ग्यानवापी मशिदीची रेषा पुसण्याचा प्रयत्न न करता, शेजारी काशी काॅरिडाॅरची मोठी रेषा ओढल्यामुळे पोटदुखी सुरू झालेल्या काही स्यूडो मंडळींनी या प्रकल्पाला बदनाम करण्यासाठी एक नवी क्लृप्ती लढविली आहे.
त्यांच्या मते भव्यतेच्या ध्यासामुळे मंदिराचा साधेपणा नष्ट होतो व आपल्या खऱ्या परंपरेला बाधा पोचते. काशीचे गल्ली-बोळ हीच या नगरीची खरी 'कॅरॅक्टर' आहे व या प्रकल्पामुळे या 'कॅरॅक्टर'ला धक्का पोचला आहे.
हे प्रतिपादन दुसरं-तिसरं काही नसून हिंदू मंदिरांचं पुनरुत्थान होत असल्यामुळे सुरू झालेल्या मळमळीवर तात्विक मुलामा चढविण्याचा हास्यास्पद तसंच संतापजनक प्रकार आहे. अरुंद-अंधारे गल्लीबोळ, अस्वच्छता, गटारांचे ओघळ आणि या सगळ्याच्या मध्ये, मूळ मंदिर पाडून त्याच्या
छाताडावर उभ्या राहिलेल्या मशीदींच्या समोर ओशाळलेपणाने उभी असलेली, मोडकळीला आलेली मंदिरं... हीच या महानुभावांच्या मते मंदिरांची 'कॅरॅक्टर' आहे. एक शहाणा तर असेही म्हणतो की काशीच्या गल्लीबोळांचे फोटो काढायला नामवंत आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार येत असत, ते आता येणार नाहीत ! म्हणजे
भारतातील गरिबी व अस्वच्छतेचे प्रदर्शन मांडता येणार नाही याचा या कंपूचा फारच त्रास झालेला दिसतो. यांचे लाडके चाचा, परदेशी पाहुण्यांना गारुड्याचे खेळ दाखवायचे, ते थांबल्यामुळे भारताचे खरे 'कॅरॅक्टर' जगासमोर येत नाही असेही यांचे म्हणणे असावे.
वास्तव हे आहे, की उत्तर हिंदुस्थानातील मंदिरांची सध्याची अवस्था ही आपली परंपरा नाही आणि हिंदू मंदिरांचे 'कॅरॅक्टर' तर त्याहूनही नाही. आपली मूळ परंपरा ही भव्य-दिव्य मंदिरांचीच आहे. महमूद गझनीबरोबर भारतात आलेला इतिहासकार अल् उत्बी म्हणतो, " मथुरेचं प्रमुख मंदिर बांधून पूर्ण
करण्यासाठी दोनशे वर्ष लागली असावीत व दहा कोटी दिनार खर्च आला असावा. दगडात बांधलेलं हे प्रचंड मंदिर व तिथलं अप्रतीम कोरीव काम पाहून महमुदही थक्क झाला." थक्क झाल्यानंतर पुढे त्याने त्या मंदिराचं काय केलं हे सांगायलाच नको !
या विध्वंसामुळे उत्तर हिंदुस्थानात भव्य-दिव्य मंदिरं
शिल्लकच राहिली नाहीत. ११९२ नंतर दिल्लीत बांधलं गेलेलं पहिलं मोठं मंदिर म्हणजे 1932 मध्ये बांधलेलं लक्ष्मीनारायण मंदिर. तलवारीच्या छायेखाली भाविकांनी कशीबशी जपलेली ही केविलवाण्या अवस्थेतील मंदिरं म्हणजेच हिंदू मंदिरांची खरी 'कॅरॅक्टर', जी 'गंगा-जमनी तहजबीची'
प्रतीकं म्हणून आहेत त्याच अवस्थेत जपली पाहिजेत, हे या मंडळींचं प्रतिपादन त्यांच्या मनातल्या विकृतीचंच दर्शन घडवतं.
