बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब देश" अशी तर भारताला त्यांनी मदत पाठवली म्हणून त्या आडून मोदींना नको नको ती दूषणे दिली जात आहेत.

आता केनियाबद्दल एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि
ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात म्हणजे

"मसाई"!

मसाई लोकांपर्यंत अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या हल्ल्याची बातमी पोहोचायला कित्येक महिने लागले.तिथेच जवळच्या
गावात राहणारी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा तिने मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.
एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली गाडली जाऊन इतकी माणसे मरू शकतात वगैरे गोष्टी सध्या झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी अविश्वसनीय होत्या.परंतु तरीही त्यांना त्या हल्ल्यात सापडलेल्या अमेरिकी लोकांबद्दल वाईट वाटले आणि त्याच विद्यार्थिनीच्या माध्यमातून
केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवले.त्यांनी ते पत्र वाचले.
विल्यम ब्रॅंगिक प्रथम विमानात चढले.काही काळ हवाई प्रवास आणि मग तिथून मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा मोडक्यातोडक्या वाटेने प्रवास करत ते तेथे पोहोचले
गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत १४ गायी घेऊन ते अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. मसाई जमातीच्या एका जेष्ठ पुरुषाने गाईंचा दोर त्या उपप्रमुखांच्या हातात देऊन एका फलकाकडे बोट दाखवलं. त्या फलकावर काय लिहिले होते ते तुम्हाला माहिती आहे?
त्यावर लिहिले होते -
"या दु:खाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत".

होय, ते पत्र वाचल्यानंतर, जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या राजदूताने चौदा गायींचे दान गोळा करण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास केला होता.
पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधने ! या दोन्हीमुळे त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतुन एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल
म्युझियममध्ये ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

पण ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यावर काय घडलं माहित्ये?
त्यांनी आभूषणांच्या जागी गायीच स्वीकारण्याचा आग्रह धरला.मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या,आभूषणे करू नयेत.
मग अधिकाऱ्यांना, नोकरशहांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली, आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले, आणि गायी स्वीकारल्या.

***
कृपया १२ टन धान्याकडे पाहू नका ते स्वीकारा. ते तुलनेने कमी असेलही कदाचित, परंतु दान नव्हे, दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पहा. लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा.
#सुदाम्याचे_पोहे #दानशूरकेनिया

राजीव शुक्ला यांच्या मूळ हिंदीतील लेखाचे मित्रवर्य Rahul Suryakant Boke यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या पोस्टमध्ये अर्थाला धक्का न लावता काही संपादन करून मंदार जोशी ह्यांनी सादर केलेली फेसबुक पोस्ट.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🚩प्राओ™🚩

🚩प्राओ™🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @BalshaliBharat

12 May
आज मुंबई हायकोर्टात काय झालं नक्की वाचा -

मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची स्थिती काय?

महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड शिंदे : 11 मे रोजी 1700 मेट्रीक टन

मुख्य न्यायाधीश : आणि केंद्र सरकारने किती दिला?

अ‍ॅड.शिंदे : 1779 मेट्रीक टन
मुख्य न्यायाधीश : राज्य सरकारने दररोज 70 हजार रेमडेसिवीर पाहिजे अशी मागणी केली आहे, हा आकडा कुठून ठरविला. यात काहीतरी समन्वयाचा अभाव दिसतो.

अ‍ॅड.शिंदे : हा आकडा सक्रिय रूग्णांवर आधारित आहे.

मुख्य न्यायाधीश : आधी 50 हजारांची मागणी आणि नंतर 70 हजारांची आणि आता तर सक्रिय रूग्ण कमी
होत असताना तीच मागणी कशी?

(केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे 21 एप्रिल ते 11 मे या काळात 8,01,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाल्या आणि 16 मे पर्यंत 11,57,000 असा कोटा रिवाईझ झाला.)

मुख्य न्यायाधीश : आमचा आदेश का पाळत नाही. पेशंटला रेमडेसिवीर आणायला का सांगितले जाते?
Read 7 tweets
17 Apr
शिवसैनिकांचे आजच्या सामना मधून प्रबोधन :
ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला आहे.. पहिल्या लाटेला चीन जबाबदार 'असेल' (अजूनही हे यांना कन्फर्म नाही बरं का), पण दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार 'आहे'
(हे मात्र यांना कन्फर्म माहीत आहे)!- दै.सामना
आता,फॅक्ट-चेक :
जास्त लांब जायची गरज नाही. जिकडे निवडणुका आहेत, त्या पाच राज्यांतील कालचेच आकडे बघूया पश्चिम बंगाल :6901 (26 मृत्यू)
केरळ :10031 (21 मृत्यू)
पुद्दुचेरी :531 (3 मृत्यू)
तामिळनाडू :8449 (33 मृत्यू)
आसाम : 537 (4 मृत्यू)
टोटल : 26449 नवे रुग्ण ( 87 मृत्यू)

आणि, जिकडे निवडणुका नाहीत त्या महाराष्ट्रातले कालचे आकडे -
महाराष्ट्र :63729 नवे रुग्ण (398 मृत्यू)

म्हणजे -
★ ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत त्यात आढळलेले रुग्ण आहेत 26449,जे निवडणुका नसलेल्या महाराष्ट्राच्या कालच्या 63729 नव्या केसेसच्या
Read 6 tweets
3 Jan
Forwarded message!!

नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .

मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/आवड आहे .

गेली ४वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे
आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.

ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German
with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
खाली पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक दिली आहे


आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे
Read 7 tweets
2 Jan
#संवाद
🙍‍♀️आप कहाँ तक जाने वाले हो?
🙍मै जालुकी जाऊँगा।
🙍‍♀️अच्छा, हम लोग तेनिंग जा रहे है।
🙍कहां से आए हो? मुंबई?
🙍‍♀️हां, महाराष्ट्र से आए है। स्टुडंट के घर जा रहे है और अपना स्कूल है यहाँ वो भी देखना है। आप से एक बात पुछ सकती हूं?
🙍हा, पुछो। जवाब देने को आएगा तो देंगे।
🙍‍♀️आज के नागालॅंड में पहले से कुछ फर्क हुआ है? आपको कुछ बदलाव नज़र आता है?

🙍अरे मॅडम, क्या बदलाव हुआ कैसे बोलेगा? जैसा था सब वैसा ही है। जिंदगी में अलग कुछ देखा ही नही है। कल भी हक के लिए बन्दूक उठाते थे और आज भी वही कर रहे है। हां थोडा बहुत बदलाव हुआ है जो आप जैसे लोग अब यहां
दिखाई देते है। नही तो इतने अंदर गाँव मे कोई नही आता। आप लोग पेन पकडने बोलते है लेकिन उससे हमारे अधिकार हमें नही मिलते। शायद हमारे बच्चे पेन पकडकर अपना हक मांग सकेंगे लेकिन तब तक बन्दूक तो उठानी ही पडेगी।
🙍‍♀️बात करके भी तो अपने हक मांग सकते हो, बन्दूक हर बात का इलाज नही है।
Read 4 tweets
20 Sep 20
नागा करार - मुईवांची मिजास उतरवणार!

नागा करारावर सह्या होण्याचा अंतिम दिवस,३० सप्टेंबर जसजसा जवळ येत आहे तसतसे राजकीय चित्र ही स्पष्ट होत चालले आहे. थुईंगा लेंग मुईवा वेगळा नागा झेंडा आणि वेगळी नागा घटना यावर अडून बसले असले तरी यापुढे मुईवांच्या अडेलतट्टू पणाला मुळीच भीक न घालता
नागा पाॅलिटीकल ग्रुपसह अन्य नागा सामाजिक संस्था बरोबर नागा करार करायचाच असा ठाम निश्चय करून केंद्र सरकारची पावले पुढे पडत आहेत. त्यामुळेच सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्व प्रमुख नागा राजकीय आणि सामाजिक संस्थांचे नेते नवी दिल्लीत डेरेदाखल होत आहेत. मध्यस्थ आणि नागालँडचे राज्यपाल
असलेले श्री आर.एन.रवी दिल्लीत दाखल होणार आहेत.त्यामुळे घटना चक्राला वेग आला आहे. श्री आर.एन. रवी ह्यांच्याशी बोलणी करणार नाही अशी भूमिका घेतलेले थुईंगा लेंग मुईवा इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बोलणी करीत आहेत.थुईंगा लेंग मुईंवांच्या धमक्यांना आणि दडपणाला झुगारून
Read 10 tweets
27 May 20
प्रवास वर्णन

२०१७-२०१८ चा नागालँड दौरा, एक अनुभव!

पहिल्या वर्षी तेनिंगला गेले नाही ह्याच शल्य फार मोठ होत कारण आल्यावर जो तो विचारे, "तेनिंगला नाही गेलीस?" मग ह्या वर्षी जायचच अस ठरवलं होत. त्या प्रमाणे दीमापूर वरून तेनिंगला जायला आम्ही सज्ज झालो होतो. आम्ही म्हणजे मी स्वतः +
आमचे संभाग प्रमुख श्री अभिनय बोरकर, ईशान्य वार्ताचे संपादक श्री रानडे,डोंबिवली छात्रावास प्रमुख यांच्या सौ.स्नेहलता कुलकर्णी आणि आमची लाडकी लेक पिपीना व तिचा भाऊ मैरवी.कुठे जात नसले तरीही ह्या मुलांना गाडी लागतेच!म्हणजे गाडीत बसल की व्याक व्याक होतच. काहींना तर रेल्वे ही लागते, +
फक्त त्यात व्याकत नाही कुणी इतकच. तेनिंगला आम्ही नागालँड स्टेट ट्रान्सपोर्ट (NST) ने प्रवास करायचा ठरवला होता. खूप कौतुक ऐकल होत तिच. हिरवळीतल्या राज्याची ही राणी पण हिरव्या रंगाची आहे. साधारण ४२ सीटची सोय असलेली बस दीमापूरला आम्ही डेपो मधुन पकडणार होतो.+
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(