तुमच्याकडे नसलेला शेअर तुम्ही आधीच विकता.कारण तुमचा अंदाज तो शेअर खाली येईल असा असतो.आणि त्यानुसार किंमत घसरल्यावर तुम्ही शेअर खरेदी करता आणि व्यवहार पूर्ण होतो.
👇🏽
हे झालं कॅश मार्केटबद्दल,इथे अशी शॉर्ट पोझिशन फक्त एक दिवसीय व्यवहारासाठी घेता येते.म्हणजेच दिवसाखेरपर्यंत व्यवहार पूर्ण करावा लागतो.
पण ओव्हरनाईट म्हणजे अनेक दिवसांच्या,महिन्यांच्या किंवा
अगदी दीर्घ कालावधीसाठी अशी शॉर्ट पोझिशन डेरीव्हीटीव्ज म्हणजेच एफएंडओद्वारे घेता येते.
👇🏽
पण मग अमेरिकास्थित असलेली अन् भारतातील भांडवली बाजारात सक्रिय नसलेल्या हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन कशी बनवली ?
तर याच उत्तर आहे, अदानी समूहाच्या अमेरिकेत सूचीबद्ध असलेले रोखे (बॉण्ड्स) व नॉनइंडियन डेरीव्हीटीव्ज उत्पादनांद्वारे हिंडेनबर्गने हे केलंय.
खरं तर हा विषय सखोलरित्या समजून घेण्यासारखा आहे पण इथे आम्ही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
"आम्ही आमचा अहवाल प्रसिद्ध केल्यापासून पुढील 36 तासांत, अदानी आम्ही उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर बोलले नाहीत. आमच्या अहवालाच्या अखेरीस, 👇🏽 1/6 #Thread
आम्ही 88 सरळ प्रश्न विचारलेत ज्याद्वारे कंपनीला आपले म्हणणे पारदर्शकतेने मांडण्याची संधी होती.
पण आतापर्यंत अदानींकडून यापैकी एकाही प्रश्नाचे निराकारण करण्यात आलेले नाही. त्याऐवजी, अपेक्षेप्रमाणे, अदानींनी बढाया आणि धमक्यांचा अवलंब केला.
👇🏽
106 पृष्ठांच्या, 32,000 शब्दांच्या आणि 720 हून अधिक उदाहरणांसह दाखले देणारा आमचा अहवाल ज्याला पूर्ण करण्यास 2 वर्षांचा कालावधी लागला त्याची संभावना माध्यमांशी बोलताना अदांनींकडून "असंशोधित" अहवाल अशी आजच्या करण्यात आली,👇🏽
तुम्ही कधी स्वताला 'पोस्ट-डेटेड चेक' दिलाय ? तो सुद्धा काही वर्षे पुढील तारखेचा ?
आज आपण एका अशाच व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने आयुष्यातील एका संघर्षाच्या टप्प्यावर स्वतःला असाच पोस्ट-डेटेड चेक दिला होता, तो सुद्धा तब्बल दहा मिलियन म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा.
👇 #Thread#म
हि गोष्ट आहे एका ख्यातनाम कलाकाराची जो आज हॉलीवूडमध्ये आघाडीचा अन् गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.
पण एक काळ होता जेव्हा केवळ एक धडपड्या कलाकार अशी ओळख असणारा तो स्वतःला सिद्ध करू शकेल अशा एका संधीच्या शोधात होता.
त्या तरुणाचे स्वप्न होते उत्तम कॉमेडियन आणि अभिनेता होण्याचे.
👇
अनेक अडथळे आणि संघर्ष नशिबी येऊनही त्याने आपले स्वप्न कधीच सोडून दिलं नाही.
उमेदवारीच्या काळात अशाच एके दिवशी, काहीतरी अचानक मनात आल्यासारखं त्याने आपल्या बँक खात्याचा चेकबुक शोधला, जवळच पेनाने त्यावर स्वतःच्या नावे $10 दशलक्ष म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा चेक लिहिला, पण..👇
यूपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे?
तूमचे पैसे परत मिळविण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता.
🔸जर तुम्ही GPay, PhonePe, Paytm सारख्या #UPI एपद्वारे हस्तांतरण व्यवहार केला असेल तर सर्वप्रथम त्या एपच्या ग्राहकसेवेशी संपर्क करून मदत मागू शकता. #म
👇🏽
🔸त्याच दरम्यान तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनशी सुद्धा संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
याआधी तुमच्या फोनवर त्या चुकीच्या व्यवहाराद्वारे पैसे खात्यातून वजा झाल्याचा तुम्हाला बँकेकडून आलेला मेसेज जपून ठेवा. या मेसेजमधील तपशील रकमेच्या परताव्यासाठी आवश्यक ठरतात.
👇🏽
🔸रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्यास, तुम्ही 👉🏻 bankingombudsman.rbi.org.in
या बँकिंग लोकायुक्त संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तक्रार करू शकता.
👇🏽
भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया ( e₹ ) ची किरकोळ वापरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरवात केली आहे.
या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (#CBDC) असे नाव देण्यात आले आहे.
थोडक्यात पाहूया नक्की काय आणि कसा आहे डिजिटल रुपया.
उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ?
बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ?
अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ?
या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो.
👇
#शेअरमार्केट मध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेल्यांसाठी वर सांगितलेलं नवीन नाही.
पण यातीलही अनेकजण किंवा बाजारात सुरुवात करू पाहणाऱ्यांचा याबाबत गोंधळ उडतो.
म्हणजे जगातील हे बाजार किती वाजता सुरु होतात?
त्यांच्या वेळा काय ?
महत्वाचे निर्देशांक कोणते ?