त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो. फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
पुरानंतर लगेचच गोकुळाष्टमी चा सण झाला. पुराच्या अस्वस्थ आणि घाणेरड्या वातावरणावर एका प्रकारचां उत्साह आणि आनंद स्वर झाला.लेझीम नाचून झाल्यावर हंड्या फोडणे हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला होता. हांड्या फोडून झाल्यानंतर दुपारी सर्व तरुण मंडळी तळ्यामध्ये पोहण्यासाठी शिरली.
हा दरवर्षीचा कार्यक्रम. रम्या देखील पाण्यामध्ये मनसोक्त डुंबला. बर्यापैकी पट्टीचा पोहणारा. त्याच्यापेक्षा वयाने मोठे मुलेदेखील त्याच्या पोहोण्यावर फिदा असायची.
मोठे तळे होते ते. साधारण पंचवीस ते तीस फूट सहज
यावेळच्या प्रचंड पावसामुळे तळे काठोकाठ भरलेले होते. बर्याच वर्षात उपसले नसल्यामुळे खाली गाळही भरपूर असावा. संपूर्ण तळ्यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे माणसे पोहायला उतरलेली. पाणी दहीहंडीच्या हळदीच्या रंगाचे झाले होते. परंतु ते जास्त काळ तसेच राहणार नव्हते कारण तळे खूप मोठे होते.
दुपारी चारच्या सुमारास रम्या पाण्यातून बाहेर आला. प्रचंड दमला होता तो आणि सकाळपासून भूकही लागली होती. आता घरी जाऊन गरम-गरम जेवण करून मस्त झोपावे हा विचार. घरी जाऊन त्याने आईने गरम करून दिलेल्या जेवणावर ताव मारला आणि शांतपणे गाढ झोपून गेला.
साधारण साडेसहा ते सातच्या सुमारास त्याला जाग आली. आता जरा बाहेर भटकून यावे म्हणून घराबाहेर पडला. एकटे पायी फिरणे त्याला पहिल्यापासून भरपूर आवडायचं. अंधार पडत आला होता व आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती. त्याला माहीत नव्हते कि बाहेर पडल्यावर आज त्याला अत्यंत विचित्रगोष्ट बघायला
मिळणार आहे.
पायी चालायला निघाल्या वरच त्याला विचित्र आणि फार घाणेरडे वाटत होते. खरातर दिवस खूप छान गेला होता. परंतु ते संध्याकाळचे मळभ. दाटून आलेले ढग. विचित्र वेळी झालेली झोप. या सर्वांमुळे आपल्याला असे वाटत असेल असे रम्याने स्वतःला समजावले.
त्याच्या घरापासून जवळपास सर्व शेती होते. काही शेते पडीक होती तेथे फक्त पावसाचे पाणी साठून असायचे. त्याला छोट्या तळ्याचे रूप आलेले असायचे आणि लहान मुले त्यात डुंबत बसलेली असायची. घरापासून पन्नास एक मीटर दूर गेल्यावर समोरील शेतांमध्ये त्याला भरपूर गर्दी दिसली.
बहुदा त्या शेतामध्ये साठलेल्या भरपूर पाण्यामध्ये लहान मुले डुंबत बसायची त्यांचेच काहीतरी करामत चालू असणार हे त्याने ताडले. परंतु आज इतकी गर्दी कशी व हा गोंधळ कसला हे त्यांना समजेना. काय झाले आहे या उत्सुकतेने तो घाईने त्या दिशेने गेला.
वाटेतच त्याला त्यांच्या घराजवळील टायरवाला भेटला.
रम्या त्याला काही विचारायच्या आतच तो गोंधळलेल्या थोडेसे घाबरलेल्या आवाजात म्हणाला "अरे लहान पोरगा बुडाला आहे तिकडे."
रम्याचा विश्वासच बसला नाही. तो अक्षरशः ओरडला "काय???"
" हो अरे, लई वंगाळ ."
पुढे काही ऐकण्यासाठी रम्या थांबला नाही आणि त्याने शेता कडे धाव घेतली.
