शंकरी प्रसाद केस मधे संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकरांना सर्वोच्च न्यायालयाने संमती दिल्यानंतर सरकारने घटनादुरुस्ती करण्याचा सपाटा लावला. 1964 साली सरकारने 17वी घटनादुरुस्ती केली..
शंकरी प्रसाद निर्णयात न्यायालयाने अनु.31A आणि 31B वैध ठरवुन संपत्ती अधिग्रहण कायद्याना संरक्षण दिले असले तरी वेगवेगळ्या राज्यांच्या नव्या कायद्याना उच्च न्यायालयात आव्हान मिळत होते. काही प्रकरणात न्यायालयाने राज्यांचे कायदे रद्द केले होते.
यावर उपाय म्हणुन संसदेने 17व्या घटनादुरुस्तीने अनु.31A मधे उपकलम समाविष्ट करून मार्केट रेट नुसार मोबदला देऊन सीलिंग अंतर्गत येणाऱ्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी कायदे करण्याची तरतूद करण्यात केली तसेच नवव्या परिशिष्टात राज्यांचे 44 कायदे समाविष्ट करून त्यांना संरक्षण दिले.
सज्जन सिंग प्रकरणात पाच न्यायधीशांच्या संविधान पीठासमोर या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले.
अनु. 368 अन्वये घटनेच्या काही अनुच्छेदात बदल करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची संमती लागते.
याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता की 17व्या घटनादुरुस्ती मुळे अप्रत्यक्षपणे अनु.226 म्हणजेच हायकोर्टाच्या अधिकारक्षेत्रावर परिणाम होतो आणि अश्या घटनादुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांची संमती आवश्यक असते जी घेतली नसल्यामुळे ही दुरुस्ती घटनाबाह्य ठरते.
नानी पालखीवाला यांचा जन्म 1920 साली मुंबईतील पारशी कुटुंबात झाला होता. 1946 साली त्यांनी सर जमशेदजी कांगा यांच्या चेंबरमधून वकिली सूर केली. सुरुवातीला त्यांचा फोकस व्यावसायिक आणि टॅक्स संबंधी खटल्यावरच होता. 1951 पासून ते घटनात्मक बाबींशी निगडित प्रकरणे ही बघू लागले आणि..
54 सालापासून सुप्रीम कोर्टात देखील यायला लागले होते. 1964 पर्यंत ते मोठे वकील म्हणुन बऱ्यापैकी नावारुपास आलेले होते. डीएम पोपट जे कि स्वतः वकील आणि पालखीवला यांचे चांगले मित्र होते त्यांनी पालखीवाला यांना सज्जन सिंग प्रकरणात युक्तिवाद करण्याची विनंती केली होती.
पालखीवाला यांनी आपण शेवटच्या दिवशी युक्तिवाद करू असे सांगितले होते. मात्र जस्टीस गजेंद्रगडकर यांनी पालखीवाला या केस मधे येण्यापूर्वीच सुनावणी गुंडाळली आणि त्यामुळे त्यांची संधी हुकली.
जस्टीस गजेंद्रगडकर (न्या.वांछु आणि न्या. दयाळ यांसोबत) यांनी लिहिलेल्या बहुमताच्या निर्णयात...
म्हंटले कि अनु. 368 चे इंटरप्रिटेशन हे घटनेच्या इतर अनुच्छेदांशी संतुलित अशा पद्धतीने करावे लागेल. अनु.368 मधील निम्म्या राज्यांच्या संमतीची जी अट आहे ती लागु होते कि नाही हे ठरवण्यासाठी मूलभूत अधिकरांत केलेल्या दुरुस्तीद्वारे अनु.226 मधील हायकोर्टाच्या अधिकरांवर लक्षणीय परिणाम..
होतो आहे की नाही हे तपासावे लागेल. जर अश्या दुरुस्तीमुळे अनु.226 वर होणारा परिणाम हा अप्रत्यक्ष, नाममात्र, प्रासंगिक असेल तर 368 मधील अट पूर्ण करण्याची गरज नाही. थेट अनु.226 मधे दुरुस्ती केली असेल तर त्यासाठी राज्यांच्या संमतीची अट लागू होईल. अनु. 31A, 31B मधील...
केलेल्या दुरुस्तीचा परिणाम तपासण्यासाठी pith & substance कसोटीचा आधार घेता येईल. ( Pith & substance म्हणजे एखाद्या तरतूदिचा 'मूळ गाभा' बघणे).
अनु. 31A, 31B आणि त्यासाठी केलेल्या दुरुस्त्या यामागचा हेतू हा राज्यांनी त्यांचे सामाजिक-आर्थिक धोरण राबवण्यासाठी जे कायदे केले..
त्यातील घटनात्मक अडथळे दूर करणे हा होता. Pith and susbtance कसोटीने बघितले तर असे लक्षात येते हि या तरतुदी ह्या मूलभूत अधिकरांत बदल करण्यासाठी केलेल्या आहेत. त्यांचा हायकोर्टाच्या कार्यक्षेत्रात होणारा परिणाम हा नाममात्र आहे. त्यामुळे या तरतुदींसाठी अनु.368 मधील..
निम्म्या राज्यांच्या संमतीची आवश्यकता आहे असे म्हणता येणार नाही.
जमीन हा राज्य सरकारचा विषय आहे आणि संसदेने त्यावर कायदे केले आहेत या आक्षेपवार जस्टीस गजेंद्रगडकर यांनी म्हंटले की यातही पिथ&सबस्टन्स टेस्ट बघितली तर लक्षात येते कि संसदेने जमिनीसाठी कायदे केलेले नाहीत.
संसदेने राज्यांच्या कायदे करण्याच्या मार्गातील अडथळे दूर केले आहेत,राज्यांनी केलेले कायदे संरक्षित करण्यासाठी तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे हा आक्षेप विचारात घेण्यासारखा नाही.
जस्टीस गजेंद्रगडकर यांनी याचिका फेटाळून लावत शंकरी प्रसाद निर्णय कायम ठेवला.
न्या. हिदायततुल्ला आणि न्या.मुधोळकर यांनीही याचिका फेटाळल्या असल्या तरी दोघांनी संसदेच्या घटनादुरुस्ती करण्याच्या क्षमतेबाबत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.
जस्टीस हिदायतुल्ला यांनी म्हंटले कि घटनेच्या भाग तीन मधे मूलभूत हक्कांच्या स्वरूपात आपल्याला अनेक आश्वासने दिलेली आहेत,
ती आश्वासने विशिष्ट बहुसंख्यकांच्या हातचे खळणे आहे असा विचार करणे कठीण आहे. अनु.32 हि नागरिकांना स्टेट विरुद्ध मिळालेली ढाल आहे. अनु.368 द्वारे दुरुस्ती करून सरकार हि ढाल काढून घेऊ शकते का ? शब्दशः अर्थ बघितले तर हो म्हणता येईल मात्र आपण इथे व्याकरणकाराच्या भूमिकेतून..
विचार करू इच्छित नाही. घटनादुरुस्ती अधिकरांचा वापर घटनात्मक बंधनापासून पळवाट काढण्यासाठी केला जाऊ नये असे जस्टीस हिदायतुल्ला यांनी म्हंटले.
जस्टीस मुधोळकर यांनी म्हंटले कि अनु.368 चा सरळ अर्थ बघितला तर असे दिसुन येते कि संसदेचे घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार हा सामान्य कायदे..
करण्याच्या अधिरकारासारखाच आहे. अनु368 मधे असे कुठेही म्हंटलेले नाही कि घटनादुरुस्ती करताना सभागृह हे वेगळया विशिष्ट अश्या घटनात्मक अधिरकांत (Constiuent Powers) काम करत असते. अनु.368 मधे घटनादुरुस्ती करण्याचे संसदेला वेगळे विशिष्ट अधिकार आहेत का यावर शँका घेण्यास वाव आहे.
भारतीय संसद, व्यवस्थेच्या इतर शाखाप्रमाणे घटनात्मक चौकटीत काम करते आणि ही बाब घटनादुरुस्ती प्रक्रियेला देखील लागू होते.
घटनेत भाग तीन मधल्या अधिरकांमधे दुरुस्ती करण्याबाबत कुठेही स्पष्ट बंधन घातलेले नाही हे खरे असले तरी जे अधिकार मूलभूत समजले गेले आहेत आणि अनु 32 अंतर्गत..
सुरक्षित केले गेलेले आहेत ते अनु.368 द्वारे सहजरीत्या बदलले किंवा संकुचित केले जाऊ शकतात असे म्हणणे विचित्र आहे.
संविधान सभेने लिखित संविधान स्वीकारले, व्यवस्थेचे तीन अंग तयार केले, सरकार-प्रशासन यांना सभागृहास उत्तरदायी बनवले, फेडरल स्ट्रक्चर उभे केले आणि अधिकरांची विभागणी केली
शपतेचा नमुना ठरवून दिला ज्यात पदसिद्ध व्यक्ती सविधानाप्रती निष्ठा आणि त्याचे जतन करण्याची शपथ घेतात. यावरून असे म्हणता येऊ शकत नाही का कि घटनाकरांच्या मनात घटनेच्या काही "बेसिक गुणधर्माना (बेसिक फीचर्स)" स्थायी बनवायचे होते ? असा प्रश्न मुधोळकर यांनी उपस्थित केला.
