भारताच्या लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) #COVID19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा @DDNewslive वर भारताच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेविषयी सांगत आहेत, लाईव्ह अपडेट्स साठी पाहात राहा

#Unite2FightCorona
भारताकडे सध्या 2 लसी आहेत- कोविशील्ड आणि कोवॅक्सिन. कोवॅक्सिनच्या 2मात्रातील अंतर 4 आठवड्याचे आहे आणि हे अंतर योग्य असल्याचे सातत्यपूर्ण अध्ययनात आढळले आहेः डॉ. अरोरा,अध्यक्ष, एनटीएजीआय यांचे कोविशील्डच्या 2 मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या निर्णयाबाबत
स्पष्टीकरण
#COVISHIELD वरील सुरुवातीच्या अध्ययनात खूप जास्त प्रकारचे वेगवेगळे निष्कर्ष होते. युके सारख्या काही देशांनी सुरुवातीला ही लस देताना 2 मात्रांमध्ये 12 आठवड्यांचे अंतर ठेवले.
जेव्हा आम्ही आमच्या मात्रांचे अंतर ठरवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही माहिती आमच्यासाठी गोपनीय होती. आम्ही आमच्या दोन चाचण्यांना जोडणाऱ्या चाचण्यांच्या निष्कर्षांच्या आकडेवारीच्या आधारे अंतर 4 आठवडे करण्याचा निर्णय घेतला. - डॉ. अरोरा

या चाचण्यांच्या आकडेवारीत अतिशय चांगली रोगप्रतिकारक्षमता दिसून आलीः डॉ. एन के अरोरा, अध्यक्ष, NTAGI
त्यानंतर आम्हाला अतिरिक्त शास्त्रीय आणि प्रयोगशाळेतील आकडेवारी उपलब्ध झाली. त्यानुसार 6 आठवड्यानंतर आणि जवळपास आम्हाला असे वाटले की अंतर 4 आठवड्यांवरून 8 आठवडे करावे. - डॉ. अरोरा
अध्ययनात असे दिसले की लसींच्या मात्रांमधील अंतर 4 आठवड्यांचे ठेवल्यावर तिची परिणामकारकता 57% होती आणि हे अंतर 8 आठवडे केल्यावर तिचे प्रमाण सुमारे 60% झालेः डॉ. अरोरा

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य आकडेवारीत 12 आठवड्यांच्या अंतरानंतर लसींच्या परिणामकारकतेचे प्रमाण 65-88% दरम्यान कमीजास्त होत होते, या आधारावर त्यांनी अल्फा प्रकारामुळे झालेल्या महामारीच्या प्रादुर्भावावर मात केलीः डॉ. एन के अरोरा
युके यातून बाहेर पडू शकला कारण त्यांनी अंतर 12 आठवडे केले होतेः डॉ. एन के अरोरा, अध्यक्ष NTAGI
आम्हाला देखील ही कल्पना चांगली वाटली कारण अंतर वाढवल्यामुळे ऍडेनो व्हेक्टर लसी अधिक चांगला परिणाम करतात हे दाखवणारी याविषयीची मूलभूत वैज्ञानिक माहिती असल्याने अंतर 12-16 आठवडे वाढवण्याचा 13 मे रोजी निर्णय घेण्यात आलाः डॉ. अरोरा

@mybmcHealthDept @MahaDGIPR @MantralayaRoom
आमच्याकडे अतिशय खुली, पारदर्शक प्रणाली आहे जिथे शास्त्रीय आधारावर निर्णय घेतले जातात. कोविड कार्यगटाने घेतलेल्या निर्णयामध्ये कोणाचाही विरोधी सूर नव्हता. त्यानंतर या मुद्द्यावर एनटीएजीआयच्या बैठकीतही यावर विरोध न होता चर्चा झाली.

- डॉ. एन. के. अरोरा
लसींच्या मात्रांमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याची शिफारस NTAGI ने केली

यामुळे देखील लोकांना कमी अधिक प्रमाणात मोकळीक मिळते, प्रत्येकाला नेमके 12 आठवड्यांनी यायला जमेलच असे नाही.

- डॉ. एन. के. अरोरा
कॅनडा, श्रीलंका आणि 2-3 इतर देशांची उदाहरणे आहेत जे अस्ट्राझेन्का लसीसाठी 12-16 आठवड्यांचे अंतर राखत आहेत जे कोविशील्ड लसीसाठी असलेल्या अंतराएवढेच आहे.

