#थ्रेडसिरीज
संविधानाची मूलभूत संरचना
The Basic Structure !
भाग तीन - संसदेच्या अधिकारांवर मर्यादा !
19व्या शतकाच्या मध्यात गोलकनाथ चॅटर्जी हे ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेऊन बंगाल सोडून पंजाब मधे येऊन स्थायिक झाले होते. तिथे त्यांना स्कॉटिश मिशनरी ने रहायला थोडी जागा दिली होती.
कालांतराने त्यांची मुले हेंरी आणि विल्यम गोलकनाथ यांनी परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर तिथेच जवळपास पाचशे एकर जागा घेतली होती. पंजाब सरकारने Punjab Security of land tenures act,1953 अंतर्गत त्यातली सुमारे 420 एकर जागा सरप्लस लँड ठरवत ती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले.
गोलकनाथ यांच्या तर्फे या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यांनी Punjab land tenures act हा कायदा आणि 17व्या घटनादुरुस्तीने हा कायदा नवव्या परिशिष्टात समाविष्ट केल्यामुळे या घटनादुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेतला.
1967 साली या हे प्रकरण 11 न्यायधीशांच्या संविधान पीठासमोर आले जे कि त्याकाळापर्यंतचे सर्वोत मोठे खंडपीठ होते. सर्वोच्च न्यायालयात "बेसिक स्ट्रक्चर" शब्दांचा प्रथम उल्लेख करण्याचे श्रेय हे एम.के.नांबीयार यांचे.(सध्याचे अटर्नि जनरल वेणुगोपाल यांचे वडील).
त्यांनी जर्मन ज्युरिस्ट काँरॅड यांच्या रीसर्चपेपर आधारे ही कल्पना मांडली होती.
गोलकनाथ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 6:5 बहुमताने सज्जन सिंग आणि शँकरी प्रसाद हे निर्णय चुकीचे ठरवत संसदेला मूलभूत हक्क संकुचित किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार नाहीत असा निर्णय दिला आणि दुसरे टोक गाठले.
जस्टीस सुब्बा राव (सोबत जस्टीस शाह, शेलात, सिक्रि व वैद्यलिंगम) यांनी लिहिलेल्या निर्णयात म्हंटले आहे कि घटनेतील मूलभूत अधिकार हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे आदीकालापासूनचे अधिकार आहेत. हे अधिकार व्यक्तीला स्वतःच्या आवडीप्रमाणे जीवन जगण्याची मुभा देतात.
या मूलभूत अधिकारांमधे अल्पसंख्याक समुदाय तसेच मागासवर्गीय समुदायच्या अधिकारांचा देखील समावेश आहे. मूलभूत अधिकारांची जागा ही संसदेच्या आवाक्याबाहेर अतिशय अनन्यसाधारण अशी आहे. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे एकत्रितपणे एक संहिता आहे. यात ईतकी लवचिकता आहे कि सर्व..
मार्गदर्शक तत्वे हि मूलभूत अधिकारांचे हनन न करता अंमलात आणली जाऊ शकतात. अनु. 32 मधे मूलभूत अधिकरांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आणीबाणीच्या काळात देखील केवळ अनु.19 मधले आणि राष्ट्रपती घोषित करतील तेच अधिकार निरास्त होतात, इतर सर्व अधिकार हे तसेच शाबूत राहतात.
जर मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी हे संसदेचे कर्तव्य असेल तर त्याच बरोबरीने हे देखील सभागृहाचे कर्तव्य आहे कि या तत्वांची अंमलबजावणी हि मूलभूत अधिकारांना धक्का न लावता केली जावी.
संसदेच्या सामान्य कायदे करण्याच्या आणि घटनादुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती नाही.
घटनात्मक कायदा असो वैधानिक कायदा असो, दुरुस्ती कायदा हा केवळ अनु.13(2) मधल्या कायद्याद्वारेच केला जाऊ शकतो, अनु 13(2) मधून प्रथमदर्शनी तरी घटनात्मक कायदा वगळलेला नाही. अनु. 368 मधील दुरुस्तीची प्रक्रिया हि सामान्य कायदेप्रक्रियेस जुळणारी आहे.
