#व्यवसाय म्हटलं की, आपल्या भारतीय लोकांना खूप भीती वाटते. १०-२० वर्षांपूर्वी व्यवसाय म्हणजे जणू काही आत्महत्याच आहे अशा नजरेने लोक पाहायचे...

पण ४० वर्षांपूर्वी अशी एक गोष्ट घडली होती की, एका भारतीयाने एका आंतरराष्ट्रीय बँकेला त्यांच्याच व्यवसायात धूळ चारली होती.
१९८० च्या सुरुवातीस कार लोन देणारी Citi Bank ही भारतातील एकमेव बँक होती.

कुणालाही कार घ्यायची असेल तर त्यांना Citi Bank शिवाय काहीच पर्याय नव्हता.

साहजिकच Citi Bank ला दुसरा कुणी स्पर्धकच नसल्याने त्यांचा व्याजदर तब्बल २८% होता.
कारची मागणी आता एवढी प्रचंड नसली तरीही त्याकाळी तब्बल ६-६ महिने waiting period असायचा.

त्यावेळी परिस्थिती ही अशी होती की, कुणाला Delivery Date च्या आधीच कार हवी असल्यास Dealers ना अधिक पैसे द्यावे लागायचे.

आणि जेव्हा कार उपलब्ध होईल तेव्हाच Citi Bank कार लोन द्यायची.
त्याच वेळी उदय कोटक यांनी ही संधी हेरली. Citi Bank सारख्या तगड्या बँकेशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी Out of the Box आयडिया शोधली.

त्यांनी Kotak Mahindra Fianance Services Ltd. ची स्थापना केली.
त्यांनी या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून शेकडो कार बुक करत थेट ग्राहकाला विकण्यास सुरुवात केल्या. ते ही कुठलाच अधिकचा दर न आकारता...!!

यामुळे waiting period ही संकल्पनाच राहिली नाही.

पण ज्यांना कुणाला कार घ्यायची असेल ती कोटक यांच्याकडूनच घ्यावी लागणार होती.
६-६ महिने कारची वाट बघावी लागत नसल्याने साहजिकच Citi Bank चा ग्राहक वर्ग कोटक यांच्याकडे वळला.

कोटक यांच्या Out of The Box आयडीयाने त्यांना बक्कळ पैसा कमवून दिला.

सांगायचं तात्पर्य हेच की, तुम्हाला तुमच्या आयडियावर विश्वास असेल तर प्रतिस्पर्धी कितीही मोठा असला तरी फरक नाही पडत.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अहम् ब्रह्मास्मि™🚩

अहम् ब्रह्मास्मि™🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @That_Pune_Guy2

4 Mar
राहुल गांधींनी नुकतीच संघ विचारांनी प्रेरित #विद्याभारती च्या शाळांची तुलना पाकिस्तानातील कट्टरपंथी मदरशांसोबत करत, बौद्धिक दिवाळखोरीच पुन्हा एकदा प्रदर्शन केलं आहे.

ज्यांना माहिती नाही #विद्याभारती काय आहे त्यांच्यासाठी -

➡️ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी अशासकीय शिक्षण संस्था
➡️ संपूर्ण भारतात सुमारे १८,००० प्राथमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये कार्यरत.

➡️ संलग्न विद्यालयाची संख्या जोडल्यास हाच आकडा २३,००० पर्यंत जातो.

➡️ शिक्षक संख्या - १,४७,६३४

➡️ विद्यार्थी संख्या (२०१९-२०) - सुमारे ३५ लाख
➡️ उद्देश - देशभक्तीने ओतप्रोत भरलेली युवा पिढी तयार करणे.

➡️ विद्याभारतीच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षा, योग शिक्षा, नैतिक व आध्यात्मिक शिक्षा, संस्कृत भाषा ई. विषयांवर विशेष लक्ष दिले जाते.
Read 4 tweets
28 Dec 20
ज्यांना वाटत छत्रपती शिवराय "सेक्युलर" होते हे त्यांच्यासाठी...!!

महाराज इतर धर्मांचा आदर करत असले तरी हिंदु धर्माचा अनादर त्यांनी कधीच सहन केला नाही.

तर गोष्ट आहे १६६३ मधली...

तळकोकणात पोर्तुगीजांची मस्ती वाढली होती. स्थानिक हिंदुंचे धर्मांतर करुन त्यांना बाटवण्यात येत होते.
हे सर्व समजताच छत्रपती शिवरायांनी तत्काळ तेथील फ्रान्सिस्को तोवेरा याला पत्र लिहून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.

स्वत: महाराज व तान्हाजीराव मालुसरे हे ३००० सैन्यानिशी तिथे बारीक लक्ष ठेवून होते.
एका रात्री सुमारे ५०० पोर्तुगीज व ४ पाद्री हे हातामधे क्रॉस घेवून धर्मांतर करण्यासाठी मांडवी नदी पार करुन एका वस्तीच्या दिशेने जाताना आढळले.

