बुध्द हा आज सारखा सामुदायिक धर्म नव्हता.. ती एक वैचारिक स्थिती आहे. जो त्या स्थितीपर्यंत पोहोचतो तो बुध्द.. हिंदू ही पण आपली सांस्कृतिक प्रांतीय ओळख आहे आणि या मध्ये तर खुप विचार अन दर्शने आणि मते आहेत.
१/
बुध्दांनी मांडलेले विचार पुर्वीपासुन या हिंदुसंस्कृतीत (सिंधु) थोड्या बहोत प्रमाणात अस्तीत्वात होते... बुध्दांनी निश्चितच सर्व दर्शनाचा आणि विचारांचा ,मतांचा अभ्यास करुन एक नवे दर्शन निर्माण केले. त्यांनी मानवी मुल्य जपणार्या विचारांना महत्व दिले आणि त्यातच मनुष्य जिवनाचे
२/
सार्थक आहे असे त्यांनी सांगितले.
सांगायचे एवढेच हिंदू, बुध्द ,जैन हे आता सारखे सामुदायिक धर्म नसुन विचार आचार आहेत. यात विचारांची देवान घेवान पण दिसून येते. बुध्दाचा आदर संत काही अभंगात यासाठीच करतात. तसेच लेण्या आणि मंदीरांकडे बघुन पण हे लक्षात येते. बुध्द जैन
३/
लेण्या मध्ये गजलक्ष्मी ,यक्ष,देवता यांचे शिल्पे सर्रास दिसतात. मध्यकालीन सर्व राजे महाराजे तर सर्व मतांचा आदर करणारे आणि संरक्षण देणारे होते. हे यासाठी सांगीतले की आजसारखा मूर्खपणा पुर्वी नव्हता.. बुध्द महान होते निशंक.. पण त्यांची महानता त्यांच्या विचारात आचरणात आहे.
४/
जिकडे तिकडे बुध्दच सांगण्याने ते महान होत नाहीत.
आता विठ्ठल हे बुध्द आहेत असा जो प्रचार करण्यात येतो त्यात काहीही तथ्य नाही. विठ्ठलाच्या डोक्यावर मुकुट स्थापीत आहे जो त्याकाळातील मुर्तीकलेनुसार आहे. हरीहर ऐक्याच्या विचाराने काही त्याला शिवलिंगही म्हणतात, पण अभ्यासकांच्या
५/
मते ते मुकुट आहे, गळ्यात कौस्तुभमनी, कानात मत्सकुंडले, हातात चक्र आणी कमळपुष्प आहे, बाजु दंड आणि कडेही आहेत. बुध्द अलंकार घालत नव्हते हे आपण जाणतोच.
संतानी विठ्ठलाचे वर्णन काही ठीकाणी बुध्दरुप असे केले याचा अर्थ शांत आणि संयमी रुप बुध्दासारखे आहे असे होते.. काही संतानी
६/
बुध्दावर अभंग पण केलेत ते अवतार स्वरुपावरुन, विठ्ठलाला बुध्द मानून नाही.
एका समजानुसार विठ्ठल ही क्षेत्रपाल देवता आहे...ती कधी शैवाची आराध्य होती नंतर ती विष्णुरुप मानण्यात आली... कारण खालील इंद्रायणी तिरावरील मंदीर हे विठ्ठल मंदीरापेक्षा पुरातन आहे जे शिवमंदीर असावे समाधी
७/
नाही अशी मते आहेत.. तर काही अभ्यासकांच्यानुसार विठ्ठल विष्णुचे चे अपभ्रंषित रुप आहे विष्णु—बिष्णु—बिहु—विठु अशी उदाहरणे ही इतिहासात आहे विष्णूदेव चे बिट्टीदेव वगैरे झालेले आहे..
"ते काहीही असो पण विठ्ठल मुर्ती ही बुध्दमुर्ती नाही हे सत्य आहे...!! "
एका घरातील इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा आणि त्याच्या वडीलांचा संवाद-
मुलगा - पप्पा,तुम्हाला माहीतीय का? औरंगजेब हा महान संत होता,त्याची राहणी साधी होती, जणू या वर्ल्डमधला डिक्टो दुसरा गाॅडच...जिंदा पीर !!
१/
पप्पा- अरे वेडा झालास का? औरंगजेबाने आपल्या छत्रपति शंभुराजांची हत्या केली. गुरु तेगबहादुरांचा शिरच्छेद केला. उदयपुरमध्ये 300 मंदिरे पाडली आणि आपल्या पंढरपुरच्या विठोबाच्या मंदिरालासुध्दा त्याने हानी पोहचवली होती.
मुलगा - Dad अहो, औरंगजेब तर संत होता ना? मग संत लोक असे कसे
२/
करतील? ते कस शक्य आहे?
पप्पा- अरे मूर्खा, तुला कोणत्या मास्तरने असला इतिहास शिकवला? औरंगजेब संत आणि जिंदा पीर होता म्हणून!
मुलगा - अहो किती बावळट आहात तुम्ही? आमच्या सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातच लिहिलंय...मग पुस्तके कधी खोटे लिहितील का? आमचे टिचर कसे खोटे बोलतील?
प्राचीन काळी सैनिक फक्त छातीवर कमरेपर्यंत संरक्षणासाठी चिलखत वापरीत. त्याचे हात मात्र तसेच विनाचिलखताचे असायचे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पारटा या प्रकारातील हे चिलखत. त्याचे हात मात्र तसेच उघडे राहत असत.
१/
कौटिल्याचे मते, "विशिष्ट स्वरूपामुळे ज्यास लौह जालीका असेही म्हणतात"
प्राचीन काळी तलवार, भाला, गदा इत्यादी शस्त्रांचा आघात, वारापासून अगर अर्वाचीन काळी बंदुकीची गोळी, वेगाने उडणारे तोफ गोळ्यांचे तुकडे, अस्त्रांच्या घातक मार्यापासूनच शरीर संरक्षणासाठी शरीरावर किंवा वाहनांवर
२/
चढविण्यात येणारे युद्धोपयोगी संरक्षण साधन म्हणून चिलखताचा वापर रूढ आहे.
चिलखताला संस्कृतात बाण, वर्मन, कवच, द्रापि, वर्त्मन अशी नावे आहेत. शरीराच्या प्रत्येक भागात करिता अनुरुप अशी वेगवेगळी चिलखते असतात, आणि त्यांची नावेही वेगवेगळी आहेत ती पुढीलप्रमाणे- शिरस्त्राण, कंठत्राण,
नांदा सौख्य भरे ....
माझ्या तमाम हिंदुत्ववादी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, कृपया एवढे विचलीत होऊ नका. कालपासून ही पत्रिका तब्बल एकोनतीस वेळा आली माझ्याकडे. आपली उद्विग्न प्रतिक्रिया अशा घटनांची ताकत वाढवते. त्यांचा डिवचण्याचा हेतू साध्य होतो. या घटनेला खूप
१/
पैलू आहेत. सर्वात आधी जी काही प्रतिक्रिया द्यायची ती आपण आधीच देऊन बसलोय, या घटनेचा पाठपुरावा कोणीच करणार नाही. यापूर्वी असे अनेक विवाह झालेत, पुढे काय झालं कोणालाच माहीती नाही. ती मुलगी हिंदूच राहिली का? तीने परत कधी भारतीय पोशाख परिधान केला का? तीला वागणूक कशी आहे?
२/
बुरख्याची सक्ती झाली का? तीने कीती मुले जन्माला घातली? तीला सवत आणली का? तीचा हलाला झाला का? आणि यातलं काहीच झालं नसेल तरी तिची पुजा पद्धती आणि खानपान बदलले का? थोडक्यात तीचं आयुष्य पूर्वीप्रमाणेच राहीलं का? मुलांची नावे काय? त्यांचा मजहब कुठला?
गिरीश कुबेर यांच्या वादग्रस्त पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल खोडसाळपणे लेखन केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या सत्य इतिहास संदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. खर म्हणजे उत्तरकालीन बखरी, तसेच कादंबरी, चित्रपट, नाटक या
१/
माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे अनैतिहासिक पद्धतीने चरित्रहनन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विविध इतिहासकारांनी अनेक अडीअडचणीना तोंड देत अपार कष्ट घेऊन आपल्या संशोधनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला त्याचा उपयोग
२/
आता इतिहास अभ्यासकांना होतोय, त्याच काही संदर्भग्रंथांची नामओळख इतरांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
१) छत्रपती संभाजी महाराज चरित्र - वा.सी.बेंद्रे
२) शिवपुत्र संभाजी - डॉ.कमल गोखले
३) छत्रपती संभाजी स्मारकग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार ( संपादन )