अनु. 368 मधे घटनादुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया समाविष्ट नाही, इतर कायद्यांसाठी सभागृहाच्या नियमानुसार जी प्रक्रिया करावी लागते तशीच प्रक्रिया घटनादुरुस्ती कायद्याला देखील लागू होते. अनु 3 अन्वये संसदेला राज्यांच्या क्षेत्रात आणि सीमांत बदल करण्याचे अधिकार आहेत मात्र त्यासाठी
केलेला कायदा हा अनु.368 मधील घटनादुरुस्ती म्हणून गृहीत धरल्या जात नाही. यावरून असे दिसते कि घटनादुरुस्ती हा कायदाच आहे, केवळ अनु.368 मधे त्याला घटनादुरुस्ती म्हणून गृहीत धरल्या जाते. त्यामुळे घटनादुरुस्ती हि अनु.368 किंवा इतर अनूच्छेदद्वारे त्यासाठी असलेली सर्व प्रक्रिया..
पूर्ण करूनच केली जाऊ शकते आणि त्यासाठी केलेला कायदा हा अनु.13(2) अंतर्गत कायद्याच्या व्याख्येत सामाविष्ट असेल.
सतरावा घटनादुरुस्ती कायदा,1964 हा जिथपर्यंत मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतो तिथपर्यंत घटनाबाह्य आहे कारण मूलभूत अधिकार संकुचित करणे किंवा ते काढून घेणे हे संसदेच्या..
घटनादुरुस्ती अधिकाराच्या आवाक्याबाहेरचे आहे.
या घटनादुरुस्तीचा आणि पूर्वीच्या घटनादुरुस्तीचा इतिहास बघता आणि त्याचा देशाच्या सामाजिक आर्थिक कामकाजावर झालेला परिणाम बघता या घटनादुरुस्त्या अचानक काढून घेण्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इथे Prospective overruling संकल्पना लागू करणे गरजेचे आहे. (याचा अर्थ या निर्णयाचा भूतकाळात काही परिणाम होणार नाही मात्र भविष्यात या घटनादुरुस्ती घटनाबाह्य असतील). निर्णयाचा होणारा परिणाम बघता या सर्व घटनादुरुस्त्या वैध ठरवत भविष्यात संसदेला मूलभूत हक्क संकुचित करणारा..
किंवा काढून घेणारा कायदा करता येणार नाही असा निर्णय जस्टीस सुब्बा राव यांनी दिला.
जस्टीस हिदायतुल्ला यांनी म्हंटले कि मूलभूत हक्क हे सरकारच्या मर्जीवर अवलंबून नाहीत. अनु.12,32, 138, 131 आणि 226 इत्यादी अनुच्छेदाद्वारे ते सुरक्षित केले आहेत.
घटनादुरुस्ती शब्दाचा संकुचित अर्थ काढता येणार नाही. दुरुस्ती मधे नवीन तरतुदी समाविष्ट किंवा जुनी तरतुद डिलीट, मॉडिफाय केली जाऊ शकते मात्र घटनादुरुस्ती अधिकरांचा उपयोग प्रयोग करण्यासाठी किंवा घटनामत्मक बंधनांपासून पळवाट काढण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
अनु.13(2) हे स्टेटविरुद्ध नागरिकांना असेलेले संरक्षण आहे. स्टेट मधे सरकार, कायदेमंडळ, स्थानिक प्रशासन ई. गोष्टी येतात. स्टेट मधे यातली एक किंवा अनेक गोष्टी यांचा समावेश होतो. यातली एकही संस्था किंवा अनेक संस्था एकत्रितपणे या देखील मूलभूत हक्कांपेक्षा वरचढ नाहीत.
घटनेने ज्यांच्या मुलभूत हक्कांचे हनन झाले आहे त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा घटनात्मक अधिकार दिला आहे. जर मूलभूत हक्क काढून घेता येत असतील तर दाद मागण्याचा हक्क निरुपयोगी ठरेल.
मूलभूत हक्क मधे कसलेच बदल किंवा दुरुस्ती केली जाऊ शकत नाही असे नाही.
घटनेत मूलभूत हक्कांमधे कपात करण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. राज्यघटनेत मूलभूत हक्कांना नियंत्रित करण्याची संमती दिलेली आहे, त्यांना रद्द करण्याची नाही. सध्या असलेले कायदेमंडळ संविधान सभेसारखे मुळ घटनकार सभा (constituent Body) नाही तर घटनेद्वारे स्थापित सभागृह आहे ज्यांनी
राज्यघटनेप्रति खरी निष्ठा बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांच्या स्वातंत्र्यात मूलभूत बदल करणे म्हणजे संसदेच्या कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करने. घटनेने काही विषय हे घटनादुरुस्ती प्रक्रियेच्या बाहेर ठेवलेले आहेत.
जर मूलभूत हक्क संकुचित करायचे असतील तर अनु.368 मधे दुरुस्ती करून, शेषअधिकार अंतर्गत नवीन संविधानसभा गठीत करावी, नवीन सभा मूलभूत हक्क संकुचित करण्याबाबत किंवा रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकेल असे जस्टीस हिदायतूल्ला यांनी म्हंटले.
या निर्णयावर संसद सदस्यांकडून कठोर टिका करण्यात आली. समाजवादी नेते नाथ पै यांनी यानिर्णयाविरुद्ध संसदेला पूर्ण घटनेत दुरुस्ती करण्याची अधिकार असतील अशी तरतूद असणारे घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले होते. काँग्रेसने त्यावेळी या विधेयकला मूकसंमती दाखवली होती.
आतापर्यंत जमीनदार, कारखानदार यांचे हक्क विरुद्ध सामुदायिक हिताचे कार्यक्रम अशी असणारी हि लढाई गोलकनाथ निर्णयामुळे सरकार-संसद विरुद्ध न्यायपालिका अशी झाली आणि मुद्दा होता सुप्रीमसी चा....सरकार-संसद कि संविधान ?
क्रमशः....!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शंकरी प्रसाद केस मधे संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकरांना सर्वोच्च न्यायालयाने संमती दिल्यानंतर सरकारने घटनादुरुस्ती करण्याचा सपाटा लावला. 1964 साली सरकारने 17वी घटनादुरुस्ती केली..
शंकरी प्रसाद निर्णयात न्यायालयाने अनु.31A आणि 31B वैध ठरवुन संपत्ती अधिग्रहण कायद्याना संरक्षण दिले असले तरी वेगवेगळ्या राज्यांच्या नव्या कायद्याना उच्च न्यायालयात आव्हान मिळत होते. काही प्रकरणात न्यायालयाने राज्यांचे कायदे रद्द केले होते.
यावर उपाय म्हणुन संसदेने 17व्या घटनादुरुस्तीने अनु.31A मधे उपकलम समाविष्ट करून मार्केट रेट नुसार मोबदला देऊन सीलिंग अंतर्गत येणाऱ्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी कायदे करण्याची तरतूद करण्यात केली तसेच नवव्या परिशिष्टात राज्यांचे 44 कायदे समाविष्ट करून त्यांना संरक्षण दिले.
#थ्रेडसिरीज
संविधानाचा मूलभूत गाभा
The Basic Structure...!
भाग 1 - First Case First Amendment !
संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे मात्र संविधानाचा मूलभूत गाभा, बेसिक स्ट्रक्चर मधे बदल करण्याचा करण्याचा अधिकार नाही हे सर्वांनी अनेकवेळा वाचले ऐकले असेलच..
हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात दिला होता हे देखील सर्वाना माहिती आहेच. हि थ्रेड सिरीज लिहिण्यामागचा हेतू एकूणच बेसिक स्ट्रक्चर हि संकल्पना काय आहे, याची पार्श्वभूमी काय होती, कोर्टात आणि कोर्टाबाहेर प्रकरण दर प्रकरण काय घडामोडी घडल्या..
केशवनांद भारती प्रकारनात नेमका निर्णय काय देण्यात आला आणि नंतरच्या काही प्रकरणात न्यायालयाने या संकल्पनेला भरीव स्वरूप कसे दिले ई. गोष्टीचा सविस्तर आढावा घेण्याचा आहे.
थोडक्यात 1951 ते 80 पर्यंतचा संसदेची, सुप्रीम कोर्टाची संविधानिक वाटचाल...!
