आयटीसी ऍन्यूअल जनरल मिटिंग - काय महत्वाचे?
आयटीसची ऍन्यूअल जनरल मिटिंग बुधवारी २० जुलै २०२२ ला पार पडली. या मिटिंगमधील काही महत्वाच्या मुद्द्यांचा घेतलेला परामर्श.. #म#मराठी#ITC#itcagm
१. कंपनी लवकरच ५ नव्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज सुरु करणार आहे. यामध्ये ऍग्री, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग बिझनेसचा समावेश आहे.
२. आयटीसीने नव्याने लाँच झालेल्या एफएमसीजी बिझनेसेसवर ग्राहकांनी गेल्या वर्षात २४,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. #म#मराठी#ITC#itcagm
२०३० पर्यंत ह्या बिझनेसचे पोटेन्शियल ५ लाख कोटींचे असेल असा कंपनीला विश्वास आहे. गेल्या दोन वर्षात आयटीसीच्या या नव्या एफएमसीजी बिझनेसने २५% वाढ नोंदवली आहे. कंपनीचे प्रॉडक्टस ७० हून अधिक वेगवेगळ्या आउट्लेट्समधून विकले जातात. #म#मराठी#ITC#itcagm
३. कंपनीचा पारंपरिक सिगरेट बिझनेस २०२२ वर्षात रिकव्हर होताना दिसतोय.
४. आयटीसीने २०२२ आर्थिक वर्षात ११० नवे प्रॉडक्टस लाँच केले.
५. आयटीसी ६० हून अधिक देशांमध्ये आपल्या प्रॉडक्टसची निर्यात करते. #म#मराठी#ITC#itcagm
६. आयटीसीचा ऍग्री बिझनेस भारतातील २० राज्यातून तब्बल ४० लाख टन ऍग्री कमोडिटीजचे सोर्सिंग करते. याशिवाय ९५ देशांमध्ये आपल्या ऍग्री प्रॉडक्टसची निर्यातसुद्धा करते.
७. कंपनीच्या पेपरबोर्ड बिझनेसने रेव्हेन्यूमध्ये ३६% वाढ नोंदवली. कंपनी येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग प्रॉडक्टस लाँच करण्यावर भर देईल. #म#मराठी#ITC#itcagm
८. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आयटीसीने ९ हॉटेल्स लाँच केले. येणाऱ्या काळात आणखी काही हॉटेल्स लाँच करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. कंपनी लवकरच आयटीसी नर्मदा हे हॉटेल अहमदाबादमध्ये लाँच करणार आहे. #म#मराठी#ITC#itcagm
९. आयटीसी इन्फोटेक या आयटीसीच्या आयटी सबसिडीअरीने नुकतेच पीटीसी इनकार्पोरेशनमध्ये हिस्सेदारी घेतली.
१०. आयटीसचे ई-स्टोअर आता १५ शहरांमध्ये ऑपरेशनल आहे. या स्टोअर्समध्ये ४५ हून अधिक कॅटेगरीजचे ७०० प्रॉडक्टस उपलब्ध आहेत. #म#मराठी#ITC#itcagm
गेले काही वर्षे पावसाळयात तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर बरेच लोक एकाच कंपनीचे रेनकोट, जॅकेट्स घातलेले दिसतात. दिनेश त्रिवेदी या माणसाने १९९५ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. #म#मराठी
ध्येय एकच होतं, पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या आऊटरवेअरमधली आघाडीची कंपनी बनायचं! आजघडीला रेनवेअरचे उत्पादन करणारी ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. नाव आहे एन झेड सिझनल वेअर. लक्षात नाही आलं ना? झील म्हटलं तर कदाचित लक्षात येईल. येस, ही तीच झील रेनकोट बनवणारी कंपनी आहे. #म#मराठी
कंपनीचे सर्वेसर्वा दिनेश त्रिवेदी यांनी १९८४ मध्ये मुंबईतील सँडहर्स्ट रोडला एका छोट्याश्या दुकानात आपली कारकीर्द सुरु केली. त्यांचा पहिला व्यवसाय होता गिफ्ट आर्टिकल्स आणि पॅकेजिंगचा. पुढे १९८८ मध्ये त्यांनी मदनपुरा येथे स्वतःची फॅक्टरी सुरु केली. #म#मराठी
आयपीएलमधून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या बीसीसीआयला टॅक्स मात्र शून्य!
