राईट्स इश्यू म्हणजे काय?
निधी उभारण्यासाठी कंपन्या राईट्स इश्यूचा वापर करतात. आता याला राईट्स असं का म्हणतात? तर ज्या लोकांकडे याच कंपनीचे शेअर्स आधीपासून आहेत त्यांना अजून शेअर्स घेण्याचा हक्क, राईट या माध्यमातून मिळतो. #म#मराठी#Suzlon
पण या शेअर होल्डर्सने ते शेअर्स विकत घेतलेच पाहिजेत अशी सक्ती नसते. शिवाय हे नवीन शेअर्स कंपनी सध्याच्या भावापेक्षा कमी किंमतीत देते. #म#मराठी
म्हणजे बेसिकली कंपनी तुम्हाला आणखी शेअर्स घ्या असे एक प्रकारे आवाहन करते. मग आता समजा तुम्हाला हे जास्तीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत तर ते कसे घेणार?
तर कंपनी यासाठी भविष्यातील एक तारीख निश्चित करते. #म#मराठी
आता सुझलॉनने काय केलंय? तर निधी उभारणीसाठी राईट्स इश्यू आणला आहे. यातून उभा राहिलेला पैसा ते डेट कमी करण्यासाठी वापरु शकतील.
प्रत्येक कंपनी याच हेतूने राईट्स इश्यू आणते असेही नाही. मागे रिलायन्स, एअरटेल यांनीसुद्धा राईट्स इश्यू आणला होता. #म#मराठी
आता राईट्स इश्यूमध्ये तुम्हाला किती शेअर्स विकत घेता येऊ शकतात? तर याच एक प्रमाण कंपनी ठरवते. उदा. तुमच्याकडे सुझलॉनचे १०० शेअर्स असतील तर तुम्हाला १० शेअर्स राईट्समधून विकत घेता येतील. हे फक्त उदाहरण आहे. #म#मराठी
समजा सुझलॉन आत्ता १० रुपयांवर ट्रेड करतोय तर राईट्समध्ये कंपनी तुम्हाला ७ रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स देते. म्हणजे ३०% डिस्काऊंटमध्ये.
आता तुम्हाला १० शेअर्स राईट्समध्ये मिळणार हे तर तुम्हाला कळले. पुढे काय? तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत. #म#मराठी
१. राईट्समध्ये मिळणारे सगळे १० शेअर्स विकत घेणे.
यात तुम्हाला नवे शेअर डिस्काउंटमध्ये मिळणार. पण त्याचवेळी हे लक्षात घ्या की राईट्स इश्यूची किंमत सध्याच्या मार्केटमधील भावापेक्षा कमी आहे. #म#मराठी
म्हणजे जेव्हा राईट्स इश्यू पूर्ण होईल तेव्हा शेअरची मार्केटमधील किंमत आत्ताच्या भावापेक्षा कमी असेल. म्हणजे तुमच्याकडे आत्ता जे शेअर्स आहेत त्याची किंमत कमी होईल. पण त्याचवेळी नव्याने खरेदी केलेले शेअर्स स्वस्तात मिळाले आणि त्याची किंमत राईट्स इश्यू नंतर जास्त असेल. #म#मराठी
सो तो प्रॉफिट असेल. एकुणात ऍव्हरेज होईल.
२. काहीच न करता बसून राहणे आणि १० शेअर्स विकत न घेणे.
तुमच्याकडे राईट्स इश्यूमधून शेअर्स विकत घ्यायला पैसे नाहीत. त्यामुळे तुम्ही काहीच न करता राईट्स एक्सपायर होऊ देता. #म#मराठी
३. तुमच्या वाट्याचे राईट्स इतर कुणालातरी विकणे. यासाठी कंपनीने तसा पर्याय देणे गरजेचे असते.तरच तुम्ही तुमचे राईट्स इतरांना विकू शकता. तशी सूचना तुम्हाला कंपनीकडून मिळते.
