महत्त्व "व्यवहार पाठां" चे

ब्रिटनमध्ये काही वर्षांपूर्वी एका तीन-साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला

#म #मराठी #रिम Image
आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती.
जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोन कॉल मुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या.
प्रश्न हा नाही कि त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटर बरोबर बोलता कसे आले तर प्रश्न हा आहे कि त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असते हे कसे समजले? आणि ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?
या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात.....!!!
ब्रिटनमध्ये मुलं तीन वर्षाचे झाले कि त्याला शाळेत प्रवेश मिळतो, आई वडील दोन्ही नोकरीलाअसतील तर सहा तास रोज मुलं शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात ना ABCD शिकवतात ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे,
रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते.
फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही तर आपलय रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, इलेकट्रीशियन, क्लीनर किंवा
कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात.
असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते, त्या बालमनांना त्या दिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आई वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि
तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून अधिक अधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले. यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेक्यानिकपासून ते
शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टर पर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो.

आम्ही कुठेय....? हा प्रश्न आम्हाला पडतो का?
मुलांवर ओझे अपेक्षांचे :
गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा चर्चा करत राहिलोय पण या बालमानच्या मनावरील ओझ्याचे काय? फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? याला पालकपण जबाबदार नाहीत का? माझ्या मुलाला शाळेत गेले कि आकडे वाचायला
आणि लिहायला आलेच पाहिजेत, मुलाना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत, याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे, असा सगळा अट्टाहास का?
ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहरीत पोहले पाहिजे रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या वयात इतरांचे मुलं मुलांसारखे स्टेजवर नाचवत, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंग मध्ये गाणी म्हणायला लावतोय,
नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताचा इंग्लिशच्या क्लासला पण जबरदस्तीने बसवतोय. आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळया जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत.
आज पर्यावरणाचा उद्या चित्रकलेचा परवा कॉम्पुटरचा असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत. त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही. सात वर्षाचे मुलं सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय.
मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय. आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्वकाही शिकवतात का?
युरोप-अमेरिकेच्या सगळ्याचा मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते.
स्पर्धांची गरज आहे का?
मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का? गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? तो आई वडिलांबरोबर आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात मुलं इतर शाळेच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का?
आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे.
एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोंकाना विचारून खात्री करून घेतायत कि खरेच आज गृहपाठ नाही ना.
आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय?
खरेच या बालमानांना एव्हढ्याश्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? माझे मुलं सर्वच विषयात सर्वच खेळता सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा
या कोवळ्या बालमानांना जीवघेणी स्पर्धेत ढकलत आहेत. अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी नाहीतर भविष्यात फक्त पुस्तकाच्या पानावरच ऍम्बुलन्सचे चित्र पाहिलेल्या आणि घरात लॅपटॉपवर कोडिंगचा गृहपाठ करत बसलेल्या
चार-पाच वर्षाच्या एका कोवळ्या जिवाच्या अभागी मातेने घरातील चकचकीत फरसीवरून पाय घसरून जीव गमावलेला असेल.

🖋️ @thoratnd
डॉ. नानासाहेब थोरात
वरिष्ठ शास्त्रज्ञ
मेडिकल सायन्स डिव्हिजन
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

फोटो व लेख साभार : सकाळ वृत्तपत्र

#शिक्षणपद्धती
#मूल्यसंस्कार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with शुभांगी - मी मराठी ❤️

शुभांगी - मी मराठी ❤️ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShubhangiUmaria

Oct 11
अप्रतिम गीत संरचना... ❤️

सुटताना हात, विझताना वात
वाटे आता तो काळही परतून यावा
घडले जे सारे, ते उधाण वारे
फिरुनी पुन्हा तो नवासा डाव मांडावा
खोडून कालच्या खुणा
जगायचे आहे पुन्हा
अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मना

#काकण
#म #मराठी #रिम
पुसुनी आसावे आता
नवी लिहायची कथा
नवासा द्यायचाय अर्थ जीवना
तुझ्या सावलीत माझे क्षण क्षण
अन पूर्ण आज झाले काकण!

