सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.
वाघ बेचैन झाला.
३+
मी जे बोलतोय तेच योग्य आहे हे त्याला माहित होतं. सिंहाला सत्य माहितीये हेही त्याला पक्कं ठाऊक होतं. मग हे असं कसं घडलं?!
दरबार संपायची वाट पहात वाघ बाहेरच थांबला. दरबारी निघून गेल्यावर वाघ हळूच आत शिरला आणि सिंहाला या अन्यायामागचं कारण विचारलं.
सिंह महाराज म्हणाले :
४+
"ती शिक्षा तुला गवताचा रंग नं कळण्याबद्दल नाही.
गवताच्या रंगासारख्या फालतू विषयावर -
गाढवसारख्या प्राण्याबरोबर -
८ दिवस...तब्बल ८ दिवस -
वाघासारख्या प्राण्याने वाद घालवावा -
हा तुझा पहिला गुन्हा.
५+
हा वाद मिटत नाहीये हे ८ दिवसानंतर लक्षात आल्यानंतर ही तू शहाणा झाला नाहीस -
हा दुसरा गुन्हा.
वाद मिटत नाही म्हटल्यावर -
विषय सोडून नं देता -
तू थेट माझ्या दरबारात येऊन माझा वेळ - पर्यायाने जंगलाचे रिसोर्सेस - वाया घातलेस -
हा तुझा तिसरा गुन्हा.
६+
यावरून खरंतर तुला दिलेली शिक्षा फारच सौम्य आहे.
पण या ५ वर्षांच्या मौनात तू शहाणा होशील अशी मला आशा आहे, म्हणून सध्या एवढीच शिक्षा दिलीये.
५ वर्षांनंतर परत बोलून बघूच!"
मिडीयमवर वाचलेल्या एका निनावी गोष्टीचं स्वरूप बदलून केलेलं हे स्वैर भाषांतर.
७+
आपण कोण हे आपलं आपण ठरवणं, त्यानुसार आपला वेळ, बुद्धी, कुवत वापरणं किती आवश्यक आहे हे या कथेतून कळेल!
"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.
१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!
फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.
२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.
त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.
२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.
कोव्हिड संकट विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. विशेषतः ९वी ते १२वीच्या. परिचयातील काही पालकांशी यावर बोलणं झालं, हातात काहीच नसताना फक्त काळजी करण्यापेक्षा हे दिवस अगदीच वाया जाणार नाहीत यासाठी मला जे सुचतं ते बहुतेकांना सांगितलं. तेच इथे मांडायचा प्रयत्न करतोय.
१+
हे सगळं मांडताना गृहीतक हे आहे की सध्या या ४ ही वर्गातील मुलं अभ्यासात बिझी असतीलच पण शाळा कॉलेज नसल्याने त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. शिवाय त्यांना करिअरबद्दल अनिश्चितता सतावते आहे. आणि ही अवस्था पुढील ६ महिने तरी कायम असेल.
२+
१ - आपल्याकडे प्रचंड वानवा असलेली फायनान्शियल लिटरसी कमवून घ्या. पैसा काय चीज आहे समजून घ्या. मार्केट कसं फिरतं जाणून घ्या.
येत्या ६ महिन्यांत रिच डॅड पुअर डॅड किमान ३ वेळा वाचून काढा. मित्रांचा ग्रुप करून त्यातील प्रिन्सिपल्स समजून घ्या.
इज्राईल-पॅलेस्टिन वादात तुम्ही कोणत्या बाजूचे आहात हे बाजूला ठेऊन हा व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.
देश म्हणून आपल्या प्राथमिकता कोणत्या असायला हव्यात आणि त्यामुळे, आम्ही आमचं बजेट कुठे खर्च करायचं? असे वेळोवेळी उभे रहाणारे वाद कसे बघायचे हे या निमित्ताने छान समजून घेता येतं.
१+
आज पॅलेस्टिनी मिसाईल्सपासून इज्राईलचं "ऑटोमेटेड प्रोटेक्शन" करणारी यंत्रणा म्हणजे आयर्न डोम.
२७ मार्च २०११ पासून कार्यान्वित झालेला आयर्न डोम, इज्राईलच्या नागरी भागावर सोडले गेलेले मिसाईल्स डिटेक्ट करतो.
२+
त्यांची दिशा - वेग - त्यानुसार त्यांचं संभाव्य डेस्टिनेशन ही गणितं काही सेकंदांत करून - हवेतच हे मिसाईल्स "इंटरसेप्ट" करून वरच्या वरच उडवली जातात.
याची अॅक्यूरसी किती आहे?
९०% हुन अधिक...!
म्हणजे दर १०० मिसाईल्समागे ९० हुन अधिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली हातात.
कारण त्याला साम-दाम-दंड-भेद निर्लज्जपणे आणि निर्दयीपणे कृतीत उतरवता येत होते.
हवं ते करणं राजेशाहीतही सहज शक्य नसतंच. ऑप्टिकक्स जपावेच लागतात. ते जपत, आपल्याला नको त्या गोष्टी घडूच नये अन घडल्या तर त्यांचा मिनिमम इम्पॅक्ट व्हावा - अशी तजवीज करण्यासाठी -
१+
कुणाच्याही नकळत अनंतखेळी खेळणं चाणक्यला जमलं.
म्हणून चाणक्य जिंकला.
पडद्यामागे विविध गुंतागुंतीच्या चाली रचून तो हवं तेव्हा शत्रूला आडवं पाडू शकत होता - म्हणून चाणक्य यशस्वी झाला.
शत्रूच्या नाजूक जागांवर आघात करणं, नजीकच्या भविष्यात हातघाईचा प्रसंग येऊ शकतो असं जाणवलं की -
२+
आधीच काटा काढणं, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्लॅकमेल करणं - हे सगळं चाणक्य नैतिकता वगैरे शिस्तीत बाजूला ठेऊन अमलात आणत होता.
हे जमलं तर चाणक्य जमला.
नाहीतर सत्तेत असूनही व्हिक्टिम कार्ड खेळत रहावं लागतं.
भारतीयांनी क्षुद्र राजकारणाची किती मोठी किंमत मोजणं अपेक्षित आहे?
शेतकरी आंदोलनाचा सोक्षमोक्ष अजूनही कसा लागत नाहीये?
दिल्लीत सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. विविध राज्यांमधून ऑक्सिजनचे ट्रक्स दिल्लीत पाठवले जाताहेत. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलकांमुळे -
१+
ट्रक्स वेळेवर पोहोचायला उशीर होतोय.
२ दिवसांपूर्वी आयनॉक्स एअर प्रोडक्टस या कंपनीने केंद्राला पत्र लिहून कळवलं होतं की राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून आणले जाणारे ट्रक सतत ब्लॉकेजेसना सामोरे जाताहेत.
किमान १०० किमी चा वळसा घालून यावं लागतंय त्यांना.
२+
जिथे रुग्णांच्या मिनिटा मिनिटाच्या श्वासाचं गणित जुळवण्यात आपल्या आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागतीये, तिथे ही अशी परिस्थिती भयावह वाटते.
हे तेव्हा - जेव्हा आमच्या तज्ज्ञ सोशल मीडिया चाणक्यांच्या म्हणण्यानुसार -