- डॉ. एन. के. अरोरा
आम्ही निर्णय घेतल्यावर 2-3 दिवसांनी युकेमधून अशी वृत्त येऊ लागली की अस्ट्राझेन्काच्या एकेरी मात्रेने केवळ 33% आणि दोन मात्रांनी 60% संरक्षण मिळते. त्यामुळे मेच्या मध्यापासून भारताने हे अंतर पुन्हा 4 ते 8 आठवड्यांवर आणावे का याबाबत चर्चा सुरू आहे. - डॉ. अरोरा
जेव्हा एनटीएजीआयने हा निर्णय घेतला तेव्हा असे देखील ठरवण्यात आले की भारत एक लस मागोवा मंच स्थापन करेल आणि त्यातून केवळ लसीकरण कार्यक्रमाचाच नव्हे तर लसींचा प्रकार आणि मात्रांमधील अंतर यांचा देखील अभ्यास करेल. - डॉ. अरोरा
भारतात 17-18 कोटी लोकांनी लसीची पहिली आणि 4 कोटी लोकांनी दुसरी मात्रा घेतल्याने भारतासाठी हे फार महत्त्वाचे आहे. भारतात अतिशय झपाट्याने पसरलेल्या आणि मेच्या पहिल्या आठवड्यात 4 लाख लोकांच्या संसर्गाचा उच्चांक नोंदवणाऱ्या डेल्टा प्रकाराचा विचार करता आपण एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला.
चंदीगडमध्ये एका पीजीआय अध्ययनात असे दिसून आले की लसीची परिणामकारकता अंशतः लसीकरण झालेल्या(पहिली मात्रा) आणि पूर्ण लसीकरण(दुसरी मात्रा) झालेल्या अशा दोघांसाठी 75% होती. त्यामुळे किमान सध्यापुरते तरी तुमचे अंशतः किंवा पूर्ण लसीकरण झाले असले तरी परिणामकारकता तितकीच राहते-डॉ अरोरा
याचा अर्थ असा देखील आहे की तुम्ही एक मात्रा घेतली असली तरी देखील तुम्ही सुरक्षित आहात.

- डॉ. अरोरा

#Unite2FightCorona

@mybmcHealthDept
3-4 दिवसापूर्वी सीएमसी वेल्लोर या एप्रिल आणि मेमधील सध्याच्या महामारीच्या लाटेचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या महत्त्वाच्या अध्ययनात दिसून आले की एखाद्या व्यक्तीने कोविशील्डची पहिली मात्रा घेतली असेल तर परिणामकारकता 61%आणि दुसरी मात्रा घेतली असेल तर 65%असते-डॉ अरोरा
दिल्लीमधील दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या दोन अध्ययनाचे देखील निष्कर्ष आहेत. या दोन्ही अध्ययनात असे दिसते की पहिली मात्रा घेतल्यावर संसर्गाचे प्रमाण 4 टक्के आणि दुसरी मात्रा घेतल्यावर 5 टक्के होते म्हणजेच दोन्हीमध्ये काही विशेष फरक नाही. - डॉ. अरोरा
दुसऱ्या एका अभ्यासात संसर्गाचे प्रमाण 1.5 ते 2 टक्के होते

ज्या प्रकारे निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे देशभरातील याबाबतचे अध्ययन करणाऱ्यांमध्ये वस्तुस्थिती निदर्शक आकडेवारी पाहून उत्साह निर्माण झाला.

- डॉ. एन. के. अरोरा
उद्या आमची नॅशनल वॅक्सीन इन्फरमॅटिक्स आणि डेटा ऍनालिटिक्स सोबत दुसरी बैठक होणार आहे, @ICMRDELHI वॅक्सिन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यावर कोविन प्लॅटफॉर्मवरील माहिती प्रयोगशाळांमधील आरटी- पीसीआर चाचण्यांच्या माहितीवर सुपरइंपोज होईल. - डॉ. अरोरा
यामधून आम्हाला हे लक्षात येईल की ज्यांनी लसी घेतल्या होत्या त्यापैकी किती जणांना संसर्ग झाला आणि तिसरी बाब म्हणजे @MoHFW_INDIA आणि NCDS ने गोळा केलेल्या आजार संबंधित साथरोगविषयक माहितीशी तिचे एकात्मिकरण केले जाईल. - डॉ. अरोरा
माहितीच्या या तिन्ही स्रोतांचे एकात्मिकरण करण्यात आले आहे जेणेकरून नियमितपणे जनसमुदायाची माहिती घेता येईल आणि त्याबाबत प्रत्येकाचा प्रतिसाद आणि विविध प्रकारच्या लसींचा अंशतः आणि पूर्ण लसीकरणाचा प्रभाव, मात्रांमधील अंतर आणि इतर पैलू लक्षात येतील. - डॉ. अरोरा
लसीकरण सक्तीचे नसल्याने हे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे देखरेख आवश्यक आहे आणि जसजशी आम्ही लसीकरण कार्यक्रमात वाढ करू आणि व्याप्ती वाढवू तशी माहिती जास्त गुंतागुंतीची होत जाईल. म्हणून सर्व लसींवर देखरेख आवश्यक आहे आणि भारताकडे AEFI देखरेखीसाठी एक ठोस प्रणाली आहे. - डॉ. अरोरा
युकेने केल्याप्रमाणे कोविशील्डच्या लसीच्या मात्रांमधील अंतर कमी करण्याचा एखादा प्रस्ताव आहे का?

डॉ. अरोरा यांचे उत्तरः कोणतीही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ नाही. #COVID19 आणि लसीकरण या सतत बदलत राहणाऱ्या प्रक्रिया आहेत.
उद्या आमचा वॅक्सीन प्लॅटफॉर्म आम्हाला सांगेल की मात्रांमध्ये अतिशय कमी अंतर लोकांसाठी चांगले आहे, मग त्याचे फायदे 5 ते 10 टक्केच असले तरी अशी सूचना किती योग्य आहे त्याबाबत आमची समिती निर्णय घेईल. पण जर सध्याचा निर्णयच योग्य असल्याचे दिसून आले तर आहे तसेच सुरू राहील.- डॉ.अरोरा
शेवटी आपल्या समुदायाचे आरोग्य आणि संरक्षण सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, हीच तर सर्वात महत्त्वाची अशी बाब आहे ज्यासाठी आपण चर्चा करतो, नवे शास्त्रीय पुरावे निर्माण करतो आणि निर्णय घेतो. - डॉ. अरोरा

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

16 Jun
बंधनकारक हॉलमार्किंग बद्दल, @IndianStandards चे महासंचालक श्री.प्रमोदकुमार तिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत Image
1- दिनांक 16 जून 2021 पासून 256 जिल्ह्यांत 14, 18 व 22 कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठीच हे अंमलात आणले जाईल.

2- देशातील इतर जिल्ह्यांत 20, 23 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी टप्प्याटप्प्याने ते बंधनकारक करण्यात येईल - महासंचालक, @IndianStandards
गुणवत्ता नियंत्रण आदेशात पुढीलप्रमाणे आणखी काही मुभा देण्यात आल्या आहेत-

✳️दागिन्यांच्या विशेष श्रेणी- कुंदन, मिना, पोलकी, जडाऊ (जडाव)
✳️दरवर्षी 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे सराफ
✳️सोन्याचे घड्याळ व फाउंटन पेन
Read 8 tweets
16 Jun
Govt. has decided to implement Mandatory Hallmarking of Gold in a phase-wise manner

It shall from into effect from today in 256 districts for 4, 18 and 22 carats of gold jewellery/artefacts

- DG, @IndianStandards Pramod Kumar Tiwari in a virtual press conference today Image
Any manufacturer, importer, wholesaler, distributor or retailer engaged in selling precious metal articles has to mandatorily get registered with @IndianStandards

Registration will be one-time and free of cost

: DG, @IndianStandards Pramod Kumar Tiwari Image
The hallmarking process to be computerized, with maintenance of complete trail of each job with date and time. Hallmark will include a 6-digit code along with @IndianStandards mark and purity. The software has been started from today

: DG, @IndianStandards Pramod Kumar Tiwari Image
Read 7 tweets
16 Jun
#Cabinet briefing by Union Ministers @PrakashJavdekar and @mansukhmandviya

Live from ⏰ 3 PM

Watch : Image
Live Now

#Cabinet briefing by Union Ministers @PrakashJavdekar and @mansukhmandviya

Watch : Image
#Cabinet approves proposal on Deep Ocean Mission

This will help to explore resources available in the ocean; to study about minerals present at around 6000 ft below the sea

- Union Minister @PrakashJavdekar

Watch : Image
Read 10 tweets
15 Jun
Dr. N K Arora, Chairman of India's #COVID19 Working Group of the National Technical Advisory Group on Immunisation (NTAGI) speaks to @DDNewslive on India's COVID-19 Vaccination Drive, stay tuned for LIVE updates (1/n)🧵
India has currently 2 vaccines-COVISHIELD & COVAXIN. The interval between 2 doses of COVAXIN is 4 wks & consistent studies have shown that this is the right interval: Dr. Arora, Chairman, NTAGI explains why we decided to expand gap between 2 #COVISHIELD doses to 12-16 wks
(2/n)🧵
Initial studies on #COVISHIELD were very heterogeneous. Some countries like UK went for 12 wks dose interval when they introduced the vaccine.While we were privy to this data, when we decided our interval, we went for 4 wks interval based on our bridging trial data:Dr Arora
3/n
Read 29 tweets
15 Jun
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases- 9,350
*⃣Recoveries- 15,176
*⃣Deaths- 388
*⃣Active Cases- 1,38,361
*⃣Total Cases till date - 59,24,773
*⃣Total Recoveries till date - 56,69,179
*⃣Total Deaths till date - 1,14,154
*⃣Total tests till date- 3,84,18,130

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 1,38,361 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

(2/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

9,350 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 59,24,773

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

(3/4)🧵
Read 4 tweets
15 Jun
#Unite2FightCorona

Media briefing on actions taken, preparedness and updates on #COVID19, to begin shortly

Live from 4 PM

Join
📡 Live Now 📡

JS, @MoHFW_INDIA addressing the media on actions taken, preparedness and updates on #COVID19

Watch
JS, @MoHFW_INDIA shares age bifurcation of #COVID19 cases in first and second #COVID wave

Says, there is no need to panic about children getting infected in successive waves; need to spread awareness among children and every family in the society

Watch
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(