अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरीच लसीकरण
नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
यासाठी नागरिकांनी forms.gle/E3n36oj81pMniV… या लिंकवर जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अशा रुग्णांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे.
दीर्घ आजारपणामुळे तसेच शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याची विशेष मोहीम ठाणे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून नागरिकांनी या लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सीन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्यात येत असून ज्या नागरिकांना जागेवरुन हलता येत नाही, कॅन्सरचे रुग्ण, अनुवांशिक विकार असणारे रुग्ण, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण किंवा
लिंकवर जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अशा रुग्णांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. जे बरेच महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची तयारी महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
यामध्ये अशा व्यक्तींचं किमान सहा महिने अंथरुणात खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमती पत्र किंवा नातेवाईक यांचे संमतीपत्र प्रशासनाला सादर करणे आवश्यक आहे.
या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादानुसार आठवड्यातून एक वेळ त्या-त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ व्हॅक्सिनेटर, आणि १ डेटा ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'होळी उत्सव' साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'होळी उत्सव' यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने
दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या
🚱शनिवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करणे, ट्रान्सफार्मरचे ऑईल फिल्टेशन करणे,मुख्य जलवाहिनीवर असलेली क्रॉस कनेक्शनवर होत असलेली गळती थांबविणे (1/4) @TMCaTweetAway
तसेच टेमघर जलशुध्दीकरण केंद्रात मुख्य जलवाहिनीवर असलेल्या झिरोवेलासिटी वॉलमधून होणारी गळती थांबविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी शनि. दि. 06/06/2020 रोजी सका. 9.00 ते रवि. दि. 07/06/2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे (2/4)
🚱परिणामी घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर, ऋतूपार्क,सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याचा काही भाग आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.(3/4)
#WaterCut
शुक्रवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद
@TMCaTweetAway च्या पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करण्याकरिता #शुक्रवार दिनांक 29/05/2020 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 9.00 वाजेपर्यत 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
#Thane#Update
परिणामी घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर ऋतूपार्क, सिध्देश्वर जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर, कळव्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहिल.
वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उपनगर अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.