मराठी भाषेला समृध्द करणारे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरले जाणारे व काळाच्या ओघात काहिसे विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, संकल्पनांचा मागोवा...
जसजसे शेतीबाडीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, गावगाड्याला नागरीकरणानं भरकटून टाकल. गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली.- मग ओटा,
पडवी,
न्हाणीघर,
माजघर,
शेजघर,
माळवद,
धुराडे-धारे वासं-आडं,
लग,
दिवळी,
खुंटी,
फडताळ,
परसदार,
पोत्यारं,
चावडी,
चौक,
पार,
पाणवठा,
उंबरठा,
कडी कोंडी,
खुराडं,
उकीरडा,
हे शब्द विस्मरणात गेले.
या शब्दांना आपण हरवून बसलो. विहिरीवरची मोट गेली, पंप आले. परिणामी
मोट,
नाडा,
शिंदूर,
धाव,
दंड,
ओपा,
पलान हे शब्द दिसेनासे झाले.
खुरपणी,
मोडणी,
मोगडणी,
उपणणी,
बडवणी,
खुडणी,
कोळपणी,
दारं धरणं,
खेट घालणं,
माळवं यांचा अर्थ अलीकडच्या पिढीला समजत नाही.
रास,
सुगी,
गंजी,
कडबा,
पाचुंदा,
बोंडं,
सुरमाडं,
भुसकट,
शेणकूट,
गव्हाण या शब्दांचंही तसंच! धान्य दळायचं दगडी जातं, खुट्टा,मेख हेही काळाच्या पडद्याआड चाललेत.
साळुता आणि केरसुणी याऐवजी झाडू आला. चपलेला पायताण,
गोडेतेलाला येशेल तेल,
टोपडय़ाला गुंची म्हटलं जायचं, हे आता सांगावं लागतं.
गावंदर,
पाणंद,
मसनवाट हे शब्द नागरीकरणामुळं मागं पडले.
चांभाराची रापी,
सुताराचा वाकस,
कुंभाराचा आवा,
लोहाराचा भाता,
ढोराची आरी,
बुरूडाची पाळ्ळी ही हत्यारांची नावं आता कुणाला आठवतात?
पतीला दाल्ला (दादला),
पत्नीला कारभारीण,
सासर्याला मामंजी,
सासूला आत्याबाई,
नणंदेला वन्स,
बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात,
हे आता नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?
स्वयंपाकघराचं किचन झालं आणि
कोरडयास (कोरडया पदार्थासह खायची पातळ भाजी),
कालवण (ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ),
माडगं,
डिचकी,
शिंकाळं,
उतरंड,
भांची,
डेरा,
दुरडी,
बुत्ती,
चुलीचा जाळ,
भाकरीचा पापुद्रा,
ताटली, उखळ,मुसळ हे शब्द नागर संस्कृतीनं बाजूला सारले.
रविवार हा सुट्टीचा दिवस. निवांत असण्याचा दिवस म्हणून तो आईतवार (आईतवार),
तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार.
त्याचा अपभ्रंश होऊन बस्तरवार झाला.
पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’,
सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ किंवा ‘रामपारी’ आणि सायंकाळला सांजवेळ , दिवेलागण ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.
अंगदट (बळकट),
वंगाळ (वाईट),
डोंबलं (डोकं),
हुमाण (कोडं),
भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा)ही मराठी भाषेघ्ला ग्रामीण भागानं दिलेल्या शब्द भेटीतली वानगीदाखल उदाहरणं.
कृपया आपण देखील आपल्या शब्दसंग्रहात असलेले, आपल्या मनातील पिंपळ पानावर कोरुन ठेवलेले मात्र सध्या कालबाह्य झालेले शब्द व संकल्पनाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करु या.💐💐💐
सकाळी सातची वेळ, शांताराम अण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.
अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे.
ओव्हरटाईमकरुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.
आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला.
शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,"रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?" काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या
तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते....
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं...
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात....
एका बाजारात तितर पक्षी विकणारा बसला होता.
त्याच्याकडे मोठ्या जाळीच्या टोपलीत बरेच तितर पक्षी होते ..!
आणि एका छोट्या जाळीच्या टोपलीत फक्त एकच तितर पक्षी होता ..!
एका ग्राहकाने विचारले एक तितर पक्षी कितीचा आहे ..?
"५० रुपयाला ..!"
ग्राहकाने छोट्या जाळीत असलेल्या तितर पक्षीची किंमत विचारली.
पक्षी विकणारा म्हणाला,
"मला ह्याला विकायचं नाही ..!
"पण तू आग्रह धरत असशील तर मी ५०० रुपये लावीन ..! "
ग्राहकाने आश्चर्याने विचारले,
ह्या तितर पक्षीचा भाव इतका कसा काय ..?
पक्षी विकणारा म्हणाला "खरंतर हा माझा स्वतःचा पाळीव पक्षी आहे आणि तो इतर तितर पक्ष्यांना अडकावण्याच काम करतो .."
जेव्हा तो जोरात ओरडतो, आणि इतर पक्ष्यांना स्वतः कडे बोलावतो, आणि इतर तितर पक्षी विचार न करता एकाच ठिकाणी जमतात, तेव्हा मी त्या सर्वांची सहजपणे शिकार करतो,
🙏🏻 कुटुंबप्रमुख
एक नामशेष होणारा घटक
सकाळी लवकर उठणारे,
रात्री वेळेवर झोपणारे,
पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,
फुलं देवासाठी तोडणारे,
रोज पूजा करणारे,
मंदिरात एखादी फेरी मारणारे,
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे,
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे,
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला फोडणी देऊन खाणारे,
स्वतःची गैरसोय असूनही नातलग, पाहुण्यांसाठी पाहुणचार करणारे,
आपले सण धांगडधिंगा न करता साधेपणे साजरे करणारे,
व्यसन करताना लाजणारे आणि
समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे,
जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे,
उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे,
फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे,
आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं, "ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"
"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.
"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."
"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"
"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."
"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"
"मिरजलाच घेऊन जावी लागेल."
त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.