उद्योगपती नवीन जिंदल यांनी 1993 साली त्यांच्या रायगड,म.प्रदेश येथील फॅक्टरी च्या आवारात राष्ट्रध्वज फडकवला होता. तिथल्या स्थानिक प्रशासनाने तुम्हाला अशाप्रकारे दररोज राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांना मनाई केली.
यावर नवीन जिंदल यांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केली कि राष्ट्रध्वज फडकवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि ध्वज संहिता हि घटनेच्या अनु.13 नुसार कायदा नाही त्यामुळे त्याद्वारे मूलभूत अधिकार नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. उच्च न्यायालयाने जिंदल यांना राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी
दिली.
यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. 2004 साली चीफ जस्टीस खरे यांच्या बेंचने याप्रकरणी निर्णय दिला.
न्यायालयाने निर्णयात सुरुवातीला राष्ट्रध्वजाचे महत्व अधोरेखित करताना म्हंटले आहे कि राष्ट्रध्वज हा देशाचे स्वातंत्र्य, आदर्श, आकांशा आणि यशाचं...
2018 साली झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्ष व बसपाच्या पाठिंब्यावर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. मार्च 2020 मधे काँग्रेसच्या...
22 सदस्यांनी पक्षविरोधी बंडखोरी करत आपापल्या आमदारकीचे राजीनामे दिले ज्यात 6 मंत्र्याचा देखील समावेश होता.
या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्पिकर महोदयांनी स्वीकारले. नंतर CM कमलनाथ यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी या सहा मंत्र्यांना मंत्रीपदावरून दूर केले.
मध्यप्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 16 मार्च पासून सुरू होणार होते. राज्यपालांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर सभागृहस उद्देशुन एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे भाषण होईल आणि त्यानन्तर लगेच फ्लोर टेस्ट घ्यावी अश्या सूचना केल्या.
साकीनाका येथील दुर्दैवी घटना घडल्यापासून तातडीने शक्ती कायदा करावा, तसा अध्यादेश काढावा अशी मागणी होते आहे.
अशी मागणी करण्यामागे भावना जरी नैतिक असल्या तरी लोकभावानेच्या भरात, सर्वंकष चर्चा-चिकित्सा न करता केलेल्या कायद्यामुळे पुढे न्यायालयात अडचणी निर्माण होतात...
असे दिसून आले आहे. या अनुषंगाने गेल्या वर्षी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट इथे विस्ताराने लिहीत आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन होता. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला फाशी किंवा जन्मठेपेची कठोर शिक्षा न होता तेव्हा लागू असलेल्या +
बाल हक्क कायद्यानुसार 3 वर्षे बालसुधारगृहात काढण्याची शिक्षा झाली होती. सामान्य लोकांच्या मनात या गोष्टीबद्दल प्रचंड राग होता आणि त्या आरोपी ला ही प्रौढ व्यक्तिप्रमाणे शिक्षा व्हावी अशी एकंदरीत भावना होती. घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य, लोकभावना लक्षात घेऊन सरकारने...
आपल्या देशाच्या संविधानात लोकप्रतिनिधींना म्हणजे संसद,विधानसभा सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. हे विशेषाधिकार वयक्तिक सदस्य आणि सभागृह दोघांनाही देण्यात आलेले आहेत. या विशेषाधिकारांना पार्लमेंट्री प्रिव्हिलेजेस्...
म्हटले जाते. पार्लमेंट्री प्रिव्हिलेज हि मूळ संकल्पना ब्रिटिश संसदेपासून उदयास आलेली आहे.
सभागृहाला व सदस्यांना त्यांचे काम कुठल्याही अडथळ्याशिवाय, दबाव-प्रभावशिवाय, निष्पक्षपणे करता येण्यासाठी तसेच सभागृह व सदस्यांची जनमानसातील प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी काही विशेषाधिकार..
व संरक्षण देणे हा पार्लमेंट्री तरतुदींचा उद्देश असतो. या तरतूदीचा उद्देश नैतिक असला तरी अनेकवेळा या विशेषाधिकारांचा गैरवापर झाल्याचे देखील बघावयास मिळते.
आपल्या घटनेत अनु.105(1) मधे तरतूद आहे कि सदस्यांना सभागृहात बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल.