गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रिये बाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. या अनुषंगाने न्यायाधीशांच्या नियुक्ती बाबत संविधान सभेतील चर्चा, घटनात्मक तरतूदी...
नियुक्ती प्रक्रियेबाबतचे महत्वाचे निर्णय, सध्याची प्रचलित कॉलेजिअम म्हणजेच न्यायवृंद व्यवस्थेचा उगम, विद्यमान सरकारने तो बदलण्याचा केलेला प्रयत्न व त्यावरचा निर्णय आणि आवश्यक सुधारणा या सर्व बाबींचा सविस्तर आढावा या थ्रेड मालिकेतुन घेण्याचा प्रयत्न आहे....
न्यायपालिका हि संसद व प्रशासन यांच्यावर अंकुश ठेवण्याचे कार्य करत असते. हि संसदीय लोकशाहीतील चेक्स & बॅलन्स व्यवस्था आहे. यामुळे संसद-शासन व न्यायपालिका यांच्यात अधिकारांबद्दल जगभरात चढाओढ बघायला मिळते. न्यायाधीशांची नियुक्ती याच Power Tussle चा एक भाग आहे.
संविधानपूर्व काळात 1909 च्या कायद्यानुसार न्यायधीशांची नियुक्ती-बरखास्ती ब्रिटिश क्राऊन च्या मर्जीने होत असे. 1935 च्या कायद्याने नियुक्ती प्रक्रिया तशीच ठेवली पण पदावधी व बरखास्तीचे निकष निश्चित केले.
संविधान सभेत न्यायपालिका हि 'स्वतंत्र व सक्षम' असावी यावर एकमत होते.
न्यायधीशांच्या नियुक्ती बाबत संविधान सभेत तीन प्रस्ताव समोर आले होते. पहिला म्हणजे राष्ट्रपतीद्वारे सरन्यायाधीशांच्या संमतीने नियुक्ती, दुसरा राष्ट्रपती द्वारे लोकसभेच्या 2/3rd बहुमताने नियुक्ती आणि तिसरा राष्ट्रपती द्वारे राज्यसभेच्या बहुमताधारे नियुक्ती.
याबाबत बोलताना डॉ.आंबेडकर यांनी असे मत मांडले कि जगात दोन पद्धतीने जजेस नियुक्त केले जातात. ब्रिटन मध्ये किंग/क्वीन द्वारे हि नियुक्ती केली जाते तर USA मधे सिनेटच्या संमतीने हि नियुक्ती केली जाते. आपल्या देशात अद्याप ब्रिटन-USA प्रमाणे प्रगल्भता आली नसल्याने..
न्यायधीशांची नियुक्ती पूर्णपणे राष्ट्रपतींच्या अधीन असणे किंवा संसदेच्या संमतीने करणे हा संयुक्तिक मार्ग नाही. यामुळे प्राथमिक मसुद्यात मधला मार्ग निवडताना राष्ट्रपतीद्वारे याबाबतीत उपयुक्त सल्ला देऊ शकतील अशा व्यक्तीशी सल्लामसलत करून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
सरन्यायाधीशांच्या 'संमतीने' नियुक्तीचा प्रस्तावाबाबत ते म्हणाले कि सरन्यायाधीश हे अत्यंत तज्ञ व्यक्ती असले तरी एका सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्यातही काही त्रुटी असू शकतात. त्यामुळे त्यांना नियुक्ती बाबत Veto अधिकार देणे म्हणजे असे अधिकार देणे जे आपण राष्ट्रपती किंवा संसदेला
देऊ इच्छित नाही. त्यामुळे हि पध्दत देखील घातक ठरू शकते असे डॉ.आंबेडकरांचे मत होते.
घटनेच्या अनु.124 व 217 मधे राष्ट्रपती सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करून सुप्रीम कोर्ट व हायकोर्टातील न्यायधीशांची नियुक्ती करतील अशी तरतुद आहे. यातील सल्लामसलत (Consultation) या शब्दाचा अर्थ आणि
अंतिम निर्णय कुणाचा हे या वादाचे मूळ आहे.
चार महत्वाच्या प्रकरणांनी न्यायधीशांची नियुक्ती प्रक्रिया प्रभावित केलेली आहे. हि प्रकरणे जजेस केसेस फर्स्ट (1981), सेकंड (1993), थर्ड(1998) व NJAC केस (2015) म्हणून ओळखली जातात.
त्यापूर्वी 1973 साली समशेर सिंग हे प्रकरण कोर्टासमोर आले. यात कोर्टाने राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या अधिकाराबाबत महत्वाचे निरीक्षण नोंदवले. कोर्टाने म्हंटले कि राष्ट्रपती-राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असून सर्व प्रशासकीय निर्णय त्यांच्या नावे घेतले जातात. यात त्यांना विवेकाधिकार..
