#अंदमानातील_कथित_यादी
'नेमेची येतो मग पावसाळा' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांपासून सावरकरांच्या प्रत्येक जयंती-पुण्यतिथीच्या वेळी ११४ कथित क्रांतिकारकांची एक यादी समाजमाध्यमातून फिरवण्यात येते.यादीतील प्रत्येक नावाआधी आवर्जून 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी जोडलेली असते आणि हे सर्व
सेल्युलर जेलमधील छळांना पुरून उरले व त्यांनी कधी माफी मागितली नाही,अशा अर्थाचा मजकूर फिरत असतो.ते वाचून अनेकांची सत्यासत्यतेची विचारणा होत असते.त्यासाठी खुलासा-
सेल्युलर जेलच्या मध्यभागी असलेल्या वॉच टॉवरच्या भिंतींवर तत्कालीन केंद्रसरकारने राज्यनिहाय राजबंद्यांची यादी लावली आहे.
त्यात महाराष्ट्रातील केवळ तीनच नावे दिसतात. दोन सावरकर व एक वामन जोशी..!
(छायाचित्रात स्पष्ट नामोल्लेख दिसेल.)
#अंदमान #सावरकर #काळेपाणी #म #मराठी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Satchidanand Shevde

Satchidanand Shevde Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @satchidanand_s

31 May
#साठवणीतील_आठवण
चार वर्षांपूर्वी सिडने,ऑस्ट्रेलिया येथील विश्व सावरकर संमेलन संपल्यावर न्यूझीलंडला आलो. रोटोरुआत मुक्काम केल्यावर ऍग्रोडोमच्या फार्म शो मध्ये नाना जातीच्या मेंढ्या व लोकर भादरणे पाहून रेनबो स्प्रिंग हे देखणे पक्षी आवास पाहून पुढे हॉबिटनकडे निघालो.
विश्वामित्राची प्रतिसृष्टी कशी असेल,याची झलक हॉबीटन मुव्ही सेट पाहून मिळाली.ज्यांनी 'लॉर्ड ऑफ़ द रिंग्स' आणि 'द हॉबिट' (तीन भाग) चित्रपट पाहिले असतील त्यांना सेटची कल्पना येईल.१२५० एकरच्या हिरव्याकंच कुरण टेकड्यांवर हा सेट पसरला आहे.होबिट्सची छोटी घरे, खऱ्या खोट्या भाज्या,
लाकडाचे सरपण, वाळत घातलेले छोटे कपडे, छोट्या चिमण्यातून निघणारा धूर, एका टेकड़ीवर उभा असलेला कृत्रिम वृक्ष आदी गोष्टी तोंडात बोट घालायला लावणाऱ्या होत्या. केवळ तीन सेकंदाच्या दृश्यासाठी सफरचंदाच्या झाडाची पाने तोडून तिथे बहुधा मेपलची हुबेहुब पण खोटी पाने डकवून शॉट घेणाऱ्या
Read 5 tweets
23 May
#सावरकर_आणि_द्विराष्ट्रवाद
१९३७ च्या कर्णावती येथे केलेल्या भाषणावरुन सावरकरांना सर्रासपणे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे ठरवले जाते.अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या सय्यद अहमद यांनी हा विचार १८८८ मध्ये सर्वप्रथम मांडला,त्यावेळी सावरकर केवळ पांच वर्षांचे होते,या
तथ्याकड़े जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते.
एशियन एजच्या संपादकाने २६ फेब्रुवारी २००३ च्या अग्रलेखात सावरकरांच्या 'त्या' भाषणातील एकच ओळ छापून कहर केला.
हिन्दू हे एक राष्ट्र आहेत असे संबोधता येईल,असे म्हणून सावरकर पुढे जे म्हणतात ते टीकाकारांना बहुधा दिसले नसावे वा विस्मृतीत
गेले असावे.त्या भाषणात सावरकर म्हणतात,हिंदी राज्य मात्र निर्भेळ असू द्या.त्या राज्याने मताधिकार,नोकऱ्या,अधिकाराची स्थाने,कर या संबंधात धर्माच्या नि जातीच्या संदर्भात कसल्याही मत्सरोत्तेजक भेदान्ना मुळीच थारा देऊ नये.कोणताही मनुष्य हिन्दू आहे की मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू
Read 5 tweets
22 May
प्रसंग #दुसरे_महायुद्ध
स्थळ- #अमेरिका
कर्नल पदावर विराजमान होते,बेडल स्मिथ,सेक्रेटरी ऑफ द जनरल स्टाफ.
ते जनरल मार्शल यांच्या कार्यालयात गेले.त्या दोघांमध्ये झालेला संवाद....
जनरल मार्शल- काय काम आहे, स्मिथ ?
बेडल स्मिथ- सर, बाहेर एक गृहस्थ आले आहेत. त्यांच्याकडे मजबूत बनावटीच्या
बनावटीच्या गाडीचे आराखडे आहेत.हे आराखडे त्यांना सरकारला द्यायचे आहेत.तशी त्यांची इच्छा आहे.तथापि त्यांचे कोणीही ऐकून घेण्यास राजी नाहीत.म्हणून ते आपल्याला भेटायला आले आहेत.
जनरल मार्शल- तू स्वतः आराखडे पाहिले आहेस का?
बेडल स्मिथ- होय
जनरल मार्शल- कसे आहेत?
बेडल स्मिथ- मला वाटते,
त्याचा शोध उत्तम आहे.
जनरल मार्शल - मला एवढे पुरेसे आहे. त्याला एक गाडी तयार करायला सांग.
बेडल स्मिथ- सर, गाडीची चाचणी घेण्यासाठी किमान पंधरा गाड्या कराव्या लागतील.
जनरल मार्शल- तू पैसे उभे करू शकशील?
बेडल स्मिथ- होय, 12 सहस्र डॉलर्स लागतील.
जनरल मार्शल- ठीक आहे काम हातात घे.
Read 4 tweets
20 May
आज रामायण FAQ मध्ये एका नवीन प्रश्नाचे उत्तर लिहीलं ...
गैरसमज - वाली रक्षणकर्ता होता. रामाने त्याला मारल्यावर म्हण आली,“कोणी वाली राहिला नाही”

