म्हातारी मेल्याचे दुःख नाही
पण काळ सोकावतो.

उर्फ कायद्याचं राज्य की
अंधःकारमय अनाचार.. ?

गृहमंत्री अनिल देशमुख ED ने लुक आऊट नोटिस जाहीर केल्याने आता ऑफीशियली फरारी गुन्हेगार झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा शरमेने काळेठिक्कर व्हावे असा क्षण आहे.
कारण प्रत्येक राजकीय पक्षांनी संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली असते.

गृहमंत्री देशमुख जर न्यायिक प्रक्रियेपासून पळ काढत असतील तर ते संविधानाचा अपमान करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जाहीर नोटिस देऊन दिलेल्या कालावधीत जर ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत तर त्यांचे पक्ष सदस्यत्व सुध्दा रद्द केलं पाहिजे. नेत्यांनी नैतिकतेचे पालन केलंच पाहिजे, असा एक सकारात्मक संदेश जनतेमध्ये जाणे आवश्यक आहे.

या पोस्टला आपण अधिकाधिक व्हायरल-
करूया आणि या पध्दतीचे जनसामान्यांचे दडपण राजकीय पध्दतीवर आणायला सुरवात करूया. जेणेकरून भविष्यात कुठलाही राजकीय पक्षाचा नेता त्याच्यावर आरोप झाले तर न्यायिक प्रक्रियेला सामोरा जाईल. भेकडपणे, गुन्हेगारांसारखा पळ काढणार नाही आणि असल्या पळकाढू लोकांना, त्यांच्या पक्षावर दडपण-
आणून हाकलायला लावले, तर पक्ष आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल या गैरसमजातुन सुध्दा गुन्हेगार मुक्त होतील.

भविष्यामध्ये गुन्हे करायला धजावणार नाहीत अशा पध्दतीचा जर डिटरन्स निर्माण करायचा असेल, तर आमदारकी रद्द होऊन आणि पक्षाचे सदस्यत्व कॅन्सल होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही दोन-
कवच कुंडले धारण केलेला व्यक्ति पोलिसांवरती कुठल्याही स्वरूपाच दडपण आणू शकतो.

अनिल देशमुख हे केवळ आमदार नव्हते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ सदस्य होते. त्यांनी यापूर्वी सुद्धा मंत्रीपद भूषवले आहे. यावेळी ते महाराष्ट्राचे गृह मंत्री होते. गृह मंत्री पदावर असलेला व्यक्ती,
त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्या नंतर न्यायिक प्रक्रियेला सामोरे न जाता प्रत्येक वेळी प्रकृतीअस्वास्थ्याचे कारण देऊन वेळकाढूपणा करतो आणि संधी मिळताच फरार होतो. हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांच्या या वर्तनांने गृहमंत्री आणि आमदार या दोन्ही पदांचा अवमान झालेला आहे.
सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे किंवा पोलिसांना सामोरे न जाता अश्या पद्धतीने पळ काढणे हे आपण समजू शकतो. परंतु ज्या व्यक्तीला समाजाने आमदार केले आहे, गृहमंत्र्यासारखे उच्चपद प्रदान केले आहे, तो सुद्धा न्यायिक प्रक्रियेची प्रतिष्ठा राखणार नसेल तर यातून-
कायद्याचे राज्य या संकल्पने बद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मूलभूत स्वरूपाचे नकारात्मक प्रश्न निर्माण होतात.

कायद्याचे पालन करायची गरज नाही, आपण कायद्याला कधीही फाट्यावर मारू शकतो. या पध्दतीचा नकारात्मक दृष्टीकोन समाजामध्ये पसरतो आहे. गृहमंत्री पदावरील व्यक्ती हिस्ट्रीशीटर-
क्रिमिनल सारखे वर्तन करत असेल, तर आपल्या व्यवस्थेत आमदारकी रद्द करणे, पक्षातून हकालपट्टी या तरतुदी हव्या. त्याचा पक्ष या वर्तनाच्या नंतरही पाठीशी घालत असेल तर त्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी. हे झाले तर आणि तरच भविष्यात कुठलाही राजकारणी असा माजोरीपणा पुन्हा करणार नाही.
हे घडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा निवडणूक आयोगाने अत्यंत जबाबदारीची भूमिका घेतली पाहिजे. निवडणूक आयुक्तांनी तर अनिल देशमुख विशिष्ट कालावधीत यंत्रणांच्या समोर उपस्थित झाला नाही, तर आम्ही तुमची आमदारकी रद्द करू, भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही,
इतकेच काय तुमचा मतदान अधिकार काढून घेतला जाईल हे घोषित करावे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऑफिशियल स्टँड घ्यावा की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायिक प्रक्रियेला सामोरे जावे अन्यथा आम्ही त्यांचे प्राथमिक सद्सत्व सुध्दा रद्द करू शकतो, आम्ही निवडणूक आयोगाला आणि-
राज्यपालांना सुध्दा विनंती करून तुमची आमदारकी रद्द करू

या दोन्ही गोष्टी होणे अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी घडू शकतात, परंतु त्यासाठी जनमताचा रेटा निर्माण केला पाहिजे. ही पोस्ट त्याच हेतूने लिहलेली आहे.

