@BeingSalman2802 इथे प्रयत्न करतोय. Via @ShivamShankarS जेव्हा तुम्ही #Pegasus#spyproject संबंधी बातम्या वाचाल, तेव्हा एकेका लायसेन्सची किंमत ५० ते ५५ कोटी रुपये असते आणि एक लायसेन्स फक्त ५० फोनवर वापरता येतं हे लक्षात ठेवा. हे सॉफ्टवेअर सगळा डाटा गोळा करते - कॉल्स, मेसेजेस,
की स्ट्रोक्स, कॅमेरा आणि microphone हॅक करून चालू करणं... सगळा access मिळतो. याचा अर्थ हे सगळं manually पिंजून काढत बसावं लागतं. त्यासाठी मोठी टीम लागते. मास surveillance मध्ये की वर्ड्स टार्गेट केले जातात आणि म्हणून automated system वापरली जाते. हे त्याच्या पलीकडे आहे.
यातून एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो ज्याचं उत्तर लगेच मिळणार नाही....कोण आहेत हे लोक जे snooping करताहेत? सरकार करतंय हे माहीत आहे पण सरकारमधून कोण? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत हे असू शकतं, पण कुणीतरी पाठपुरावा करायला हवा...नक्की कोण? या सॉफ्टवेअरचा ब्लॅकमेलसाठी गैरवापर
होण्याची शक्यता खूप मोठी आहे. याची उत्तरं धक्कादायक असतील. जो कोणी ही मोहीम चालवत होता ती व्यक्ती या द्वयीच्या विश्वासात असणारी आणि नियंत्रणात असेल, पण जे लोक हा डाटा पिंजून काढत असतील ते अधिक महत्त्वाचे आहेत. ते सरकारी कर्मचारी आहेत का की याचं outsourcing केलं गेलं?
याचे safeguards काय आहेत? हे बेकायदेशीर सरकारी surveillance आहे हे तर स्पष्ट आहे पण डाटा सरकारकडेच राहील याची काही गॅरंटी नाहीये...समजा हा डाटा खाजगी उद्योगांना विकला गेला तर त्यांच्याकडे न्यायाधीश, मंत्री आणि अधिकाऱ्यांवर अंकुश गाजवायला हत्यार मिळेल. आणि हा परकीय राष्ट्रांना
विकला गेला तर?
राष्ट्रीय सुरक्षेचा बागुलबुवा उभा करून हे दडपण्याचा प्रयत्न होईल, पण राजकीय नियंत्रण मिळवण्यासाठी अशी बेकायदेशीर पाळत ठेवणं हाच मुळी राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. त्यांना encryption नकोय, पण जर encryption राहिलं नाही तर आपले राजकीय पुढारी परकीय surveillance चे बळी
होतील. आणि तेही केवळ खाजगी उद्योगांच्या हव्यासापोटी. आज एक मोठा भारतीय उद्योग अशा प्रकारची यंत्रणा राबवतोय हे सर्वानाच माहीत आहे.
Encryption आणि प्रायव्हसी यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत नाही तर उलट ती अधिक बळकट होते. तिला अशा प्रकारे कमकुवत करून भारताची सुरक्षा धोक्यात
आणली जात आहे. देशाला याची उत्तरं मिळायला हवीत आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली मौन बाळगणे आपण मान्य करता कामा नये.
काय प्रोसेस वापरली गेली, परवानग्या घेतल्या होत्या की नाही हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
हे संसदेत तर उपस्थित व्हायलाच हवं, पण मीडियातील ज्या लोकांना आस्था आहे...
