🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Aug 26, 2020, 11 tweets

'माहित नसलेला #इरफान'
हा लेख २९ एप्रिलचा असुन मी FB वर post केला होता.आज इरफान भाईचा Piku movie बघितला आणि त्याची आठवणं आली.म्हणलं तुमच्यासोबत share करावा.आवडल्यास नक्की like Rt करा आणि इरफानभाईचे तुम्हाला आवडलेले movie सांगा.👍

"अम्मी आयी है..वो मुझे लेने के लिए आयी है...."

मरणाच्या पहिले इरफान खान ह्या अभिनेत्याचे शेवटचे शब्द.इरफानची आई सईदा बेगम(वय वर्ष ९५) ह्यांचे ४ दिवसांपूर्वीच निधन झाले होते व आज ह्या अप्रतिम कलाकाराची कर्करोगाशी चाललेली लढाई संपली.२०१८ साली इरफानला Neuroendocrine Tumour झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा कर्करोग दुर्मिळातला ‌

दुर्मिळ असुन १० लाखांतुन एखाद्याला होतो..आपल्या सारख्या तमाम रसिकवर्गाचं दुर्दैवच की हा रोग इरफान खान सारख्या अत्यंत हुशार,अष्टपैलू,कामाला न्याय देणार्या पण दैनंदिन जीवनात तेवढाच सरळ,साध्या कलाकाराला व्हावा....
*इरफानभाईला प्राण्यांबद्दल भरपुर प्रेम होते म्हणुन बहुतेक तो शाकाहारी

राहिला असावा..
घरातील सर्वांना शिकारीचा नाद असताना स्वत इरफानला प्राण्यांची हत्या करायला आवडत नव्हती, त्याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला"जेव्हा मी लहान होतो तेव्हा शिकार करायला कुटुंबासोबत जंगलातून फिरायचो,मारल्या जाणाऱ्या जनावरांना पाहुन मी,माझा छोटा भाऊ आणि बहीण त्या

प्राण्याच्या कुटुंबाबद्दल विचार करून दुःखी व्हायचो."घरातले सगळे त्याला म्हणायचे,"ब्राम्हण पैदा हुआ है पठाणों के घरमे"('anupam kher talk show' मध्ये त्याने स्वता हे सांगितलं आहे).
आयुष्यात कारकीर्दीच्या सुरूवातीला कोणत्याही मालिकेत कोणत्याही चित्रपटात मिळेल तो अभिनय करुन आपला

प्रवास चालु केलेल्या इरफानला गेल्या ५-६ वर्षांमध्ये एक ना अनेक भन्नाट चित्रपट मिळाले..तो चित्रपट सृष्टीमध्ये एवढा Establish झाला की bollywood च्या मोठ मोठाल्या चित्रपटात काम करुन jurassic park,life of pie,slumdog millionaire सारख्या Hollywood चित्रपटामध्येदेखील त्याने काम केले.

एका बाजुला Hollywood मध्ये चित्रपट करण्याची संधी मिळाली की आपलं सगळं सामान बांधून पळायला तयार असणारे कलाकार तर दुसरीकडे मिळालेले Hollywood चित्रपट नम्रपणे नाकारणारा इरफान खान सारखा अवलीयादेखील भारताने पाहिला..
Christopher Nolan(batman trilogy चे जनक) सारख्या जगमान्य ‌

दिग्दर्शकाच्या 'Interstellar' चित्रपटाची सुवर्णसंधी इरफानने नाकारली कारण त्याला चित्रपटासाठी अमेरिकेमध्ये ४ महिने थांबावं लागेल अस सांगण्यात आलं.पण इकडे इरफानचे 'The lunchbox' व 'D-day' ह्या दोन चित्रपटांचं काम पहिल्यापासून सुरू होतं.शेवटी इरफानने Nolan ला नम्रपणे नकार कळवला.

Steven Spielberg(Indiana jones,Jurassic park चे दिग्दर्शक) ह्यांच्या चित्रपटाला(Robopocalypse)देखील इरफानने नकार कळवला ज्यामध्ये त्याची सहनायिका म्हणुन Scarlett johnson(avengers मधील black widow) होती.
Hollywood चित्रपट नाकारल्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला"मी खरंच खुप

नशीबवान आहे की मला hollywood मध्ये चित्रपट मिळत आहेत पण खरतर भारत सोडुन मला दुसरीकडे जाण्याची इच्छा होत नाही.माझी लोकं माझ्या कथा सर्वकाही इथेच तर आहे🙏"
माणसाने मिळवलेले यश तर सर्वच बघतात पण ते मिळवण्यापर्यंतच्या खाल्लेल्या खस्ता पाहणे खरंच खुप वेधक असते..त्यातल्या काही गोष्टी

आपल्या दररोजच्या जीवनाची लढाई लढायला बळं देऊ शकतात..अश्या ह्या भावनिक,सरळ,साध्या 'struggling actor' पासून Self made king झालेल्या इरफान भाईला #भावपूर्ण #श्रद्धांजली.!!🙏💐😓
#म #मराठी #रिम #स्वलिखीत #सहज #इरफान_खान #bollywood #hollywood #struggle #celebrity #simple #humble

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling