#थ्रेडसिरीज
संविधानाची मूलभूत संरचना
The Basic Structure !
भाग चार - केशवानंद भारती केस (I)
गोलकनाथ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संसदेला मूलभूत हक्क संकुचित किंवा त्यात बदल करता येत नाही असा निर्णय देऊन सरकारचे हात बांधले होते. यानंतर दोन महत्वाच्या प्रकरणात कोर्टाने..
सरकारची पाठ जमिनीला टेकवली.
बँकांच्या राष्ट्रीयकरणाची सुरुवात तशी 1949 साली झाली जेव्हा RBIचे राष्ट्रीयकरणं झाले होते. पूढे 1955 साली इम्पेरियल बँक नॅशनलाईज करून SBI स्थापन करण्यात आली. 1967 नंतर प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरणं करण्याच्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली.
इंदिराची PM झाल्या होत्या आणि सोशालिस्ट धोरण आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात झाली होती. बँक राष्ट्रीयकरणावरून इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यात मतभेद झाले. मोरारजी यांचे मत होते कि बँका कायद्याने नियंत्रित कराव्यात तर इंदिराजी राष्ट्रीयकरणाच्या बाजूने होत्या.
17 जुलै 1969ला मोररजीकडून अर्थमंत्री पद काढून घेण्यात आले. 18 जुलैला त्यांनी उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. 19 जुलैला अधिवेशनाच्या दोन दिवसआधी सरकारने 50 कोटी पेक्षा जास्त ठेवी असलेल्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी अध्यादेश काढला.
काळजीवाहू राष्ट्रपती V.V.गिरी यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करताच संध्याकाळी इंदिरा गांधींनी रेडिओवरून बँक राष्ट्रीयकरणाची घोषणा केली.
सेंट्रल बँकेचे डायरेक्टर RC कुपर यांनी नानी पालखीवाला यांच्याकरवी या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात..
आव्हान दिले.
अनु.31(2) मधे संपत्ती अधिग्रहित करण्यासाठी दोन अटी आहेत. एकतर ती सार्वजनिक उद्देशासाठी घेतली जावी आणि दुसरी त्याचा मोबदला(compensation) दिला जाईल.
बॅंकांना जो मोबदला सरकारणे ऑफर केला होता तो सरकार बँकसोबत करार करून ठरवेल अन्यथा एक ट्रायब्यूनल..
नेमले जाईल तिथे वाटाघाटी होऊन मोबदला ठरेल. हा मोबदला सरकारी प्रतिभूतीच्या स्वरूपात असेल जो 10 वर्षांनी Encash करता येईल.
सर्वोच्च न्यायालयाने 10:1 अशा बहुमताने बँक अधिग्रहण घटनाबाह्य ठरवले. बँकांना दिला जाणारा मोबदला अपुरा असल्यामुळे अनु.31(2) उल्लंघन आणि इतर बँकांच्या तुलनेत..
या 14 बँकांना भविष्यात बँकिंग व्यवसाय करण्यास बंदी हे अनु.14 मधील समानतेचे उल्लंघन असल्याचे कोर्टाने म्हंटले. एकमेव न्यायमूर्ती ज्यांनी बँकांचे राष्ट्रीयीयकरन वैध ठरवले ते म्हणजे जस्टीस AN रे !
नंतर सरकारने कोर्टाने दाखवलेल्या त्रुटी दूर करून मोबदला देण्याच्या नवीन तरतुदीसह..
नव्याने कायदा केला जो वैध ठरला.
बँक राष्ट्रीयकरणापाठोपाठ सरकारला दुसरा धक्का बसला प्रीव्ही पर्सेस केस मधे. देश स्वतंत्र्याच्या प्रक्रियेत जेव्हा संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले तेव्हा त्याबदल्यात संस्थानिकांना सरकारी तिजोरीतुन तनखे आणि काही सोयीसुविधा देण्याचे ठरले होते.
तशी घटनात्मक तरतूद अनु.291 आणि 362 मधे केली होती. संस्थानिकांना मिळणारे तनखे बंद करावेत अशी मागणी वारंवार होती राहिली. इंदिराजींच्या काळात संस्थानिकांचे आणि काँग्रेसचे संबंध बिघडले. 1967च्या निवडणुकीत राजकुमारांनी अनेक काँग्रेस उमेदवार पाडले.
जून 1967 मधे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या बैठकीत संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा ठराव करण्यात आला. सप्टेंबर मधे सरकारने घटनेतून अनु.291 आणि 362 रद्द करण्यासाठी 24वे घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले. हे विधेयक लोकसभेत पास झाले मात्र राज्यसभेत फेटाळण्यात आले.
