#सावरकरांचे_विचार
भाग २२
श्री पु गोखलेंनी तात्यारावांना एकदा प्रश्न केला की, "तात्या तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पाहता जो जंबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल - प्रसंग पडलाच तर?"
ते नजर रोखून श्रीपुंकडे पाहात क्षणभर रस्त्यातच थांबले, आणि चटकन उसळून म्हणाले -
"मी क्षीण झालो आहे, थकलो आहे, माझे वयही होत आलेले आहे, हे तुला वाटते ते अगदी खरे आहे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करील असाही संभव जवळजवळ नाहीच. पण हा सर्व आपण काही गृहीत कृत्ये धरून काढलेला निष्कर्ष आहे.
२/८
आपला निष्कर्ष बरोबर येत राहिला आणि आपण शस्त्रधारी राहिलो तरी नुकसान काही होणार नाही.
पण आपला तर्क चुकला तर?
स्वामी श्रद्धानंदांचा तर्क असाच चुकला होता. अब्दुल रशीदने या हिंदूचा अंदाज चुकणार हा अंदाज बरोबर केला होता.
३/८
क्रांतिकारक जेव्हा एखादा कट करतात तेव्हा त्या माणसाच्या सवयी, आवडीनिवडी, आपल्यासारखा कोणी फिरणारा वध्य असला तर त्याचा मार्ग, त्याचे सोबती, त्याचा वेष, त्याच्या स्वतःच्या संरक्षणाची सिद्धता याचा अभ्यास करतात. या अभ्यासातून शिकार साधते.
४/८
ते जाऊ दे...उद्या समज, माझ्यावर कोणी हल्ला केलाच तर निर्बंधात राहून मला कोणते शस्त्र बाळगता येईल ते मी जवळ ठेवतो. क्वचित हल्ला आलाच तर माझी प्रतिकारशक्ती कमी पडेलही, प्रतिकार कमी पडला नि मला पराभव पत्करावा लागला तर कधीच वाईट वाटणार नाही. पण...
५/८
- प्रतिकार न करताच नुसत्या शेळीसारखा बें बें करीत मी पतन पावलो तर मला अतोनात दुःख होईल. झुंजत राहणे हे मी आयुष्यभर केलेले आहे. कोणी हल्ला केलाच तर मारीत मारीत मरणे मला आवडेल. रडत रडत, अंदाज चुकला, मला कल्पनाच आली नाही हे म्हणणे मला कधीच मानवणार नाही,
६/८
जंबिया ठेवण्याचा हेतू कोणता तो समजला ना?"
शस्त्र वापरण्याची वेळ आयुष्यात सहसा येतच नाही. पण कधीही न येईल अशी वाटणारी वेळ आलीच तर नुसता पश्चाताप करून कार्यभाग साधत नाही. पुष्कळ वेळा नुसते शस्त्र आपल्याजवळ आहे यानेच काम भागते.
७/८
अपेक्षाभंग होतो तो तुमच्यावर हल्ला करण्यासाठी येणाराचा!
अपेक्षाभंग झाला की कार्यभंग होतो!
म्हणून शस्त्रु बाळगायचे...
मराठी प्रेमाचे नुसतेच तुणतुणे वाजवून आपली #मराठी मोठी होणार नाही हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाणले होते.
#भाषा केवळ संवादाचं माध्यम अन अभिव्यक्त होण्याचे साधन नसून,भाषा ही संस्कृतीचं द्योतक आहे; संस्कृतीची वाहक आहे.
१/१३
आपल्या भाषेतून आपले संस्कार प्रतीत होत असतात आणि म्हणूनच 'परकीय भाषेतून आलेल्या शब्दांमुळे मराठी अधिक संपन्न झाली' हे तत्कालीन अन आताच्या भाषातज्ञांचे मत, सावरकरांनी त्यावेळीच खोडून काढले होते.
२/१३
सावरकरांनी १९२४ साली केसरी मधून #मराठी_भाषेचे_शुद्धीकरण ही लेखमाला सुरू करून त्यात आपली भाषाशुद्धीची कल्पना अधिक ठामपणे मांडली.
दत्तो वामन पोतदार आणि सावरकरांचा #भाषाशुद्धी वरील वाद त्याकाळी खूप गाजला.
#आत्मार्पण
तात्या दररोज रात्री निजताना योगविषयक श्लोक म्हणत. त्या वेळी ते आपले दोन्ही हात प्रथम टाळूवर ठेवून मग कपाळ, छाती, पोट यांवर ठेवीत ठेवीत पायांवरून पावलांकडे सावकाश नेत असत.
ते श्लोक पुटपुटत असल्याने ते श्लोक कोणते हे सांगणे कठीण होते; पण ते सदर कृती ३ वेळा करीत.
