इतकी वर्ष तुम्ही खात असलेली किटकॅट चॉकलेट नसून वेफर आहे.
किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या.
मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.
त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.
टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, 'किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.' त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे. #म#मराठी
आता काय करायचं?
शेवटी प्रकरण मुंबई कस्टमच्या एक्साइज अँड गोल्ड ट्रिब्युनलसमोर आलं. आता हे ट्रिब्युनल ठरवणार होतं की किटकॅट वेफर आहे की चॉकलेट आहे? त्यावर १०% की २०% टॅक्स लागला पाहिजे? #म#मराठी#kitkat#किटकॅट
या केसमध्ये टॅक्स अथॉरिटीला पहिल्यांदा बाजू मांडण्याची संधी मिळाली. त्यांचं म्हणणं होतं,
'किटकॅट ही चॉकलेट, वेफर आणि प्रालीन या घटक पदार्थांपासून बनते. त्यामुळे त्याला वेफर म्हणू शकत नाही. किटकॅटमध्ये सर्वात जास्त वाटा मिल्क चॉकलेटचा आहे.' #म#मराठी#kitkat#cadbury
'नेस्ले कंपनीनेसुद्धा किटकॅट हे चॉकलेटच आहे अशा पद्धतीने त्याचा साठा केला आहे. तसेच त्याची वाहतूकही चॉकलेट म्हणूनच केली जाते. किटकॅट विकणारे विक्रेते आणि ती विकत घेणारे कस्टमर हेदेखील किटकॅट एक चॉकलेट म्हणूनच विकतात आणि खातात. कुणीही किटकॅटचा उल्लेख वेफर म्हणून करत नाही.'
त्यामुळे किटकॅट हे चॉकलेटच आहे.
ट्रिब्युनलला मात्र हे पटलं नाही. ते म्हणाले,
'मिल्क चॉकलेटमध्ये कोकोआ बटर आणि कोकोआ पावडर असते हे बरोबर. पण म्हणून लगेच त्याला चॉकलेट म्हणता येणार नाही. कोकोआ असलेला प्रत्येक पदार्थ चॉकलेट असेलच असे नाही.'
'शिवाय किटकॅटची विक्री चॉकलेट म्हणून केली जाते असं तुमचं म्हणणं असलं तरी ते कुठेही सिद्ध होत नाही. किटकॅट हे चॉकलेट आणि बिस्कीटचं कॉम्बिनेतशन आहे असे समजून लोक ते विकत घेतात. त्यामुळे नेस्ले कंपनी म्हणते त्याप्रमाणे किटकॅट हे चॉकलेट नसून वेफरच आहे.' #म#मराठी#nestle
शेवटी निकाल नेस्ले कंपनीच्या बाजूने मिळाला आणि किटकॅट वेफर म्हणूनच विकली जाऊ लागली.
एलआयसीला जेव्हा तोटा होतो...
अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या यांची सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल काही न बोललेलं बरं. मात्र त्यांची एक कंपनी अशी आहे की जी बुडाल्याने स्वतः अनिल अंबानी यांच्यापेक्षा दुसऱ्या एका कंपनीचा जास्त मोठा तोटा होणार आहे. #म#मराठी#एलआयसी
ती कंपनी म्हणजे रिलायन्स कॅपिटल आणि यामध्ये तोटा होणार आहे तो म्हणजे भारतातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंपनी एलआयसीचा. कसा?
एलआयसीचा रिलायन्स कॅपिटलमध्ये २.९८% स्टेक आहे. या आकडेवारीनुसार ते रिलायन्स कॅपिटलमधील सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ठरतात. #म
स्वतः अनिल अंबानी यांच्याकडे कंपनीचा १.५१% स्टेक आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे कंपनीचे एकूण ५७.५३% शेअर्स आहेत.
रामकृष्ण रेड्डी चिंता यांच्याकडे कंपनीचा २.१६% स्टेक आहे तर ते डायरेक्टर असलेली कंपनी आरकेआर इन्व्हेस्टमेंटकडे १.४३% स्टेक आहे. #म#मराठी#अंबानी#रिलायन्सकॅपिटल#एलआयसी