देवाक काळजी रे 😭
थोडा व्यक्त होतोय बाकी लोकांना ही विनंती आहे खास करून शिक्षण क्षेत्रात असलेल्या नि जरूर व्यक्त व्हा .मी जे अनुभवतो आहे ते लिहितोय .आज ना मुलांना ना त्यांच्या पालकांना निकालाची ना हुरहूर , ना उत्साह ,ना भीती ना उत्कंठा ,ना देवाचा धावा ना पेढ्यांचा गोडवा ,
हा सगळा निकाल अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित खरे तर दीड ते दोन वर्षे अभ्यास, टेस्ट, परीक्षा हजेरी, निकाल सगळेच ऑनलाइन आहे .आज उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांची आकडेवारी आणि टक्केवारी वाचाल तर डोळे पांढरे होतील एकूण 93435 विदयार्थी 90%
1350 विद्यार्थ्यांना 95% तर 46 विद्यार्थी
100% मिळवून आहेत.दहावी चे पण तेच आणि 12 वी चे ही तेच. लाखो मुले पास झाली आहेत आणि ही काही आनंदाची बातमी नाही .10 वि 12 विच्या पौगंडावस्थेतील मुला मुलींन चे भावविश्व काचेच्या पेल्या सारखे तडकणार आहे .,मुले आणि पालक डिप्रेशन मध्ये जाणार.काही डॉक्टर इंजिनियर CA होणार बाकी काय ?
इंजिनियरिंग च्या या वर्षी दीड लाख जागा कमी झाल्या आहेत. विज्ञान कला वाणिज्य यांच्या फर्स्ट इयर ला ऍडमिशन घायला ही सगळी टोळधाड जेव्हा धडकेल ना तेव्हा सुरू होईल केविलवाणी धावपळ.टक्केवारी जास्त त्यामुळे कटआऊट 90 % च्या आसपास बंद होणार ,75 ते 80% मिळवणारे त्यांना पर्याय नाही.अगदी ITI
च्या ऍडमिशन पण मारामारी असते.यां लाखो विद्यार्थ्यांन चे हे 90 % च्या पुढची टक्केवारी ही ब्रॉयलर कोंबडी सारखी दिखाऊ आहे निदान दहावी ची तरी तशीच अवस्था आहे. सरकारी नोकरीचा दुष्काळ, आरक्षणाचा गोंधळ, परराज्यातील मुलांनी बॅंका ,फायनान्स कंपन्या,रेल्वे तसेच प्रशासकीय परीक्षा देऊन
बळकवलेल्या जागा मग आता नोकऱ्या कुठे आहेत?? हेच 12 लाख विदयार्थी चार वर्षानी ग्राज्युएट होणार .भविष्यात अंधार आहे आणि सरकारी धोरणात सुसूत्रता नाही .अगदी म्हणजे ज्या ला आपण "क्रीम " म्हणतो त्या बुद्धिमान मुलांना सोडून उरलेल्या एक तरुण पिढीची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे
मुलांच्या पालकांनी याचा विचार करून पावले उचलायला हवीत.फक्त करिअर नाही तर भक्कम मानसिक आधाराची गरज या संपूर्ण पिढीला आहे. कदाचित तिसरी लाट आली तर या पिढीचे मानसिक ,भावनिक , शैक्षणिक ,परिणामी थोडेफार शारीरिक ही नुकसान होणार आहे .आपण काळजीपूर्वक वागू या 🙏 शेवटी
देवाक काळजी रे 🙏.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Shekhar P

Shekhar P Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Godfath52464383

31 Jul
अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
Read 13 tweets
30 Jul
संस्कार ठेवा रे 😡
अजित पवार आज म्हणाले ही महाराष्ट्र ची भाषा नाही पण हे तितके खरे नाही .खरे तर शिवराळ भाषा राजकारणात आणण्याचे श्रेय सेने कडे जाते .भुजबळांना मैद्याचे पोते ,पवारांना बारामती चा मल्ल , ही उपाधी बाळासाहेब यांनीच दिली .मागे फडणीस यांचा वारु मोकाट उधळत होता तेव्हा
छगन उठ कमळ बघ ,शरद कमळ घे असे हलके वक्तव्य करून हा वारसा सुरू केला .आज राणे न चे पोर म्हणतात हे भाडखाऊ सरकार आहे .ही भाषा नाही हे संस्कार आहेत.जनाब सेना ,सोनिया सेना ,जितृदिन आव्हाड, संघोट्या , टरबूज ,चम्पा , बोबड्या , फावड्या , पेंग्विन , धरण मुत्र्या, बेडूक .अरे काय लावलय काय
इतकीच खुमखुमी आहे ते सरळ आई बहिणीवरून शिव्या चालू करा ना .शिव्या पेक्षा ही खालची पातळी राजाकारण्यांनी धरली आहे,त्यात सर्व पक्षीय महिला पदाधिकारी पण चौखूर उधळल्या आहेत.मुख्य म्हणजे महिलांच्या अशा वक्तव्ये किंवा ट्विट ला हजारो लाईक करणारे त्यांचे चाहते आहेत. संजय राऊत यांनी शायरी
Read 6 tweets
30 Jul
घरोघरी चे आहारतज्ञ 😩
काल प्रफुल ने केलेल्या ट्विट वरून जे मनात आहे ते लिहितोय .शब्दशः उच्छाद घातलाय या घरोघरी च्या आहारतज्ञ जमाती ने .आणि ही जमात सगळ्यांच्या घरी असते .शिक्षित अडाणी हुशार मठ्ठ गरीब श्रीमंत सगळीकडे ही जमात पावसाळ्यातील भुछत्र सारखी उगवली आहे.मुख्य म्हणजे
आपले तोकडे ज्ञान इतरांना सांगताना ते किंचित ही लाजत नाही 😱.आता या जमातीचे बोल वाचा माझे एक जवळचे संबंधित आहे त्यांच्या कडे पाच लोक मिळून अर्धा किलो तेल महिनाभर पुरते आम्ही तेल खातच नाही म्हणे, जपान मध्ये उकडलेले अन्न खातात म्हणून 100 वर्ष आरामात जगतात आम्ही उकडलेलं खातो 😩 एकदा
घरी दोस्त आला मी सफरचंद सोलून काप करून त्याला खायला दिले .साल फेकू नये खरे सत्व त्यातच असते तू चुकीच्या पद्धतीने सफरचंद खातो आहे म्हणाला.😩कोणाकडे जेवायला गेले की विचारणार भात वाढू ना शुगर आहे म्हणून विचारतो आहे 😩 अरे वाढ 😡 वरण भाता शिवाय जेवण आहे का ? चहा चे पण तेच साखर टाकू ?