आता ज्यांना सुझलॉनकडून राईट्स इश्यू बाबत ईमेल आला आहे त्यांना काय करायचे हे कळेल. #म#मराठी
फक्त ईमेलमध्ये राईट्स विकत घेण्यासाठी पेमेंटची तारीख किती आहे ते पाहून त्याच्याआधी पेमेंट करा. राईट्स नको असतील तर काही करू नका.
भविष्यात तुमच्याकडे असलेल्या कंपनीने राईट्स इश्यू आणला तर काय करायचे हे तुम्हाला नक्की कळेल. #म#मराठी
शेअर मार्केटमधील मराठी लोकांसाठी पैसापाणी आणि चार्टीयन्स घेऊन आले आहेत 'महाराष्ट्रातला सर्वात मोठा वेबिनार'
या मेंटरशिप प्रोग्रॅमबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर आम्हाला मेसेज करा. wa.me/message/AFGSHH…
एके दिवशी एक साठीतला माणूस बँकेत आला. आतमध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसला. बराच वेळ तो बँकेत चाललेल्या कामाचे निरीक्षण करत होता. हा माणूस इतर लोकांसारखा कस्टमरच असेल असे वाटून बँकेचे कर्मचारी त्यांचे काम करत होते. #म#मराठी#icici
काही वेळाने तो माणूस उठला आणि ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला.त्याने ब्रँच मॅनेजरला आपली ओळख सांगितली,
"मी संदीप बक्षी."
एवढ्याने ब्रँच मॅनेजरने त्याला ओळखणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही.मग त्या माणसाने ब्रँच मॅनेजरला सांगितले की,
"मी संदीप बक्षी.आयसीआयसीआय बँकेचा सीईओ."
ते ऐकून ब्रँच मॅनेजरची धांदल उडाली. त्याने आधी बक्षी यांची माफी मागितली. बक्षी यांनी आपल्या मानपानाला दुय्यम दर्जा देत ब्रँच मॅनेजरबरोबर संवाद साधणे पसंत केले.
नव्वदच्या दशकात पुण्यात गोपाळ गाडगीळ नामक माणसाने स्वतःचा बंगला बांधला. या बंगल्यात रहायला गेल्यावर कपडे वाळत घालायला आपण नेहमी करतो तेच त्यांनी केले. दोऱ्या बांधून त्यावर कपडे वाळत टाकू लागले. #म#मराठी
पण त्यांची पत्नी आणि आई यांना उंचीवर असलेल्या या दोऱ्यांवर कपडे वाळत घालण्यासाठी काठीचा वापर करावा लागे. ते करत असताना कधीकधी वाळत घातलेल्या कपड्यांवर घड्या पडत. यावर उपाय म्हणून मेकॅनिकल इंजिनीयर असलेल्या गाडगीळ यांनी घरच्या घरीच एक पुली सिस्टीम तयार केली. #म#मराठी
ती वापरून कपडे वाळत घालण्याची दांडी/काठी/पाईप खाली घेता येत असे. त्यावर कपडे वाळत टाकणे आधीपेक्षा खूपच सोपे झाले. गाडगीळांच्या घरी केलेली ही युक्ती शेजारपाजाऱ्यांनी पाहिली. त्यांनी गोपाळ गाडगीळांना विनंती केली की आम्हाला पण हे बनवून दे. #म#मराठी
शाळेत असताना आपण सगळ्यांनीच नटराज आणि अप्सरा ब्रँडच्या पेन्सिल आणि खोडरबर वापरले आहेत. त्यावेळी नटराज थोडा स्वस्त आणि अप्सरा थोडा महाग ब्रँड असायचा. अजूनही तसेच आहे. या दोनपैकी अप्सरा हा भारीतला ब्रँड समजला जायचा. #म#मराठी
पण हे दोन्ही ब्रँड एकाच कंपनीचे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
होय, हिंदुस्थान पेन्सिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे दोन ब्रँड आहेत.
