पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर वृंदावन गृहरचना सोसायटीमध्ये अगदी डोंगराच्या बाजूला निसर्गाच्या कुशीत निवांत ठिकाणी लपलेला एक टुमदार बंगला आहे. त्या बंगल्याचं नाव आहे ‘सांख्य’. अध्यात्मातील सांख्य तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारे हे आगळेवेगळे नाव असणाऱ्या (१/११) #म#मराठी#रिम
या बंगल्याचे मालक कोणी साधुसंत वा बुवामहाराज नाहीत, तर ते आहेत अभिमानाने भारताची मान ताठ ठेवणारे, ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती करणारे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर!
विदर्भातल्या मूर्तिजापूर तालुक्यातलं मुरांबा गाव हे भटकरांचं मूळ गाव. वडील स्काउटचे संघटक तर आई मुख्याध्यापिका. (२/११)
आईची आईसुद्धा करंजगावाला. आजोबा सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते. थोरला भाऊ अविनाश आणि डॉ. विजय भटकर या दोघांचं शिक्षण झालं ते करंजगावला. विजय भटकर साडेसात वर्षांचे असताना तोंडी परीक्षा देऊन त्यांनी एकदम चौथीत प्रवेश मिळविला. (३/११)
मूर्तिजापूरला ते गाडगेमहाराजांच्या गोरक्षण शाळेत राहायचे. त्यामुळे त्यांच्यावर संस्कार झाले ते आईचे आणि त्याबरोबरच गाडगेमहाराजांचे! लहानपणी अविनाश आणि विजय या दोघा भावांनी घरीच एक छोटी प्रयोगशाळा सुरू केली. (४/११)
त्या प्रयोगशाळेतलं साहित्य मात्र हॉस्पिटलमध्ये वापरून वाया गेलेलं होतं. दिल्लीच्या आय.आय.टी.त असताना भटकरांनी प्रचंड कष्ट केले. वाचन, लिखाण केले. जीवशास्त्रापासून ते मूलभूत गणितापर्यंत वीस हजारांहून अधिक पुस्तकं त्यांनी वाचली. (५/११)
तिथेच डॉ. विक्रम साराभाईंशी त्यांची भेट झाली आणि त्यामुळे भारतात राहूनच संशोधन करण्याचा निर्णय विजय भटकरांनी घेतला. १९८८ मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्याचे नाकारले. तेव्हा आपणच महासंगणकाची निर्मिती का करू नये, असे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना वाटले.
(६/११)
डॉ. भटकरांचे नाव सुचविले गेले. राजीवजींनी त्यांना तीन प्रश्न विचारले. ‘‘आपण सुपर कॉम्प्युटर तयार करू शकाल का?’’ डॉ. भटकरांनी उत्तर दिले, ‘‘हो.’’
‘‘किती वेळ लागेल?’’. उत्तर होते, ‘‘एक संगणक आयात करण्यासाठी लागतो त्यापेक्षा कमी.’’ (७/११)
आणि किती पैसा लागेल? उत्तर होतं ‘‘एक सुपर कॉम्प्युटर आयात करण्यासाठी जेवढा लागेल त्यापेक्षा कितीतरी कमी.’’ भटकरांची उत्तरं राजीवजींना खूप भावली. मग जन्म झाला तो ‘परम ८०००’ या महासंगणकाचा आणि ‘सी-डॅक’’ या संस्थेचा! डॉ. विजय भटकर म्हणजे खरोखर अजब माणूस आहे. (८/११)
लग्नाबद्दलची त्यांची कल्पनाही वेगळी होती. स्वजातीय मुलगी नको आणि टिपिकल गृहिणी नको म्हणून त्यांनी वृत्तपत्रात एक अगदी फिलॉसॉफिकल जाहिरात दिली. नंतर त्यांना एक हजार पत्रं आली. त्यात ललिता आहुजा या १९ वर्षीय मुलीचं पत्र होतं. (९/११)
त्या पत्रातील निरागसता, भाबडेपणा, पारदर्शीपणा आणि या गोष्टी पाहिलेल्या-अनुभवलेल्या शास्त्रज्ञाशीच लग्न करण्याचा निश्चय हे सगळं विजय भटकरांना भावलं. पत्नीने केवळ नेसत्या वस्त्रानिशी गृहप्रवेश करावा असा विजयरावांचा हट्ट होता. शेवटी शंकराच्या मंदिरात वैदिक पद्धतीनं
(१०/११)
डॉ. भटकरांचं लग्न लागलं! माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण घरोघरी अल्पदरात मिळावं म्हणून डॉ. विजय भटकरांनी ‘एज्युकेशन टू होम’ (ई.टी.एच.) हा प्रकल्प सुरू केला. संगणक साक्षरतेच्याबाबतीत हा प्रकल्प आता मैलाचा दगड ठरू लागला आहे! (११/११)
तीन वर्षांपूर्वीची घटना...
