शाळेत असताना आपण सगळ्यांनीच नटराज आणि अप्सरा ब्रँडच्या पेन्सिल आणि खोडरबर वापरले आहेत. त्यावेळी नटराज थोडा स्वस्त आणि अप्सरा थोडा महाग ब्रँड असायचा. अजूनही तसेच आहे. या दोनपैकी अप्सरा हा भारीतला ब्रँड समजला जायचा. #म#मराठी
पण हे दोन्ही ब्रँड एकाच कंपनीचे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
होय, हिंदुस्थान पेन्सिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे दोन ब्रँड आहेत.
ही कंपनी १९५८ पासून या व्यवसायात असून आजघडीला भारतातील सर्वात मोठी पेन्सिल मॅन्युफॅक्चरर आहेत. #म#मराठी
कंपनी आपले प्रॉडक्टस ५० हून अधिक देशांमध्ये विकते. कंपनी प्रत्येक दिवशी ८५ लाख पेन्सिल्स, १७ लाख शार्पनर्स, २७ लाख खोडरबर, १० लाख पेन आणि ३ लाख पट्ट्या बनवते. ही सगळी प्रोसेस ऑटोमेटेड आहे. कंपनीचे स्वतःचे १२ मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट्स आहेत. #म#मराठी
कंपनीचे २८०० हून अधिक रिजनल डिस्ट्रिब्युटर्स तर जवळपास पावणेदोन लाख डायरेक्ट डिस्ट्रिब्युशन आउटलेट्स आहेत.
भारत पारतंत्र्यात असताना पेन्सिलसुद्धा आयात केली जात असे. ती प्रामुख्याने युके, जपान आणि जपान या देशांमधून मागवली जाई. #म#मराठी
मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर ही निर्यात जवळपास ठप्प झाली. त्यावर पर्याय म्हणून भारतातच काहीजणांनी पेन्सिल बनवण्याचे कारखाने सुरु केले. मात्र दुसरे महायुद्ध संपल्यावर पुन्हा एकदा परदेशी पेन्सिल्स भारतात आयात होऊ लागल्या. #म#मराठी
भारतात ज्यांनी हा व्यवसाय सुरु केला होता त्यांची अडचण झाली. भारतात बनवल्या जाणाऱ्या पेन्सिल्स या तुलनेने तकलादू आणि महाग असत. त्यामुळे साहजिकच त्यांनी खरेदी करणे ग्राहकांनी थांबवले. अशात या पेन्सिल कारखानदारांनी सरकारचे दरवाजे ठोठावले. #म#मराठी
सरकारने आयातबंदी करून काही प्रमाणात त्यांची मदतही केली.
अशातच पेन्सिल व्यवसाय नक्की कसा करावा? मॅन्युफॅक्चरिंग कसे केले पाहिजे?यासारख्या महत्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी बी जे संघवी, रामनाथ मेहरा आणि मनसुखानी हे तीन मित्र जर्मनीला जाऊन आले. #म#मराठी
सगळे शिकून त्यांनी १९५८ मध्ये हिंदुस्थान पेन्सिल्सची मुहूर्तमेढ रोवली.
सगळ्यांचा लाडका आणि बहुतेकजणांचा आयुष्यातील पहिला पेन्सिल, खोडरबर ब्रँड हा कंपनीचासुद्धा पहिला ब्रँड होता. लोकांना व्हॅल्यू फॉर मनी देता यावी हेतूने कंपनीने तो लाँच केला होता. #म#मराठी
अर्थातच त्यात ते यशस्वी झाले. पुढे १९७० दशकात कंपनीने अप्सरा हा थोडा प्रीमियम ब्रँड लाँच केला. या ब्रॅण्डलादेखील ग्राहकांनी आपलेसे केले.
