#धागा
मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली झाली. व्यापारी प्रेमचंद राॅयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली. प्रेमचंद राॅयचंद हे व्यापारी राॅयचंद दीपचंद यांचे पुत्र होते. (१/६)
सफाईदारपणे इंग्लीश बोलणाऱ्या प्रेमचंद यांनी १८४९ मध्ये शेअर ब्रोकर म्हणून कामाला सुरूवात केली. कापूस आणि सोन्याच्या व्यवसायात त्यांनी आपला दबदबा तयार केला. मुंबई शेअर बाजाराचं जन्मस्थान हे १८५० मध्ये एक वडाच्या झाडाखाली आहे. सद्या हे ठिकाण हार्निमन सर्कल नावाने ओळखलं जातं. (२/६)
टाऊन हाॅलजवळ वडाच्या झाडाखाली प्रेमचंद राॅयचंद आणि इतर दलाल लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या धंद्यांची दलाली करायचे. मुख्यतः यावेळी कापसाचे सौदे व्हायचे. सुरूवातील ४ गुजराती आणि एक पारसी हे दलाल होते. या दलालांना बसण्यास अशी विशिष्ट जागा नव्हती. (३/६)
तसंच वेळेचं बंधन आणि कुठलेही नियमही नव्हते.
टाऊनहाॅलसमोरील वडाच्या झाडाखाली हे सर्व दलाल लोक एकत्र येत असत. हळूहळू या ठिकणी दलालांची संख्या वाढली. त्यामुळे येथे जागा अपुरी पडू लागली. १८७४ च्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होवून सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे (४/६)
ठरवले आणि त्यानंतर 'द नेटीव शेअर ॲन्ड स्टॉक ब्रोकर्सही संस्था १८७५ स्थापन होऊन व्यवहार सुरू झाले . प्रेमचंद रॉयचंद हे व्यापारी 'द नेटीव शेअर ॲन्ड स्टॉक ब्रोकर्स'चे संस्थापक सदस्य होते. 'द नेटीव शेअर ॲन्ड स्टॉक ब्रोकर्स'ची सुरूवात २५ शेअर दलालांनी अवघ्या एका रुपयात केली होती.(५/६)
३१ ऑगस्ट १९५७ रोजी भारत सरकारने या बाजारास सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ॲक्ट १८५६ अन्वये मान्यता दिली. अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला. सध्या मुंबई शेअर बाजार हा जगातील ११ व्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे.
हॉस्पिटल कडून सद्य स्थितीत उपचारांचा अंदाजे खर्च रु.तीन लाख पन्नास हजार( ₹३,५०,०००/- ) पर्यंत सांगितलेला आहे, सोबतच संजीवनी ची शस्त्रक्रिया करायची झाल्यास हा खर्च अजून वाढण्याची शक्यता असल्याने असल्याने आज पाचे कुटुंबियांना आपल्या सर्वांच्या आधाराची गरज आहे.
• म्यूकोरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार असून, ‘म्युकोरमायकोटीस’ या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्मजंतूंमुळे होतो. हा आजार ‘ब्लॅक फंगस’ या नावाने ओळखला जातो.
• या विकाराला झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखला जातो #MahaCovid#Mucormycosis (1/n)
• सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिवेंशन अर्थात सिडीसी (CDC) म्हणण्यानुसार हा रोग दुर्मिळ आहे.
• ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असते. मात्र जेंव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते, तेंव्हाच तिचा संसर्ग शरीरात होतो. #MahaCovid#Mucormycosis (2/n)
• खुल्या जखमांमधूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते.
• ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, त्यांच्या श्वसनातून ही बुरशी शरीरात गेल्यास फुफ्फुसे किंवा सायनसमध्ये त्यांचा संसर्ग होऊ शकतो आणि शरीराच्या अन्य भागातही तो पसरू शकतो.