नसून त्यांनी मंत्रीपरिषदेच्या सल्ल्याने निर्णय घ्यायचा असतो. प्रॅक्टिकली राष्ट्रपती म्हणजेच मंत्री किंवा मंत्रीपरिषद आणि राष्ट्रपतीचे समाधान म्हणजेच मंत्रीपरिषदेचे समाधान. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हा संविधानाचा मूलभूत पाया आहे. सामान्यपणे सरन्यायाधीशांशी केलेली सल्लामसलत हि..
सरकारने स्वीकारली पाहिजे. अश्या संवेदनशील बाबींमधे अंतिम शब्द हा सरन्यायाधीशांचा असला पाहिजे.
1977 साली हायकोर्ट न्यायाधीशांच्या बदलीबाबत संकलचंद सेठ हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले. यात न्यायालयाने म्हंटले कि..
सुप्रीमकोर्टात नियुक्ती किंवा हायकोर्टात नियुक्ती-ट्रान्सफर याबाबत राष्ट्रपतीनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करणे अनिवार्य आहे. राष्ट्रपतीनी सरन्यायाधीशांना त्यांच्याकडील सर्व माहिती उपलब्ध करून देणे आणि सरन्यायाधीशांनी सर्व बाबींचा विचार करून योग्य सल्ला देणे हे दोघांचे कर्तव्य आहे
हि सल्लामसलत प्रक्रिया परिपूर्ण व प्रभावी असली पाहिजे, ती केवळ औपचारिक, अनुत्पादक नसावी. सामान्यपणे सरन्यायाधीशांचे मत स्वीकारले गेले पाहिजे. मात्र सरकारवर ते मत स्वीकारलेच पाहिजे असे कायदेशीर बंधन नाही. संयुक्तिक कारण असेल तर सरकार वेगळी भूमिका घेऊ शकते.
⚠️ First Judges Case ⚠️
मार्च 1981 मधे तत्कालीन कायदेमंत्री यांनी काही राज्यपालांना पत्र लिहून कळवले कि 'राज्यातील उच्च न्यायालयात 1/3rd न्यायाधीश हे राज्याबाहेरील असले पाहिजेत. अतिरिक्त न्यायाधीशांकडून त्यांना पर्मनंट न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी तीन राज्यांची नावे घेण्यात..
यावीत' अश्या स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या.
हे पत्र म्हणजे न्यायपालिकेच्या क्षेत्रात शासनाकडून थेट हस्तक्षेप असल्याचे म्हणत याविरोधात अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण हायकोर्ट न्यायाधीशांच्या ट्रान्सफरबाबत असले तरी...
यात सुप्रीम कोर्ट -हायकोर्ट जजेस च्या नियुक्ती संदर्भात अनेक मुद्दे कोर्टासमोर आले होते.
जस्टीस भगवती यांनी लिहिलेल्या निर्णयात म्हंटले कि, सुप्रीम कोर्टाप्रमाणेच हायकोर्टमधील न्यायाधीशांच्या नियुक्ती अनु.217 नुसार केंद्र सरकारद्वारे सरन्यायाधीश, राज्यपाल, व हायकोर्ट
मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्याने (Consultation) केली जाते. यामधे सरन्यायाधीश व हायकोर्ट मुख्य न्यायाधीश यांची भूमिका हि सल्लागाराची असून नियुक्ती करण्याचे exclusive अधिकार हे केंद्र सरकारच्या अधीन आहेत. केंद्र सरकारला यात मनमानी करण्यास मुभा नसुन घटनेत नमूद व्यक्तींचा..
सल्ला घेणे बंधनकारक आहे.
Consultation या शब्दांच्या अर्थाबाबत जस्टीस भगवती यांनी म्हंटले कि संकलचंद निर्णयानंतर हा मुद्दा अनिर्णित राहिलेला नाही. केंद्र सरकारने नियुक्ती करण्याबाबत किंवा न करण्याबाबत घटनेतील नमूद सर्व व्यक्तिंशी सल्लामसलत करणे बंधनकारक असून सर्वांचे मत विचारात
घेऊनच केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर सल्लागार व्यक्तींमधे मतभेद असतील तर कुणाचे मत ग्राहय धरायचे हा केंद्र सरकारचा निर्णय असेल. सरन्यायाधीश यांच्या मताला प्राधान्य देण्यात यावे हि मागणी मान्य केली जाऊ शकत नाही कारण याबतीत घटनेत सर्व घटनात्मक पदांना समान मह्त्व...
दिलेले आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्ती बाबत सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करणे अनिवार्य असले तरी केंद्र सरकारवर त्यांचे मत बंधनकारक नाही. नियुक्ती बाबतचा अधिकार हा अंतिमतः केंद्र सरकारचा असेल.
जस्टीस भगवती यांच्याप्रमाणेच या घटनापीठातील इतर न्यायधीशांनीही...
संकलचंद निर्णयाचा पुनरुच्चार केला. न्यायाधीशांची नियुक्ती हा प्रशासकीय निर्णय असतो. राष्ट्रपती हे प्रशासकीय प्रमुख असून मंत्रीपरिषदेच्या सल्ल्याने ते निर्णय घेत असतात. न्यायधीशांच्या नियुक्तीपूर्वी घटनेत नमूद सर्व व्यक्तींशी सल्लामसलत करणे अनिवार्य आहे.
या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट अशी भूमिका आहे. यात सरन्यायाधीशांच्या मताला प्राधान्य असले पाहिजे असे म्हंटले जाऊ शकत नाही. सरन्यायाधीश व हायकोर्ट मुख्य न्यायाधीश एखाद्या नावावर सहमत असतील तर सामान्यपणे राष्ट्रपतीनी त्याचा स्वीकार केला पाहिजे.
मात्र राष्ट्रपतींवर प्रत्येकवेळी असे करण्याचे बंधन नाही. घटनेत सल्लामसलत(Consultation) अपेक्षित आहे, समंती (Concurrunce) नाही.
निर्विवादपणे, न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अधिकार हा अंतिमतः राष्ट्रपतींचा असेल अश्या स्वरूपाचा निर्णय फर्स्ट जसेस केस मधे देण्यात आला.
सरन्यायाधीशांचे मत बंधनकारक नाही या निर्णयावर अनेकांकडून टिका करण्यात आली. ज्येष्ठ वकील सिरवाई यांनी हा निर्णय 'न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य उध्वस्त करणारा' आहे असे म्हंटले तर स्कॉलर उपेंद्र बक्षी यांनी हा निर्णय 'असंगत,निरर्थक व यात योग्य दृष्टीकोनाचा अभाव' असल्याचे म्हंटले.
Ironically, 1973ला सरन्यायाधीशांचा शब्द अंतिम असेल असा निर्णय देणाऱ्या घटनापीठात जस्टीस भगवती देखील होते. फर्स्ट जजेस केस मधे त्यांनी स्वतःच्याच पूर्वीच्या निर्णयाचा विचार केला नाही. जर तो निर्णय विचारात घेतला असता तर सेकंड जजेस केस ची गरजच पडली नसती......
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले. संविधान सभेतील चर्चेच्या काळापासून ते आजतागायत आपले संविधान इतर देशांच्या संविधानातुन 'उधार' घेतलेले किंवा 'कॉपी-पेस्ट वर्क' असल्याची टीका..
होत आली आहे. संविधान सभेत जेव्हा अशी टिका झाली तेव्हा त्यामागे संविधानावर पाश्चात्य प्रभाव व भारतीयत्वचा अभाव असल्याची भावना होती. अलीकडे अशी टीका हि घटनाकारांचे कार्य कमी लेखण्यासाठी, डॉ.आंबेडकरांबद्दल असलेल्या आकसापोटी केली जाते.
भारतीय संविधानात इतर देशांच्या संदर्भाचा आधार घेऊन अनेक तरतूदी समाविष्ट केल्या आहेत यात दुमत नाही. पण त्याला कॉपी-पेस्ट म्हणणे याला 'घटनात्मकता' हि संकल्पना न समजून घेता केलेली टिका म्हणता येईल.
संविधान म्हणजे थोडक्यात 'रुल बुक'. समाजव्यवस्थेचे किंवा शासनव्यवस्थेचे मूलभूत नियम.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीशांच्या नियुक्ती करणाऱ्या कॉलेजिअम व्यवस्थेबाबत सामान्य लोकांमधे नाराजी असल्याचे विधान करून मंत्री किरण रिजिजू यांनी कॉलेजीएम सिस्टीम बाबत चा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.
पुन्हा याबाबतीत न्यायिक सुधारणा करण्याबाबत कुजबुज सुरू झालेली आहे.
वास्तविक कॉलेजिअम व्यवस्था हि सर्वोत्तम व्यवस्था आहे असे खुद्द न्यायपालिकेचे देखील मत नसावे. अनेक माजी न्यायधीशांनी सुधारणेची गरज बोलून दाखवलेली आहे. यात सुधारणा व्हाव्यात हि सर्वसाधारण भावना आहे.
मात्र या सुधारणा करत असताना न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि स्वतंत्रता अबाधित राहणे अत्यंत महत्वाचे आहे !!
उपाययोजना पुढे न करता, समावेशक चर्चेसाठी पुढाकार न घेता केवळ आहे त्या
व्यवस्थेवर आक्षेप घेत राहणे यात सुधारणेचा कमी आणि कोर्टाला टार्गेट करण्याचा हेतू जास्त दिसतो.
नार्को टेस्ट, ब्रेनमॅपिंग ई. चाचण्या आणि अनुच्छेद 20(3) !
गुन्हेगारी तपास प्रक्रियेत माहिती मिळवण्यासाठी, पुरावे मिळवण्यासाठी केले जाणारे वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग हा कायम चर्चिला जाणारा विषय. आरोपी व्यक्तींकडून सत्य माहिती काढून घेण्यासाठी त्यांच्यावर..
नार्कोएनालिसिस, पॉलिग्राफी किंवा ब्रेन मॅपिंग सारख्या चाचण्या करणे हा त्याचाच एक भाग. या चाचण्यांची वैधता, उपयुक्तता हे हे मुद्दे भारतात देखील अनेकदा वादग्रस्त ठरलेले आहेत. महाराष्ट्तील तेलगी प्रकरण किंवा दिल्लीतील तलवार डबल मर्डर प्रकरण यात नार्को चाचणी हा विषय गाजला होता.
हाथरस प्रकरणात पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची नार्को चाचणी करण्यावरून देखील हा मुद्दा चर्चेत आला होता.
अश्या प्रकारच्या चाचण्यांची घटनात्मक वैधता, आरोपी व्यक्तींचे हक्क, यातील माहितीची उपयुक्तता ई. सर्व गोष्टींचा विचार सुप्रीम कोर्टाने सेलवी वि. कर्नाटक सरकार या प्रकरणात केला आहे.
2013 पासून PewDiePie हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइबर काऊंट नुसार जगात एक नंबर होते. भारतीय चॅनेल टीसिरीज हे हळूहळू करत दोन नंबरवर पोहोचले आणि सुरू झाली या दोन चॅनेलमधे नंबर वन ची स्पर्धा.
अल्पकाळातच या स्पर्धेने राष्ट्रीय स्वरूप धारण केले आणि भारतीय चॅनेल जगात एक नंबर बनवण्यासाठी भारतीय नेटकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला. या देशकार्यात टिसिरीज सबस्क्राइब करून हातभार लावला. परिणामी भारतीय चॅनेल टिसिरीज नंबर वन झाले आणि आजही आहे.
गौतम भाई अदानी मोठ्या मेहनतीने थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने जागतिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांच्यापुढे आहे अमेरिकन एलोन मस्क. या एलोन चे चाहते भारतात जरी असले तरी इथे मुद्दा देशाचा आहे.
चीफ जस्टीस AN रे यांच्या कार्यकाळात रिव्ह्यू याचिकेच्या माध्यमातून केशवनांद प्रकरणातील निर्णय बदलण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. 1976 साली सरकारने त्या निर्णयाचा अडथळा दूर...
करण्यासाठी घटनादुरुस्तीचा मार्ग निवडला आणि सर्वात वादग्रस्त अशी 42वी घटनादुरुस्ती केली. 42व्या घटनादुरुस्तीने घटनेत ईतके बदल केले होते कि तीला 'मिनी कॉन्स्टिट्युशन' म्हणुन ओळखले जाते. अर्थात यातील अनेक बदल सरकारला निरंकुश अधिकार मिळवून देण्यासाठी होते.
मिनर्वा मिल्स प्रकरण हे 42व्या घटनादुरुस्तीने अनु.368 आणि 31C मधे केलेल्या दुरुस्तीशी संबंधित आहे.
मिनर्वा मिल्स हि कर्नाटक मधील एक कापड गिरणी होती. 1971 साली सरकारने टेक्स्टाईल अंडरटेकिंग ऍक्ट नुसार गैरकारभाराचा ठपका ठेवत या कंपनीचे राष्ट्रीयकरण केले. 39व्या घटनादुरुस्तीने..
#थ्रेडसिरीज
संविधानाची मूलभूत संरचना
The Basic Structure !
भाग चार - केशवानंद भारती केस (I)
गोलकनाथ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संसदेला मूलभूत हक्क संकुचित किंवा त्यात बदल करता येत नाही असा निर्णय देऊन सरकारचे हात बांधले होते. यानंतर दोन महत्वाच्या प्रकरणात कोर्टाने..
सरकारची पाठ जमिनीला टेकवली.
बँकांच्या राष्ट्रीयकरणाची सुरुवात तशी 1949 साली झाली जेव्हा RBIचे राष्ट्रीयकरणं झाले होते. पूढे 1955 साली इम्पेरियल बँक नॅशनलाईज करून SBI स्थापन करण्यात आली. 1967 नंतर प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरणं करण्याच्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली.
इंदिराची PM झाल्या होत्या आणि सोशालिस्ट धोरण आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात झाली होती. बँक राष्ट्रीयकरणावरून इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यात मतभेद झाले. मोरारजी यांचे मत होते कि बँका कायद्याने नियंत्रित कराव्यात तर इंदिराजी राष्ट्रीयकरणाच्या बाजूने होत्या.