पुढे जाऊन कंपनीने पेन्सिल्सबरोबरच खोडरबर, शार्पनर, बॉल पेन, जेल पेन, कलर पेन्सिल असे वेगवेगळे #म#मराठी
प्रॉडक्टस लाँच करत मार्केटमधील आपला दबदबा वाढवत नेला. आजही पेन्सिल, खोडरबर, शार्पनर मार्केटचा ६०% अधिक शेअर हिंदुस्थान पेन्सिल्सकडेच आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये घट होत आहे. #म#मराठी
त्यात गेली दोन अडीच वर्षे शाळा, कॉलेज ऑनलाईन झाल्याने प्रॉडक्टसच्या खपावर त्याचा परिणाम झाला. आता येणाऱ्या काळात कंपनी या सगळ्याला कसे तोंड देते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. #म#मराठी
भारतातील पेन्सिल मार्केट गेली अनेक वर्षे हिंदुस्थान पेन्सिल्स, कॅम्लिन, डॉम्स आणि महाराष्ट्र पेन्सिल्स या चारच कंपन्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. #म#मराठी
मध्यंतरी कंपनीने एका आईच्या पात्राला प्रतिसाद देताना तिच्या डावखुऱ्या मुलीला पेन्सिलला टोक करणे सोपे जावे म्हणून खास वेगळे शार्पनर बनवून तिला पाठवले होते.
आयटीसी ऍन्यूअल जनरल मिटिंग - काय महत्वाचे?
आयटीसची ऍन्यूअल जनरल मिटिंग बुधवारी २० जुलै २०२२ ला पार पडली. या मिटिंगमधील काही महत्वाच्या मुद्द्यांचा घेतलेला परामर्श.. #म#मराठी#ITC#itcagm
१. कंपनी लवकरच ५ नव्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज सुरु करणार आहे. यामध्ये ऍग्री, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग बिझनेसचा समावेश आहे.
२. आयटीसीने नव्याने लाँच झालेल्या एफएमसीजी बिझनेसेसवर ग्राहकांनी गेल्या वर्षात २४,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. #म#मराठी#ITC#itcagm
२०३० पर्यंत ह्या बिझनेसचे पोटेन्शियल ५ लाख कोटींचे असेल असा कंपनीला विश्वास आहे. गेल्या दोन वर्षात आयटीसीच्या या नव्या एफएमसीजी बिझनेसने २५% वाढ नोंदवली आहे. कंपनीचे प्रॉडक्टस ७० हून अधिक वेगवेगळ्या आउट्लेट्समधून विकले जातात. #म#मराठी#ITC#itcagm
गेले काही वर्षे पावसाळयात तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर बरेच लोक एकाच कंपनीचे रेनकोट, जॅकेट्स घातलेले दिसतात. दिनेश त्रिवेदी या माणसाने १९९५ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. #म#मराठी
ध्येय एकच होतं, पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या आऊटरवेअरमधली आघाडीची कंपनी बनायचं! आजघडीला रेनवेअरचे उत्पादन करणारी ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. नाव आहे एन झेड सिझनल वेअर. लक्षात नाही आलं ना? झील म्हटलं तर कदाचित लक्षात येईल. येस, ही तीच झील रेनकोट बनवणारी कंपनी आहे. #म#मराठी
कंपनीचे सर्वेसर्वा दिनेश त्रिवेदी यांनी १९८४ मध्ये मुंबईतील सँडहर्स्ट रोडला एका छोट्याश्या दुकानात आपली कारकीर्द सुरु केली. त्यांचा पहिला व्यवसाय होता गिफ्ट आर्टिकल्स आणि पॅकेजिंगचा. पुढे १९८८ मध्ये त्यांनी मदनपुरा येथे स्वतःची फॅक्टरी सुरु केली. #म#मराठी
आयपीएलमधून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या बीसीसीआयला टॅक्स मात्र शून्य!
