🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवरायांनी "दंडाराजपुरी" हिंदवी स्वराज्यात दाखल केले.
🚩३१ जुलै १६५७🚩
मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला.
🚩३१ जुलै १६५७🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ३१ जुलै १६५७ रोजी निळोपंत रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्याबरोबर आरमार व फौज देऊन जंजिरा काबीज करण्यासाठी पाठवले.
🚩३१ जुलै १६५८🚩
औरंगजेब मुघल सम्राटच्या तख्तावर बसला.
🚩३१ जुलै १६७७🚩
दक्षिण दिग्विजय मोहीम
छत्रपती श्री शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती" ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम" ला शिवशंकराचे दर्शन घेतले
🚩३१ जुलै १६८१🚩
औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले.
🚩३१ जुलै १६८३🚩
मराठयांनी युद्धाची तयारी करून दि.३१ जुलै १६८३ रोजी मराठयांनी चेउलवर जोराचा हल्ला केला. व त्यास वेढा घातला काही महिने निकाराचा लढा झाला.पण मराठ्यांना ते जिंकून घेण्यात यश आले नाही. चौलचा वेढा उठवण्यास मराठ्यांस भाग पाडण्यासाठी गोव्याचा व्हाइसरॉय कोंदी द ऑलव्होर
याने १७ ऑक्टोबर रोजी फोंडयावर स्वारी केली. २२ ऑक्टोबर रोजी पोर्तुगीज हल्ल्याची तयारी करत असताना त्यावेळेस छत्रपती शंभुराजे तातडीने राजापूर वरून फोंडयास आले.
🚩३१ जुलै १८५७🚩
१८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचा सहभाग
कोल्हापूर:इथल्या २७ व्या नेटिव-देशी पायदळ तुकडीतील २०० सैनिकांनी ३१ जुलै १८५७ ला उठाव करून इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले करून तिघा अधिकाऱ्यांना ठार मारले.नंतर स्थानिक जनता पण ह्या उठावात सामील झाली.
ह्या उठावाचे नेते कोल्हापूर महाराजांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे होते.
🚩३१ जुलै १८९७🚩
द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस
लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच,
पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव.
वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे राधानगरी धरणाचे बांधकाम सुरु केले होते, ते बांधकाम शाहूराजांच्या पश्चात पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले.
आजही सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू शाहू राजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे, राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले.
🚩३१ जुलै १९४०🚩
क्रांतिकारी उधमसिंग बलिदान दिन लंडनमधल्या कोर्टात खटला चालून क्रांतिकारी उधमसिंगांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनमधल्या पेंटॉनव्हिले
तुरुंगातच फाशी झाली आणि त्यांचे प्रेतही तुरुंगाच्या आवारातच पुरले गेले.
१३ मार्च १८४० रोजी लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमध्ये ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्सचं अफगाणिस्तानबद्दल भाषण चाललं होतं. भाषण संपल्यावर भारतमंत्री लॉर्ड झेटलंडने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
ह्या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हेही उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला अजून दोन लोक उपस्थित होते - ते म्हणजे पंजाबचा पूर्वीचा अजू एक गव्हर्नर सर मायकेल ओ’ड्वायर आणि ‘मोहम्मद सिंग आझाद’ हे नाव
(नाव नीट वाचा म्हणजे गंमत कळेल!) घेऊन तिथे आलेला भारतीय क्रांतिकारी उधम सिंग!
कसेबसे पैसे जमा करून फक्त जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या उधम सिंगांनी इथे लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी अनेक फुटकळ कामे केली. गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वगैरे.
एक सहसा माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘द फोर फेदर्स’ व ‘एलिफंट बॉय’ या दोन इंग्रजी चित्रपटांत कामही केले होते. (‘एलिफंट बॉय’ ची लिंक खाली देतोय.) पण हे सगळं वरवरचं होतं. त्यांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला हत्याकांडाचा बदला
घेणे हाच होता आणि ते संधीची वाटच पहात होते.
कॅक्स्टन हॉलच्या सभेचं आमंत्रण त्यांना मिळालं. मग त्यांनी तयारी सुरु केली. बोर्नमाऊथला जाऊन एका इंग्रज शिपायाकडून जाऊन एक जुनं पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवलं. सोबत
खिशात एक चाकूही घेतला.
१३ मार्च रोजीच्या सभेला उधमसिंगांनी मोहम्मद सिंग आझाद ह्या नावाने मस्त सूट - टाय - ट्रिल्बी हॅट वगैरे त्यावेळचा टिपिकल इंग्रजी पोशाख घालून हॉलमध्ये ऐटीत एंट्री केली. वर सांगितलेले साईक्सचे भाषण संपताच त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या.
दोन गोळ्या ओ’ड्वायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. दोन गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. एक गोळी सर लुईस डेनच्या मनगटावर लागली तर एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. दोन लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंगांना पकडले.
अगदी “साडी घातली म्हणून भारताची नाडी ओळखता येत नाही” म्हणणाऱ्या सिंगलहड्डीपासून ते जर्सी गाय, कॉंग्रेसकी विधवा म्हणणाऱ्या छप्पन इंची गाढवापर्यंत सर्वांनी त्यांच्यावर कुत्सित टीका केली आहे...
पण जिच्या मांडीवर गोळ्यांनी चाळण झालेल्या सासूने जीव सोडला.. जिच्या नवऱ्याच्या शरीराचे अवशेष प्लास्टिकच्या बॅग मध्ये भरावे लागले, ती स्त्री राजकारणात येते.. उत्तरेतल्या परदा संस्कृतीतल्या तथाकथीत मर्दांना आपल्या राजकीय हुशारीच्या जोरावर लगाम घालते,
नागपुरातले चड्डीधारक मापात ठेवते, आपल्याला विदेशी म्हणून पक्ष सोडून गेलेल्याना पुन्हा आपल्याच आघाडीत येण्यासाठी तिष्ठत ठेवून, केंद्रात सहाव्या क्रमांकाचं मंत्रिपद देते .. आणि त्यावर कडी म्हणजे अनेकांनी ज्या पदाची सहा दशकं स्वप्न पाहिली ते पंतप्रधानपद नाकारते..
🚩३० जुलै १६७७🚩
"दक्षिण दीग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले.
🚩३० जुलै १६८२🚩
कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"मोगल बादशहा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यांतून हाकलून
दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारुगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे "किमॉश " खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले.