जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडल्याच्या बातमीमुळे भारतीयांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या साठ्यांमधून प्रत्यक्षात #Lithium प्रॉडक्शन सुरू होण्यासाठी किती काळ लागू शकेल? हे लिथियमचे मायनिंग धोकादायक असू शकते का?याबाबत थोडीशी माहिती #Thread#म#मराठी 1/n
कुठल्याही मायनिंग प्रक्रियेमुळे सामाजिक,भौगोलिक, नैसर्गिक आणि परिसरातील नागरिकांवर शारिरीक परिणाम होतात. लिथियमच्या या मायनिंगमुळे सॉईल डिग्रेडेशन, पाण्याचे शॉर्टेज, परिसरातील बायोडायव्हर्सिटीवर आणि सबंध इकोसिस्टीमवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. #LithiumInIndia#मराठी
2/n
याशिवाय लिथियमच्या प्रॉडक्शनसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागते. उदाहरण द्यायचे झाले तर एक टन लिथियम बनवण्यासाठी जवळपास 22 लाख लिटर पाणी आणि 300 किलोवॉट अवर विजेची गरज असते. ही वीज पारंपारिक स्त्रोतांपासूनच बनवलेली असल्यामुळे डाय-ऑक्साइड उत्सर्जित होते. #Thread#मराठी
3/n
5 किलोवॉट अवरची(kWh) बॅटरी बनवण्यासाठी - 500 ग्रॅम लिथियम, 1500 किलोवॉट अवर #energy आणि 30000 लिटर पाणी लागते. म्हणजेच 5 किलोवॉट अवर बॅटरी साधारणपणे चार माणसांच्या कुटुंबासाठी लागणारी 15 महिन्यांची वीज आणि 50 दिवसांचे पाणी वापरते. #Thread#म#मराठी
4/n
त्यामुळे जम्मू काश्मीरमधील लिथियमच्या साठ्यामधून लिथियमचे मायनिंग करणे ही मोठी आव्हानात्मक बाब असणार आहे. त्यासाठी जोपर्यंत एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि सस्टेनेबल सोल्युशन सापडत नाही तोपर्यंत तरी या गोष्टीबाबत फार काही बोलणे उचित ठरणार नाही. #Thread#म#मराठी#lithiuminjammu
5/n
पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
'मन' आणि 'नियमांत' ट्रेडरचा मित्र 'नियम' असले पाहिजेत. थ्रेड...
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये लॉस करतो व परत सायंकाळी ते रिकव्हर करतो, तेव्हा तो १०० टक्के आनंदी होतो. टेक्नीकली त्याने त्या दिवशी शुन्य रुपये कमावलेले असतात. #म#मराठी#Thread
1/n
जेव्हा एखादा ट्रेडर सकाळी १ लाख रुपये प्रॉफिट कमावतो व त्याच दुपारी १ लाख रुपये लॉस करतो तेव्हा मात्र तो २५० टक्के दु:खी होतो. टेक्नीकली त्याने या दिवशीही शुन्य रुपये कमावलेले असतात. #म#मराठी#Thread
2/n
थोडक्यात काय तर प्रॉफिट व लॉस जरी सेम असला तरी माणूस प्रॉफिटच्या वेळी जेवढा आनंदी होतो, त्याच्या कित्येक पट जास्त दु:खी तो लॉस झाल्यावर होतो. #म#मराठी#Thread
3/n
ट्रेडिंग करत असताना बऱ्याच वेळा रिस्क रिवॉर्ड रेशो ही टर्म आपल्या कानावर पडते. आपण ट्रेड घेताना किती रिस्क घेतोय आणि ती रिस्क घेतल्यावर त्यावर आपल्याला मिळणारा रिवॉर्ड किती आहे? याचा हा रेशो असतो. या रेशोबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा थ्रेड.#Thread#म#मराठी@in_tradingview
1/n
सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ असतो तेव्हा तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक एक रुपयाच्या रिस्कवर तुम्हाला दोन रुपये रिवॉर्ड मिळू शकतो. हाच रेशो १:५ असेल तर तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक एक रुपया रिस्कवर तुम्हाला पाच रुपये रिवॉर्ड मिळू शकतो. #म#मराठी
2/n
बऱ्याच नवीन ट्रेडर्सला तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कमीत कमी १:२ असला पाहिजे असे सांगितले जाते. पण यामध्ये खरोखर तथ्य आहे का? हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. #Thread#म#मराठी#RiskManagement
3/n
#IPO : सीलमॅटिक इंडिया (Sealmatic India Limited) या कंपनीचा IPO १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सब्स्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. BSE च्या डेटानुसार काल पहिल्याच दिवशी हा IPO जवळपास ४५ टक्के सबस्क्राईब झाला आहे. या IPO ची इशू साईझ ५६.२४ कोटी रुपये इतकी आहे. #म#मराठी#Thread 1/n
IPO चा प्राईज बँड २२०-२२५ रुपये प्रति शेअर इतका आहे. सब्स्क्रिप्शनसाठी कंपनीने ६०० शेअर्सचा लॉट निश्चित केला आहे. त्यामुळे एका लॉटची किंमत जवळपास १,३५,००० रुपये इतकी असणार आहे. यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर फक्त एकाच लॉटसाठी बोली लावू शकतात. #म#मराठी#Thread#IPO
2/n
#IPO मधील २५ लाख शेअर्सपैकी १८.५ लाख फ्रेश इशू आहेत तर ६.५ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल(OFS) आहेत. यातील ४० टक्के शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स, १८ टक्के शेअर्स नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स तर ४२ टक्के शेअर्स रिटेल इन्वेस्टर्ससाठी राखीव आहेत. #म#मराठी#Thread
3/n
#important: आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर व डेव्हलपर्स कंपनीचा स्टॉक्स स्प्लिट होणार आहे. या स्टॉक्सची स्प्लिट रेकॉर्ड डेट २२ फेब्रुवारी आहे. कंपनी इंजीनिअरिंग व कंस्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम करते. #IRB#Thread#म#मराठी
1/n
शेअर होल्डरने स्टॉक्स स्प्लिटला पोस्टल बॅलेटने ९९.९९ टक्केंच्या आवाजी मतादानाने मंजूरी दिली. याबद्दल कंपनीने स्टॉक्स एक्सचेंजला ६ फेब्रुवारी रोजी माहिती दिली होती. हा स्टॉक १०:१ असा स्प्लिट होणार आहे. #IRB#Thread#म#मराठी
2/n
१०:१ या स्टॉक स्प्लिट रेशोप्रमाणे कंपनीच्या प्रत्येक शेअर होल्डरला प्रत्येकी एका शेअर मागे १० शेअर मिळणार आहेत. शेअरची फेस व्हॅल्यू देखील यामुळे १० वरुन १ रुपयांवर येणार आहे. #IRB#Thread#म#मराठी
3/n
ईएलएसएस म्युच्यूअल फंडाचा लॉकइन पिरीयड कसा काम करतो?
म्युच्यूअल फंडामध्ये गुंतवणूक करणे आता तितकेसे नवीन नाही. मात्र अनेकांना म्युच्यूअल फंडाचा लॉकइन पिरीयड कसा काम करतो? याची पुरेशी कल्पना नसते. #म#मराठी#ELSS
ईएलएसएस म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम किंवा टॅक्स सेव्हर स्कीम यांचा लॉकइन पिरीयड तीन वर्षे म्हणजेच 36 महिन्यांचा असतो.
मग 37 व्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट काढून घेता येते का? याचे उत्तर नाही असे आहे. #म#मराठी#ELSS
असे का? तर पहिल्या महिन्यामध्ये गुंतवलेल्या रकमेचा 36 महिन्यांचा लॉकइन पिरीयड हा 37 व्या महिन्यामध्ये संपतो. दुसऱ्या महिन्यात गुंतवलेल्या रकमेचा लॉकइन पिरीयड 38 व्या महिन्यात संपतो. #म#मराठी#ELSS
'जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया(GSI)'ने जम्मू काश्मीरच्या रेसाई जिल्ह्यात ५९ लाख टन इतके लिथियमचे स्रोत असल्याची शक्यता वर्तवली आहे. माईन्स सेक्रेटरी विवेक भारद्वाज यांनी 'सेंट्रल जिऑलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्ड(CGPB )'च्या ६२व्या सभेमध्ये याची घोषणा केली.#म#मराठी#LithiumInIndia 1/n
युनायटेड नेशन्सच्या क्लासिफिकेशन ऑफ रिसोर्सेस या फ्रेमवर्कनुसार कोणताही खनिज साठा शोधण्याचे ४ टप्पे असतात - प्राथमिक तपास, प्राथमिक संशोधन, सामान्य संशोधन आणि तपशीलवार संशोधन. यापैकी हा लिथियम साठा दुसऱ्या म्हणजे प्राथमिक संशोधन या टप्प्यावर आहे. #म#मराठी#LithiumInIndia
2/n
इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या बनवण्यासाठी लागणार लिथिअम हा एक मुख्य घटक आहे. परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)च्या मते, “इव्हीच्या वाढत्या मागणीमुळे जागतिक पुरवठा तणावाखाली आहे”. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA)नुसार, 2025पर्यंत जगाला लिथियम टंचाईचा सामना करावा लागू शकतो.#Lithium
3/n