त्यांना विनंती की तुमच्या reportage मध्ये यावर भर असू द्या की भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचं आहे. Pegasus स्टोरी हे केवळ एक उदाहरण आहे. अंतर्गत राजकारणासाठी सरकार ज्या अगणित डाटा करण्याच्या मोहिमा राबवत असतं त्याने भारताची सुरक्षितता कमजोर होईल.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काल @Gaju3112 यांनी म्हटलं होतं की #Pegasus चा उपयोग खाजगी यंत्रणादेखील करू शकतात आणि मग ते कुठवरही पोचू शकते. हे रुपेश कुमार सिंह, झारखंडमध्ये हिंदी पत्रकारिता करतात. Pegasus मार्फत यांच्या फोनमध्ये spyware टाकण्यात आलं. का? त्यांनी एका आदिवासीच्या नकली एन्काऊंटर बद्दल लिहिलं.
फादर स्वामी, ज्यांचा नुकताच तुरुंगात मृत्यू झाला, ते देखील आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या कम्प्युटरवर देखील malware टाकण्यात आलं आणि त्यामार्फत त्यांना भीमा कोरेगाव खटल्यात अडकवण्यात आलं असा त्यांच्या वकिलाचा आरोप होता. झारखंडसारख्या छोट्या राज्यातले हे
पत्रकार, कार्यकर्ते एवढ्या मोठ्या निशाण्यावर का असतात? कारण भल्या मोठ्या मल्टी नॅशनल कंपन्यांच्या हजारो कोटींच्या मोठ्या प्रकल्पांमधून आदिवासींची कशी पिळवणूक होते आहे याकडे ते लक्ष वेधतात. #Pegasus बद्दल तुम्ही आम्ही आवाज उठवायला हवा तो यासाठी. जे चोरी करतील त्यांच्यावरच पाळत
चीन सीमेच्या आत घुसला आणि आपले सैनिक मारले गेले, राफेलच्या मागचं सत्य इथल्या न्यायव्यवस्थेने गाडून टाकलं. दोन्ही गोष्टी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या, पण आपल्या मतदारांना सोयरसुतक नाही. याच मतदारांना बोफोर्स भ्रष्टाचाराचं प्रतीक वाटतं.
ज्या राम मंदिराच्या नावाने मते मागितली जातात, त्या राम मंदिराच्या जमीन खरेदीसाठी अत्यंत संशयास्पद व्यवहार होतात, पण आपल्या मतदारांना अजूनही भाजप हाच हिंदू हितरक्षक पक्ष वाटतो. आपल्या आस्थेचा असा दुरुपयोग त्यांना कसा पचतो?
करोनाच्या काळात लाखो मृत्यू झालेत आणि आणखी किती बळी पडत राहतील हे माहीत नाही. जगभरात झाला नसेल इतका गोंधळ लसीकरणाच्या बाबतीत घातला गेलाय. पण घरात सुतक आलेल्या आपल्या मतदारांना मोदीजी आजही विक्रमवीर वाटतात.
विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याची जबाबदारी तुमची होती, आमची नव्हे. करोना फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही हे उद्गार तुमचे होते, आमचे नव्हे. २१ दिवसात युद्ध जिंकू ही भाषा तुमची होती, आमची नव्हे. लॉकडाऊनच्या काळात infrastructure उभं करायची जबाबदारी तुमची होती,
आमची नव्हे. मोफत लस सर्वांना वेळेवर पुरवायची जबाबदारी तुमची होती, आमची नव्हे. त्यासाठी ऑर्डर नोंदवायची जबाबदारी तुमची होती, आमची नव्हे. कुंभ, बंगाल - आसाम - तामिळनाडू येथे निवडणुका घेताना करोनाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी न घेता समोरची गर्दी बघून तुम्ही हुरळून गेलात, आम्ही नाही
आमच्या दोन चुका झाल्या - तुम्ही नीट राज्य कराल ह्या विश्वासाने तुम्हाला एकदा नव्हे तर दोनदा मत दिलं. लॉकडाऊनमध्ये पोरा - बाळांना कसंही करून जगवावं म्हणून घराबाहेर पडलो. हौस नव्हती. आणि आज जे होतं आहे त्याला आम्ही सर्व जबाबदार आहोत असं म्हणून तुम्ही तुमच्या शिष्यांची तरफदारी करताय
एक पेपर बंद होतो तेव्हा किती पत्रकार बेरोजगार होतात त्याच्याबद्दल बरंच बोललं- लिहिलं जातं. पण एक पेपर बंद होतो तेव्हा फक्त पत्रकारच नव्हेत, तर सोबतच्या शेकडो इतर बिगर पत्रकारांची कुटुंबं उद्ध्वस्त होतात. त्यांची आठवण येते आणि झोप येत नाही.
