आज पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण अशा पुरस्कारांचा मान वाढवणारे आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे १००रीत पदार्पण करत आहेत.
ह्या इतिहासपुरुषाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. या महात्म्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचवलं.
१/५
‘राजा शिवछत्रपती’ सारखं शिवचरित्र लिहून महाराष्ट्राच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षरश: वेड लावणारा हा इतिहासमहर्षी.
‘जाणता राजा’ हे नाटक दिग्दर्शीत करुन बाबासाहेबांनी १६७४ चा भव्य ‘शिवराजाभिषेक’ सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा करुन आपल्यावर असंख्य उपकार केलेत.
२/५
कोणता ही स्वार्थ न पाहता शिवछत्रपतींचं अष्टपैलू कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी या महात्म्याने स्वत: संपूर्ण आयुष्य वेचलं.
प्रत्येक शिवप्रेमी बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र वाचल्याशिवाय राहू शकत नाही.
३/५
अनेक राजघराण्यांचा आणि शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.
पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले ह्यातर कल्पवृक्षासारख्या बाबासाहेबांच्या मागे उभ्या होत्या.
आजही राजमाता कल्पनाराजे आणि छत्रपती उदयनराजे यांचे बाबासाहेबांशी स्नेहाचे संबंध आहेत.
४/५
अनेक दिग्गज राजकारण्यांनी नेहमीच बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला आहे.
अशा ह्या महान शिवशाहीरास त्रिवार वंदन💐🙏🏼
आदिशक्ति आई तुळजाभवानी आणि श्रीसद्गुरु समर्थांच्या चरणी एकंच प्रार्थना - ह्या सरस्वतीपुत्रास उदंड आयुष्य द्या🙏🏼
मालिका बघून झाल्यावर मनामध्ये अभिमान आणि राग या दोन्ही भावना प्रकट झाल्या.
सर्वप्रथम, क्रांतिवीर चापेकर बंघू आणि महादेव रानडे यांच्या वीरस्मृतीस त्रिवार वंदन🙏🏼
१/१७
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव रानडे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिची जी ज्योत प्रज्वलित केली ती अनेक क्रांतिकारकांनी पुढे तशीच प्रज्वलित ठेवली ह्याचा सार्थ अभिमान वाटतो.
२/१७
१८९७ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. असंख्य लोकांनी या भयानक रोगामुळे आपले प्राण गमवले होते.
इंग्रज सरकारने या प्लेगला नियंत्रित करण्यासाठी वॅाल्टर चार्ल्स रॅंड च्या अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली होती.
पुण्यातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या...
महाराष्ट्रातील इतिहासप्रेमीना दुर्गभ्रमंतीचे वेड लावणारे, ऐतिहासिक कादंबरीकार, महाराष्ट्रातील संतावरील भरीव लेखन , प्रवासलेखन चारित्रलेखक असे विविध गुणी ऋषितुल्य व्यक्तीमत्व म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर होय.
१/५
गो.नी. दांडेकरांनी सांगितलेली एक आठवण👇🏼
महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो. बाहेर धो धो पाऊस सुरु होता, पाखरंही आडोसा धरुन बसलेली.
खिडकीतुन आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो.
विचारच करीत होतो इतक्यात चेहरा दिसला. तसाच धडपडत बसमधुन खाली उतरलो,धावतच जावुन त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले अन विचारले हे काय? या प्रलयपावसात कुठुन आलात आणि कुठं निघालात?
🔸१९८५ साली शाह बानो खटल्यामधे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून, Bofors चा घोटाळा करुन, BoP Crisis होई पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावून, देशाचं सोनं विकून भारताची आर्थिक आणि सामाजिक अधोगती झाली नाही का🤷🏻♂️
धर्मस्वातंत्र्य म्हणजे तत्त्वज्ञान सांगायचे स्वातंत्र्य, संघटितपणे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. देशाच्या एकीला व नेकीला विरोधी असे धर्मस्वातंत्र्य असूच शकत नाही.
- स्वातंत्र्यवीर सावरकर
हिंदु समाजाला संघटित करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्येय होतं.
२/१३
सावरकरांना भारतीय समाजात मतभेद निर्माण करणार्या प्रथा नष्ट करायच्या होत्या.
६ जुलै, १९२० रोजी बंधू नारायणराव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, “मला इंग्रज राजवटी विरूद्ध लढा देण्याची जितकी गरज वाटते तितकीच जातीभेद आणि अस्पृश्यतेविरूद्ध बंड करण्याची गरज वाटते.”