#CinemaGully
पुष्पा - द राईज
''रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध'
२००४ साली अल्लू अर्जुनचा 'आर्या' सिनेमा आला होता. त्यातलं "आ आंटे आमलापूरम" हे गाणं तेव्हा लग्नाच्या वरातीत वाजायचं. गाण्याचा एक शब्दही कळत नसताना लोक झिंगून नाचायचे तेव्हा आश्चर्य
वाटायचं.या गाण्यानं तेलुगू सिनेमाला
अपार प्रसिध्दी मिळाली. भाषा कळत नसूनही अडीच तीन तास सिनेमा बघायला लावलं ते 'आर्या'नं. अल्लू अर्जुन तेव्हापासून कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेकांचा फेव्हरेट बनला. अवघ्या पंचविशीतल्या देवी श्री प्रसाद यांचं संगीत, वयाच्या पस्तिशीत स्वत:चं काही करू पाहणारे सुकुमार यांचं
दिग्दर्शनातलं पदार्पण आणि अवघ्या एकविस वर्षाच्या अल्लू अर्जुनचा अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स. या तरुणाईच्या सिनेमानं समकालिन तरुणाईला तेलुगू सिनेमाशी जोडलं. आज १७ वर्षांनंतर याबद्दल लिहिण्याचं कारण
म्हणजे नुकताच रिलिझ झालेला 'पुष्पा'. या तिघांनी पुन्हा एकदा एकत्र येत पुष्पाच्या निमित्तानं थीएटर दणाणून सोडलंय.
तीन तिगाडा काम बिगाडा अशी आपल्याकडे म्हण आहे. पण अल्लू अर्जुन, सुकुमार आणि देवी श्री प्रसाद यांनी ही म्हण खोटी ठरवली. दोन वर्षांनंतर
थीएटरला गेल्यावर अल्लू सरांनी नाराज नाही केलं. मला आठवतं 'केजीएफ'च्या वेळीही अशीच धमाल थीएटरमध्ये आली होती. अल्लू अर्जुनचे अॅक्शन सीन कमाल होते. आंध्रप्रदेशमधल्या घनदाट शेषाचलमच्या जंगलातल्या लाल चंदनाच्या तस्करांची ही कहाणी आहे. या जंगलाचा राजा बनलाय 'पुष्पा..
पुष्पराज'. लाल चंदनाच्या काळ्या धंद्यात पुष्पाचे प्रतिस्पर्धी खूप आहेत, या सर्वांच्या चेहर्यावर मित्रत्वाचे बुरखे आहेत. पण वेळ आल्यावर ते एकमेकांचा जीव घ्यायला कायम पुढे असतात. पुष्पा कोण आहे? कुठून आलाय? तो या अवैध धंद्याकडे कसा वळला? हे सर्व सविस्तर कथेसोबत कळत जातं. मारधाडसोबत
रोमान्स आणि खास डान्स स्टेप्स ही अल्लू अर्जुनची खासियत आहे. हिंदी व्हर्जनमध्ये डायलॉगही उत्तम झालेत. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनसाठी श्रेयस तळपदेनं आवाज दिलाय. अल्लूच्या पर्सनालिटीला तो आवाज बर्यापैकी शोभलाय. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची जोडी सोबतीला
देवी श्री प्रसाद यांच्या सुश्राव्य संगीताने या सिनेमाला देखणं केलंय. एका आयटम सॉन्गमध्ये तेलुगू लेडी सुपरस्टार समंथा दिसली आहे. या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची अशी की, रोमान्स, आयटम सॉन्ग हे कुठेही मधे घुसवले नाहीत. मूळ कथेसोबत हे सगळं घडत जातं, त्यामुळे दिग्दर्शक सुकुमार यांना टेन
आऊट ऑफ टेन मार्क द्यायला पाहिजे. कोविडच्या निर्बंधांच्या काळात पाचशे सहाशे जणांना सोबत घेऊन या चित्रपटात जंगलात शुटिंग करणं एक मोठं आव्हान होतं. ही प्रचंड मेहनत आपल्याला हा सिनेमा बघताना प्रत्येक सीनमध्ये जाणवते. या काळात तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणं सोपं
नाहीये. पण सर्व कलाकारांच्या दमदार अभिनयानंं ते शक्य झालंय.