आमच्या ऑफिस असिस्टंट चा कधी मधी गुड मॉर्निंग, गुड नाईट चा मेसेज येतो. त्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. एकदोनदा तुला काही मदत करू का विचारलं, पण त्याला मदत नकोय, नोकरी हवीय. वयाच्या ४५ व्या वर्षी त्याला काय नोकरी मिळवून द्यायची? त्याच्याकडे इतर काहीही स्किल्स नाहीत.
डिझायनर होते. कोण कुठे, कोण कुठे हरवलाय. जमतील तसे दिवस काढताहेत. गावची शेती, आंब्याची बाग, कुठले तरी टुकार प्रिंट प्रोजेक्ट करत दिवस ढकलत आहेत.
फॅन्ड्री मध्ये शेवटाला अत्यंत पॉवरफुल सीन आहे. जब्याचा बाप आणि अख्खं कुटुंब डुकराच्या मागावर आहे. जब्याच्या बहिणीच्या लग्नाचा खर्च त्यातून निघणार आहे. कुटुंबासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि गावातून पाठलाग चालू असताना कुठल्याश्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू आहे.
जब्याचा बाप धर्मसंकटात. राष्ट्रगीताचा अपमान होऊ नये म्हणून सावधान मध्ये उभं राहायचं तर डुक्कर पळून जातय आणि नाही राहिला उभा तर गाव हाणील ही भीती. आपल्या राष्ट्रवादाच्या पोकळ कल्पनांना हात घालणारा प्रसंग मी थिएटरमध्ये पाहिला तेव्हा अंगावर काटा आला होता. आज दिल्लीत हेच झालंय.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आणि काही शेतकरी लाल किल्ल्यावर चालून गेले. त्यांनी तिथे शिखांना पूज्य असा निशान साहिब ध्वज लावला. राष्ट्रध्वज काढून नव्हे, किंवा त्याहून उंचावर नव्हे. पण त्याचं निमित्त करून शेतकऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवलं जातं आहे.
अर्णब चे व्हॉट्सॲप गेले दोन दिवस नीट वाचले. पद्धतशीरपणे देशाच्या प्रत्येक भागात वातावरण कसं आणि कुठल्या मुद्द्यावर पेटवत न्यायचं याची रणनीती हा माणूस अत्यंत थंड डोक्याने आखत होता. काश्मीरवर अख्खा देश, ममतांच्या विरोधात बंगाल, लालूच्या विरोधात बिहार, केजरीवालच्या..
विरोधात दिल्ली, केरळमध्ये शबरीमला, बंगलोर, चेन्नई...महाराष्ट्रात आपण त्याचा उच्छाद पाहिलाच सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येनंतर...२०११ ला अण्णा आंदोलन...आणि ही नशा या माणसाच्या डोक्यात चढलीये. इंग्रजीत ज्याला drunk on power म्हणतात तसा प्रकार आहे हा. पुलवामा हल्ल्यानंतर याला...
Ratings वाढतील याचा orgasm होतो. शशी थरूर यांना दोषी ठरवून मीडिया trial चालवायची, टीव्ही वर सुब्रमणियन स्वामी यांच्याबरोबर भांडायच आणि आतून एक राहायचं...भयानक माणूस आहे हा. आणि यांच्यासारखे अनेक. एका निष्पक्ष anchor ने, जो याचा कट्टर विरोधक मानला जातो, त्याने याला चॅनल लॉन्च ..