ही कंपनी १९५८ पासून या व्यवसायात असून आजघडीला भारतातील सर्वात मोठी पेन्सिल मॅन्युफॅक्चरर आहेत. #म#मराठी
कंपनी आपले प्रॉडक्टस ५० हून अधिक देशांमध्ये विकते. कंपनी प्रत्येक दिवशी ८५ लाख पेन्सिल्स, १७ लाख शार्पनर्स, २७ लाख खोडरबर, १० लाख पेन आणि ३ लाख पट्ट्या बनवते. ही सगळी प्रोसेस ऑटोमेटेड आहे. कंपनीचे स्वतःचे १२ मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट्स आहेत. #म#मराठी
आयटीसी ऍन्यूअल जनरल मिटिंग - काय महत्वाचे?
आयटीसची ऍन्यूअल जनरल मिटिंग बुधवारी २० जुलै २०२२ ला पार पडली. या मिटिंगमधील काही महत्वाच्या मुद्द्यांचा घेतलेला परामर्श.. #म#मराठी#ITC#itcagm
१. कंपनी लवकरच ५ नव्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज सुरु करणार आहे. यामध्ये ऍग्री, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग बिझनेसचा समावेश आहे.
२. आयटीसीने नव्याने लाँच झालेल्या एफएमसीजी बिझनेसेसवर ग्राहकांनी गेल्या वर्षात २४,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. #म#मराठी#ITC#itcagm
२०३० पर्यंत ह्या बिझनेसचे पोटेन्शियल ५ लाख कोटींचे असेल असा कंपनीला विश्वास आहे. गेल्या दोन वर्षात आयटीसीच्या या नव्या एफएमसीजी बिझनेसने २५% वाढ नोंदवली आहे. कंपनीचे प्रॉडक्टस ७० हून अधिक वेगवेगळ्या आउट्लेट्समधून विकले जातात. #म#मराठी#ITC#itcagm
गेले काही वर्षे पावसाळयात तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर बरेच लोक एकाच कंपनीचे रेनकोट, जॅकेट्स घातलेले दिसतात. दिनेश त्रिवेदी या माणसाने १९९५ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. #म#मराठी
ध्येय एकच होतं, पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या आऊटरवेअरमधली आघाडीची कंपनी बनायचं! आजघडीला रेनवेअरचे उत्पादन करणारी ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. नाव आहे एन झेड सिझनल वेअर. लक्षात नाही आलं ना? झील म्हटलं तर कदाचित लक्षात येईल. येस, ही तीच झील रेनकोट बनवणारी कंपनी आहे. #म#मराठी
कंपनीचे सर्वेसर्वा दिनेश त्रिवेदी यांनी १९८४ मध्ये मुंबईतील सँडहर्स्ट रोडला एका छोट्याश्या दुकानात आपली कारकीर्द सुरु केली. त्यांचा पहिला व्यवसाय होता गिफ्ट आर्टिकल्स आणि पॅकेजिंगचा. पुढे १९८८ मध्ये त्यांनी मदनपुरा येथे स्वतःची फॅक्टरी सुरु केली. #म#मराठी
आयपीएलमधून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या बीसीसीआयला टॅक्स मात्र शून्य!
आयपीएल, भारतातली सर्वाधिक लोकप्रिय लीग. दोन अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. #म#मराठी
खेळाडूंच्या लिलावाच्या रकमा, सामन्यांच्या प्रक्षेपणासाठीच्या रकमा याचे आकडे घाम फोडणारे असतात. हे आकडे दरसाल वाढतच चालले आहेत. बीसीसीआयसाठी आयपीएल ही एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. #म#मराठी
मात्र याच आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआय एक रुपयाही कर भरत नाही असे तुम्हाला सांगितले तर? होय हे खरे आहे. आयपीएल कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्याकरता लाएबल नाही. #म#मराठी