उत्तर - हा 'वाली' समजण्यासाठी आपल्याला इस्लामी निकाह समजून घ्यायला हवा. इस्लामी निकाह हा मिया आणि बिवी यांच्या मधील करार असतो. या
करारातील एक पार्टी (मिया)असा करार एका वेळेला ४ बिवींशी करू शकतो.काही इस्लामी पंथात,निकाह ठराविक काळासाठी सुद्धा करायची सोय आहे.त्यामध्ये मिया असा निकाह किंवा करार, ३ दिवसांपासून ते काही वर्षांपर्यंतच्या काळासाठी करू शकतो.
या करारनाम्यात,निकाहाच्या वेळी,मियाने बिविला तलाक दिल्यास
(म्हणजेच त्याने हा करार मोडल्यास)"मी तुला अमुक इतकी रक्कम देईन",असे नमूद करणे आवश्यक असते.या रकमेला 'मेहेर' म्हणतात.तलाक दिल्यावर बिवीला 'मेहेर' मिळतो किंवा ती तो मागते.जो मिया मेहेर देतो त्याला 'मेहेरबान' म्हणतात.अरबी भाषेतून मराठीत आलेला हा अजून एक शब्द. "मेहेरबानी करणे" उपकार
Read 5 tweets
11 May
#संग्राह्य
'चर्चचे वास्तव' या छोटेखानी पुस्तकाचा परिचय करून दिल्यानंतर अनेकांनी या विषयावर एखादे विस्तृत माहिती देणारे पुस्तक आहे का,अशी पृच्छा केली आणि आमच्या संग्राहातील 'ख्रिश्चँनिटी आणि हिंदुस्थान' या पुस्तकाची आठवण झाली.वैद्यकीय व्यवसायात असणाऱ्या डॉ.अरविंद गोडबोले यांनी
सत्यान्वेषण करून,भरपूर तळटीपा,विस्तृत संदर्भ ग्रंथ यादी दिल्यामुळे या ग्रंथाला प्रचंड संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.प्रस्तुत ग्रंथाची अनुक्रमणिका पाहिली की विषय व्याप्ती कळते.ख्रिश्चँनिटी- तत्वज्ञान व इतिहास,येशू ख्रिस्ताचे मूळ शिष्य व हिंदुस्थान,युफ्रेटीसचा तीर,सीरियन ख्रिस्ती व
पोर्तुगीजपूर्व मिशनरी,हिंदुस्थानातील पोर्तुगीजांच्या आगमनाची पार्श्वभूमी,मलबारमध्ये पोर्तुगीजांचा चंचुप्रवेश,गोवे व अन्यत्र पोर्तुगीज राज्यस्थापना, पोर्तुगीज शासन व कॅथलिक धर्मपीठ यांचे हिंदूंवर अत्याचार,इन्क्विझिशन, हिंदूंचा विविध प्रकारे धर्मछळ,रॉबर्ट डी नोबिली व फादर स्टीफन्स,
Read 5 tweets
10 May
#हौतात्म्यदिन
महादेव विनायक रानडे हा विज्ञान शाखेचे शिक्षण घेणारा तरुण चापेकर बंधूसोबत होता.उंचापुरा व भक्कम शरीराचा हा युवक रँड व आयर्स्ट यांच्या वधात सामील होता.प्लेगमधील अत्याचारांमुळे शनिपारावर डोके आपटून २ स्त्रियांनी जीव दिल्याचा निषेध मवाळपक्षीय गोपालकृष्ण गोखले यांनी
केला.त्यावर सरकारने नाराजी दाखवताच भारतात परतल्यावर ते क्षमा मागून मोकळे झाले.त्यावेळी टिळकांनी त्यांना,पुरावे देतो पण क्षमा मागू नका,असे सांगितले होते.
पुढे एकदा सरदारसिंग राणा म्हणाले होते की,गोखल्यांची एम्.ए. ही पदवी master of apologies म्हणून शोभते.
फितूर द्रविड़ बंधुंना
मारण्यात वासुदेव चापेकर यांच्यासह महादेव रानडे सामील होते.पकड़ले गेल्यावर सर्व आरोप त्यांनी निडरपणे स्वीकारले.
त्यांचे मवाळ पंथीय मामा प्रा.वैजनाथ राजवाड़े त्यांना भेटायला तुरुंगात आले होते,तेव्हा त्यांनी सूचवले की, टिळक हे या कटात सामील होते अशी साक्ष दे, मी तुला यातून बाहेर
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(