विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा माणूस मुंबई पोलिसांनी हैदराबादमधून पकडला आहे. सदर मनुष्य तेवीस वर्षांचा आहे, आयआयटी ग्रॅज्युएट आहे. रामनागेश श्रीनिवास असं सदर आरोपीचं नांव असल्याचं वृत्त आहे.

त्याच्यावर कारवाई कायद्यानुसार होईलच. पण इथे काही गोष्टी विशेष
लक्षात घेण्यासारख्या आहेत.

सदर आरोपीने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहलीच्या मुलीला रेप थ्रेट देणारं ट्विट केलं. हे करण्यासाठी त्याने आपलं @ ramanheist असं असलेलं ट्विटर हँडल बदलून @ criccrazygirl असं करून पाकिस्तानी असल्याचा बनाव केला होता.

विशेष @boomliveसारख्या
फॅक्टचेकर्सनी ही पोलखोल करूनही अनेक भक्त मंडळी सदर ट्विट हे पाकिस्तानी असल्याचं छाती ठोकून सांगत होती. यात अनेक गल्लीगटारछाप भक्तांपासून ते अगदी ज्यांना मोदी स्वतः फॉलो करतात अशा PhD असलेल्या @TrulyMonica बाईंचा समावेश होता. या बाईंनी तर भलामोठा निबंध लिहून कशी ही पाकिस्तानी
साजिश आहे आणि कसा विराटबद्दल लोकांनी दाखवलेली सहानुभूती अनाठायी आहे हे सांगण्याचा आकांत केला होता.

मात्र आज मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर फॅक्टचेकर्सनी केलेल्या दाव्याला दुजोरा मिळाला असून, भक्त मंडळी आपल्या पाकिस्तान-पाकिस्तानच्या प्रॉपगंडासाठी किती नीच , खोटारडी आणि
मुर्दाड बनू शकतात याचं हे अजून उदाहरण आपल्यासमोर आलं आहे.

याबद्दलच्या बातमीच्या लिंक्स, स्क्रीनशॉट्स, ट्विट्स इ. या पोस्टखाली कमेंटबॉक्समध्ये संदर्भासाठी देत आहेच. ते वाचून एकंदर मामला काय हे वाचकांच्या सविस्तरपणे लक्षात येईलच... पण इथे एका गोष्टीची विशेष जाणीव करून द्यायची
गरज आहे. ती म्हणजे - विराट कोहलीची मुलगी नऊ महिन्यांची आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आपला संघ हरला म्हणून पाकिस्तानी हँडल असल्याचा बनाव करून एक भारतीय सुशिक्षित माणूस कोहलीच्या नऊ महिन्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी देतो; हे सगळं किती गंभीर आणि भयानक आहे याचा एकदा विचार करा!
१. ANI चं वृत्त Image
४. @TrulyMonica यांची भक्तब्रँड फसवेगिरी

Image
५. @thenewsminute चे वृत्तांकन
thenewsminute.com/article/hydera…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Makarand Desai

Makarand Desai Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @makmd

12 Nov
कंगना काय म्हणते ते नीट ऐकणं गरजेचं आहे. त्यातला 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं, 1947ला भीक मिळाली इतकाच भाग उचलला जातोय. मात्र त्याआधी ती जे बोलली आहे ते तितकंच विषारी आहे. तिचं विधान पूर्ण ऐकणं यासाठीच गरजेचं आहे.

त्या मंचावर कंगना म्हणते-
१. काँग्रेस, लिबरल्स हा ब्रिटिशांनी भारतीयांचं रक्त वाहावं म्हणून केलेली योजना आहे.

२. पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक झालं आणि हिंदुस्थान मात्र सेक्युलर झाला. सेक्युलर म्हणजे नो मॅन्स लँड.

३. ब्रिटिशांनी देश ज्यांच्या हातात सोडला ते म्हणजे काँग्रेसवाले ब्रिटीशांचं एक्सटेन्शन होते.
४. पाकिस्तान मुस्लिमबहुल असल्याने इस्लामिक राष्ट्र झाला, हिंदुस्थान मात्र काँग्रेसने षडयंत्र करून सेक्युलर ठेवला.

५. सावरकर, लक्ष्मीबाई आणि नेताजी यांनी याविरोधात प्रयत्न केले. त्याची त्यांना किंमत भोगावी लागली.

यानंतर ती 1947 चं स्वातंत्र्य भीक होती, 2014ला खरं स्वातंत्र्य
Read 9 tweets
19 Aug
निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसने ऑईल बॉण्ड्स करून ठेवले म्हणून ते फेडण्यासाठी आम्हाला पेट्रोल-डिझेलवर जास्तीचा कर लावावा लागतो, त्यामुळे दर कमी करता येणार नाही असं सांगितलं आहे.

निर्मला सीतारामन यांच्याच म्हणण्यानुसार मोदी सरकारने त्या ऑइल बॉण्ड्सवर भरलेले व्याज आणि
मुद्दलाची परतफेड मिळून फार-फार तर ७५,००० करोड रुपये होतात. तर १,३०,००० करोडचे मुद्दल अजून बाकी आहे.

आता निर्मलाबाई हे सांगत नाहीत की मोदी सरकारने फक्त एका वर्षात २०२०-२१मध्ये पेट्रोल-डिझेलवरील करांतून ३,००,००० करोडपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. म्हणजे सगळ्या ऑईल बॉण्ड्सची
मुद्दल आणि त्यावर आतापर्यंत भरलेलं व्याज हे मिळूनही हे मोदी सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील एका वर्षातील करवसुलीच्या रकमेपेक्षा कमी आहे!

मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून पेट्रोलियमवरील करांतून वसूल केलेली रक्कम ही २०,००,००० करोडच्या घरात पोचली आहे. म्हणजे ऑईल बॉण्ड्सची सुरुवातीची
Read 9 tweets
5 Aug
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्भीड, तेजस्वी आणि द्रष्टे विचार!

(सुरू असलेल्या #गैरसोयीचेमहापुरुष या सिरीजचा तिसरा भाग)

१. पंतप्रधान नेहरूंवर कठोर टीका करणारे डॉ. आंबेडकर

"याला काय चारित्र्याची चाड आहे का ? या गोष्टींचा तुम्ही सर्वांनी पूर्ण विचार करावयास पाहिजे...
...या पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या स्त्रिया अशा बहकलेल्या असतील तर त्यांना तिथे काँग्रेसने जाऊ देण्याचे काय कारण आहे?"

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३५)
२. विनोबा भावे यांची निर्भीडपणे पोलखोल करणारे डॉ. आंबेडकर

"होय. तोच तो विन्या, काय गोळा केले आहे त्याने ? नाकातून एकीकडे शेंबूड वाहात असता दुसरीकडे तो व्याख्याने देतो."

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३६)
Read 9 tweets
22 May
नुकतेच आरबीआयने मोदी सरकारला रुपये 99,122 करोड दिले आहेत.

आरबीआयने 2020-21च्या नऊ महिन्यांच्या कालावधीमधील बँकेचा सरप्लस मोदी सरकारला म्हणून दिलेली ही रक्कम निर्मला सीतारामन यांनी बजेटमधील मांडलेल्या रुपये 53,511 करोडच्या अंदाजाहून सुमारे 85% अधिक म्हणजे जवळपास
रुपये 45,611 करोडने जास्त आहे.

आधीच बजेटमध्ये रुपये 35,000 करोड फक्त लसीकरणासाठी राखून ठेवले गेल्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामध्ये भारतातील पन्नास कोटी इतक्या लोकसंख्येचे मोफत लसीकरण आपण करू शकतो असे मोदी सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सचिव असलेले टी. व्ही. सोमनाथन
यांनी याच वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बजेटची स्तुती करता सांगितले होते.

आता आरबीआयने अधिकचे रुपये 45,611करोड मोदी सरकारला दिले आहेत. तर आता संपूर्ण देशभरात मोफत लसीकरण राबवायला केंद्राला पैसे कमी पडतात असं म्हणण्याची उरलीसुरली कारणेही नाहीशी झाली आहेत.

मात्र रिझर्व्ह बँकेच्या
Read 11 tweets
20 May
मणीपूरमधील भाजप सरकारने एका पत्रकाराला "गोमूत्र आणि शेण यांनी कोरोना बरा होत नाही" असं फेसबुकवर लिहिलं म्हणून रासुका लावून अटक केली आहे.

मणीपूरमध्ये एक भाजप नेत्याचे निधन झाल्यावर सदर पत्रकाराने, किशोरचंद्र वांगखेम याने "गोमूत्र आणि शेण यांनी कोरोना बरा होत नाही" अशा आशयाची
फेसबुक पोस्ट टाकली. त्यासाठी त्याच्यावर NSA कायद्याखाली त्याचे लिखाण राज्याच्या सुरक्षेला आणि कायदासुव्यवस्थेला धोका असल्याचा ठपका ठेवूनअटक केली गेली आहे.

अगदी लहान मुलालाही हे कळेल की गोमूत्र आणि शेण खाऊन कोरोना बरा होत नाही असे लिहिणे हा काही देशाच्या सुरक्षेला आणि
कायदासुव्यवस्थेला धोका असायची शक्यता नाही. तरीही हे असे पोलिसी वर्तन भाजपशासित राज्यात अत्यंत नेटाने राबवले जात आहे.

हे विरोधकांना सडवायला पोलीस वापरायचं "योगी-शाह" मॉडेल आहे, जे भाजप देशभर वापरू पाहत आहे. या अशा पोलीस बळाच्या दुरूपयोगाबद्दल न्यायालयाने त्यांना वेळोवेळी
Read 16 tweets
30 Mar
१. लॉकडाऊन हा उपाय म्हणून मुळात त्या प्रगत देशांतून आला, ज्या देशांनी लॉकडाऊन काळात लोकांना अक्षरशः घरी बसायचे पैसे वाटलेत, तेही मुबलक!
म्हणजे अमेरिकेन सरकारने आतापर्यंत तीन राउंडस् मध्ये स्टीमुलस चेक्स पाठवले आहेत. त्याची एकूण रक्कम ही $(1200+600+1400)=$3200 इतकी आहे.
म्हणजे जवळपास अडीच लाख रुपये. हे श्रीमंत व्यक्ती सोडून सर्वांना पाठवले गेलेले दरडोई पेमेंट आहे आणि ज्यांना मुलं आहेत त्यांना त्या प्रत्येक मुलांसाठी अधिकचं पेमेंट दिलं गेलं आहे. हे असं पेमेंट करायचं काम ट्रम्प सरकार असताना सुरू झालं आणि बायडेन आल्यावर ते सुरू ठेवलं गेलं.
२. आपल्याकडे केंद्राने स्टीमुलसच्या नांवावर वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तर राज्यांची बॅलन्सशीट आधीच जीएसटीमुळे परावलंबी झाल्याने त्यांनी नवे कर लावून लोकांना लॉकडाऊन काळात पोसावं हेही शक्य नाही.
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(