लालपरी कडून देखील टोल घेतात हे पत्थरदील, संगदिल लोक!?
अरे हिला तरी सोडा!! बिचारी आधीच कर्ज आणि गरिबीने ग्रासलेली आहे. आवक आधीच कमी, त्यातही बिचारी काही लोकांना आधार देते आणि त्यात तुम्ही तिला असे त्रास देणार..! शोभतं का? 😵
आता दिवसभर काहीही होवो.. मला Vitamin D कमी पडणार नाही याची जबाबदारी स्वयं सूर्य नारायणाने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे! असा काही अँगल घेतलाय की बासच. माझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्याचं 🤓✌️
मानवी स्वभाव काही प्रमाणात विनोदी देखील आहे. आपल्याला प्रवास करायचा नसला तरीही समोरून येणाऱ्या प्रत्येक ST वरचे "कुठून कुठपर्यंत वाल्या पाट्या" अगदी via वाल्या यादी सकट, सगळ्यांना एकदा तरी वाचायचा मोह होतोच! 😄🤗
घाट सुरू होणार हे सुचविणारा नाश्ता करायचा थांबा आलेला आहे. सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, महाबळेश्वर, इत्यादी अनेक दक्षिणाभिमुख लालपऱ्या थांबलेल्या आहेत. पण यांच्या गर्दीतही सांगली - मिरज ची लालपरी उठून दिसत आहे. निदान आत्तापर्यंत तरी हेच दिसत आहे. 🤪🙃😂
घाटात डावीकडून ट्रक चालवणाऱ्या चालकांचा खरचं सत्कार केला गेला पाहिजे! नाहीतर जवळजवळ सगळेच ट्रकवाले, घाटातील तिन्ही lanes सरकारने सवलत म्हणून आंदण दिल्यासारखे, किंवा वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे स्वच्छंद आणि कूर्मगतीने गाड्या चालवतात 😠
घाट वगैरे पार करून आता, शेत - शिवारे आणि random पवनचक्क्या यांच्यात प्रदेशात ही लालपरी आलेली आहे. मैला मैलावर भाषा आणि स्वभाव बदलणाऱ्या दुनियेत ही लालपरी किती लीलया वावरते? कमाल आहे! असं जमलं पाहिजे. सगळ्यात मिसळून देखील स्वतःचे अस्तित्व टिकवणे एक कला आहे!
#सातारा वगैरे भाग जवळ आला की महामार्गावर भारीतल्या गाड्या दिसतात. मला इतक्या भारी भारी गाड्या असूनही अत्यंत कमी वेगात, दबकत दबकत आणि डाव्या बाजूने नेणाऱ्या मंडळींबद्दल अत्यंत आदर व असूया आहे. इतका मनोनिग्रह, संयम आणि शालीनता आजकाल दिसत नाही कुठे!
वडा पाव, सामोसे, गोळ्या, लस्सी आणि पाणी इथपर्यंत ठीक होतं पण पेढे !? 😵 साताऱ्यात कंदी पेढे सोडून बाकी मिठाई बनत नाही बहुदा. पण मी समजू शकतो. लोकांना पुण्यात आले की कधीही न खाल्ल्यासारखे उकडीचे मोदक मागतात! जणू काही आमच्याकडे जिलबी, श्रीखंड, पुरणपोळी बनतच नाही! 🤨
#लालपरी मला आता जिवंत असल्यासारखी वाटू लागली आहे. चंचल, बोलकी, थोडी नखरेल पण मनाने चांगली! तिला रस्त्याच्या वळणांचा त्रास होत नाही. मात्र रस्त्याने विचित्र खड्डे किंवा अडथळे मधे आणले तर चिडते. पण फुगून नाही बसत हां. रस्ता जरा छान सरळ वाहू लागला की खुलून येते! #अजब_प्रेम#प्रवास
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सह्याद्रीच्या कुशीत वळण घेत लालपरीने विसावा घेतला. थोडी दमलेली दिसली. जेवण झालं व पुन्हा नव्या जोमाने धावू लागली. कोकणचा #प्रवास भलताच वळणदार. #कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध! आजूबाजूला मागे पडणाऱ्या घरात डोकावून पाहता आलं असतं तर? विश्वाचे आर्त समजले असते! #लालपरी
#प्रवासी गाड्या ज्या जेवणाच्या अड्ड्यांवर थांबतात तिथे जेवण चांगलेच मिळते! कारण इथल्या जेवणाला अनोळखी लोकांच्या गप्पांची जोड असते. कोणी दिवसभर या हाटेलात बसला/ बसली तर काही वर्षे पुरेल इतके साहित्य, विषय आणि पात्रे मिळतील. आज अस्खलित #सातारी बोली ऐकायला मिळाली! 🤗 #प्रवास#अनुभव
#सह्याद्री.. महाराष्ट्रासारख्या राकट देशाला शोभून दिसणारी आणि स्वतः देखील साक्षात कालीमातेसारखी रौद्र सह्याद्री पर्वतरांग! त्यांच्या घनदाट जंगलात वसलेल्या संसारातून प्रवास करणारी ही #लालपरी!
सह्याद्रीला पाहून एकच वाक्य मनात येते, "असो हिमालय तुमचा, अमुचा केवळ माझा सह्यकडा!"
