#InternationalTigerDay निमित्त सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना पंतप्रधान @narendramodi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जगातल्या 70% वाघांचे निवासस्थान असलेल्या या भूमीत त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी आणि व्याघ्र-स्नेही पारिसंस्थेचे जतन करण्याची आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो आहोत.
भारत 18 राज्यात पसरलेल्या 51 व्याघ्रराखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्रगणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. भारताने व्याघ्रसंवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट 4 वर्ष आधीच पूर्ण केले-पंतप्रधान
भारताच्या व्याघ्र संवर्धन धोरणात स्थानिक समुदायांना सहभागी करुन घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. निसर्गासोबत सौहार्दपूर्ण सहअस्तित्व ठेवण्याच्या आमच्या प्राचीन परंपरा आणि मूल्यांपासूनही आम्ही प्रेरणा घेतली आहे-पंतप्रधान