प्राचीन भारतात शहराचं प्रमुख केंद्र राजमहाल नाही, तर मंदिर असे. स्थापत्यशास्त्र, शिल्पकला यांचा अद्भुत आविष्कार असलेली ही मंदिरं महत्वाची
सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्रही असत. इतकंच नव्हे, तर उद्योग- व्यवसायासाठी अर्थसहाय्यही मंदिरांकडूनच होत असे. ही आहे आपल्या मंदिरांची खरी परंपरा.
तिचं पुनरुज्जीवन होत असलेलं बघवत नाही म्हणून ही मंडळी तर्कहीन युक्तिवाद लढवत आहेत. काय तर म्हणे, महादेव हा साधी राहणी असलेला भणंग देव
आहे. दिखाऊ भव्यता असल्यास तो तिथे राहणार नाही. एकतर नव्याने उभ्या राहणाऱ्या मंदिरांची भव्यता दिखाऊ नाही. आपली सर्वोच्च श्रद्धास्थाने आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला साजेशी असावीत या कोट्यावधी भाविकांच्या तीव्र इच्छेचा तो हुंकार आहे. तसंच, येशू आणि महंमद
पैगंबरांची राहाणीही साधीच होती. तरी भव्य चर्चेस व मशीदींच्या स्थापत्याचं कौतुक करताना न थकणारी ही मंडळी मंदिरं मात्र जीर्ण-शीर्ण, मोडकळीला आलेल्या अवस्थेत, गल्ली-बोळातच राहिली पाहिजेत असं म्हणतात तेंव्हा त्यांचा खोटारडेपणा व ढोंगीपणा लपत नाही.
#CinemaGully
पुष्पा - द राईज
''रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध'
२००४ साली अल्लू अर्जुनचा 'आर्या' सिनेमा आला होता. त्यातलं "आ आंटे आमलापूरम" हे गाणं तेव्हा लग्नाच्या वरातीत वाजायचं. गाण्याचा एक शब्दही कळत नसताना लोक झिंगून नाचायचे तेव्हा आश्चर्य
वाटायचं.या गाण्यानं तेलुगू सिनेमाला
अपार प्रसिध्दी मिळाली. भाषा कळत नसूनही अडीच तीन तास सिनेमा बघायला लावलं ते 'आर्या'नं. अल्लू अर्जुन तेव्हापासून कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेकांचा फेव्हरेट बनला. अवघ्या पंचविशीतल्या देवी श्री प्रसाद यांचं संगीत, वयाच्या पस्तिशीत स्वत:चं काही करू पाहणारे सुकुमार यांचं
दिग्दर्शनातलं पदार्पण आणि अवघ्या एकविस वर्षाच्या अल्लू अर्जुनचा अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स. या तरुणाईच्या सिनेमानं समकालिन तरुणाईला तेलुगू सिनेमाशी जोडलं. आज १७ वर्षांनंतर याबद्दल लिहिण्याचं कारण
भाजपमध्ये बरेच नेते व लोकप्रतिनिधी असे आहेत जे आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत पण लो-प्रोफाईल ठेऊन आपलं काम करत असतात. ते एवढे लो-प्रोफाईल आहेत की त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून ते जे जबरदस्त कार्य करत आहेत, त्याचं श्रेय सुद्धा त्यांना घ्यायची इच्छा नसते.
मी एक सिरीज बनवत आहे. निस्वार्थ भावनेने व श्रेयवादाच्या भानगडीत न पडणाऱ्या अशा काही केंद्रीय मंत्र्यांच्या कार्याबद्दल, दर २-३ दिवसातून एक पोस्ट टाकून शक्य तेवढी (ज्याबद्दल जास्त चर्चा होत नाही अशी) माहिती मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याची सुरवात आज करत आहे.
डॉ.भारतीताई पवार
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार.
प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना, आयुष्यमान भारत अभियान (मोदी-केअर), कोविड लसीकरण अभियान सारख्या अनेक यशस्वी व जगभरात नावलौकिक मिळवलेल्या योजनांवर जोमाने काम तर
आई श्रीतुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही
कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून
येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही.
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.
सत्य परिस्थिती अशी आहे
१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.