टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. पण त्या सोबतच आपल्या सर्व खेळाडूंना पदका पर्यंत पोहोचविन्यासाठी मोदी सरकारची "TOPS" पॉलिसी मैलाचा दगड ठरत आहे..
याच पॉलिसी बद्दल थोडक्यात..
+
ही पॉलिसी आहे, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचून तेथे निर्णायक विजय मिळवु शकणाऱ्या खेळाडूंना शोधणे, त्यांना लागेल त्या योग्य सुविधा, प्रशिक्षण देणे आणि त्यांना ऑलिंपिक पोडियमपर्यंत पोहोचविणे..
२०१४ मध्येच मोदी सरकार प्रथम सत्तेवर आल्यावर त्यावेळचे
+
क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली ही पॉलिसी अमलात आणण्याचा निर्णय झाला होता. ही पॉलिसी त्यावेळी ताबडतोब अमलात आणली गेली. टोकियो ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य पाहिले तर या पॉलीसीचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल.. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक मधले पदक विजेते सर्व भारतीय खेळाडू हे
कोणत्याही मोठ्या शहरातून आलेले नाहीत, तर ते दूरच्या किंवा छोट्या शहरांमधून आणि गावांमधून पुढे आलेले आहेत. एकट्या मणिपूर मधून तर पाच ऑलिम्पियन टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाले आणि त्यातले तीन ऑलिम्पियन खेळाडू पदक विजेते ठरले आहेत. या सगळ्या यशात TOPS या पॉलीसीचा नक्कीच हातभार
+
लागलेला आहे..
ऍथलीट्स आणि पॅराथलीट्स खेळाडूंची निवड ही टॉप्स एलिट ऍथलीट्स आयडेंटिफिकेशन कमिटीद्वारे केली जाते जिथे मिशन ऑलिम्पिक (MOC) नावाचा एक वेगळा सेल देखील आहे, ज्याचे एकमेव लक्ष टॉप्स अंतर्गत निवडलेल्या खेळाडूंना मदत करणे हे आहे..
TOPS चे फायदे आणि सुविधा :
- जागतिक
+
दर्जाच्या सुविधा असलेल्या संस्थांमध्ये जागतिक प्रतिष्ठित प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण
- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग
- खेळासाठी अद्ययावत उपकरणे आणि सामान खरेदी
- आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, स्पोर्ट्स मानसशास्त्रज्ञ, मानसिक प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्ट सारख्या सहाय्यक कर्मचारी/
+
कर्मचाऱ्यांच्या सेवा
- खेळाच्या शिस्तीसाठी, खेळ भावना वाढावी यासाठी इतर कोणतीही विशिष्ट मदत, प्रशिक्षण
- पॉकेट मनी म्हणून खेळाडूंना प्रति महिना रुपये ५०,०००/- प्रोत्साहन भत्ता
या आधी खेळाडूंचा फक्त प्रवास खर्च सरकार करायचे. क्रीडा इव्हेंटसाठी आणि क्रीडा सुविधांसाठी खेळाडूंना
+
खाजगी स्पॉन्सरवर अवलंबून रहावे लागायचे. तेथे आवश्यक उपलब्ध निधी उपलब्ध होईलच याची खात्री नसायची. त्यातून खेळाडूंचे सर्व लक्ष स्पॉन्सरर मिळवणे आणि खर्चाच्या जुळवणी याकडेच लागलेले असायचे. अनेकदा आपल्या प्रशिक्षकाची फी खेळाडूंना आपल्या खासगी खर्चातून भागवावी लागायची. याचा परिणाम
+
कुठेना कुठे खेळाडूंच्या गुणवत्तेवर नक्कीच होत असे..
या TOPS पॉलिसीमुळे खेळाडूला आता या इतर कोणत्याही गोष्टीच टेंशन राहिलेलं नाही.. खेळाडूने फक्त आणि फक्त आपला खेळ आणि कामगिरी याकडेच लक्ष केंद्रित करून बिंधास्त खेळ करावा बाकी सर्व गोष्टी हाताळायला सरकार भक्कमपणे पाठीशी आहे हा एक
प्रकारचा विश्वास या पॉलिसीने खेळाडूंना दिलेला आहे..
मिशन ऑलिम्पिक सेल (MOC), भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत तयार करण्यात आलेली निवड आणि रिव्यूव समिती, या TOPS योजने अंतर्गत खेळाडूंची निवड आणि करते.
या ऑलिम्पिक सेलद्वारे प्रत्येक आठवड्यात या
+
निवडल्या गेलेल्या खेळाडूंच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाते. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत हा ऑलिम्पिक सेल योग्य प्रशिक्षक आणि प्रशिक्षण संस्थांची निवड करते, तसेच खराब कामगिरी असणाऱ्या एखाद्या खेळाडूला काढून टाकणे किंवा चांगली कामगिरी असल्यास त्यांना कायम ठेवण्याची शिफारस सुद्धा
+
याच सेल द्वारे केली जाते..