आयपीएल, भारतातली सर्वाधिक लोकप्रिय लीग. दोन अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. #म#मराठी
खेळाडूंच्या लिलावाच्या रकमा, सामन्यांच्या प्रक्षेपणासाठीच्या रकमा याचे आकडे घाम फोडणारे असतात. हे आकडे दरसाल वाढतच चालले आहेत. बीसीसीआयसाठी आयपीएल ही एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. #म#मराठी
मात्र याच आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआय एक रुपयाही कर भरत नाही असे तुम्हाला सांगितले तर? होय हे खरे आहे. आयपीएल कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याकरता लाएबल नाही. #म#मराठी
कॉफीचा स्टॉक संपवायचा म्हणून बनवली आणि जगप्रसिद्ध झाली
अमेरिकेन स्टॉक मार्केटमध्ये १९२९ मध्ये मोठा क्रॅश झाला होता. या क्रॅशमुळे जगभरात सगळीकडे कॉफीच्या किंमती पडल्या. इतक्या पडल्या की उत्पन्नाचा खर्चही निघेल की नाही याची शास्वती नव्हती. #म#मराठी#nescafe
लॉसमध्ये विकण्यापेक्षा साठवलेली बरी म्हणून जगात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या ब्राझील या देशाने कॉफी विकलीच नाही. परिणामी देशात मोठ्या प्रमाणावर कॉफीचा साठा तसाच पडून राहिला. #म#मराठी
यावर उपाय म्हणून ब्राझीलने थेट नेस्ले या कंपनीला साकडे घातले. आमच्याकडे असलेल्या जास्तीच्या कॉफीचा वापर करून काहीतरी बनवता येईल का? अशी विचारणा करण्यात त्यांनी केली. नेस्लेने हे आव्हान स्विकारण्याचे ठरवले. #म#मराठी
उद्यापासून मॅकडोनाल्डने पिझ्झा बनवायला सुरुवात केली तर? या कंपनीची साईझ पाहता त्यांच्यासाठी हे करणे फार अवघड नाही. याच्याउलट डॉमिनोज किंवा पिझ्झा हट बर्गर का बनवत नाहीत? तेही बर्गर बनवूच शकतात की? #म#मराठी
महिंद्रा जसे ट्रॅक्टर बनवते तसेच टाटा का बनवत नाही? त्यांच्याकडे अशी क्षमता आहेच की? तरीही टाटा असे करत नाहीत.
पण आपल्या प्रॉडक्ट ऑफरिंग सोडून वेगळे काहीतरी करणे या कंपन्यांच्या तत्वात बसत नसेल. #म#मराठी
त्यासाठी लागणार वेळ, कष्ट, पैसा त्यांच्या सध्याच्या प्रॉडक्टसवर खर्च करून आणखी काहीतरी चांगले आपल्या कस्टमर्सला देता येईल असाही विचार असू शकेल. #म#मराठी
आयपीओ येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या एलआयसीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत एलआयसीला २३५ कोटींचा नफा झाला आहे. हाच नफा आर्थिक वर्ष २०२१ च्या तिमाहीत ९४ लाख रुपये होता. हा प्रॉफिट इतका का वाढला? #म#मराठी
एलआयसीने आपली प्रॉफिट शेअरिंग पॉलिसी नुकतीच बदलली. म्हणजे नक्की काय केलं? आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एलआयसीचा एक पोलिसहोल्डर्स फंड होता. या फंडातला ९५% वाटा पॉलिसीहोल्डर्समध्ये वाटला जाई तर ५% वाटा शेअरहोल्डर्ससाठी असे. #म#मराठी
प्रायव्हेट कंपन्या ९०% वाटा पॉलिसीहोल्डर्सला तर १०% वाटा शेअरहोल्डर्ससाठी ठेवतात.
आता एलआयसीचा आयपीओ येणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या वाढणार आहे. मग ही प्रॉफिट शेअरिंग सिस्टीम रिटेल शेअरहोल्डर्ससाठी योग्य ठरली नसती. #म#मराठी
एलआयसी ही भारत सरकारची कंपनी आहे. आता आयपीद्वारे सरकार या कंपनीतला आपला काही हिस्सा विकणार आहे. हा हिस्सा विकला तरीही बराचसा हिस्सा सरकारकडे कायम असणार आहे. #म#मराठी#LIC#LICIPO
मग ही सरकारी कंपनी आयपीओनंतर प्रायव्हेट झाली तर तिचा कारभार कसा चालणार? जे नवे लोक एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या असल्या तर काय करायचे? असे काही प्रश्न या निमित्ताने उभे राहतील. #म#मराठी#LICIPO
१. सरकार आपला हिस्सा किती आणि कसा कमी करणार?
आयपीओच्या नियमानुसार सरकारला एलआयसीमधील कमीत कमी ५% हिस्सा कमी करावा लागेल. कंपनीचे लिस्टिंग झाल्यावर दोन वर्षात आणखी १०% आणि नंतर पुढच्या पाच वर्षात २५% पर्यंत हिस्सा कमी करावा लागेल.