आयपीएल, भारतातली सर्वाधिक लोकप्रिय लीग. दोन अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. #म#मराठी
खेळाडूंच्या लिलावाच्या रकमा, सामन्यांच्या प्रक्षेपणासाठीच्या रकमा याचे आकडे घाम फोडणारे असतात. हे आकडे दरसाल वाढतच चालले आहेत. बीसीसीआयसाठी आयपीएल ही एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. #म#मराठी
मात्र याच आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआय एक रुपयाही कर भरत नाही असे तुम्हाला सांगितले तर? होय हे खरे आहे. आयपीएल कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याकरता लाएबल नाही. #म#मराठी
कॉफीचा स्टॉक संपवायचा म्हणून बनवली आणि जगप्रसिद्ध झाली
अमेरिकेन स्टॉक मार्केटमध्ये १९२९ मध्ये मोठा क्रॅश झाला होता. या क्रॅशमुळे जगभरात सगळीकडे कॉफीच्या किंमती पडल्या. इतक्या पडल्या की उत्पन्नाचा खर्चही निघेल की नाही याची शास्वती नव्हती. #म#मराठी#nescafe
लॉसमध्ये विकण्यापेक्षा साठवलेली बरी म्हणून जगात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या ब्राझील या देशाने कॉफी विकलीच नाही. परिणामी देशात मोठ्या प्रमाणावर कॉफीचा साठा तसाच पडून राहिला. #म#मराठी
यावर उपाय म्हणून ब्राझीलने थेट नेस्ले या कंपनीला साकडे घातले. आमच्याकडे असलेल्या जास्तीच्या कॉफीचा वापर करून काहीतरी बनवता येईल का? अशी विचारणा करण्यात त्यांनी केली. नेस्लेने हे आव्हान स्विकारण्याचे ठरवले. #म#मराठी
उद्यापासून मॅकडोनाल्डने पिझ्झा बनवायला सुरुवात केली तर? या कंपनीची साईझ पाहता त्यांच्यासाठी हे करणे फार अवघड नाही. याच्याउलट डॉमिनोज किंवा पिझ्झा हट बर्गर का बनवत नाहीत? तेही बर्गर बनवूच शकतात की? #म#मराठी
महिंद्रा जसे ट्रॅक्टर बनवते तसेच टाटा का बनवत नाही? त्यांच्याकडे अशी क्षमता आहेच की? तरीही टाटा असे करत नाहीत.
पण आपल्या प्रॉडक्ट ऑफरिंग सोडून वेगळे काहीतरी करणे या कंपन्यांच्या तत्वात बसत नसेल. #म#मराठी
त्यासाठी लागणार वेळ, कष्ट, पैसा त्यांच्या सध्याच्या प्रॉडक्टसवर खर्च करून आणखी काहीतरी चांगले आपल्या कस्टमर्सला देता येईल असाही विचार असू शकेल. #म#मराठी
आयपीओ येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या एलआयसीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत एलआयसीला २३५ कोटींचा नफा झाला आहे. हाच नफा आर्थिक वर्ष २०२१ च्या तिमाहीत ९४ लाख रुपये होता. हा प्रॉफिट इतका का वाढला? #म#मराठी
एलआयसीने आपली प्रॉफिट शेअरिंग पॉलिसी नुकतीच बदलली. म्हणजे नक्की काय केलं? आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एलआयसीचा एक पोलिसहोल्डर्स फंड होता. या फंडातला ९५% वाटा पॉलिसीहोल्डर्समध्ये वाटला जाई तर ५% वाटा शेअरहोल्डर्ससाठी असे. #म#मराठी
प्रायव्हेट कंपन्या ९०% वाटा पॉलिसीहोल्डर्सला तर १०% वाटा शेअरहोल्डर्ससाठी ठेवतात.
आता एलआयसीचा आयपीओ येणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या वाढणार आहे. मग ही प्रॉफिट शेअरिंग सिस्टीम रिटेल शेअरहोल्डर्ससाठी योग्य ठरली नसती. #म#मराठी