हरिद्वारमध्ये नुकत्याच झालेल्या 'धर्म संसदे'त जमलेल्या हिंदुत्ववादी धर्मगुरूंनी नक्की काय काय मौलिक रत्ने उधळली ती थोडक्यात बघू. हे वाचताना उत्तरप्रदेशात सध्या निवडणूका होणार आहेत, आणि एकेकाळी सध्याचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ हे अशाच बाबा-बुवा-महाराज लोकांपैकी
एक होते हे लक्षात असू द्या... तर आता एकेक करून कोण काय बोललं ते बघू -

१. महामंडलेश्वर असलेल्या, हिंदूमहासभेच्या अन्नपूर्णा माँ म्हणाल्या की 'त्यांना' संपवायला आपल्याला त्यांना मारूनच टाकावं लागणार आहे, त्यासाठी त्यांचे वीस लाख कापतील असे 100 योद्धे आपल्याला हवेत.

२. बिहारचे
धरमदास महाराज म्हणाले की मनमोहन सिंग जेव्हा संसदेत बोलले की अल्पसंख्याकांना देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार आहे, तेव्हा मी तिथे असतो तर गोडसे बनून त्यांच्या छातीत सहा गोळ्या डागल्या असत्या.

३. आनंद स्वरूप महाराज म्हणाले की जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर
आम्ही 1857च्या बंडापेक्षा भीषण युद्ध पुकारू. ते पुढे म्हणतात की उत्तराखंडमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना त्यांचे सण साजरे करू देणार नाही, कारण ही हिंदूंची भूमी आहे.

४. यति नरसिंहानंद सरस्वती म्हणतात की आर्थिक बहिष्कार करून आता भागणार नाही, हिंदूंनी शस्त्र उचलायला हवीत.
नुसत्या तलवारी नको, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हिंदूंनी बाळगायला हवीत. त्यात त्यांनी हिंदूंना पाच हजारांचा मोबाईल वापरत दिवस काढा पण एक लाखाची शस्त्र विकत घ्या असं आवाहन केलं आहे.

५. स्वामी प्रेमानंद महाराज यांनीही हिंदूंनी शस्त्रे खरेदी करून धर्माच्या रक्षणाला सज्ज राहायला
हवं असं म्हटलं आहे.

६. याच मंचावर अश्विनी उपाध्याय यांनी यति नरसिंहानंद यांना 'भगवं संविधान' सुपूर्द केलं.

७. स्वामी प्रबोधानंद म्हणतात तुम्ही मारायला सज्ज व्हा नाही तर मराल. पोलीस, आर्मी, राजकीय नेते सगळ्यांनी मिळून म्यानमारसारखं (म्हणजे तिथे झालेलं रोहीग्यांचं शिरकाण)
'सफाई अभियान' हाती घ्यावं असंही ते म्हणाले.

८. सिंधू सागर स्वामी म्हणाले की मुसलमानांच्या जमिनी खरेदी करून टाका आणि गावेच्या गावे मुस्लिममुक्त करा. त्याचबरोबर त्यांनी अट्रोसिटी कायद्याखाली किमान दहा मुस्लिम त्यांनी फसवले आहेत तसेच प्रत्येकाने करावे अशी आयडिया दिली आहे.

९. यति
नरसिंहानंद म्हणाले की हिंदूंना प्रभाकरन, भिंद्रावाले, सारखी माणसं हिंदूंमध्ये घडायला हवी आहेत, तसं बनायला तयार असणाऱ्या माणसाला त्यांनी एक करोड द्यायचं आश्वासन दिलं आहे.

१०. सागर सिंधुराज महाराज म्हणाले की इथून गेल्यावर आपला मेसेज क्लिअर असायला हवा की 'ते' हिंदू धर्मात आले तरच
त्यांचे जीव वाचतील, नाहीतर म्यानमारसारखे पळवून मारले जातील. याचबरोबर त्यांनी हिंदूंनी दहा-दहा पोरे काढावीत असं आवाहन केलं आहे.

या सगळ्या वक्तव्यांचे व्हिडीओ एकेक करून बघण्यासाठी altnewsचे @zoo_bear यांचा ट्विटर थ्रेड पहिल्या कमेंटमध्ये दिला आहे.