पुढे त्यांनी म्हंटले आहे की यांचा देखील विचार करणे गरजेचे आहे कि घटनेच्या बेसिक फीचर्स मधे बदल याचा अर्थ घटनादुरुस्ती असा होतो की घटनेचे पुनर्लेखन असा होतो ? पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने फजलुल चौधरी या प्रकरणात राष्ट्रपतीचा आदेश रद्द करताना म्हंटले आहे की राष्ट्रपतीना पाकिस्तानच्या
संविधानातील बेसिक फीचर्स मधे बदल करण्याचा अधिकार नाही.
त्यामुळे हे तपासणे गरजेचे आहे की जोपर्यंत राज्यघटनेतील उद्देशिका अस्तित्वात आहे तोपर्यंत संसदेला त्यात नमूद बेसिक फीचर्स मधे बदल करण्याचा अधिकार आहे का ? पूर्वीच्या निर्णयात उद्देशिका घटनेचा भाग नाही असा निर्णय
कोर्टाने दिला असला तरी जर घटनेचे बेसिक फीचर्स हे उद्देशिकेतील नमूद तत्वांचाच परिपाक असेल तर उद्देशिका घटनेचा भाग नाही ? यावर विचार करणे गरजेचे आहे जस्टीस मुधोळकर यांनी म्हंटले.
दोन न्यायधीशांनी संसदेवर शँका उपस्थित केली होती. जर पालखीवाला या प्रकारणात आले असते आणि..
बहुमतातील तीन पैकी एका जरी न्यायधीशाचे मत बदलू शकले असते तर हे प्रकरण मोठ्या पीठाकडे वर्ग झाले असते अन 1964 मधेच बेसिक स्ट्रक्चर संकल्पना अस्तित्वात आली असती आणि नंतरच्या दशकात सरकार व न्यायपालिका यांच्यात जे महाभारत झाले ते टळले असते.
सज्जन सिंग प्रकरणात जस्टीस गजेंद्रगडकर यांनी शँकरी प्रसाद निर्णयाचीच री ओढत संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकांरावर शिक्कामोर्तब केले असले तरी जस्टीस हिदायतुल्ला आणि जस्टीस मुधोळकर यांनी संसदेच्या असिमीत क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अप्रत्यक्षपणे..
घटनात्मक चौकटीची गरज अधोरेखित केली होती.
जस्टीस मुधोळकर यांनी त्यांच्या निर्णयात पहिल्यांदाच "बेसिक फिचर्स" शब्दांचा उल्लेख करून मूलभूत गाभा संकल्पनेची बीजे रोवली होती....!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#थ्रेडसिरीज
संविधानाचा मूलभूत गाभा
The Basic Structure...!
भाग 1 - First Case First Amendment !
संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे मात्र संविधानाचा मूलभूत गाभा, बेसिक स्ट्रक्चर मधे बदल करण्याचा करण्याचा अधिकार नाही हे सर्वांनी अनेकवेळा वाचले ऐकले असेलच..
हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात दिला होता हे देखील सर्वाना माहिती आहेच. हि थ्रेड सिरीज लिहिण्यामागचा हेतू एकूणच बेसिक स्ट्रक्चर हि संकल्पना काय आहे, याची पार्श्वभूमी काय होती, कोर्टात आणि कोर्टाबाहेर प्रकरण दर प्रकरण काय घडामोडी घडल्या..
केशवनांद भारती प्रकारनात नेमका निर्णय काय देण्यात आला आणि नंतरच्या काही प्रकरणात न्यायालयाने या संकल्पनेला भरीव स्वरूप कसे दिले ई. गोष्टीचा सविस्तर आढावा घेण्याचा आहे.
थोडक्यात 1951 ते 80 पर्यंतचा संसदेची, सुप्रीम कोर्टाची संविधानिक वाटचाल...!
उद्योगपती नवीन जिंदल यांनी 1993 साली त्यांच्या रायगड,म.प्रदेश येथील फॅक्टरी च्या आवारात राष्ट्रध्वज फडकवला होता. तिथल्या स्थानिक प्रशासनाने तुम्हाला अशाप्रकारे दररोज राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांना मनाई केली.
यावर नवीन जिंदल यांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केली कि राष्ट्रध्वज फडकवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि ध्वज संहिता हि घटनेच्या अनु.13 नुसार कायदा नाही त्यामुळे त्याद्वारे मूलभूत अधिकार नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. उच्च न्यायालयाने जिंदल यांना राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी
दिली.
यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. 2004 साली चीफ जस्टीस खरे यांच्या बेंचने याप्रकरणी निर्णय दिला.