१/११
हा प्रकार मी लागोपाठ ३-४ दिवस पाहिला. कुतूहल तर निर्माण झाले होते, पण तात्यांना मी हेतुतःच काही विचारले नाही. कदाचित त्यांनी हा परिपाठ बंद केला असता, अशी मला भीती वाटली.
मात्र कुतुहलाने त्या वेळी कामावर असलेल्या शुश्रूषांकडे मी चौकशी केली होती. त्यांनीही तेच सांगितले.
२/११
तेव्हा माझी निश्चिती झाली की, योगविषयक श्लोक ते म्हणत असावेत व त्यातील अर्थाप्रमाणे ते डोक्यापासून हात ठेवत ठेवत पावलांपर्यंत नेत असावेत.
१९ फेब्रुवारी १९६६ ला अमावास्या होती. त्या संध्याकाळपासून त्यांची तगमग होत होती. जीव आत ओढला जात होता.
लोकमान्य टिळकांचे देहावसान झाल्याची दुःखद बातमी अंदमानात येऊन पोहोचली.
सावरकरांनी "हा राष्ट्रीय शोकदिन आहे. म्हणून आपणा सर्वांनी आज उपवास पाळावा" अशी सूचना करताच केवळ राजबंद्यांनीच नव्हे, तर इतर कैद्यांनीही सावरकरांच्या या सूचनेला दुजोरा दिला.
#BlackLivesMatter साठी गुडघ्यावर बसून 'गोऱ्यांच्या चुकीबाबत आम्ही खेद व्यक्त करतो' आविर्भावात झुकला!
का?
फक्त Black Lives Matter करतात का? #HinduLivesMatter करत नाहीत?
हिंदूंमध्ये जीव नसतो?
हिंदू स्त्रियांवरील अत्याचार कृष्णवर्णीय स्त्रियांवरील अन्यायापेक्षा कमी पाशवी आहेत क?
२/४
सातासमुद्रापार गोऱ्यांच्या विकृत मानसिकतेसाठी आम्ही का स्वतःला पापी समजावं?
पाक-तालिबान-बांगलादेशी शांतिप्रिय समुदायाकडून जेंव्हा हिंदू मारले जातात, तेंव्हा त्या शांतिप्रिय समुदायाचे भारतीय नागरिक तोंडातून ब्र सुद्धा काढत नाहीत.
मग आमचे विकसित हिंदू कणे का नाही ताठ राहू शकत?
३/४
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध #चौकोनीपाव आणि कुद्रे बिस्किट्स
चौकोनी पाव म्हणजे आमच्या वेंगुर्ल्याची खासियत !
#वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(१/६)
वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे !
इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे. सकाळच्या नाष्ट्याला अगदी दुपारी २ पर्यंत इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ-चौकोनी पाव, हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते.
(२/६)
चाकरमानी देखील हॉटेलात यथेच्छ ताव मारुन चौकोनी पाव पार्सल बांधून घरी नेतात. हे चौकोनी पाव फक्त वेंगुर्ल्यातच बनविले जातात.
इथे सुरेश शिवलकर, नार्वेकर, भैरे, पाटणकर, सुदन रेडकर अशा मोजक्याच चौकोनी पाव बनविणाऱ्या बेकऱ्या आहेत.
(३/६)
लखोबा लोखंडेने बहुजन (खरं तर ते सर्वांचेच आदर्श आहेत) समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला म्हणून ज्यांनी कोर्टाबाहेर त्याच्यावर हल्ला केला, इथे twitter वर येऊन 'तो लिमये, म्हणजे ब्राह्मण...म्हणून इतर समाजातील आदर्शांचा अपमान करतो' असं certificate देऊन मोकळे झालेले -
(१/६)
- आपल्या पुरतं सोयीस्कर 'सत्य' शोधून जातीचं राजकारण करणारे #ठेकेदार, हा भय्या पाटील समर्थ रामदास स्वामी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा जाहीर अपमान करत असताना कुठे लपले आहेत ?
समाजात जातीय तेढ निर्माण करून हा विकृत भैया पाटील काय साधू पाहत आहे?
(२/६)
मा.@sachin_inc हे या भैया पाटीलला follow करतात, म्हणजे काँग्रेसी तर्कानुसार भैया पाटलाच्या या लिखाणाशी सावंत सहमत आहेत का?
सावरकर, हिंदू आणि ब्राह्मणद्वेष घेऊन जन्मास येणाऱ्या काँग्रेसी पिलावळीकडून दुसरी अपेक्षा ती काय करणार!
सावरकरांना गांधीहत्येत गोवण्यात अयशस्वी ठरलेल्या -
३/६