हे पाहताच महाराजांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला केला. ३००० मराठ्यांनी मिळून त्यांना छाटायला सुरवात केली. २००-२५० पोर्तुगीज ठार झाले.
Read 6 tweets
27 Dec 20
गरीबांच जेवण - #पिझ्झा

पिझ्झा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येत एकदम महागडे रेस्टॉरंट, त्यांचा झगमगाट आणि त्याच भरमसाठ बिल...

पण पिझ्झाचा जन्म कसा झाला? याबाबत आपल्याला फार कमी माहिती असेल...

एकवेळ गरीबांच्या पोटाची भूक भागवणारा पिझ्झा आता श्रीमंत झालाय त्यावर एक छोटासा थ्रेड -
युरोप मध्ये नेपल्स नावाचं एक बंदर होत. खलाशी, हमाल यांच्या वर्दळीने हे बंदर कायम गजबजलेलं असायचं. इथे विश्रांती घ्यायलाही कुणाला वेळ नसायचा मग निवांत बसून भरपेट जेवण करणे तर फार दूरची गोष्ट..

पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते, आणि याच गरजेचं भांडवल करून एक शक्कल बाजारात आली.
एका खानावळ वाल्याने एका रोटी वर कांदा टोमॅटोची फोडणी आणि मासळी घालून वरून भरपूर चीज टाकून एक चमचमीत आणि भूक भागेल अशी डिश तयार केली ती म्हणजे पिझ्झा...

अगदी उभ्याने पटकन खाता येईल असा हा प्रकार तिथल्या गरीब मजूर लोकांनी उचलून धरला.
Read 5 tweets
22 Dec 20
अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान सुरू होत आहे. हे अभियान म्हणजे प्रभू श्रीरामांच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे असा आरोप शिवसेना करत आहे.

आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निधी संकलना मागे नक्की काय प्रयोजन आहे? मला जे वाटतं त्याबद्दल हा छोटासा थ्रेड....
आपल्या देशात अंबानी, अदानी सारखे अनेक उद्योगपती आहे जे एकरकमी १५०० कोटी देऊन मंदिर उभारू शकतात.

मात्र अशा पद्धतीने मंदिर उभारल्यास किती हिंदूंना हे मंदिर "आपले" वाटेल? राम मंदिरावर त्यांच्या "सौजन्याची" पाटी आपल्याला चालेल?
मंदिरासाठी अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतचे कूपन उपलब्ध आहेत आणि २१०० रुपयांच्या वरील सर्व रक्कम चेकद्वारे स्वीकारली जाणार आहे.

त्यामुळे राजकीय पक्षनिधी मध्ये जशी गडबड होते तशी यात अजिबात होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
Read 6 tweets
25 Nov 20
गोष्ट आहे एका तालुक्याची...
एका अशा तालुक्याची जो एकेकाळी गुन्हेगारी बाबत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर होता.

तालुक्याचं नाव - #मुळशी

एकेकाळी नामवंत पैलवान आणि अधिकारी देणारा हा तालुका गुन्हेगारी साठी ओळखला जाऊ लागला होता आणि ही ओळख आम्हा सर्वांच्या मनाला लागत होती...
सर्वांनी मनाशी गाठ बांधली की काहीही करून आपल्या तालुक्याची "गुन्हेगारांची मुळशी" ही ओळख पुसायची.

४ वर्षांपूर्वी तुळजाभवानी ट्रस्टचे संस्थापक रामदास पवळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संतोष भूमकर या बालमित्रांनी हा विडा उचलला. साथीला होते ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मित्र मंडळी..
संकल्पना होती - "आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र"
एक असे केंद्र जे तरुणाईला अधिकारी आणि त्याहून अधिक एक उत्तम व्यक्ती होण्याची प्रेरणा देईल.

मुळशी तालुक्यात अनेक होतकरू तरुण तरुणी गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणी किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी ठरत होते.
Read 10 tweets
11 Aug 20
#tweet4bharat 🇮🇳
राष्ट्रीय एकात्मता आणि आपण -

आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे...
परंतु इंग्रज आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे कधीच मान्य केलं नाही आणि हीच गोष्ट ते सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले, त्याचा प्रभाव इतका पडला की काही भारतीय म्हणायला लागले की, "इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाला शैक्षणिक सुबत्ता मिळाली आणि तुकड्या तुकड्यात विभागलेला देश एकसंध झाला."
इंग्रजांना भारतातून हाकलून दिल्यावरही परिस्थिती फारशी बदलली नाही.

काही राजकारणी लोकांनी वैयक्तिक स्वार्थापायी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे राजकारण करत देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम केलं.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!