Read 10 tweets
9 Jul
स्वयंप्रकाशीत व्हा 🌹🙏
प्रीतम वय 38 ,पंकजा वय 42 तसे पाहिले तर राजकारणात आल्यात तेव्हा 30 आणि 35 च्या असतील.गोपीनाथ मुंडे हे फक्त मराठवाडा पुरते लाडके व्यक्तित्व नव्हते तर उभा महाराष्ट्रात त्यांचे चाहते होते .आज मुंडे साहेबांन वर लिहिण्याचे काही प्रयोजन नाही विषय मुंडे
साहेबांचा नाही तर त्यांच्या मुलींचा आहे म्हणून त्यांची आठवण काढणे जरुरी आहे.आज जे काही या दोघीना मिळाले आहे म्हणजे प्रीतम ला दोन वेळा लोकसभा आणि पंकजा ला एकदा आमदार पद ते फक्त आणि फक्त मुंडे साहेबांना मरणोत्तर दिलेला सन्मान आहे तो मराठवाडा च्या लोकांनी आणि भाजपा या दोघांनी दिला
आहे.प्रीतम च्या पारड्यात 6 लाख असे विक्रमी मतदान हे मुंडे साहेबांन वरचे प्रेम आणि माया आहे .यात प्रीतम आणि पंकजा यांचा खारीचा वाटा आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही.पंकजा आक्रमक स्वभावाची आहे ती म्हणते मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे त्याची जाणीव गोपीनाथ गडावरच्या भव्य गर्दी
Read 9 tweets
9 Jul
हॅट्स ऑफ टू यू
दाद्दया त्यागी 🔥🔥🔥🔥
नारायण तातू राणे
काल राणे नि शपथ घेतली आणी रथी महारथी मुत्सद्दी ,हुद्र्य सम्राट , जाणते राजे , साधे राजे , टगे,सगे ,सोयरे सगळ्यानी तोंडात बोट नाही तर पाची बोटे घातलीत.राणे कोणत्याही पक्ष्यात गेले तरी राणे नि स्वतः च्या विचारसरणी त फार
बदल घडून आणला नाही.खरे तर सेने बरोबर पंगा घेणे तर ते पण बाळासाहेब असतांना हाच राणे न चा धमाका होता.मग काँग्रेस प्रवेश पण काँग्रेस म्हणजे प्रत्येक घोंगडे भिजत घालून सावलीत वाळत टाकणारे लोक.त्यात पृथ्वी राज बाबा, अधोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे एकाहून एक अडथळे पार पाडण्या पेक्षा
राणे नि स्वाभिमानी हा पक्ष काढला वास्तविक स्वाभिमान या शब्दाचा दूरदूर संबंध आपल्या राजकीय जीवनात त्यांनी ठेवला नाही.दस्तुरखुद्द राणे ना कधी कुठल्या पक्षात आपण जाऊ आणि सोडू याची खात्री तमा आणि पर्वा नसायची.कोकणी माणूस वरतून काटेरी आणि आतून फणसा सारखा गोड याला राणे नि तिलांजली
Read 7 tweets
8 Jul
राहू दे खर्च पाण्याला
दिलदार बाप 🌹🙏
फक्त EBC च्या फॉर्म वर पालका चा व्यवसाय म्हणून लिहिणाऱ्या जागेत पालक -शेती म्हणून लिहायचो तेवढीच शेती नावावर होती.वडिल मूर्तिकार ,पेंटर , चित्रकलेचे क्लासेस घायचे .इतर ही काम करायचे खास असे नियमित उत्पन्न नसायचे पण एकत्र कुटूंबात निभावून
जायचे. वडील थोडीशी घेत असत पण कधी घरी तमाशा किंवा गोंधळ कधीच करत नव्हते . इतर वेळी तुझे सर भेटले होते काल गणित कच्चे आहे म्हणत होते / शर्टवर शाई कोण फेकते रे तुझ्या ?/ पुस्तके फाटतात कशी तुझी 😡 इतक्या लवकर वही संपली ? पाऊस चालू तर जा ना विरघळणार आहे का पाण्यात ? हजारो प्रश्न
आणि मी कातवलेला .,शक्यतो बापा पासून लांबच राहायचो.पण पिऊन आलेले वडील पाहिले की मी एकदम मोकळा रिलॅक्स व्हायचो न पिलेला बाप म्हणजे गरम पाण्याचा बंब आणि पोटात गेलेली असली की बापा सारखा "गोड्या पाण्याचा झरा " दुसरा कुठेच नाही .इतर वेळी कमी खा शाळेत झोप येईल म्हणणारा बाप अचानक
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(