ही हिंदुत्ववादी 'संत-महंत'
मंडळीनी धर्मसंसदेतून जाहीर पणे केलेली वक्तव्ये आहेत. आज जे यति नरसिंहानंद बोलत आहेत, संघटन बनवत आहेत तसंच काहीसं योगी आदित्यनाथ एकेकाळी करत होते. त्यांच्या 'हिंदू युवा वाहिनी'चा सूर हा असाच "हिंदू खतरे में है" वाला होता! यासंदर्भात त्यांना २००७साली धार्मिक तेढ पसरवल्याबद्दल अटक
सुद्धा झाली होती. यति नरसिंहानंद आणि त्यांच्या या धर्मसंसदेचं गांभीर्य आपल्या लक्षात यावं यासाठी ही आठवण पुरेशी आहे!

देश आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. ही जाहीरपणे झालेली विखारी धर्मसंसद आपल्याला या नव्या वळणावर देशासमोर नक्की काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक देऊन
गेली आहे. कदाचित यातून देशाला सावरायची वेळ नागरिक म्हणून आपल्या हातातून कधीचीनिघून गेली असण्याचीही शक्यता आहे, धर्मांध हिंदुत्ववादी शक्तींच्या तावडीतून देश वाचवायचे प्रयत्न यशस्वी होतील याची आता काही शाश्वती वाटत नाही!

मात्र आधुनिक भारताच्या गळ्याला नख लावणारी ही
हिंदुत्ववादी भुतावळ माजावर होती तेव्हा आपण टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी नव्हतो, जमेल तसा विरोधाचा सूर लावणाऱ्यांपैकी होतो एवढं या घडणाऱ्या इतिहासाला सांगण्यासाठी तरी याविरोधात बोलत राहणं आपल्याला भाग आहे!!

#HaridwarHateAssembly
या वक्तव्यांचे व्हिडीओ बघण्यासाठी लिंक:

पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांचा प्रवास कसा झाला याबद्दल वाचण्यासाठी लिंक:

bbc.com/hindi/india-59…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Makarand Desai

Makarand Desai Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @makmd

23 Dec
Just finished the #SpiderMan movie !

MCU once again delivers while the expectations bar was set insanely high... The movie checks all the major items on its to-do list. It does insane fan-service, it sets up a grand prequel to the upcoming movie in continuity and it manages to Image
be entertaining throughout.

There are two major components of the plot here. One is the MCU's Multiverse Saga beginning to manifest itself into cinema, taking cues from the Disney+ productions i.e. WandaVision, Loki and yes, WhatIf ! The other component is about the Spidey
Trio delivering on the hype and nostalgia.

There might be some plot holes which are introduced by this movie into the continuity. But the overall impact certainly manages to deliver a classic MCU-fulfilled experience to the fans...

The end credit scene was beautifully done.
Read 5 tweets
12 Nov
कंगना काय म्हणते ते नीट ऐकणं गरजेचं आहे. त्यातला 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं, 1947ला भीक मिळाली इतकाच भाग उचलला जातोय. मात्र त्याआधी ती जे बोलली आहे ते तितकंच विषारी आहे. तिचं विधान पूर्ण ऐकणं यासाठीच गरजेचं आहे.

त्या मंचावर कंगना म्हणते-
१. काँग्रेस, लिबरल्स हा ब्रिटिशांनी भारतीयांचं रक्त वाहावं म्हणून केलेली योजना आहे.

२. पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक झालं आणि हिंदुस्थान मात्र सेक्युलर झाला. सेक्युलर म्हणजे नो मॅन्स लँड.

३. ब्रिटिशांनी देश ज्यांच्या हातात सोडला ते म्हणजे काँग्रेसवाले ब्रिटीशांचं एक्सटेन्शन होते.
४. पाकिस्तान मुस्लिमबहुल असल्याने इस्लामिक राष्ट्र झाला, हिंदुस्थान मात्र काँग्रेसने षडयंत्र करून सेक्युलर ठेवला.

५. सावरकर, लक्ष्मीबाई आणि नेताजी यांनी याविरोधात प्रयत्न केले. त्याची त्यांना किंमत भोगावी लागली.

यानंतर ती 1947 चं स्वातंत्र्य भीक होती, 2014ला खरं स्वातंत्र्य
Read 9 tweets
10 Nov
विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा माणूस मुंबई पोलिसांनी हैदराबादमधून पकडला आहे. सदर मनुष्य तेवीस वर्षांचा आहे, आयआयटी ग्रॅज्युएट आहे. रामनागेश श्रीनिवास असं सदर आरोपीचं नांव असल्याचं वृत्त आहे.

त्याच्यावर कारवाई कायद्यानुसार होईलच. पण इथे काही गोष्टी विशेष
लक्षात घेण्यासारख्या आहेत.