अनु 366(22) मधे राष्ट्रपतीना संस्थांन च्या राजांना-वारसांना मान्यता देण्याचा अधिकार होता. सरकारने एक अध्यादेश काढला ज्यात राष्ट्रपतीनी अनु.366(22)अन्वये सगळ्या संस्थानिकांची मान्यता रद्द केली.
ग्वालीयर घराण्याच्या माधवराव सिंधिया यांनी या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान..
दिले. 6-5 अशा बहुमताने कोर्टाने राष्ट्रपतीचा आदेश घटनाबाह्य ठरवला, राष्ट्रपतीना 366(22) मधे राजांना किंवा वारसांना मान्यता देण्याचे अधिकार हे अनु.291, 362 मधल्या प्रीव्ही पर्सेसच्या घटनात्मक योजनेच्या अंमलबजावणी साठी याअर्थाने आहेत, सरसकट मान्यता रद्द करून प्रीव्ही पर्सेसची..
घटनात्मक योजना राष्ट्रपती रद्द करू शकत नाहीत असा निर्णय कोर्टने दिला. राष्ट्रपतींचा निर्णय वैध ठरवणाऱ्या पाच पैकी एक न्यायमूर्ती होते जस्टीस AN रे !
हा निर्णय इंदिरा गांधी यांच्या जिव्हारी लागला. 9 दिवसानंतर त्यांनी राष्ट्रपतीना लोकसभा विसर्जित करून निवडणूका घेण्याची शिफारस
केली. गरिबी हटाव घोषणेसह त्या निवडणुकीत गेल्या आणि 350 जागांच्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या.
आपल्या योजनांना जनसमर्थन मिळवल्यावर त्यांनी मार्गातील घटनात्मक,न्यायालयीन अडथळे दूर करण्यासाठी लागोपाठ घटनादुरुस्ती केल्या.
1971 साली 24वी घटनादुरुस्ती करण्यात आली. याद्वारे अनु.13 आणि 368 मधे दुरुस्ती करून संसदेला घटनेच्या कोणत्याही अनुच्छेदात दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला. (म्हणजेच गोलकनाथ निर्णय निष्प्रभ करण्यात आला)
25व्या घटनादुरुस्तीने अनु.31 मधे संपत्तीच्या बदल्यात मोबदला देताना
Compensation ऐवजी Amount हा शब्द समाविष्ट केला. त्यामुळे सरकारवर आता संपत्तीसाठी जशीच्या तशी रक्कम देण्याचे बंधन नव्हते. यासोबतच नवीन 31C अनुच्छेद समाविष्ट करण्यात आला. यात तरतुद होती की 39(b) & (c) मधील मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेला कायदा आणि तशी घोषणा असलेल्या
कायद्याला मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते म्हणून आव्हान देता येणार नाही.
26 व्या घटनादुरुस्तीने अनु.291 & 362 हटवून संस्थानिकांचे तनखे रद्द केले तर 29व्या घटनादुरुस्तीने केरळ लँड रिफॉर्मस् ऍक्ट 1970 हा कायदा नवव्या परिशिष्टात समाविष्ट केला.
हिज होलीनेस केशवानंद भारती श्रीपादगारुलू हे केरळ मधल्या एडनिर मठाचे मठाधिपती होते. केरळ सरकारने केरळ लँड रिफॉर्म ऍक्ट अंतर्गत मठाची जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाने हा कायदा घटनाबाह्य ठरवल्यानंतर सरकारने 29व्या घटनादुरुस्तीने तो नवव्या परिशिष्टात समाविष्ट केला.
केशवानंद भारती यांनी हा कायदा आणि 24, 25 व 29व्या घटनादुरुस्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.
पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने ह्या प्रकरणी गोलकनाथ निर्णयाचा पुनर्विचार गरजेचा असल्याचे म्हणत हे प्रकरण 13 सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले जे कि सर्वात मोठे खंडपीठ होते(अद्यापही आहे).
नानी पालखीवाला सुरुवातीला याप्रकरणात युक्तिवाद करण्यास उत्सुक नव्हते. त्यांनी याचिकाकर्त्यांना MC छागला यांचे नाव सुचवले होते. छागला यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन पुन्हा विनंती केल्यानंतर पालखीवाला तयार झाले. त्यांच्या सोबतीला सोली सोराबजी, DM पोपट, अनिल दिवाण, फली नरिमन..
अशी मोठी मंडळी होती.
सरकार कडून कोण युक्तिवाद करणार यावरून बराच वाद झाला. नामवंत ज्येष्ठ वकील HM सिरवई हे प्रथम मुख्य युक्तिवाद करण्याच्या अटीवर बाजू मांडण्यास तयार झाले तर अटर्नि जनरल नरीन डे यांनी AG घटनात्मक पद आहे त्यामुळे तेच प्रथम युक्तिवाद करतात म्हणून यास विरोध केला.
हा वाद इंदिराजींपर्यंत गेला. सरकारने सिरवई यांनी प्रथम युक्तिवाद करणे हा रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट केल्यावर डे यांनी माघार घेतली.
31 ऑक्टोबर 1972 ला 13 न्यायधीशांच्या घटनापीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरू झाली. पालखीवाला यांनी 31 दिवस युक्तिवाद केला.
पालखीवाला यांच्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे :-
- अनु.368 मधील घटनादुरुस्तीचा अर्थ संकुचित असाच बघितला पाहिजे, यात संसदेला घटनेची मूलभूत संरचना मोडण्याचा अधिकार नाही.
- मूलभूत संरचने उल्लंघन करण्याबाबत संसदेवर घटनेत अंतर्भूत असे बंधन आहे.
- जर 368 अंतर्गत अमर्याद दुरुस्तीचा अधिकार असेल तर संसद देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही रचना उध्वस्त करू शकते, न्यायपालिका बरखास्त करू शकते, सर्व मूलभूत अधिकार काढून घेऊ शकते.
- अनु.368 म्हणजे संविधानाची Death Wish या अर्थाने इंटरप्रिट केले जाऊ शकत नाही.
- अनु.31C मुळे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचे, संविधानाची सर्वोच्चता तत्वांचे पूर्ण उल्लंघन केले आहे.
- पालखीवाला यांनी त्यांच्या मते घटेनच्या मूलभूत संरचनेत समाविष्ट 12 मूल्यांची यादी कोर्टास् दिली होती.
सरकारतर्फे सिरवई यांनी 21 दिवस युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेल्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे :-
- 24वी घटनादुरुस्ती हि संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकाराबाबत गोलकनाथ निर्णयमुळे निर्माण झालेली संभ्रमाची परिस्थिती दूर करण्यासाठी आहे.
- उद्देशिका घटनेचा भाग असून त्यात संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकाराबाबत कोणतेही बंधन नाही.
- मूलभूत हक्क हे नैसर्गिक किंवा मानवी हक्क नाहीत ते सामाजिक हक्क आहेत. अश्या हक्कांमधे काळानुरूप बदल होत असतात, त्यामुळे ते घटनादुरुस्ती पासून अलिप्त नाहीत.
- घटनेच्या संरचनेतील मूलभूत मूल्ये जसे कि संसदीय लोकशाही, न्यायिक पुनर्विलोकन, धार्मिक हक्क ई. हे कायमस्वरूपी शाश्वत राहतील असे घटनाकारांचे मत नव्हते.
- अनु. 368 नुसार संसदेला मूलभूत हक्कांसकट घटनेच्या कोणत्याही अनुच्छेदात घटनादुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
68 दिवस प्रत्येक दिवशी साडेचार तास अशी या प्रकरणाची सुनावणी चालली.
23 मार्च 1973 ला न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला...
#थ्रेडसिरीज
संविधानाची मूलभूत संरचना
The Basic Structure !
भाग तीन - संसदेच्या अधिकारांवर मर्यादा !
19व्या शतकाच्या मध्यात गोलकनाथ चॅटर्जी हे ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेऊन बंगाल सोडून पंजाब मधे येऊन स्थायिक झाले होते. तिथे त्यांना स्कॉटिश मिशनरी ने रहायला थोडी जागा दिली होती.
कालांतराने त्यांची मुले हेंरी आणि विल्यम गोलकनाथ यांनी परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर तिथेच जवळपास पाचशे एकर जागा घेतली होती. पंजाब सरकारने Punjab Security of land tenures act,1953 अंतर्गत त्यातली सुमारे 420 एकर जागा सरप्लस लँड ठरवत ती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले.
गोलकनाथ यांच्या तर्फे या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यांनी Punjab land tenures act हा कायदा आणि 17व्या घटनादुरुस्तीने हा कायदा नवव्या परिशिष्टात समाविष्ट केल्यामुळे या घटनादुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेतला.
शंकरी प्रसाद केस मधे संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकरांना सर्वोच्च न्यायालयाने संमती दिल्यानंतर सरकारने घटनादुरुस्ती करण्याचा सपाटा लावला. 1964 साली सरकारने 17वी घटनादुरुस्ती केली..
शंकरी प्रसाद निर्णयात न्यायालयाने अनु.31A आणि 31B वैध ठरवुन संपत्ती अधिग्रहण कायद्याना संरक्षण दिले असले तरी वेगवेगळ्या राज्यांच्या नव्या कायद्याना उच्च न्यायालयात आव्हान मिळत होते. काही प्रकरणात न्यायालयाने राज्यांचे कायदे रद्द केले होते.
