#स्थळपहाणी
चाचू मेकॅनिकल इंजिनिअर, पण थोडे लाजरे आणि टोटली भोळे (इनो"संत" )
सर्व प्रकारच्या गाड्या दुरुस्त करत

इंजिनिअरींग पूर्ण होऊन सेटल झाले आणि घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला

पण चाचू नेहमी आपल्या कामाच्या तंद्रीत
एका लग्न जुळविणाऱ्या कडून चाचुंना फोन आला
एक स्थळ आहे
पण चाचू आपल्याच विचारात असल्याने त्यांनी विचारले
"कोणत्या कंपनीची आहे ?"

तिकडून पुन्हा फोन आला नाही

एका मॅरेज ब्युरो कडून फोन आला, चाचू तुमच्यासाठी उत्तम स्थळ आलंय

पुन्हा तोच पाना (पाढा)

" कोणतं मॉडेल आहे हो?"

त्या मॅरेज ब्युरो ने आज गॅरेज खोलले आहे
घरच्यांनी खूप प्रयत्न केल्यावर एक स्थळ जुळले

चाचू आणि घरचे मुलीच्या घरी दाखल झाले
कार वगैरे बघून मुलीच्या घरचे खूष

मुलगी चहा आणि पोहे घेवून आली, तेव्हड्यात चाचुंना मोबाईल कॉल आला

चाचू "अरे पण टू व्हीलर आहे का फोर व्हीलर ?"

मुलीनं आपल्या हात -पायांकडं पाहिलं दोन हात आणि
दोनच पाय होते
चहा पोहे वाया गेले

आणखी एका ठिकाणी कहरच झाला

मुलगी बाहेर आली आणि चाचू

फोन वर"अरे नवीन आहे की सेकंड हँड?"

पुढचं वर्णन न करण्यासारखं आहे

पण चाचू खूप इनो"संत" आहेत

पाहिजे एक 2000 सालचं शोरूम मॉडेल
टू व्हीलर, सरळ चालणारं (चाचूनसारखं)
कमी धूर (भांडण ) करणारं
PUC आणि मेंटेनन्स चाचू स्वतः जबाबदारी घेतील

इच्छुकांनी चाचू ऑटोमोटिव्ह कंपनीस संपर्क करावा
#तिरकस
#नाना_म्हणे
टीप- कुणाच्याही भावना दुखाविण्याचा हेतू नाही

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with नानाची टांग

नानाची टांग Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @nanachi_tang202

24 Mar
#राजकारणाचा_भेंडीबाजार

राजकारणाच्या चौकात #भाजी'पाल' (भाजी विक्रेता) भाज्या घेऊन बसला होता

त्यात एक 'फळांचा राजा', एक 'फळांचा उपराजा', मोजकी मोठी रसाळ 'संत्री' अनेक छोटी 'सामान्य संत्री'
आणि वेगवेगळ्या कलर च्या भरपूर 'भेंड्या' मांडल्या होत्या
भाजी'पाल' ओरडत होता भेंड्याच्या बदल्यात आंबा, संत्री घ्या sss 📢

एक स्थूल गृहस्थ आणि त्यांचे चारपाच सोबती जवळ जवळ धावत तिथे पोहोचले

स्थूल पणामुळे दम लागला होता

तरीही भाजी'पाल' यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते

आमच्याकडे एकशे ....(पण मध्येच दम लागला)
भाजी'पाल' नी भाज्यांवर पाणी मारत, ग्लासभर पाणी त्या स्थूल गृहस्थास दिले

आणि चहा घेणार का ? विचारले

सद्गगृहस्थाना खूपच घाई होती, पाणी पीत पीतच बोलले

आमच्याकडे एकशे चार भेंड्या आहेत,
या घ्या आणि आम्हाला फळांचा राजा, उपराजा, आणि संत्री द्या
Read 8 tweets
23 Mar
#मामीआणि_पिसाळलेलाकुत्रा

अखंड महाराष्ट्राच्या लाडक्या, थोर्थोर गायिका यांना हे अचानक काय झालं ?
याची खोलात जाऊन आम्ही चौकशी केली ,त्यातून समोर आलेलं सत्य आपल्यासमोर मांडत आहे

अखिल भारतीय श्वान संघटनेचा अध्यक्ष आणि 'ठार भारत' चा म्होरक्या नेहमी भुंकून भुंकून
ओरडायचा ऐ उ ठा, ऐ दशमुख, ऐ एस राऊत वगैरे वगैरे,
तर हा श्वान सध्या निद्रिस्त असला तरी मामींच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा

मामी काही दिवसांपूर्वी आपल्या पंचतारांकित गाडीतून आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणत , आपल्याच धुंदीत पंचतारांकित हॉटेल कडे चालल्या होत्या
हॉटेल च्या गेट वर पोहोचल्या आणि

मामींनी गाडीचा दरवाजा खोलला आणि नेमका हा 'पिसाळलेला श्वान' तिथेच बसला होता, मामींचा पाय शेपटावर पडताच कडाडून चावला.