गर्दीतून तो पुढे झाला. शेताचा बंध मोठा होता. खाली भरपूर शेवाळ वाढले असणार , गवत वाढले असणार याचा अंदाज त्याला आला.
आणि त्याची नजर पडली. एक सात आठ वर्षाचे मुल निष्प्राण तरंगत होते. ते बघून त्याला काही सुचेना. पहिल्यांदाच तो इतका प्रचंड आतून घाबरला होता . मेलेली माणसे किंवा अंतयात्रा या त्याच्या शाळे वरूनच स्मशानभूमीकडे जात असत परंतु तेव्हा त्याला कधी भीती वाटायची नाही.
पण आज हे समोर असे काहीतरी बघून मात्र त्याच्या घशाला कोरड पडली.
वातावरण अजून अत्यंत घाणेरडे आणि भकास वाटायला लागले. पोलीस आत्ताच आले होते ते पंचनामा करत होते. मुलाचा बाप तेथील दगडावर बसून विषण्णपणे तिकडे बघत होता. रम्याच्या ओळखीचा होता तो.
आता गाव लहान असल्यामुळे जवळपास सर्वजण एक मेकाला तोंडावरून तर ओळखतच असायचे.
त्यामध्ये देखील रम्या थोडासा पुढे झाला व त्याने त्या प्रेताकडे निरखून बघितले. आतून प्रचंड भीती वाटत होती तरीदेखील.
त्या पोराचे डोळे उघडे लालसर झालेले... पाय होताना वाकलेले असतात तसेच होते थोडेफार. दोन्ही हात बाजूला. तोंड उघडे. पायामध्ये गवताची वेल अडकलेली. ती मांडीपर्यंत.
रम्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. आतून अशी काही शिसारी आली की बास आता घरी जायचे इतकेच त्याला कळले.
अंधार पडत आला होता. अत्यंत ओंगळवाणे असे दृश्य बघून तो विषण्ण आणि घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचला.
सर्वत्र ही बातमी पसरली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सुट्टी होती. घरच्यांशी देखील हा विषय बोलताना रम्या मात्र शांतच होता.
त्याने कोणालाच सांगितले नाही की त्याने ते पाहिले आहे.
झोपायला सर्वजण दहा साडेदहा वाजता आडवे झाले. बाहेर जवळच कुठेतरी कुत्रे भेसूर रडत होते. त्याला पुराची रात्र आठवली. त्या रात्री देखील रम्याच्या अंगणा मधील एका छोट्याश्या देवळावरील पत्र्याच्या शेड वर कुत्रे बसले होते.
दिवसभर उपाशी असल्याने व खाली पूर्ण पाणी असल्यामुळे कुत्रे तेथेच अडकलेले होते. रात्रभर ते चार-पाच कुत्रे इतक्या भेसुर आवाजात रडत होते. फक्त तेथेच नाही तर सर्व गावांमध्ये कुठेना कुठेतरी असे अडकलेले कुत्रे संपूर्ण वातावरण विदीर्ण करतील अशा आवाजात रडत होते.
त्यावेळेला देखील त्या प्रकारचा आवाज ऐकून रम्या सुन्न झाला होता. आज संध्याकाळी अवेळी झोप झाल्यामुळे आणि त्यानंतर जे काही पाहिले होते त्यामुळे रम्याचा डोळा लागणे शक्य नव्हते. त्यात ते कुत्र्याचे अभद्र रडणे अजूनच विचित्र आठवणींना त्याच्या मनात आणत होते.
कधी नाही तो बाबांच्या जवळ घुसला होता झोपताना. डोळ्यासमोर येत होता सात आठ वर्षाचा मेलेला मुलगा. त्याच्या आजूबाजूचे हिरवट पाणी आणि ती अभद्र संध्याकाळ.
कशीबशी त्याला मध्यरात्री झोप लागली...
परंतु उद्या यापेक्षाही काहीतरी भयानक घडणार होते ..काय त्याची मात्र त्याला सुतराम कल्पना नव्हती....
तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग?
मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.
रुमी....
हा अनुवाद आहे माझ्या एका आवडत्या कवितेचा. अर्थात ती कविता देखील इंग्लिशमध्ये अनुवाद केलेली आहे पर्शियन लैंग्वेज मधून. इंग्लिश मध्ये ही कविता वाचताना खूप छान वाटते. मराठीतले भाषांतर तेवढे खास वाटत नाही. खालील आहे इंग्लिश भाषांतर पर्शियन भाषेतून केलेले. किंवा मला जमले नाही नीट.
प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता.
प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
हे तिन्ही प्रसंग स्वप्नातले आहेत.
आता तुम्ही या स्वप्नात कितीही निर्णय स्वतःच्या इच्छेनें घेतलेले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तरी खरंच तसे आहे का?
कारण स्वप्नात डोंगर, दरी, पायवाट, वाघ, जंगल ही प्रत्येक गोष्ट मनाने तयार केलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे 2020 मध्ये देखील देखील जंगलात जाण्याचे ठरवले. जंगलातला अनुभव हा वेगळाच असतो. परंतु त्या वर्षी जे काही बघितले ते मात्र अफाट आणि कल्पनेच्या बाहेर होते. लिहायचे म्हटले तर किती मोठे लिहावे लागेल याची कल्पना नाही.
बाकी जंगलांमध्ये आपल्याला गाड्या फिरवतात व ठराविक जागां पाशी जाऊन आपल्याला प्राणी दिसतात किंवा पक्षी दिसतात व त्याचा आनंद आपण घेत असतो व फोटो काढत असतो. परंतु चिपळूण जवळ कोकणातील ही जागा मात्र बाकी जंगल सफारी या कल्पनेच्या पूर्णपणे वेगळी व अत्यंत जबरदस्त आहे.
या ठिकाणी जाण्याचे आम्हाला अभिजीत (माझा भाऊ) ने सुचवले होते वर्षभरापूर्वीच. परंतु त्याचा विचार मात्र आम्ही आत्ता या वर्षी केला. जवळपास 40 एकर चे हे जंगल खाजगी मालकीचे आहे. निशिकांत तांबे म्हणजेच नंदू आणि तांबे परिवार यांनी हे जंगल अशा प्रकारे समृद्ध केले आहे की त्याला तोड नाही.
अमावस्येची भुताटकी
2010 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला मी अलिबाग मध्ये आरसीएफ थळ या कंपनीच्या एका कामासाठी अलिबागला राहत होतो. आरसीएफ कंपनीचेच गेस्ट हाऊस किहीम ला होते. तेथे मी आणि समिरन दत्ता म्हणून माझा ऑफिस मधील मित्र 3 महिने कामासाठी होतो.
शनिवार-रविवारच्या एका सुट्टीसाठी जुलै महिन्यात मी महाड ला आलो होतो. तेथून परत अलिबागला जाण्याकरता संध्याकाळची गाडी पकडली. जुलै महिन्यातला दिवस होते प्रचंड पाऊस होता. त्यामध्ये अमावस्येचा दिवस त्यामुळे पावसाचा जोर थोडा जास्तच होता.
एसटी महामंडळाची लाल गाडी थांबत थांबत साधारण पावणेबाराच्या सुमारास रात्री अलिबागच्या आधी एक कार्ले खिंड लागते तिथे आली. माझ्या गाडीचा ड्रायव्हर मला नेण्याकरता तिथेच येणार होता. मी कार्ले खिंडीच्या आधी एक तीठा आहे तिथे उतरलो.
एकाला स्वप्न पडले. त्याने ते मित्राला सांगितले. त्यावर मित्र म्हणाला "कायपण, असे स्वप्न पडूच शकत नाही, काहीही.. Prove कर तुझे स्वप्न."
आता तो काही स्वप्न मित्राला दाखवू शकत नाही. It's subjective experience.
देव नाहीच्चे आणि आहे तर दाखव म्हणणारे हे त्या मित्रासारखेच😂 #11pmWords