यावर उपाय म्हणुन संसदेने 17व्या घटनादुरुस्तीने अनु.31A मधे उपकलम समाविष्ट करून मार्केट रेट नुसार मोबदला देऊन सीलिंग अंतर्गत येणाऱ्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी कायदे करण्याची तरतूद करण्यात केली तसेच नवव्या परिशिष्टात राज्यांचे 44 कायदे समाविष्ट करून त्यांना संरक्षण दिले.
#थ्रेडसिरीज
संविधानाचा मूलभूत गाभा
The Basic Structure...!
भाग 1 - First Case First Amendment !
संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे मात्र संविधानाचा मूलभूत गाभा, बेसिक स्ट्रक्चर मधे बदल करण्याचा करण्याचा अधिकार नाही हे सर्वांनी अनेकवेळा वाचले ऐकले असेलच..
हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात दिला होता हे देखील सर्वाना माहिती आहेच. हि थ्रेड सिरीज लिहिण्यामागचा हेतू एकूणच बेसिक स्ट्रक्चर हि संकल्पना काय आहे, याची पार्श्वभूमी काय होती, कोर्टात आणि कोर्टाबाहेर प्रकरण दर प्रकरण काय घडामोडी घडल्या..
केशवनांद भारती प्रकारनात नेमका निर्णय काय देण्यात आला आणि नंतरच्या काही प्रकरणात न्यायालयाने या संकल्पनेला भरीव स्वरूप कसे दिले ई. गोष्टीचा सविस्तर आढावा घेण्याचा आहे.
थोडक्यात 1951 ते 80 पर्यंतचा संसदेची, सुप्रीम कोर्टाची संविधानिक वाटचाल...!
उद्योगपती नवीन जिंदल यांनी 1993 साली त्यांच्या रायगड,म.प्रदेश येथील फॅक्टरी च्या आवारात राष्ट्रध्वज फडकवला होता. तिथल्या स्थानिक प्रशासनाने तुम्हाला अशाप्रकारे दररोज राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांना मनाई केली.
यावर नवीन जिंदल यांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केली कि राष्ट्रध्वज फडकवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि ध्वज संहिता हि घटनेच्या अनु.13 नुसार कायदा नाही त्यामुळे त्याद्वारे मूलभूत अधिकार नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. उच्च न्यायालयाने जिंदल यांना राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी
दिली.
यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. 2004 साली चीफ जस्टीस खरे यांच्या बेंचने याप्रकरणी निर्णय दिला.
न्यायालयाने निर्णयात सुरुवातीला राष्ट्रध्वजाचे महत्व अधोरेखित करताना म्हंटले आहे कि राष्ट्रध्वज हा देशाचे स्वातंत्र्य, आदर्श, आकांशा आणि यशाचं...
2018 साली झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्ष व बसपाच्या पाठिंब्यावर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. मार्च 2020 मधे काँग्रेसच्या...
22 सदस्यांनी पक्षविरोधी बंडखोरी करत आपापल्या आमदारकीचे राजीनामे दिले ज्यात 6 मंत्र्याचा देखील समावेश होता.
या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्पिकर महोदयांनी स्वीकारले. नंतर CM कमलनाथ यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी या सहा मंत्र्यांना मंत्रीपदावरून दूर केले.
मध्यप्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 16 मार्च पासून सुरू होणार होते. राज्यपालांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर सभागृहस उद्देशुन एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे भाषण होईल आणि त्यानन्तर लगेच फ्लोर टेस्ट घ्यावी अश्या सूचना केल्या.
साकीनाका येथील दुर्दैवी घटना घडल्यापासून तातडीने शक्ती कायदा करावा, तसा अध्यादेश काढावा अशी मागणी होते आहे.
अशी मागणी करण्यामागे भावना जरी नैतिक असल्या तरी लोकभावानेच्या भरात, सर्वंकष चर्चा-चिकित्सा न करता केलेल्या कायद्यामुळे पुढे न्यायालयात अडचणी निर्माण होतात...
असे दिसून आले आहे. या अनुषंगाने गेल्या वर्षी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट इथे विस्ताराने लिहीत आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन होता. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला फाशी किंवा जन्मठेपेची कठोर शिक्षा न होता तेव्हा लागू असलेल्या +
बाल हक्क कायद्यानुसार 3 वर्षे बालसुधारगृहात काढण्याची शिक्षा झाली होती. सामान्य लोकांच्या मनात या गोष्टीबद्दल प्रचंड राग होता आणि त्या आरोपी ला ही प्रौढ व्यक्तिप्रमाणे शिक्षा व्हावी अशी एकंदरीत भावना होती. घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य, लोकभावना लक्षात घेऊन सरकारने...