राहुल गांधींनी नुकतीच संघ विचारांनी प्रेरित #विद्याभारती च्या शाळांची तुलना पाकिस्तानातील कट्टरपंथी मदरशांसोबत करत, बौद्धिक दिवाळखोरीच पुन्हा एकदा प्रदर्शन केलं आहे.
ज्यांना माहिती नाही #विद्याभारती काय आहे त्यांच्यासाठी -
➡️ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी अशासकीय शिक्षण संस्था
➡️ संपूर्ण भारतात सुमारे १८,००० प्राथमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये कार्यरत.
➡️ संलग्न विद्यालयाची संख्या जोडल्यास हाच आकडा २३,००० पर्यंत जातो.
➡️ शिक्षक संख्या - १,४७,६३४
➡️ विद्यार्थी संख्या (२०१९-२०) - सुमारे ३५ लाख
➡️ उद्देश - देशभक्तीने ओतप्रोत भरलेली युवा पिढी तयार करणे.
➡️ विद्याभारतीच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षा, योग शिक्षा, नैतिक व आध्यात्मिक शिक्षा, संस्कृत भाषा ई. विषयांवर विशेष लक्ष दिले जाते.
त्यामुळे आता जेव्हा केव्हा विद्याभारतीचा बोर्ड दिसेल तेव्हा समजून जा,
इथेच "भारताचं भविष्य" घडवलं जात आहे आणि ते खूप "प्रखर" आहे...!!🇮🇳
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पिझ्झा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येत एकदम महागडे रेस्टॉरंट, त्यांचा झगमगाट आणि त्याच भरमसाठ बिल...
पण पिझ्झाचा जन्म कसा झाला? याबाबत आपल्याला फार कमी माहिती असेल...
एकवेळ गरीबांच्या पोटाची भूक भागवणारा पिझ्झा आता श्रीमंत झालाय त्यावर एक छोटासा थ्रेड -
युरोप मध्ये नेपल्स नावाचं एक बंदर होत. खलाशी, हमाल यांच्या वर्दळीने हे बंदर कायम गजबजलेलं असायचं. इथे विश्रांती घ्यायलाही कुणाला वेळ नसायचा मग निवांत बसून भरपेट जेवण करणे तर फार दूरची गोष्ट..
पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, आणि याच गरजेचं भांडवल करून एक शक्कल बाजारात आली.
एका खानावळ वाल्याने एका रोटी वर कांदा टोमॅटोची फोडणी आणि मासळी घालून वरून भरपूर चीज टाकून एक चमचमीत आणि भूक भागेल अशी डिश तयार केली ती म्हणजे पिझ्झा...
अगदी उभ्याने पटकन खाता येईल असा हा प्रकार तिथल्या गरीब मजूर लोकांनी उचलून धरला.
अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान सुरू होत आहे. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामांच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे असा आरोप शिवसेना करत आहे.
आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निधी संकलना मागे नक्की काय प्रयोजन आहे? मला जे वाटतं त्याबद्दल हा छोटासा थ्रेड....
आपल्या देशात अंबानी, अदानी सारखे अनेक उद्योगपती आहे जे एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारू शकतात.
मात्र अशा पद्धतीने मंदिर उभारल्यास किती हिंदूंना हे मंदिर "आपले" वाटेल? राम मंदिरावर त्यांच्या "सौजन्याची" पाटी आपल्याला चालेल?
मंदिरासाठी अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचे कूपन उपलब्ध आहेत आणि २१०० रुपयांच्या वरील सर्व रक्कम चेकद्वारे स्वीकारली जाणार आहे.
त्यामुळे राजकीय पक्षनिधी मध्ये जशी गडबड होते तशी यात अजिबात होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
एकेकाळी नामवंत पैलवान आणि अधिकारी देणारा हा तालुका गुन्हेगारी साठी ओळखला जाऊ लागला होता आणि ही ओळख आम्हा सर्वांच्या मनाला लागत होती...
सर्वांनी मनाशी गाठ बांधली की काहीही करून आपल्या तालुक्याची "गुन्हेगारांची मुळशी" ही ओळख पुसायची.
४ वर्षांपूर्वी तुळजाभवानी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष भूमकर या बालमित्रांनी हा विडा उचलला. साथीला होते ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळी..
संकल्पना होती - "आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र"
एक असे केंद्र जे तरुणाईला अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम व्यक्ती होण्याची प्रेरणा देईल.
मुळशी तालुक्यात अनेक होतकरू तरुण तरुणी गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणी किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरत होते.
आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे...
परंतु इंग्रज आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे कधीच मान्य केलं नाही आणि हीच गोष्ट ते सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले, त्याचा प्रभाव इतका पडला की काही भारतीय म्हणायला लागले की, "इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाला शैक्षणिक सुबत्ता मिळाली आणि तुकड्या तुकड्यात विभागलेला देश एकसंध झाला."
इंग्रजांना भारतातून हाकलून दिल्यावरही परिस्थिती फारशी बदलली नाही.
काही राजकारणी लोकांनी वैयक्तिक स्वार्थापायी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे राजकारण करत देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम केलं.