न्यायालयाने निर्णयात सुरुवातीला राष्ट्रध्वजाचे महत्व अधोरेखित करताना म्हंटले आहे कि राष्ट्रध्वज हा देशाचे स्वातंत्र्य, आदर्श, आकांशा आणि यशाचं...
2018 साली झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्ष व बसपाच्या पाठिंब्यावर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. मार्च 2020 मधे काँग्रेसच्या...
22 सदस्यांनी पक्षविरोधी बंडखोरी करत आपापल्या आमदारकीचे राजीनामे दिले ज्यात 6 मंत्र्याचा देखील समावेश होता.
या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्पिकर महोदयांनी स्वीकारले. नंतर CM कमलनाथ यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी या सहा मंत्र्यांना मंत्रीपदावरून दूर केले.
मध्यप्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 16 मार्च पासून सुरू होणार होते. राज्यपालांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर सभागृहस उद्देशुन एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे भाषण होईल आणि त्यानन्तर लगेच फ्लोर टेस्ट घ्यावी अश्या सूचना केल्या.
साकीनाका येथील दुर्दैवी घटना घडल्यापासून तातडीने शक्ती कायदा करावा, तसा अध्यादेश काढावा अशी मागणी होते आहे.
अशी मागणी करण्यामागे भावना जरी नैतिक असल्या तरी लोकभावानेच्या भरात, सर्वंकष चर्चा-चिकित्सा न करता केलेल्या कायद्यामुळे पुढे न्यायालयात अडचणी निर्माण होतात...
असे दिसून आले आहे. या अनुषंगाने गेल्या वर्षी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट इथे विस्ताराने लिहीत आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन होता. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला फाशी किंवा जन्मठेपेची कठोर शिक्षा न होता तेव्हा लागू असलेल्या +
बाल हक्क कायद्यानुसार 3 वर्षे बालसुधारगृहात काढण्याची शिक्षा झाली होती. सामान्य लोकांच्या मनात या गोष्टीबद्दल प्रचंड राग होता आणि त्या आरोपी ला ही प्रौढ व्यक्तिप्रमाणे शिक्षा व्हावी अशी एकंदरीत भावना होती. घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य, लोकभावना लक्षात घेऊन सरकारने...
आपल्या देशाच्या संविधानात लोकप्रतिनिधींना म्हणजे संसद,विधानसभा सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. हे विशेषाधिकार वयक्तिक सदस्य आणि सभागृह दोघांनाही देण्यात आलेले आहेत. या विशेषाधिकारांना पार्लमेंट्री प्रिव्हिलेजेस्...
म्हटले जाते. पार्लमेंट्री प्रिव्हिलेज हि मूळ संकल्पना ब्रिटिश संसदेपासून उदयास आलेली आहे.
सभागृहाला व सदस्यांना त्यांचे काम कुठल्याही अडथळ्याशिवाय, दबाव-प्रभावशिवाय, निष्पक्षपणे करता येण्यासाठी तसेच सभागृह व सदस्यांची जनमानसातील प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी काही विशेषाधिकार..
व संरक्षण देणे हा पार्लमेंट्री तरतुदींचा उद्देश असतो. या तरतूदीचा उद्देश नैतिक असला तरी अनेकवेळा या विशेषाधिकारांचा गैरवापर झाल्याचे देखील बघावयास मिळते.
आपल्या घटनेत अनु.105(1) मधे तरतूद आहे कि सदस्यांना सभागृहात बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल.
97वी घटनादुरुस्ती, सहकारी संस्था आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय !
संविधानिक तरतुदींनुसार आपण आपल्या देशासाठी संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. यानुसार संविधानाच्या सातव्या परिशिष्ठामधे केंद्र म्हणजेच संसद व व राज्य विधिमंडळ यांच्यात कायदे करण्यासाठी...
विषयावर विभागणी करण्यात आलेली आहे. याला 'फिल्ड्स ऑफ लेजिस्लेशन' असे म्हणतात. सातव्या परिशिष्टात विषयांच्या तीन याद्या दिलेल्या आहेत. केंद्र म्हणजेच संसद ज्यावर कायदे करू शकते असे विषय केंद्र सूचित आहेत, राज्य ज्यांवर कायदे करू शकते असे विषय राज्य सूचीमधे आहेत आणि...
केंद्र व राज्य दोघे कायदे करू शकतील असे विषय समवर्ती सूची मधे आहेत. [समवर्ती सुचीतील विषयावर केंद्राने केलेला कायदा वरचढ असतो.]
संविधानाच्या अनुच्छेद 368 मधे संविधानात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. यातील अनुच्छेद 368(2)(c) या तरतूदी नुसार जर प्रस्तावित दुरुस्ती हि..