भेटीला आणी ती जुनी कहाणी
आठवू दोघे पुन्हा
लाटांची गाणी ती माझी निशाणी
जपली आहेस ना
बेरंग झालेले आयुष्य सारे
रंगवू थोडे जरा
पहाट सारली नि रातीही गेल्या
वाट पाहण्यात त्या
माझ्या जगातून आले मी परतून
जायचे आहे पुन्हा
प्रेमात हरले मी तुझे आयुष्य
आहे हा माझा गुन्हा

चल झाली वेळ
आटोपून खेळ
सोडून हात सारा प्रवास हा एकट्याचा
दिले शब्द शब्द जे जे
पुरे केले ते ते
आहे सुखात तरी हि मनात हि व्यथा का
खोडून कालच्या खुणा
जगायचे आहे पुन्हा
Read 4 tweets
Sep 25
#Threadकर

पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर वृंदावन गृहरचना सोसायटीमध्ये अगदी डोंगराच्या बाजूला निसर्गाच्या कुशीत निवांत ठिकाणी लपलेला एक टुमदार बंगला आहे. त्या बंगल्याचं नाव आहे ‘सांख्य’. अध्यात्मातील सांख्य तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारे हे आगळेवेगळे नाव असणाऱ्या (१/११)
#म #मराठी #रिम
या बंगल्याचे मालक कोणी साधुसंत वा बुवामहाराज नाहीत, तर ते आहेत अभिमानाने भारताची मान ताठ ठेवणारे, ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती करणारे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर!
विदर्भातल्या मूर्तिजापूर तालुक्यातलं मुरांबा गाव हे भटकरांचं मूळ गाव. वडील स्काउटचे संघटक तर आई मुख्याध्यापिका. (२/११)
आईची आईसुद्धा करंजगावाला. आजोबा सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते. थोरला भाऊ अविनाश आणि डॉ. विजय भटकर या दोघांचं शिक्षण झालं ते करंजगावला. विजय भटकर साडेसात वर्षांचे असताना तोंडी परीक्षा देऊन त्यांनी एकदम चौथीत प्रवेश मिळविला. (३/११)
Read 12 tweets
Jun 7, 2021
समाजमाध्यमं वापरताय तर सावधान!! 🛑

तीन वर्षांपूर्वीची घटना...
साल २०१९ च्या उन्हाळ्यात दक्षिण कोरियामधील आणीबाणी क्रमांकावर (Emergency Number) एक फोन कॉल आला. हा फोन कॉल केला होता दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा. (१/२७)
#म #मराठी #रिम
या विद्यार्थ्यांनी पोलिसांना एका गंभीर गुन्ह्याची माहिती दिली की; टेलिग्राम वर एक ग्रुप आहे, जो क्रूर सेक्स नेटवर्कींग चालवतो. हा ग्रुप १८ वर्षांखालील मुलींना व महिलांना अमानविय आणि विकृत सेक्स करण्यासाठी भाग पाडून त्याचे अश्लील चित्रफिती बनवून आॅनलाईन मानवी तस्करी (२/२७)
सारख्या घटनांना चालना देत होता. टेलिग्रामवरिल युजर्स कडून पैसे घेऊन हा ग्रुप त्यांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकत असे. पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावला आणि २३ मार्च २०२० साली पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख प्रसार माध्यमांद्वारे सार्वजनिक केली. (३/२७)
Read 29 tweets
May 22, 2021
चिमुरड्यांचा लैंगिक छळ थांबवा!!

आपल्या भारतात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत बोललं जात नाही, किंबहुना लोक या गोष्टीला नगण्य समजतात. आपल्या देशात बाल लैंगिक शोषणाच्या घटना फार घडत नाहीत असा पांचट गैरसमज लोकं करून बसतात. (१/३३) Image
इंटरनेटचा वापर जितका चांगल्या कामांसाठी होतो त्याहूनही जास्त वाईट कामांसाठी होतो. आधी संगणक आणि आता मोबाईल यामुळे चाईल्ड पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण यांसारख्या घटना समाज माध्यमांद्वारे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. लहान मुलांचा वापर अश्लील दृश्यांसाठी करणं, (२/३३)
लहान मुलांना कामोत्तेजक गोष्टींसाठी प्रवृत्त करणं, बालवेश्या किंवा परदेशातील लोकांच्या वासना शमवण्यासाठी बालकांची विक्री अथवा तस्करी करणे हे प्रकार इतर देशांप्रमाणे भारताच्याही डोक्यावर दगडाप्रमाणे बसून आहेत. अलिकडे हे गुन्हे खूप वाढत चालले आहेत, असंच दिसून येतं. (३/३३) Image
Read 34 tweets
May 6, 2021
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)

#म #मराठी #रिम
जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.

आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
आंतरजातीय विवाहाची सुरूवात आपल्याच बहिणीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडवून आणून लोकांना त्याकरिता प्रोत्साहित करणारा एकमेव राजा म्हणून राजर्षींकडे पाहीलं जातं.
(३/११)
Read 11 tweets
May 2, 2021
#जागतिक_हास्य_दिन

लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्‍याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻

#म #मराठी Image
ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻 Image
काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.

परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻 Image
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(