🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Sep 25, 2020, 18 tweets

(२/२)
काल मी OBC reservation'मंडल आयोगा'चा थ्रेड लिहीला होता.वाचला नसेल तर ह्या थ्रेडच्या शेवटी त्याची लिंक दिलीय.आज त्याचा दुसरा भाग लिहीला आहे.आरक्षण लागु झाल्यावर देशात काय घडलं,दंगली,नवीन नेत्यांचा उदय,अडवाणी रथयात्रा,सरकार स्थापना, इंदिरा सहाणी खटला इ.
नक्की वाचा #म #मराठी

जसं व्हिपी सिंगने १५ ऑगस्टला OBC आरक्षणाची घोषणा केली तस देशभरामध्ये आणि खासकरून उत्तर भारतात याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.👇
१)मंडल आयोगाने अहवाल बनवताना आधार म्हणुन १९३१ ची जनगणना वापरली ज्याला अनेकांनी विरोध केला.कारण १९३१ ला जो समाज मागास होता तो आता मागास असेलच अस नाही

उदा.
**यादव समाज:-
पुर्वी यादव मागास होते पण देश स्वतंत्र झाल्यानंतर UP, Bihar मध्ये यादवांचा राजकीय प्रभाव भयंकर वाढला होता.पण मंडल आयोगानुसार यादव मागास आहेत.
**जाट समाज:-
राजस्थान,हरयाणामधील जाट समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असला तरी सामाजिकदृष्ट्या प्रचंड प्रभावशाली होता.

राजस्थानमधील जाट ला मंडल आयोगाने आरक्षण दिले पण हरयाणामधील समाजाला आरक्षण दिल नसल्यामुळे त्यांनी ही आरक्षणाची जोरदार मागणी केली.
२)व्हिपी सिंग सरकारने आरक्षण लादायची गडबड केल्यामुळे जातीचा भेदभाव आणखी ठळक होईल अस मत नोंदवले गेले..खासकरून उत्तर भारतामधील जातीभेद..

आणि व्हायच तेच झाल..आरक्षणाची घोषणा झाल्या झाल्या संपूर्ण भारतात(खासकरून उत्तर भारत) दंगा उसळला.दिल्ली,अलाहाबाद विद्यापीठातील शिक्षक,विद्यार्थी यांनी दिवसभर लेक्चर बुडवून आंदोलन सुरु केले.Upper cast च्या मुलांनी २७% नोकर्या आरक्षित झाल्या म्हणुन हताश होऊन आंदोलन सुरू केली. #म

दुसर्या बाजुला काही शिक्षकांनी मंडल आयोगाच्या बाजुने घोषणाबाजी केली.जो SC व ST समाजवर्ग होता त्यांनी व्हिपी सिंग सरकारच्या समर्थनात नारेबाजी केली.ठिकठिकाणी सरकारच्या पुतळ्यांचे दहन झाले तर ठिकठिकाणी सरकारच्या बाजुने लोक उभारली.पण तुम्हाला माहित नसेल मित्रांनो, मंडल आयोगामुळे

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात आत्मदहनाच्या घटना घडल्या.विद्यार्थी स्वताला जिवंत जाळुन घ्यायला लागले!!🙏🙏
'राजीव गोस्वामी' या तरुणाने सर्वात प्रथम स्वताला आग लावुन घेतली.संपुर्ण देशात एकुण १५९ लोकांनी स्वताला पेटवुन घेतले व दुर्दैवाने त्यातील ६३ जणांचा मृत्यू झाला.

मंडल आयोगामुळे जे 'OBC backing' चे पक्ष होते त्यांची ताकद लक्षणियरित्या वाढली.त्यांनी मंडल आयोगाच्या समर्थनात शेकडो rally काढल्या.यातुनच लालुप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव,मायावती,रामविलास पासवान,नितीशकुमार,शरद यादव यांसारखे अनेक नेते उदयास आले!!! @MarathiDeadpool @Digvijay_004

***भाजपा रथयात्रा:-
भाजपच्या ८५ खासदारांनी व्हिपी सिंग सरकारला(नॅशनल फ्रंट) सत्तास्थापनेला बाहेरून समर्थन दिल होतं.जर त्यांनी मंडल आयोगला उघडपणे विरोध केला असता तर भाजप OBC वर्गाच्या विरोधात आहे अस चित्र तयार झालं असत पण मंडल आयोगामुळे व्हिपी सिंगचा प्रभाव तर वाढला होता..ह्यावर

उपाय म्हणुन भाजपने देशाचे संपुर्ण लक्ष मंडल आयोगावरून आपल्याकडे वळवण्यासाठी 'अयोध्या रथयात्रा' सुरु केली.ज्यामुळे संपूर्ण देशातल्या हिंदू मतांचे ध्रुवीकरण साधता आले.ह्या यात्रेचे नेतृत्व श्री.लालकृष्ण अडवाणींनी केले.ही यात्रा सोमनाथ पासुन चालु होऊन अयोध्येत थांबणार होती.

एका टोयोटा गाडीला रथामध्ये बदलले होते.
ह्या यात्रेचे नियोजन पार पाडण्यामध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खुप मोठे योगदान आहे मित्रांनो!!(फोटो पाहा)🙏😄
ही यात्रा जिथे गेली तिथे मोठ्या प्रमाणात दंगे झाले,हजारो लोक मारले गेले..एका ठिकाणी व्हिपी सिंग व अडवाणीजी यांच्यात

चर्चा झाली पण ती असफल ठरली.शेवटी बिहारच्या समस्तापुर येथे अडवाणींना लालुप्रसाद यादव सरकारने अटक केली.त्यावेळीस व्हिपी सिंग यांचे एक वाक्य खुप प्रसिध्द झाले.ते होते,"मेरे लव-कुश ये रथ रोकेंगे".ह्यात लव म्हणजे UP मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आणि कुश म्हणजे bihar CM लालुप्रसाद यादव🙏

आणखी एक मजेशीर गोष्ट ही की, ज्या R.K.Singh नावाच्या IAS officer ने लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली ते आज भाजप सरकारमध्ये ऊर्जामंत्री म्हणुन काम करत आहेत🙏🙏😄👇.
अडवाणींना अटक झाल्यावर भाजपाने व्हिपी सिंग सरकारला दिलेले ८५ खासदारांचे समर्थन काढुन घेतले व तिकडे चंद्रशेखर यांनी

६४ खासदार फोडुन राजीव गांधी यांच्या १९७ खासदारांच्या पाठिंब्यावर स्वताचे सरकार स्थापन केले.अशातर्हेने व्हिपी सिंग सरकार पडले आणि चंद्रशेखर सरकार आले.
पुढे राजीव गांधी यांनी चंद्रशेखर सरकार त्यांची जासुसी करतय व त्यांचे फोन टॅप करत आहे अस सांगून १९७ खासदारांचे समर्थन काढुन घेतले.

**राजीव गांधी यांची हत्या झाल्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत(१९९२) भावनिकतेच्या लाटेवर काॅंग्रेस पुन्हा सत्तेत येते.
ही सर्व राजकीय उलाढाल झाली...
आता मंडल आयोग व इंदिरा सहाणी खटला पाहु:-
आरक्षणाची घोषणा झाल्यावर इंदिरा सहाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात १९९०

ला मंडल आयोगाविरूद्ध याचिका दाखल केली.त्यात त्या म्हणाल्या की,"जातीच्या आधारावर मागास ठरवता येत नाही".त्यानुसार कोर्टने आरक्षणावर तात्पुरती स्तगिती लागु केली.१९९२ च्या आसपास कोर्टने सांगितले की जातीच्या आधारावर मागास ठरवता येऊ शकते व १९९३ पासुन OBC reservation लागु करण्यात आले.

'मंडल आयोग' थ्रेड पहिला 🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling