आजही आपल्या भारतभुमीकडे पाहीलं तर एक गोष्ट जी भारतीय समाजव्यवस्थेला वाळवीप्रमाणे खाते ती म्हणजे जातीप्रथा.हे जातीव्यवस्थेचं मूळ उपटण्यासाठी महाराष्ट्रात भागवतधर्मी संतांनी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.काही संत तर याच व्यवस्थेने वाळीत टाकले,त्यातील एक होते #संत_चोखामेळा..! (१/१३)
तेराव्या ( इसवी सन १३०० ) शतकात उदयास आलेल्या निस्सीम विठ्ठल भक्ताबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच! ज्ञानदेवांनी संत लोकशाहीचा पाया रोवला होता.तोच भागवतधर्म नामदेवांनी आणि चोखामेळा यांनी तत्कालीन उपेक्षित ठेवलेल्या समाजापुढे आणून ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं. (२/१३)
एक महार म्हणून जन्माला आलेल्या चोखोबां मरेपर्यंत भेदभाव आणि शिवाशिव, उच्चनीच, शुद्र अति शुद्र, सामाजिक जीवन व वर्णव्यवस्था या गोष्टींनी होरपळून निघाले होते.
लहानपणापासून विठ्ठल भक्तीची कास धरलेल्या चोखोबांनी अखेरपर्यंत ईश्वरभजनाची, नामस्मरणाची संगत सोडली नाही. (३/१३)
पंढरपुरातील विठ्ठलमुर्ती समोर असूनही त्यांना दर्शन घेता येत नव्हतं यापेक्षा एका भक्तासाठी वाईट काय असु शकेल.जातीव्यवस्थेची दरी इतकी खोल जी होती. गुलामांसारखं वागवल्या जाणाऱ्या समाजाला भक्तीमार्गाकडे वळवणं हे काही सोप्पं कार्य तर नव्हतंच. (४/१३)
संत नामदेवांना गुरू मानलेल्या चोखोबांनी आपल्या अभंगातून आणि भजनातून दलित समाजात आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यास सुरुवात केली पण तत्कालिन उच्चवर्णीय लोकांना ते देखील गळी उतरायचं नाही. (५/१३)
आत्मविकासाची संधी आपल्या साध्यासरळ नामस्मरणातून आणि भजणातून साधता येते याचा आदर्श चोखोबांनी घालून दिला होता. (६/१३)
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या चोखोंबाचं जीवन जातीपातीच्या आणि सतत जाती द्वेशाने कोंडलं जात होतं तरी देखील त्यांनी अखंड नामस्मरणाची कास मरणानंतरही सोडली नाही.उपेक्षितांपर्यंत भक्तीमार्ग पोहोचविताना ते आपल्या अभंगात म्हणतात,
(७/१३)
एका संस्कारसंपन्न आणि ईश्वराशी एकरूप झालेल्या चोखामेळांचं जीवन किती काट्याकुट्यांनी भरलेलं होतं हे अनुभवणं देखील आत्ताच्या पिढीला महाकठीण कर्मच आहे.गावकुसाच्या कामात कार्यरत असताना दरड कोसळून चोखाबा त्याखाली गाडले गेले. (८/१३)
त्याचं शरिर शोधून देण्याइतपत कार्य देखील त्यावेळच्या गलिच्छ विचाराच्या लोकांनी केलं नाही हेच त्याकाळच्या व्यवस्थेचं विश्व डोळ्यासमोर उभं करतं. मेल्यांनतरही त्यांच्या हाडांमधून विठ्ठल नामाचा जयघोष नाद करत होता. (९/१३)
परमानंदात वावरणं काय असतं याची साक्ष चोखोंबाच्या रुपानं आपल्याला मिळते.नामदेवांनी याच नादाचा आधार घेत त्यांच शरीर शोधलं आणि पंढरपुरात समाधी बांधली.
संत नामदेव आपल्या शिष्याची महती गाताना म्हणतात, (१०/१३)
चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।
चोखामेळांचे अभंग हे तुकारामांच्या जीवनाला (११/१३)
देखील दिशा देण्यास कारणीभूत ठरले, हेच सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’
म्हणजे उपेक्षितांचा आवाज आणि तळमळ ईश्वरचरणी मांडण्याचं आणि पतितांना तारण्याचं कार्य चोखामेळा यांनीच केलं. (१२/१३)
आज ज्या उच्चवर्णीय समाजाने त्यांना वाळीत टाकलं तोच समाज त्यांच्या समाधीजवळ नतमस्तक होतो हिच संतश्रेष्ठ चोखामेळांच्या निस्सीम श्रद्धा आणि महानतेची साक्ष आहे. (१३/१३)
दिनकरराव जवळकर आणि र. धो कर्वेंच्या वादग्रस्त खटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या तिसर्या खटल्याबाबत खूपच कमी जणांना ठाऊक आहे. तर खटला चालला होता फिलीप स्प्रॅट या ब्रिटिश लेखकावर! फिलीप स्प्रॅट ( २६ सप्टेंबर १९०२ - ८ मार्च १९७१ ) हा ब्रिटिश लेखक होता. (1/11)
फिलीप हा कम्युनिस्ट होता, फिलीपला ब्रिटिश आर्म ऑफ कम्युनिस्ट इंटरनॅशनल ने भारत आणि मॉस्को येथे कम्युनिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं होतं. फिलीप हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक मनबेंद्रनाथ रॉय यांचे मित्र आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. (2/11)
भारतीय कम्युनिस्ट चळवळीत चैतन्य उत्पन्न करण्यासाठी ते भारतात आले. फिलीप स्प्रॅट यांनी 'इंडिया अँड चायना' या मथळ्याखाली 'नॅशनल हेरॉल्ड' मधुन लेख लिहीण्याचं कार्य केलं. या लेखांचं संपादन 'क्रांती' या नियतकालिकाचे संपादक श्री मिरजकर यांनी प्रसिद्ध केलं होतं. (3/11)