भारतीय भूमीत ख्रिस्तपूर्व ३००० सालापासूनचे नागरी सांस्कृतिक पुरावे सापडतात.
पण भारत मुघलांनी घडवलाय.
अंदाजे ६०,००० लोक रहात असावीत अशी - ड्रेनेज सिटीम्स, पक्क्या विटांची घरं, पाणीपुरवठा यंत्रणा आणि व्यवस्थित टाऊन प्लॅनिंग केलेली शहरं
१+
इथे ख्रिस्तपूर्व २५०० साल पूर्वी होती.
पण, समजून घ्या, भारत मुघलांनी घडवलाय.
बाय द वे - हे आपण नागरी संस्कृती बद्दल बोलतोय. शेती आणि तत्सम "वस्ती करून" रहाणारा माणूस इकडे ख्रिस्तपूर्व ७५०० वर्षांपूर्वीच होता.
पण, तरीही, भारत मुघलांनी घडवलाय.
२+
आमचं महाभारत घडलं वेदिक काळात. म्हणजे ख्रिस्तपूर्व १००० वर्षांपूर्वी. म्हणजे त्यावेळी आमच्याकडे थेट युद्ध करता येण्याजोगी विकसित संस्कृती होती.
पण, अर्थात, भारत मुघलांनीच घडवलाय.
या भूमीत २ सुवर्णयुग मानले जातात.
उत्तरेकडील सुवर्णयुग, दक्षिणेकडील सुवर्णयुग.
३+
या युगांमध्ये या भूमीत काव्य शास्त्र संगीत विज्ञान स्थापत्य तत्वज्ञान गणित अश्या सर्व क्षेत्रात प्रगती झाली. व्यापार वृद्धिंगत झाला. संस्कृतीची भरभराट झाली.
उत्तरेकडे हे सुवर्णयुग येऊन गेलं - इसवी सन ४०० ते ६०० च्या दरम्यान.
४+
याच काळात गुप्त राजसत्तेत डेसिमल सिस्टीम, शून्यचा शोध लागला. भौतिक शास्त्रातील अनेक सिद्धांत मांडले गेले.
दक्षिणेकडे १०व्या आणि ११व्या शतकात सुवर्णयुग होतं. चोला साम्राज्याने दक्षिणेत अनेक वंडर्स घडवून आणले. केंद्रीय सरकार आणि ब्युरोक्रसी उभी केली त्यांनी.
५+
मोठी मंदिरं, शिल्पं फक्त पूजेची ठिकाणं नं समजता आर्थिक उलाढालीची चक्रं म्हणून निर्माण केली.
असा हा अक्षरशः हजारो वर्षांचा इतिहास आहे या भूमीचा.
आणि हा कुणी संघी प्रतिगामी इतिहासकाराने लिहिलेला इतिहास नाही.
फिरंग्यांचे शब्द आणि त्यांचेच आकडे आहेत सगळे.
सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.
"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.
१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!
फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.
२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.
त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.
२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.
कोव्हिड संकट विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. विशेषतः ९वी ते १२वीच्या. परिचयातील काही पालकांशी यावर बोलणं झालं, हातात काहीच नसताना फक्त काळजी करण्यापेक्षा हे दिवस अगदीच वाया जाणार नाहीत यासाठी मला जे सुचतं ते बहुतेकांना सांगितलं. तेच इथे मांडायचा प्रयत्न करतोय.
१+
हे सगळं मांडताना गृहीतक हे आहे की सध्या या ४ ही वर्गातील मुलं अभ्यासात बिझी असतीलच पण शाळा कॉलेज नसल्याने त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. शिवाय त्यांना करिअरबद्दल अनिश्चितता सतावते आहे. आणि ही अवस्था पुढील ६ महिने तरी कायम असेल.
२+
१ - आपल्याकडे प्रचंड वानवा असलेली फायनान्शियल लिटरसी कमवून घ्या. पैसा काय चीज आहे समजून घ्या. मार्केट कसं फिरतं जाणून घ्या.
येत्या ६ महिन्यांत रिच डॅड पुअर डॅड किमान ३ वेळा वाचून काढा. मित्रांचा ग्रुप करून त्यातील प्रिन्सिपल्स समजून घ्या.
इज्राईल-पॅलेस्टिन वादात तुम्ही कोणत्या बाजूचे आहात हे बाजूला ठेऊन हा व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.
देश म्हणून आपल्या प्राथमिकता कोणत्या असायला हव्यात आणि त्यामुळे, आम्ही आमचं बजेट कुठे खर्च करायचं? असे वेळोवेळी उभे रहाणारे वाद कसे बघायचे हे या निमित्ताने छान समजून घेता येतं.
१+
आज पॅलेस्टिनी मिसाईल्सपासून इज्राईलचं "ऑटोमेटेड प्रोटेक्शन" करणारी यंत्रणा म्हणजे आयर्न डोम.
२७ मार्च २०११ पासून कार्यान्वित झालेला आयर्न डोम, इज्राईलच्या नागरी भागावर सोडले गेलेले मिसाईल्स डिटेक्ट करतो.
२+
त्यांची दिशा - वेग - त्यानुसार त्यांचं संभाव्य डेस्टिनेशन ही गणितं काही सेकंदांत करून - हवेतच हे मिसाईल्स "इंटरसेप्ट" करून वरच्या वरच उडवली जातात.
याची अॅक्यूरसी किती आहे?
९०% हुन अधिक...!
म्हणजे दर १०० मिसाईल्समागे ९० हुन अधिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली हातात.