🚩३० जुलै १६७७🚩
"दक्षिण दीग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले.
🚩३० जुलै १६८२🚩
कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"मोगल बादशहा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यांतून हाकलून
दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारुगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे "किमॉश " खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले.
यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या, मराठा सेनेच्या औरंगी अजस्त्र आक्रमणास तोंड देणाऱ्या विजिगीषू वृत्तीची कल्पना आल्यावाचुन रहात नाही.
"छत्रपती संभाजी महाराजांना जोराचा हल्ला करून दंडाराजपुरी घेईन अशी फार आशा होती. दादाजी प्रभू व इतर सेनापती व आपले निधड्या छातीचे ४ हजार लोक घेऊन,
त्यांच्याकडे वेढा घालविला. या दुर्घट कामासाठी उत्तेजित व्हावे म्हणून त्यांस अर्धा शेर सोने किंवा चांदीची कडी बक्षिस दिली.
परंतु यश आले नाही. बरेच लोक मारले गेले अवघे ५०० लोक वाचले.
🚩३० जुलै १७३३🚩
अंजनवेलच्या गोपालगड मोहीमेदरम्यान रघूनाथ हरींनी बाजीराव पेशव्यांना पत्र पाठवले त्या पत्रात रघूनाथ हरींनी लिहलं होतं कि प्रतिनिधी मला मोहीमेतून बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
🚩३० जुलै १७८७🚩
महादजी शिंद्यांना १७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले.
राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः
बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती.मग महाद्जीने आपला मोर्चा जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी राजपुतांकडे वळविला.जयपूर संस्थांनचा राजा पृथ्वीसिंग १७७८ मध्ये मेला व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता,
राज्यपदी आला. पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता.
त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली.
अगदी “साडी घातली म्हणून भारताची नाडी ओळखता येत नाही” म्हणणाऱ्या सिंगलहड्डीपासून ते जर्सी गाय, कॉंग्रेसकी विधवा म्हणणाऱ्या छप्पन इंची गाढवापर्यंत सर्वांनी त्यांच्यावर कुत्सित टीका केली आहे...
पण जिच्या मांडीवर गोळ्यांनी चाळण झालेल्या सासूने जीव सोडला.. जिच्या नवऱ्याच्या शरीराचे अवशेष प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरावे लागले, ती स्त्री राजकारणात येते.. उत्तरेतल्या परदा संस्कृतीतल्या तथाकथीत मर्दांना आपल्या राजकीय हुशारीच्या जोरावर लगाम घालते,
नागपुरातले चड्डीधारक मापात ठेवते, आपल्याला विदेशी म्हणून पक्ष सोडून गेलेल्याना पुन्हा आपल्याच आघाडीत येण्यासाठी तिष्ठत ठेवून, केंद्रात सहाव्या क्रमांकाचं मंत्रिपद देते .. आणि त्यावर कडी म्हणजे अनेकांनी ज्या पदाची सहा दशकं स्वप्न पाहिली ते पंतप्रधानपद नाकारते..
🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवरायांनी "दंडाराजपुरी" हिंदवी स्वराज्यात दाखल केले.
🚩३१ जुलै १६५७🚩
मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला.
🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ३१ जुलै १६५७ रोजी निळोपंत रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्याबरोबर आरमार व फौज देऊन जंजिरा काबीज करण्यासाठी पाठवले.
🚩३१ जुलै १६५८🚩
औरंगजेब मुघल सम्राटच्या तख्तावर बसला.
🚩३१ जुलै १६७७🚩
दक्षिण दिग्विजय मोहीम
छत्रपती श्री शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती" ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम" ला शिवशंकराचे दर्शन घेतले
🚩३१ जुलै १६८१🚩
औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले.