मित्रांनो, काल मी कंगनाला दिलेल्या सुरक्षेबाबत व भारतात VIP ला दिली जाणारी सुरक्षा यासंदर्भात थ्रेड लिहीला होता..आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षण यंत्रणेवर किती खर्च होतो,मागच्या वर्षी तो किती होता..नक्की सामान्य जनतेचा किती पैसा सुरक्षेला जातो ह्याबद्दल..#म #मराठी #धागा
काल मी सांगितल्याप्रमाणे SPG(Special Protection Group) ही रक्षा फक्त पंतप्रधान व माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते.SPG मध्ये एकुण ३००० commando आहेत.ते सर्व ज्युदो,कराटे आधुनिक हत्यारे वापरण्यात अतिशय निष्णात असतात.
तुम्हाला ऐकुन धक्का बसेल पण SPG वर
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला '५९२.५ कोटी' रू ची तरतूद केली आहे म्हणजे दिवसाचा खर्च हा जवळपास
'१.६२ कोटी' रू आहे.हा मागील वर्षीपेक्षा १० टक्के ज्यादा खर्च आहे.(५४०.१६ कोटी रू) एवढा अवाढव्य खर्च आपल्या पंतप्रधानवर होतो आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट
मागील वर्षी SPG सुरक्षेमध्ये गांधी (सोनिया,राहुल,प्रियांका) परिवाराचा समावेश होता पण ८ नोव्हेंबर २०१९ ला त्यांची SPG काढुन त्यांना Z+ सुरक्षा दिली.तरीपण ह्या बजेटमध्ये सुरक्षेवर १०% ने वाढ केलीय.
आणखी थोडी फोड करून सांगितल तर मागील वर्षी मोदी व ३ गांधी असे एकुण ४ जण SPG रक्षेत
होते तेव्हा २०१९-२० च्या बजेटमध्ये त्यांच्या रक्षेसाठी '५४०.१६' रू तरतुद केली होती.म्हणजेच प्रत्येकासाठी जवळपास '१३५ कोटी' रू खर्च...८ नोव्हेंबर २०१९ ला गांधी परिवाराची SPG सुरक्षा काढुन घेतली तरी ह्या बजेटमध्ये मोदींच्या सुरक्षेसाठी जवळपास '४५७ कोटी' रू वाढ झालीय..🤯😱😰
ज्यावेळीस केंद्र सरकारने गांधी कुटुंबाची SPG सुरक्षा काढुन घेतली त्यावेळीस लोकसभेत खुप गदारोळ झाला आणि गृहमंत्री श्री.अमित शहा सभेतुन निघुन गेले.दुसर्या दिवशी गांधी परिवाराने tweet द्वारे सर्व SPG family चे आभार मानले.गांधी कुटुंबाला १९९१ पासुन म्हणजे सलग २९ वर्ष ही सुरक्षा लाभली
अतिरिक्त माहिती:-तुम्ही SPG सुरक्षायंत्रणेचा फोटो पाहिलात तर तुम्हाला त्यांच्या हातात कायम एक काळ्या रंगाची बॅग दिसेल.ती बॅग म्हणजे bulletproof shield असुन ऐनवेळेस जर हल्ला झाला तर ती उघडुन VIP व्यक्तीला संरक्षण दिले जाते.
मी काल लिहीलेल्या थ्रेड ची खाली लिंक दिली आहे..नक्की पहा
विचार करा सामान्य माणसाचा किती पैसा वापरला जातो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती अवश्य पोचवा!!🔥🔥
Source:-India today, telegram.
#म #मराठी #धागा #security #SecurityGuard #Kangana #Modi #Congress #budget @DhumalSpeaks @anil010374 @KhanawalDurga @Am_here_DURGA
कालचा थ्रेड..नक्की वाचा
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.