#Thread #अमर_सावरकर #वीर_सावरकर_जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग २):-
इंग्रजांच्या क्रूर आणि निर्दयी जाचातून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी जो अविरत स्वातंत्र्यलढा झाला त्यात एक मोठं योगदान आहे ते सावरकर कुटुंबाचं.ज्यात तिन्ही भाऊ तर प्राणपणाने लढलेच पण
१
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
२/
थुंकण्यासारखे आहे.
जर आपण ह्या सावरकर विरोधी लोकांचा 'अर्ज केले म्हणून ते माफीवीर होतात आणि ब्रिटिशांचे गुलाम होतात' हा तर्क विचारात घ्यायचा म्हणलं, तर मग ज्यावेळी सावरकरांची सुटका झाली त्यावेळेपासून त्यांनी सर्व सोडून द्यायला हवं होत. त्यांचं सामाजिक आणि राजकीय जीवन संपुष्टात
३/
यायला हवं होत. पण इतिहास तर काही वेगळंच सांगतो..!
१९२४ साली सावरकरांना स्थानबद्धतेत रत्नागिरीत ठेवण्यात आले. त्याकाळात त्यांच्यावर राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची बंदी घालण्यात आली. तेंव्हा सावरकरांनी सगळ्यात महत्वाचे काम हातात घेतले ते म्हणजे 'समाजसुधारणा' करण्याचे.
४/
त्यांनी अंदमानात असताना शुद्धीकरणाची अर्थात परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदूधर्मात घेण्याची मोहीम चालू केली होती, ती रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात चालू केली. तात्यांचा अगदी स्पष्ट विचार होता की "एखाद्याने स्वखुशीने धर्म स्वीकारला तर ते योग्य आहे पण एखाद्याला बळजबरीने धर्मांतर
५/
करण्यास लोक भाग पाडत असतील ते अत्यंत चुकीचे आहे." त्यांचं एकच म्हणणे होते जोपर्यंत मुस्लिम व ख्रिश्चन लोक हिंदूंना बळजबरी धर्मांतर करण्याचे कमी करत नाहीत तोपर्यंत मी हे शुद्धीकरण चालूच ठेवणार. ह्यात मग धर्मांतर केलेल्या लोकांचे संसार थाटून देणे,त्यांना समाजात मान्यता मिळवून
६/
देणे अशा विविध योजना हाती घेतल्या.त्यानंतर हिंदू समाजाच्या सुधारणेचे काम त्यांनी हातात घेतले.ज्यात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काम केले गेले.अस्पृश्यतेमुळे हिंदू समाज विभागून गेला होता त्यामुळे समाजास एकत्र करायचे असेल तर अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे असे सावरकरांचे म्हणणे होते.
७/
त्यासाठी त्यांनी मंदिरात बहुजन लोकांना प्रवेश मिळवून देणे,शाळेमध्ये सर्वांना समान अधिकार, सर्वांचा गणेश उत्सव अशा गोष्टींचा अवलंब केला.तसेच त्यांनी सर्वांना प्रवेश देणारे पतित पावन मंदिर उभारले.ज्याच्या प्राणप्रतिष्ठेत बहुजनांचा देखील सहभाग होता. हळू हळू हेच पतित पावन मंदिर
८/
समाज जागृती कार्यक्रमाचे विद्यापीठ झाले. ज्यात सर्व समाजाचे सहभोजन,स्त्रियांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम अशा कार्यक्रमाद्वारे हिंदूंना एकत्र करण्याचे काम केले.
ह्या सर्व उपक्रमांच्या बातम्या सर्वदूर पसरल्या. त्यावेळी सावरकरांची सगळीकडे स्तुती होऊ लागली. कर्मवीर व्ही आर शिंदे
९/
म्हणतात की "जर सावरकरांच्या विचारांचा अवलंब केला तर अस्पृश्यता काही काळातच भारतातून नष्ट होईल."तसेच काकासाहेब बर्वे म्हणत की "सावरकर म्हणजे गौतम बुद्ध,शिवाजी महाराज आणि स्वामी दयानंद ह्यांचे एकत्र प्राकट्य आहे."
ह्या समाजसुधारणेबरोबर त्यांनी मराठी भाषा शुद्धीकरणाची चळवळ
१०/
चालवली. मराठीत आक्रमित झालेल्या इंग्लिश व उर्दू शब्दांना प्रतिशब्द तयार केले. सगळ्यांना नवीन माहिती करून दिली व वापरण्याची सक्ती केली. हे त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळातील त्यांच्या अफाट कामाचं संक्षिप्त वर्णन.
१९३७ ला त्यांची संपूर्ण मुक्तता झाली. त्याबरोबरच त्यांनी हिंदू
११/
महासभेचे कार्य हाती घेतले.या काळात त्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला. सगळीकडे त्यांचं खूप भव्य प्रमाणात स्वागत होत असे. त्यांच्या स्वागताला इतकी गर्दी होई की सभेच्या ठिकाणी जायला कधी कधी २-२ तास वेळ होई. १९३७ पासून पुढे ते सलग सहा वेळा हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिले.
१२/
त्याकाळी काँग्रेस तिच्या मुळ उद्दीष्टांपासून भिन्न वागत होती. मुस्लिमांचे लांगुलचालन करणे ह्यातच काँग्रेस धन्यता मानत असे. तसेच मुस्लिम लीगचे कार्यक्रम पण हिंदूंना त्रासदायक होऊ लागले होते. अशा काळात सावरकरांनी सर्व हिंदूंना आधार दिला. "एखादा देश हा त्याच्या बहुसंख्य असलेल्या
१३/
लोकांच्या संस्कृतीवरच ओळखला जात असतो त्यामुळे भारत हे एक 'हिंदूराष्ट्र' म्हणूनच ओळखले जायला हवे."असे तात्यांचे स्पष्ट मत होते.तात्यांनी आपल्याला हिंदूची अगदी स्पष्ट व्याख्या दिली आहे. ते म्हणतात,
आसिंधूसिन्धुपर्यन्ता,यस्य भारत भूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव सवै हिन्दुरिति स्मृतः।।
अर्थात सिंधू सागरापासून ते सिंधूनदीपर्यंत असलेली ही भूमी ज्याची 'पितृभू' आहे तोच 'हिंदू' आहे. तसेच त्यांनी अखंड भारताचा कायमच पुरस्कार केला. अंदमानात प्रचंड कष्ट,नंतर स्थानबद्धता असे अनेक आघात सहन करून पण सावरकर हिंदू रक्षणार्थ हिमालयासारखे अचल उभे राहिले. अशा अहोरात्र भारतीय
१४/
लोकांसाठी खचलेल्या ह्या दिव्य पुरुषास काही बुद्धिहीन लोकं हवे त्या भाषेत टीका करतात हे अत्यंत लाजिरवाणे आहे.
अहो जर सावरकर देशभक्त नसले असते तर एवढी कठोर शिक्षा भोगून परत त्यांनी एवढं कष्टमय जीवन कशाला जगलं असतं.? सगळं सोडून आरामात राहता आलं असतं ना त्यांना..!
१५/
सावरकर जर देशभक्त नसते तर बाकी देशभक्तांनी त्यांच्यासाठी गौरवोद्गार कशाला काढले असते. काही उदाहरणे आपण पाहू. क्रांतिवीर भगत यांनी तात्यांचं '१८५७ चा स्वातंत्र्य लढा' ह्या पुस्तकाच्या २००० प्रती छापून लोकांमधे वाटल्या होत्या.तसेच त्यांच्या
१६/
सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तात्यांच 'हिंदूपदपादशाही' हे पुस्तक वाचण्याची सक्ती असे. ज्यावेळी भगत सिंह व इतर लोकांना फाशी झाली त्यादिवशी सावरकरांच्या घरावर भगव्या ऐवजी काळा झेंडा होता.तसेच त्यांनी या वीरांवर कविता देखील केली.
१९४० साली सावरकरांची आणि सुभाषचंद्र बोस
१७/
यांची मुंबई इथे भेट झाली.त्यात ते म्हणतात की "सावरकरांची सुटका झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्यासारख्या नेत्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात नवी उर्मी येईल."पुढे १९४२ मध्ये रेडिओ वर बोलताना ते म्हणाले की "मला खूप आनंद वाटत आहे की वीर सावरकर युवकांना आझाद हिंद फौजेत येण्यासाठी
१८/
आग्रह करत आहे." त्याचप्रमाणे असफ अली म्हणतात की "सावरकरांच्या रुपात मला शिवाजी महाराजांचा आभास होतो."
सगळ्यात महत्वाचं भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या एका पत्रात म्हणातात की "सावरकर हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत..!" तसेच त्यांनी सावरकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डाक
१९/
तिकीट ही जाहीर केले होते.