यावरून आठवलं.. लोक कोणाला बिरुदावली नाही लावली की जणू पातक झाल्यासारखे अंगावर धावून येतात. म्हणजे नावामागे महात्मा, छत्रपती, भारतरत्न जोडलं नाही की गहजब झाल्यासारखे हिंसक होतात. आणि हेच लोक लोकशाहीची हत्या वगैरे बडबड करतात. ही बिरुदावल्यांची जलपर्णी आहे!
कोणी मुद्दाम अपमान करण्यासाठी हे करत नाही. काही वेळा एखादी व्यक्ती इतकी जवळची वाटते की बिरुदावली नात्यांवरचं ओझं वाटतं. उदा. मी कवी ग्रेस यांना फक्त ग्रेस असं कधी कधी एकेरी हाक मारतो कारण मला ग्रेस खूप जवळचे वाटतात. यात अपमान कुठे आला. तीच गत तुकोबा, ज्ञानोबा आणि इतरांची आहे.
मध्यंतरी मीj व्हिडिओ मध्ये तुकाराम महाराजांना तुकोबा म्हटलं तर एकाने निषेध नोंदवला, शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा अनवधानाने झाला तर शिव्या! मग महाराजांचे नाव घेताना संपूर्ण गारद म्हणत जा दर वेळेस? काय म्हणता?
Bill Maher म्हणतो तसे psychological haemophilia झालाय लोकांना
अंगावर उंची वस्त्रे परिधान करून नेहमीप्रमाणे तो सभेत आला. विश्वविजेता म्हणून ज्याची ख्याती होती आणि प्रखर शासक म्हणून ज्याचा वचक होता. तो राजा आपल्या सभेकडे नजर टाकून
आपल्या सिंहासनाच्या दिशेने जाऊ लागला. सभागृहात शांतता होती. एक विचित्र शांतता. सर्पाने काळोखात लपून बसावे अशी शांतता. पण त्याने दुर्लक्ष केले कारण अशा अनेक सर्पांना त्याने युद्धभूमीवर हरवलेले होते. सिंहासनाकडे जाणाऱ्या पायरीवर त्याने पाय ठेवलाच होता की एक गलका झाला आणि..
काय झालं हे समजायच्या आत पाठीवर आघात झाला. कालपर्यंत ज्यांना तो आपले मानत होता, ज्यांच्या निष्ठेविषयी त्याला किंचितही शंका नव्हती त्या मंत्र्यांच्या दिशेने आक्रोश ऐकू आला. माणसांचा एक श्वापदी लोळ त्याच्या दिशेने धावून आला. पाठीतून एक असह्य कळ मस्तकापर्यंत गेली आणि ..
काल एक जण गेल्या ५-७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिका व चित्रपट यांचे दाखले देत तावातावाने मुद्दे मांडायचा प्रयत्न करत होता.
त्याला साधा प्रश्न विचारला "आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांबरोबर कोण कोण होते आणि त्यांना कोणी कोणी मदत केली?"
तेव्हापासून बिचारा ऑफलाईन आहे😎
ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांच्यात दाखवल्या जाणाऱ्या घटना, त्या ज्या पद्धतीने मांडल्या जात आहेत त्यांच्या मागची विचारसरणी, खुंटीवर टांगलेला तर्कशुद्धपणा आणि विनाकारण निर्माण केलेली जातीय दरी. या मुद्द्यांवर अक्षरशः पिसं काढली जाऊ शकतात. हास्यास्पद पातळीवर बनवले जात आहेत चित्रपट
भाषिक पातळीवर आणि पात्र व्यवहार पातळीवर तर बोलूच नये. अनेक बोचणारे मुद्दे आहेत. वेळ आल्यावर नक्की मांडेन. पण मूळ मुद्दा असा की सिनेमाच्या सुरुवातीला "हा ऐतिहासिक दस्तऐवज नाही" हे शब्द लोकांच्या तोंडावर फेकले की सिनेमा बनवणाऱ्यांची जबाबदारी संपते का? काल्पनिक इतिहासावर आधारित
आजच्या दिवशी म्हणजेच २८ जून १८२० साली सगळ्यांनी पहिल्यांदा हे मान्य केलं की टोमॅटो विषारी फळ नाही आणि ते खाण्यास योग्य आहे हे सगळ्यांनी मान्य केलं. ऐकायला विचित्र वाटेल पण इंग्लंड, उत्तर युरोप व अमेरिका येथे कैक वर्षे टोमॅटो हे एक विषारी फळ मानले जात होते. १/क्ष
टोमॅटो आपण भाजी म्हणून खात असलो तरी वनस्पतीशास्त्रानुसार टोमॅटो हे एक फळ आहे. तर या रोचक कथेची सुरुवात होते मेक्सिकोत. टोमॅटो खरं तर मूलतः दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातील फळ आहे. इतिहासाच्या प्रवासात कधीतरी मेक्सिकोत Aztec लोकांनी ते फळ मेक्सिकोत आणलं व त्याची लागवड केली. २/क्ष
टोमॅटो हा शब्द टोमाटल म्हणजे स्थानिक मेक्सिकन भाषेत फुगलेले फळ या शब्दावरून आलेला आहे. आता साधारण १५ व्या शतकाच्या दरम्यान स्पॅनिश प्रवाशांबरोबर टोमॅटो युरोपात पोहोचला अशी आख्यायिका आहे. तिथे आधी हे फळ स्पेन, इटली या दक्षिण युरोपीय देशात एक भाजी म्हणून वापरले जावू लागले. ३/क्ष