सदर आरोपीने भारत-पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहलीच्या मुलीला रेप थ्रेट देणारं ट्विट केलं. हे करण्यासाठी त्याने आपलं @ ramanheist असं असलेलं ट्विटर हँडल बदलून @ criccrazygirl असं करून पाकिस्तानी असल्याचा बनाव केला होता.

विशेष @boomliveसारख्या
फॅक्टचेकर्सनी ही पोलखोल करूनही अनेक भक्त मंडळी सदर ट्विट हे पाकिस्तानी असल्याचं छाती ठोकून सांगत होती. यात अनेक गल्लीगटारछाप भक्तांपासून ते अगदी ज्यांना मोदी स्वतः फॉलो करतात अशा PhD असलेल्या @TrulyMonica बाईंचा समावेश होता. या बाईंनी तर भलामोठा निबंध लिहून कशी ही पाकिस्तानी
Read 11 tweets
19 Aug
निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसने ऑईल बॉण्ड्स करून ठेवले म्हणून ते फेडण्यासाठी आम्हाला पेट्रोल-डिझेलवर जास्तीचा कर लावावा लागतो, त्यामुळे दर कमी करता येणार नाही असं सांगितलं आहे.

निर्मला सीतारामन यांच्याच म्हणण्यानुसार मोदी सरकारने त्या ऑइल बॉण्ड्सवर भरलेले व्याज आणि
मुद्दलाची परतफेड मिळून फार-फार तर ७५,००० करोड रुपये होतात. तर १,३०,००० करोडचे मुद्दल अजून बाकी आहे.

आता निर्मलाबाई हे सांगत नाहीत की मोदी सरकारने फक्त एका वर्षात २०२०-२१मध्ये पेट्रोल-डिझेलवरील करांतून ३,००,००० करोडपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. म्हणजे सगळ्या ऑईल बॉण्ड्सची
मुद्दल आणि त्यावर आतापर्यंत भरलेलं व्याज हे मिळूनही हे मोदी सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील एका वर्षातील करवसुलीच्या रकमेपेक्षा कमी आहे!

मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून पेट्रोलियमवरील करांतून वसूल केलेली रक्कम ही २०,००,००० करोडच्या घरात पोचली आहे. म्हणजे ऑईल बॉण्ड्सची सुरुवातीची
Read 9 tweets
5 Aug
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्भीड, तेजस्वी आणि द्रष्टे विचार!

(सुरू असलेल्या #गैरसोयीचेमहापुरुष या सिरीजचा तिसरा भाग)

१. पंतप्रधान नेहरूंवर कठोर टीका करणारे डॉ. आंबेडकर

"याला काय चारित्र्याची चाड आहे का ? या गोष्टींचा तुम्ही सर्वांनी पूर्ण विचार करावयास पाहिजे...
...या पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या स्त्रिया अशा बहकलेल्या असतील तर त्यांना तिथे काँग्रेसने जाऊ देण्याचे काय कारण आहे?"

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३५)
२. विनोबा भावे यांची निर्भीडपणे पोलखोल करणारे डॉ. आंबेडकर

"होय. तोच तो विन्या, काय गोळा केले आहे त्याने ? नाकातून एकीकडे शेंबूड वाहात असता दुसरीकडे तो व्याख्याने देतो."

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३६)
Read 9 tweets
22 May
नुकतेच आरबीआयने मोदी सरकारला रुपये 99,122 करोड दिले आहेत.

आरबीआयने 2020-21च्या नऊ महिन्यांच्या कालावधीमधील बँकेचा सरप्लस मोदी सरकारला म्हणून दिलेली ही रक्कम निर्मला सीतारामन यांनी बजेटमधील मांडलेल्या रुपये 53,511 करोडच्या अंदाजाहून सुमारे 85% अधिक म्हणजे जवळपास
रुपये 45,611 करोडने जास्त आहे.

आधीच बजेटमध्ये रुपये 35,000 करोड फक्त लसीकरणासाठी राखून ठेवले गेल्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामध्ये भारतातील पन्नास कोटी इतक्या लोकसंख्येचे मोफत लसीकरण आपण करू शकतो असे मोदी सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सचिव असलेले टी. व्ही. सोमनाथन
यांनी याच वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बजेटची स्तुती करता सांगितले होते.

आता आरबीआयने अधिकचे रुपये 45,611करोड मोदी सरकारला दिले आहेत. तर आता संपूर्ण देशभरात मोफत लसीकरण राबवायला केंद्राला पैसे कमी पडतात असं म्हणण्याची उरलीसुरली कारणेही नाहीशी झाली आहेत.

मात्र रिझर्व्ह बँकेच्या
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(