ही पोस्ट महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ति पर्यन्त पोहचवली गेली पाहिजे.
सर्व सामान्य नागरिकांनी याविरुद्ध उघडपणे बोलले पाहिजे.

गृहमंत्री पदावर असलेला व्यक्ती जर फरार गुन्हेगारासारखा वागणार असेल, तर त्याला या देशाचे संविधान आणि लोकशाही यंत्रणा वठणीवर आणू शकते. हा संदेश जनसामान्यांत पोचलाच पाहिजे. जर हे करण्यात आपल्या यंत्रणा अपयशी झाल्या तर आपला-
लोकशाहीचा डोलारा कोसळू लागेल..

"म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो."

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

22 Oct
नवाब मलिक, समीर वानखेड़े आणि ड्रग जिहाद.

ऐकलाय का ड्रग जिहाद हा शब्द?
हा कोणी बजरंग दल अथवा विश्व हिंदु परिषदेच्या उनाड कार्यकर्त्याने वापरलेला शब्द नाही.

याचा उल्लेख पहिले झाला केरळ मध्ये. एका चर्चमध्ये फ़ादरने तेथे जमलेल्या भाविकांना जे सगळे ख्रिश्चन होते. 👇 Image
त्यांना समाजात नव्याने फ़ोफ़ावत चाललेल्या धोक्याची जाणीव करुन देण्यासाठी आपल्या प्रवचनात हा शब्द वापरला.

त्यांच्या मते आधी शांतीदुतांनी लव्ह जिहादचे प्रयोग सुरु केले व इतर धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्यांचे धर्मांतरण करणे अथवा त्यांना बरबाद करुन सोडणे हा 👇
प्रयोग आरंभला व आता ते ड्रग जिहाद मध्ये उतरले आहेत. इतर धर्मीय मुलांना ड्रगचे व्यसन लावायचे व त्यांची युवा पिढी बरबाद करायची. फ़ादरचे हे वक्तव्य खरे होते व त्यामुळे डाव्यांना खुप बोचले. गदारोळ झाला व नंतर त्या फ़ादरला दबावाखालती सारवासारव करावी लागली. 👇
Read 18 tweets
18 Oct
#धागा

शरद पवार प्रधानमंत्री न होण्याची कारणे:-

मला १९९६ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार आठवतो. १९९६ ते २०१९ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणूक प्रचारातील एक सामाईक घटक म्हणजे, 'आपले साहेब यंदा पंतप्रधान होणार' हा शरद पवारांच्या समर्थकांना वाटणारा विश्वास.
'पवार साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत' देशातल्या सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत' 'बाळासाहेब ठाकरे - शरद पवार यांच्यात मैत्री होती' आणि 'शरद पवार नरेंद्र मोदींचेही गुरु आहेत' असे आणखी बरेच काही सांगत प्रत्येक लोकसभा निवडणुकांपूर्वी पवार समर्थक कार्यकर्ते आणि पत्रकार-
यांच्याकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो. याच वातावरण निर्मितीच्या जोरावर शरद पवार यंदा पंतप्रधान होतील अशी खात्री त्यांच्या समर्थकांना लोकसभा निवडणुकीपूर्वी असते.

कार्यकर्त्यांच्या भाबड्या आशावादावर देशाचा पंतप्रधान ठरत नाही. त्यासाठी लोकसभेत तुमच्या पक्षाला बहुमत असणे-
Read 17 tweets
17 Oct
#धागा:-

मोपला नरसंहार:-

महात्मा गांधी जी ची विचार आचार सर्व जगात आदर्श असले तरी एका गोष्टी बाबत त्यांचे वागणे चेखुप आश्चर्य वाटते. आजपर्यंत या त्यांच्या वागण्याचे खरे कारण कोणी सांगू शकले नाही. तसे पाहायला गेले तर ब्रिटिश काळात हिंदु मुस्लिम दंगाचे अनेक कागज भरून पडून आहेत. 👇
त्यातील एक कुप्रसिध्द म्हणजे मोपला आणि नौखोला दंगली.