आता वाचकांनी ठरवावे की ह्या वरील लोकांवर विश्वास ठेवायचा की खोट्या आरोपांवर...!! स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सकळ गुणांची खाण होती.म्हणजे एक एक गुण वर्णन करायचा म्हणलं तर खंड तयार होतील पुस्तकांचे.
२०/
मातृभूमीसाठी प्राणांतिक प्रेम,एक उत्तम लेखक,कवी,वक्ता,हिंदू हितार्थ जीवनभर काम, राजकीय आणि सामाजिक दूरदृष्टी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक समाजसुधारक.अशा ह्या थोर महापुरुषाच्या ऋणातून भारत कधीही उतराई होऊ शकणार नाही.!
धन्यवाद.! #VeerSavarkar @ShefVaidya@smitprabhu@thatPunekar
संदर्भ:-
१) माझी जन्मठेप - स्वा सावरकर
२) माझ्या आठवणी - स्वा सावरकर
३) Echoes from Andamans - Veer Savarkar
४) सावरकर चरित्र - शी ल करंदीकर
५) Savarkar and His Times - Dhananjay Keer
६) Struggle for Freedom - R C Majumdar
७) Swarajya,OpIndia and StandPointIndia's Articles
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा भाग १ ची लिंक:-
जन्माला आल्यापासून ते मृत्यूपावेतो प्रत्येक क्षणी केवळ आणि केवळ गुरुंच्या मार्गदर्शनाने ह्या अपार संसारसागरात मनुष्य वावरु शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२/२५
'गुरू' शब्दाच्या व्याख्येचा विचार करायचा झाला तर, शास्त्रकार सांगतात,
गुरु - गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते।।
अर्थात 'गु' कार म्हणजे अज्ञानरुपी अंधकार व 'रु' कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज.
३/२५
#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना, @ShefVaidya@authorAneesh@MulaMutha #Temples#मंदिर#राम
१/
जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!
२/
या सर्व मंदिरांना उत्तम स्थितीत पाहून मनाला अतिशय संतोष वाटला.
त्यात मला श्रीराम मंदिराची भावलेली भव्यता,सुंदरता आणि रमणीयता इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
फलटण गावात स्थित असणारे श्रीराम मंदिर हे श्रीमंत निंबाळकर यांच्या राजवाड्याच्या परिसरात आहे.
३/
#Thread #ज्ञानेश्वरी_जयंती
-:अद्वैतामृतवर्षिणी भगवती ज्ञानेश्वरी जयंती :-
आज मराठी भाषेतील सर्वच पैलूने श्रेष्ठ ठरणारा ग्रंथ कुठला असा जर प्रश्न विचारला गेला तर याचे सर्वानुमते केवळ एकच उत्तर आहे तो ग्रंथ म्हणजे 'भगवती ज्ञानेश्वरी'.
१/ @Kal_Chiron@ShefVaidya@swamiyogeshji
कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
केवळ संस्कृत भाषेच्या जाणकार लोकांमध्ये सीमित झालेले ब्रह्मज्ञानाचे भांडार ज्ञानेशांनी अगदी सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीद्वारे खुले करून दिले व त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज
२/
साधकांची 'माऊली' झाली..! आणि त्यानंतर मग जो अमृताचा वर्षाव सगळ्या महाराष्ट्र भूमीवर झाला की अगदी आजपर्यंत साधक लोक त्यात अखंड न्हाहून आपल्या जीवनाची इतिकृत्यता करून घेत आहेत.
योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी गलितगात्र झालेल्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतेचा साक्षात्कार अखिल
३/
#दीपअमावस्या
दीपसूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेजमुत्तमम्।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।
आज आषाढ वद्य अमावस्या. आजच्या अमावस्येला 'दीप अमावस्या' देखील म्हणतात. आपल्या सनातन धर्मात आपल्याला आपल्या कार्यात आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
१/
काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
२/
व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी घरातील सर्व समई नीरांजन वैगरे गोष्टी धुवून स्वच्छ केल्या जातात व नंतर त्याची पूजा केली जाते. आजच्याचं दिवशी समई निरांजन स्वच्छ करण्याचं व पूजा करण्याचं कारण हेच की उद्यापासून श्रावण महिना चालू होणार व
३/
#Thread #गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/ #GuruPurnima2021 @ShefVaidya
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
काही मतीस कळाले ते मांडण्याचा प्रपंच इथे करत आहे.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की 'गुरु' या शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्रकारांनी गुरु ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की,
गुरु -
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
३/
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/ @Kal_Chiron@ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/