एलआयसीला जेव्हा तोटा होतो...
अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या यांची सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल काही न बोललेलं बरं. मात्र त्यांची एक कंपनी अशी आहे की जी बुडाल्याने स्वतः अनिल अंबानी यांच्यापेक्षा दुसऱ्या एका कंपनीचा जास्त मोठा तोटा होणार आहे. #म#मराठी#एलआयसी
ती कंपनी म्हणजे रिलायन्स कॅपिटल आणि यामध्ये तोटा होणार आहे तो म्हणजे भारतातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंपनी एलआयसीचा. कसा?
एलआयसीचा रिलायन्स कॅपिटलमध्ये २.९८% स्टेक आहे. या आकडेवारीनुसार ते रिलायन्स कॅपिटलमधील सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ठरतात. #म
स्वतः अनिल अंबानी यांच्याकडे कंपनीचा १.५१% स्टेक आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे कंपनीचे एकूण ५७.५३% शेअर्स आहेत.
रामकृष्ण रेड्डी चिंता यांच्याकडे कंपनीचा २.१६% स्टेक आहे तर ते डायरेक्टर असलेली कंपनी आरकेआर इन्व्हेस्टमेंटकडे १.४३% स्टेक आहे. #म#मराठी#अंबानी#रिलायन्सकॅपिटल#एलआयसी
असे असले तरी या सगळ्यात एलआयसीचा आणखी एका प्रकारे तोटा होणार आहे. कारण त्यांच्याकडे रिलायन्स कॅपिटलचे बॉंडदेखील आहेत. म्हणजे एलआयसी जरी भारतातली सगळ्यात यशस्वी आणि मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असली तरी रिलायन्स कॅपिटलबाबत मात्र ते तोट्यात गेले आहेत. #म#मराठी#रिलायन्स#एलआयसी
२९ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने रिलायन्स कॅपिटलची इनसॉल्व्हन्सी प्रोसेस लवकरच सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशी वेळ आलेली अंबानी कुटुंबियांची ही पहिलीच कंपनी आहे. #म#मराठी#रिलायन्स#एलआयसी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
इतकी वर्ष तुम्ही खात असलेली किटकॅट चॉकलेट नसून वेफर आहे.
किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या.
मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.
त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.
टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, 'किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.' त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे. #म#मराठी