पुष्पा पार्ट १ च्या शेवटाकडे आणि क्लायमॅक्सकडे जाताना एन्ट्री होते सुपरस्टार फहाद फासिलची. खाकी वर्दीत बाल्ड लूकमध्ये फहादने साकारलेला पोलीस अधिकारी भंवरसिंह शेखावत भाव खाऊन
गेलाय. आतापर्यंत हा सिनेमा फक्त अल्लू अर्जुनचा होता. पण समोर त्याच तोडीचा अभिनेता फहाद फासिल आल्यानं दोघांची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. यातला हिरो कोण आणि विलन कोण? हे प्रेक्षकांनी ठरवायचं. एका क्षणाला फहाद हा सिनेमा हायजॅक करतो की काय? असं वाटत
असतांना शेवटचा सीन पुष्पा पार्ट २ ची उत्सुकता वाढवून जातो. दुसर्या पार्टमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन विरुद्ध सुपर डूपरस्टार फहाद फासिल हा सामना रंगणार आहे. त्यामुळे पुष्पा पार्ट २ ची वाट पाहावी लागेल.
आणि अभिनय, रश्मिकाचा प्रेझेंस, दमदार कथानक, उत्तम दिग्दर्शन, देवी श्री प्रसाद यांचं मधूर संगीत, ग्राफिक डिझाईन्स आणि परफेक्ट कास्टिंगमुळे पुष्पा पार्ट १ जमून आलाय. इंटरवल नंतर थोडा स्लो झालाय पण क्लायमॅक्स अनेक सरप्राईज घेऊन येतो. त्यामुळे चुकवू नये असा सिनेमा.
Amol Kinholkar
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ग्यानवापी मशिदीची रेषा पुसण्याचा प्रयत्न न करता, शेजारी काशी काॅरिडाॅरची मोठी रेषा ओढल्यामुळे पोटदुखी सुरू झालेल्या काही स्यूडो मंडळींनी या प्रकल्पाला बदनाम करण्यासाठी एक नवी क्लृप्ती लढविली आहे.
त्यांच्या मते भव्यतेच्या ध्यासामुळे मंदिराचा साधेपणा नष्ट होतो व आपल्या खऱ्या परंपरेला बाधा पोचते. काशीचे गल्ली-बोळ हीच या नगरीची खरी 'कॅरॅक्टर' आहे व या प्रकल्पामुळे या 'कॅरॅक्टर'ला धक्का पोचला आहे.
हे प्रतिपादन दुसरं-तिसरं काही नसून हिंदू मंदिरांचं पुनरुत्थान होत असल्यामुळे सुरू झालेल्या मळमळीवर तात्विक मुलामा चढविण्याचा हास्यास्पद तसंच संतापजनक प्रकार आहे. अरुंद-अंधारे गल्लीबोळ, अस्वच्छता, गटारांचे ओघळ आणि या सगळ्याच्या मध्ये, मूळ मंदिर पाडून त्याच्या
भाजपमध्ये बरेच नेते व लोकप्रतिनिधी असे आहेत जे आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत पण लो-प्रोफाईल ठेऊन आपलं काम करत असतात. ते एवढे लो-प्रोफाईल आहेत की त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून ते जे जबरदस्त कार्य करत आहेत, त्याचं श्रेय सुद्धा त्यांना घ्यायची इच्छा नसते.
मी एक सिरीज बनवत आहे. निस्वार्थ भावनेने व श्रेयवादाच्या भानगडीत न पडणाऱ्या अशा काही केंद्रीय मंत्र्यांच्या कार्याबद्दल, दर २-३ दिवसातून एक पोस्ट टाकून शक्य तेवढी (ज्याबद्दल जास्त चर्चा होत नाही अशी) माहिती मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याची सुरवात आज करत आहे.
डॉ.भारतीताई पवार
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार.
प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना, आयुष्यमान भारत अभियान (मोदी-केअर), कोविड लसीकरण अभियान सारख्या अनेक यशस्वी व जगभरात नावलौकिक मिळवलेल्या योजनांवर जोमाने काम तर
आई श्रीतुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही
कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून
येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही.
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.
सत्य परिस्थिती अशी आहे
१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.