मामींनी मामुना फोन लावून पंचतारांकित सरकारी इस्पितळात दवापाणी केले पण,

त्या दिवसापासून मामींचे स्वर डायरेक्ट 'सप्तकात'
Read 5 tweets
22 Mar
#अर्रर्रर्रर_नेम_चुकलाच

लहान असताना मित्रांची गॅंग जमवून उन्हाळ्यात आंबे, चिंचा, आवळे, बोरं झाडावरून दगड-गोटे-काठ्या नी झाडावर नेम धरून पाडून खायला एक वेगळीच मज्जा यायची

तर मी, निल्या, आतल्या , अभ्या, अश्या अशी पूर्ण गॅंग निघाली
आंब्याच्या बागेत पोहोचलो , एक मोठं आंब्याचं झाड बघून अभ्या ने दगड मारला एकदम आंब्या जवळून गेला, आंबा पडला नाही आणि अभ्या बोलला

'अर्रर्रर्रर नेम चुकलाच'
मग अचूक नेम असलेल्या 'निल्या' ने नेम धरून दगड फेकला

तो आंब्यावर लागला पण आंबा काही पडला नाही
निल्या- अर्रर्रर्रर नेम चुकलाच
एवढ्यात लक्षात आले की आंब्याच्या झाडाखाली दुसऱ्या बाजूला एक बाबा (प्रत्त्येक वेळेस #बाबा_रंगदेव असलाच पाहिजे का?) डोळे मिटून ध्यानस्थ
बसले होते

आता अचूक नेम असलेल्या आतल्या ने एक डोळा बंद करून दगड भिरकावला दगड आंब्याला स्पर्श करून गेला पण आंबा काही पडला नाही
Read 8 tweets
22 Mar
#पुस्तकांचे_पुतळे
टीप १- खालील धागा मनातल्या मनात वाचावा, जाहीरपणे मोठ्याने वाचल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही

तर वाचनाची आवड आम्हाला लहानपणापासूनच आहे,
काहीही वाक्य नजरेस पडले की, आम्ही ते जाहीरपणे मोठ्याने, चार चौघास ऐकू गेले पाहीजे अशा पद्धतीने वाचतो
एसटी त तिकीट काढायच्या आधी

"वाहकास नेमके व सुट्टे पैसे द्यावेत" असे मोठ्याने वाचत कंडक्टरास ५०० रुपयांची कडक नोट देत एक पुस्तकनगरी द्या, असे बोललो होतो,
आता त्याने आमच्याकडे रागाने का बघितले ,हे मात्र आम्हाला समजले नाही

बस स्टँड वरील (अ)स्वच्छतागृहातील सुविचार ही
आम्ही कित्येकदा मोठ्याने वाचले आहेत, पण ते इथे सांगण्यासारखे नाहीत (वाचकांनी आम्हाला माफ करावे)

एकदा आम्ही सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले
" *** वापरा, एड्स टाळा " हे वाक्य जाहीरपणे मोठ्याने वाचले , तर उपस्थित लोक आमच्याकडे वेड्यासारखे पहात हसत होते, एका काकू ने तर पायातील चपलेकडे
Read 8 tweets
24 Feb
#नामकरण_सोहळा

क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू, थोर क्रिकेट समालोचक, तज्ञ क्रिकेट प्रशिक्षक, ऑल टाईम ऑल राउंडर... आणखी बरेच काही बाही असणारे आमचे परमखिलाडी 'सेठ मनोहरदास' यांचे नाव एका छोट्याशा मैदानाला काय दिले आमच्या विरोधकांनी आकाश पाताळ एक केले
ज्याचे नुसते पोस्टर खोलीत लावून आम्ही क्रिकेट शिकलो ,आशा या प्रातः स्मरणीय, सेठ मनोहरदास यांचे योगदान माहिती नसणाऱ्या पामारांना त्यांचे योगदान आम्हास सांगावेच लागेल, म्हणून हा लेखन प्रपंच .

सेठ दासांना बोलायला यायला लागलं तर त्यांच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला 'क्रिकेट'
पण आईवडील शिकले नसल्याने याची नोंद इतिहासात नाही, पण सेठनीच येकदा खाजगीत आम्हाला सांगितले होते, आता त्यांनी सांगितले म्हणजे साक्षात शंकेस ही शंका घेण्याचा अधिकार नाही.

लहानपणी सेठ 'बडावनं' (शब्द थोडा अवघड आहे पण दास सोप्पं काम करतच नाहीत)
Read 11 tweets
23 Feb
#शेतकरी_आणि_कुत्रा

एक शेतकरी होता आणि त्याने पाळलेला एक कुत्रा होता. कुत्रा इमाने इतबारे शेतकऱ्याची सेवा करायचा आणि त्याबदल्यात कुत्र्यालाही शेतकरी आपल्या ताटातील जेवण द्यायचा. शेतकऱ्याच्या मुलांसोबत खेळायचा,झोपायचा.

शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा
शेतकरी शेतावर चालला की कुत्रा त्याच्या मागोमाग जायचा

शेतकऱ्याने बैलगाडी/ बैलबंडी बैलं जुंपून बाहेर काढली आणि शेतावर चालला की कुत्राही सोबत सोबत चालायचा

काही दिवसांनी कुत्र्याच्या डोक्यात वेगळीच हवा शिरायला लागली
बैलगाडी/बैलबंडी शेतावर चालली की, उन्ह लागतं म्हणून कुत्रा बैलगाडीच्या खालून, सावलीतून चालू लागला
बैलगाडी थांबली की कुत्रा थांबायचा

काही दिवसांनी कुत्र्याला असं वाटायला लागलं की आपण चाललो की बैलगाडी चालते आणि आपण थांबलो की बैलगाडी थांबते
आपणच बैलगाडी ओढतो असं कुत्र्याला वाटू
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(