साल २०१९ च्या उन्हाळ्यात दक्षिण कोरियामधील आणीबाणी क्रमांकावर (Emergency Number) एक फोन कॉल आला. हा फोन कॉल केला होता दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा. (१/२७) #म#मराठी#रिम
या विद्यार्थ्यांनी पोलिसांना एका गंभीर गुन्ह्याची माहिती दिली की; टेलिग्राम वर एक ग्रुप आहे, जो क्रूर सेक्स नेटवर्कींग चालवतो. हा ग्रुप १८ वर्षांखालील मुलींना व महिलांना अमानविय आणि विकृत सेक्स करण्यासाठी भाग पाडून त्याचे अश्लील चित्रफिती बनवून आॅनलाईन मानवी तस्करी (२/२७)
सारख्या घटनांना चालना देत होता. टेलिग्रामवरिल युजर्स कडून पैसे घेऊन हा ग्रुप त्यांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकत असे. पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावला आणि २३ मार्च २०२० साली पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख प्रसार माध्यमांद्वारे सार्वजनिक केली. (३/२७)
आपल्या भारतात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत बोललं जात नाही, किंबहुना लोक या गोष्टीला नगण्य समजतात. आपल्या देशात बाल लैंगिक शोषणाच्या घटना फार घडत नाहीत असा पांचट गैरसमज लोकं करून बसतात. (१/३३)
इंटरनेटचा वापर जितका चांगल्या कामांसाठी होतो त्याहूनही जास्त वाईट कामांसाठी होतो. आधी संगणक आणि आता मोबाईल यामुळे चाईल्ड पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण यांसारख्या घटना समाज माध्यमांद्वारे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. लहान मुलांचा वापर अश्लील दृश्यांसाठी करणं, (२/३३)
लहान मुलांना कामोत्तेजक गोष्टींसाठी प्रवृत्त करणं, बालवेश्या किंवा परदेशातील लोकांच्या वासना शमवण्यासाठी बालकांची विक्री अथवा तस्करी करणे हे प्रकार इतर देशांप्रमाणे भारताच्याही डोक्यावर दगडाप्रमाणे बसून आहेत. अलिकडे हे गुन्हे खूप वाढत चालले आहेत, असंच दिसून येतं. (३/३३)
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.
आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻
ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻
काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.
परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻 #म#रिम#मायबोली
रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्यांमधून, 👇🏻
कथांमधून चित्रपट निर्मिती होते. बर्याच चित्रपटांमध्ये कवींच्या कवितांचे गाण्यात रूपांतर होते.
मराठी भाषेची गोडी निर्माण होणे, ही गोष्टच कुठेतरी दुरावत चालली आहे. पुढच्या पिढीला मराठी भाषेतील साहित्य संपदा ही कळायलाच हवी. कारण भाषा ही फक्त व्यवहारापुरती मर्यादित नसते.