असे शिफारस पात्र खेळाडू हे TOPS कडून भत्ता मिळण्यासाठी पात्र होतात..
(i) टॉप्स प्रायोजित खेळाडू, साक्षी मलिक (कुस्ती) आणि पीव्ही सिंधू (बॅडमिंटन) यांनी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदके जिंकली.
(ii) २०१६
+
च्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये टॉप्स खेळाडूंनी चार पदके, दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य जिंकले.
(iii) गोल्ड कोस्ट येथे २०१८ कॉमनवेल्थ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या ७० खेळाडूंपैकी ४७ खेळाडू हे TOPS योजनेत सहभागी झालेल्यांपैकी होते..
कोणत्याही योजनेचे यश हे सर्वस्वी
+
ज्यांच्यासाठी ती योजना तयार केली आहे त्यांच्यावर त्याचा नेमका किती प्रभाव पडतो यावर अवलंबून असते. भारतीय बॉक्सिंगची दिग्गज मेरी कोम आणि गोल्डन भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या म्हणण्या नुसार, TOPS ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळविण्यासाठी खेळाडूंसाठी एक मैलाचा दगड ठरत आहे..
या
+
योजनेच्या यशामुळेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कनिष्ठ खेळाडूंसाठी सुद्धा Junior TOPS लाँच करण्यात आले आहे.. यात प्रामुख्याने २०२४ आणि २०२८ ऑलिम्पिकवर नजर ठेवून २५० पेक्षा जास्त तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे टोकीयो ऑलिम्पिक ही तर आत्ता कुठे फक्त सुरुवात आहे भविष्यात
+
ऑलिम्पिक खेळात सुद्धा आपल्या देशाला सुगीचे दिवस नक्की येणार हा विश्वास व्यक्त करायला काही हरकत नाही..
#रोड_मराठा
... इतिहासातील दोन प्रकरणे मी कधीच वाचत नाही किंबहुना माझ्याच्याने ती वाचण्याची हिम्मतच होत नाही... याला कारण आहे हिंदूंची झालेली कत्लेआम आणि त्यानंतर झालेली ससेहोलपट... त्यातील पहिले प्रकरण आहे पानिपत आणि दुसरे आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन अर्थात देशाची फाळणी..
... पानिपतावर मराठ्यांचा झालेला पराभव हा आज तागायत आमच्या जिव्हारी लागलेला आहे... ज्यावेळी प्रचंड अपयश येते त्यावेळी आपण त्याचे पानिपत झाले म्हणतो... पानिपतावरच्या "काला आम"ची कथा आजही प्रसिद्ध आहे... दोन मोत्ये गळाली, सत्तावीस मोहरा हरपल्या, एक लाख बांगडी फुटली हे वर्णन आजही
+
विषण्ण मनाने सांगितले जाते... सावरकरांनी लिहिलेले उत्तरक्रिया हे संगीत नाटक पानिपताच्या पराभवावाचे उट्टे काढण्या वरून आहे... पानिपतचा पराभव आजही आमच्या समाज मनातील सल आहे...
... स्वकर्तृत्वाने हिंदू पातशाही ची स्थापना करून हिंदू साम्राज्य दिनाचा अर्थात शिवराज्याभिषेकाचा सोहळा
+
#वेड
... २००२ च्या विम्बल्डन स्पर्धेत... महिलांच्या एकेरी अंतिम फेरीत... वीनस आणि सेरेना या दोन सख्ख्या बहिणी एकमेकींविरुद्ध खेळायला उभ्या राहिल्या होत्या...
... ऐन विशीतल्या आपल्या दोघी लेकींचा अभूतपूर्व सामना पाहण्यासाठी त्यांचे वडील रिचर्ड विलियमस आवर्जून हजर होते...
+
... पत्रकारांनी रिचर्ड यांना गराडा घातला... या सामन्या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना रिचर्ड विलियम्स म्हणाले...
... या दोघी ४-५ वर्षांच्या असल्यापासून त्यांना प्रशिक्षणासाठी मी रोज सकाळी टेनिस कोर्टवर घेऊन जात असे... आमचे शेजारी आम्हाला हसायचे... हा काळया आपल्या पोरींना
+
विम्बल्डन चॅम्पियन करणार आहे म्हणून शहरातले अनेकजण उपहासाने टिंगल-टवाळी करायचे... पण मी वेडच घेतलं होतं... जिद्दीने चिकाटीने मुलींचं प्रशिक्षण आणि सराव यात खंड पडू दिला नाही... आज हसणार्या त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो...
... ही मॅच कोणी ही जिंको... विम्बल्डनची ट्रॉफी माझ्याच
#आगे_बढ़ो_आगे_बढ़ो
... दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या सुदैवाने त्या देशाला विन्स्टन चर्चिल नावाचा पंतप्रधान मिळाला... रणांगणावर आणि राजकीय डावपेचात तो अक्षरशः शत्रू आणि मित्र राष्ट्रांना पुरून उरला... विन्स्टन चर्चिल हे एक लोक लोकविलक्षण व्यक्तिमत्व होते... विन्स्टन चर्चिलचा
+
हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा होता... मात्र आम्हाला त्याचे कौतुक असायचं काहीच कारण नाही कारण... तो प्रचंड हिंदुस्तान द्वेष्टा होता...
... एकदा पत्रकारांनी विन्स्टन चर्चिलला आपल्या आयुष्याचा, जीवनाचा आदर्श कोण? आपले प्रेरणास्थान काय... असा प्रश्न विचारला... क्षणाचाही विलंब न लावता
+
चर्चिल म्हणाला... माझा शिंपी... आश्चर्यचकित झालेल्या पत्रकारांनी विंस्टन चर्चिलला त्याचा शिंपी प्रेरणास्थान कसं असू शकतो म्हणून विचारलं...
... विन्स्टन चर्चिल म्हणाला... ब्रिटनचा पंतप्रधान या नात्याने मी वर्षाला किमान चार जोडी सूट शिवतो... दर तीन चार महिन्याने मी माझ्या
+
#वरपिता
... एक राजा होता... एकदा त्याने आपल्या प्रधानाला विचारले... जगात सगळ्यात जास्त सन्मान कोणाचा?... प्रधान उत्तरला... वर पित्याचा... राजाला खरंच वाटेना... राजाने प्रधानाला वर पित्याचा सन्मान जगात सर्वात जास्त हे सिद्ध करायला सांगितलं...
... दुसऱ्या दिवशी प्रधान राजाला घेऊन
+
एका शेतकऱ्याच्या झोपडीत गेला... झोपडीचा शेतकरी मालक अत्यंत दरिद्री होता... झोपडीत जगायला पुरेसं सामानही नव्हतं... अठराविश्व दारिद्र्य... राजा आपल्या घरी आलेला बघून त्या दरिद्री शेतकऱ्याने खाटेवर कांबळं अंथरलं... राजाला त्या खाटेवर बसवलं आणि आपण खाली जमिनीवर राजाच्या पायाशी बसला..
... राजाचं आपल्या घरी येण्याचं प्रयोजन काय हे विचारल्यावर प्रधान म्हणाला की... राजाला आपली मुलगी तुझ्या घरी द्यायची आहे... शेतकरी गयावया करून रडू लागला... गरीबाची कशाला थट्टा करता म्हणून हात पाय जोडू लागला...
... महत्प्रयासाने प्रधानाने शेतकर्याला पटवून दिलं की... राजाला खरंच
+
... राजीव गांधींच्या नावावर असलेल्या सरकारी शैक्षणिक संस्था... मोजून २७...
... मान ना मान मैं तेरा मेहमान
मैं और मेरा बाप महान...
...
आसाम राजीव गांधी यूनिव्हर्सिटी ऑफ को ओपरेटीव्ह मॅनेजमेंट, आसम
राजीव गांधी मेमोरियल बोर्डिंग स्कूल, श्योपुर, मध्य प्रदेश
राजीव गांधी अकादमी फॉर
+
एविएशन टेक्नोलॉजी, त्रिवेंद्रम, केरळ
राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी, तिरुवनंतपुरम, केरळ
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, श्रीपेरंबुदूर, तमिळनाडु
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, पुडुचेरी
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, रिसर्च एंड टेक्नोलॉजी, चंद्रपूर,
+
महाराष्ट्र
राजीव गांधी कॉलेज ऑफ वेटरनरी एंड एनिमल साइंसेस, पुडुचेरी
राजीव गांधी डिग्री कॉलेज, आंध्रप्रदेश
राजीव गांधी एजुकेशन सिटी, हरियाणा
राजीव गांधी फाउंडेशन, दिल्ली
राजीव गांधी गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज, हिमाचल प्रदेश
राजीव गांधी सरकार पॉलिटेक्निक, अरुणाचल प्रदेश
+
ऑलम्पिक मध्ये घडवला इतिहास....
२००८ नंतर पहिल्यांदा आॕलिंपिक मध्ये घुमणार भारताचे राष्ट्रगीत...
"भाला फेक" मध्ये "नीरज चोप्राला" सुवर्ण पदक ....🥇
अभिनंदन नीरज... 🙏🚩