नागपूर मध्ये खिलाफत चळवळीला प्रारंभ करताना महात्मा गांधी समोर अनेक मौलवी नी कुराण ची आयात वाचली. नंतर त्यांनी जिहाद च उच्चार केला. त्यावेळी स्वामी श्रद्धानंद यांनी गांधीजींना ही गोष्ट सांगितली पण त्यांनी सांगितले याचा उपयोग 👇
ब्रिटिश राजवट विरोधात करत आहे. पण स्वामी श्रद्धानंद यांनी सांगितले की आपण असिंहा पदावर चालत असताना जिहाद योग्य नाही. पण महात्मा गांधी नी त्याकडे दुर्लक्ष केले.

ब्रिटिश साठी चालू झालेली खिलाफत चळवळ(मोपलं विद्रोह) नंतर हिंदु विररुधा सहा महिने दंगल झाली. 👇
Read 20 tweets
16 Oct
लव्ह जिहाद

खर तर मी आज झालेली केस लिहणार नव्हतो पण आताच मुलीच्या वडिलांचा call आला होता ढसाढसा रडत होते. त्यांच्या भावना ऐकून वाटले कुठे तरी आजही पुण्य काम केले म्हणून शेअर करतोय...

काल दसरा होता, त्याच्यामुळे सकाळी पूजा करत असताना एक फोन आला माझ्या सौभाग्यवती ने फोन 👇
उचलून माझ्याकडे दिला विकास देशपांडे बोलतात का मी वसई वरुण महेश मिस्त्री बोलतोय मला तुमचा नंबर जितेंद्र अग्रवाल दादांनी दिलाय.. दादा आताच कांदिवली मधुन पळून गेलेली मुलगी वसई ला सापडली आहे मुलगी अजिबात ऐकत नाही मुलीचे घरचे आणी त्या जिहादी मुलाचे घरचे लोक वसई पोलीस चौकीत आहेत 👇
तुम्हाला जाता येईल का.. सौभाग्यवती हे सगळे ऐकत होती तिने लगेच सांगितले पूजा करा आणि आधी तिकडे जा.. बाकीचे काम नंतर क्षणार्धात कपड़े घालून खाली उतरलो..

गाडीला किक मारली पंकज कृष्णकांत परब हे घराच्या जवळ राहतात त्यांना call केला योगायोगाने तेही घरात देव पूजा करत होते त्यांना 👇
Read 16 tweets
14 Oct
तेव्हा महाराष्ट्रबंद का पुकारला नाही ?

¶ एका कॅबिनेट मंत्र्याने फेसबुकवर त्याच्या संबंधात पोस्ट करणाऱ्या एका युवकाला आपल्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली.. त्याच्यावर शासन प्रशासनाने कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र बंद का पुकारला नाही? 👇 Image
¶ एका मंत्र्यामुळे गर्भवती राहिलेल्या एका युवतीला आत्महत्या करावी लागली (की हत्या झाली?) त्या मंत्र्याला तुरुंगात टाकावे ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?

¶ एका मंत्र्याने दोन लग्ने करून त्याच्या दुसऱ्या बायकोच्या बहिणीचे लैगिक शोषण केले. तिला जीवे मारण्याची धमकी👇
दिली. पीडितेने तक्रारही दिली.. शासन प्रशासनाने त्या मंत्र्याला अटक करावे ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?

¶ १७ वर्षे निलंबित असलेल्या एका भ्रष्ट पोलिसाला पुन्हा सेवेत घेतले. व त्याला अटक झाल्यानंतर तपासकार्यातून उघडकीस आलेल्या वृत्तानुसार त्याला खंडणी वसुलीसाठी 👇
Read 13 tweets
7 Oct
#धागा:-

मनुष्य परिवर्तनातून समाज परिवर्तन..

केरळ मधील तिरुवनंतपुरम जवळ कालडी नावाचे ठिकाण आहे. तिथेच जवळ थामारम या नावाचे एक गाव आहे.

गाव तसे छोटेसे आहे,अवघे ६०० घरांचे गाव. पण वैशिष्ठ्य म्हणजे गुंडांचे गाव म्हणून प्रसिद्ध. सगळी अनागोंदी चालायची. 👇
विविध गुंडांच्या टोळ्याच सगळीकडे. दहशतीचा कारभार. खून होणे / करणे हे नेहमीचेच. राजकारणी इथून भाड्याने गुंड घेऊन आपले काम करवून घ्यायचे. त्यासाठीच प्रसिद्ध गाव म्हणा ना.

सुमारे वीस - बावीस वर्षांपूर्वी या गावात संघ शाखा सुरु झाली. ठरवून या गावाला बदलायचे हे ठरवून. 👇
माणूस बदलला की समाज बदलतो हे काही दिवा स्वप्न नाही. कठोर परिश्रम करून अनुभूति येणारे सत्य आहे ते. याची जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शाखा सुरु केली.

शाखेला सुद्धा गावातल्या वातावरणची झळ पोचत होतीच. त्यात कम्युनिस्ट पण होते. 👇
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(