माझा आजचा धागा मी खुप उद्वीग्न मनाने लिहीत आहे..ज्या देशात हजारो लाखोंनी बलात्कार,अन्याय होतात आणि करणारे उघडपणे फिरतात, त्या देशात एका बलात्कार झालेल्या मुलीचा २ दिवसांपूर्वी मृत्यू झाला🙏🙏..खाली मी विस्तृत घटना सांगण्याचा प्रयत्न केला आहे..सर्वांनी नक्की वाचा🤕🤕
#म #मराठी
१)घटना
२)पोलिस प्रतिक्रिया
१)उत्तरप्रदेश मधील हातरस गावामध्ये १४ सप्टेंबरला समाजाला काळीमा फासणारी घटना घडली..एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला.जिच्यावर बलात्कार झाला ती दलित समाजाची होती आणि कृत्य करणारे upper cast वाले हरामखोर.(वस्तुस्थिती सांगतोय)..
मुलीच्या
कुटुंबाने आणि त्या पिडीतने २३ सप्टेंबरला सांगितल्याप्रमाणे पिडीत,तिची आई आणि भाऊ गुरांसाठी गवत कापायला गेले.तिचा भाऊ आणि आई थोड्याश्या अंतरावरच असताना अचानक मागुन येऊन ४ जणांनी तिच्यावर झडप टाकली..तिच्या गळ्यात आणि डोक्यावर ओढणी टाकुन तिला आत लांबपर्यंत ओढत घेऊन गेले🙏🙏
आणि नंतर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला..हे ४ जण गावातलेच असुन त्यातला एक २० वर्षाचा आहे..दुसरा त्याचा ३५ वर्षाचा काका आहे आणि राहिलेली २ गावातलीच आहेत..त्यांची नावे संदिप,रामु,लवकुश आणि रवी.
बलात्कारानंतर यांनी तिचा मणका मोडुन टाकला आणि तिने कुणासमोर तोंड उघडु नये यासाठी
तिची जीभ कापली..२३ तारखेला तिने खुप मेहनतीने जबाब नोंदवला..तिच्या भावाने सांगितले की मी आणि माझी आई तिला शोधत गेलो तर ती बेशुद्ध अवस्थेत निपचीत पडली होती..आम्हाला सुरूवातीला वाटले तिला साप चावलाय..पण नंतर आम्हाला ध्यानात आले की तिच्यावर बलात्कार झालाय..
तिला तातडीने अलिगढच्या
दवाखान्यात भरती केले, नंतर तिला दिल्लीला हलवण्यात आले.
**स्थानिक लोकांमध्ये कुजबुज चालुय..लोक म्हणतायत गुन्हा करणारे उच्च जातीतले होते आणि पिडीत दलित होती म्हणुन पोलिस काही action घेत नाहीत..इ..
२)पोलिस प्रतिक्रिया:-
ही घटना UP मधील चंदपा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे..
तेथील SHO(station house officer) याची घटना घडल्यावर तात्काळ बदली करण्यात आली.सध्या ही बदली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पोलिसांनी आरोपींना अटक केली पण एकत्र नाही केली.१४ तारखेला संदिपला अटक केली त्यानंतर रामु,लवकुश ला अटक केली आणि शेवटी २६ तारखेला रवी ला अटक करण्यात आली..
आरोपींवर सेक्शन ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न आणि सेक्शन ३७६ D नुसार सामुहिक बलात्कार अंंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पिडीतेवर इतके अमानुष आणि पाशवी अत्याचार झाले की ती ९ दिवसांनीच(२३तारखेला) शुद्धीवर आली.शुद्धीवर आल्यानंतर तिच्या सांगण्यानुसार आरोपींवर कलमं ठोकण्यात आले.
पिडीतेला सुरूवातीला AIIMS,दिल्ली ला हलवुया अस म्हणण्यात आले परंतु तिला सफदरजंग ला हलवण्यात आल.परवा त्याच दवाखान्यात मणका तुटलेल्या,मानेची ३ हाड मोडलेल्या,बोलता येऊ नये म्हणुन जीभ कापल्या गेलेल्या आणि गळा आवळल्या गेलेल्या निष्पाप मुलीची प्राणज्योत मालवली..#HathrasCase
सगळ्यात मोठा कहर म्हणजे या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारत तिच्या मृतदेहावर रातोरात अंत्यसंस्कार उरकले आहेत.मुलीवर सकाळी अंत्यसंस्कार करावेत,तिचे अंत्यदर्शन घेऊ द्यावे, मृतदेह घरी नेऊ द्यावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती.
मात्र आधीपासूनच आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी धुडकावून लावली आणि कडेकोट बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची खुपमोठी लाट उसळली आहे.
#म #मराठी #HathrasHorrorShocksIndia #HathrasCase
मला एका गोष्टीचा प्रश्न पडतो..कस जन्माला येते ही नागडी मानसिकता,वासनेच्या जळमटांना कस काय बळ येत मनावर हावी व्हायला..का असले नराधमी कृत्य करताना समोर कपड्यात असलेल्या मुलीमध्ये,स्त्रीमध्ये एका क्षणासाठीही आपली बहीण आपली आई दिसु नये??नुसते मोर्चे,मेणबत्त्या काही कामाच्या नाहीत आता
कायद्यांमध्ये बदल आणि तातडीचे कठोर बदल होणं गरजेच आहे..
ही दलित मुलगी असो किंवा हरवलेले घोडे शोधण्याचे आमिष दाखवून सांझीरामने ८ वर्षीय 'असिफा' वर ५ दिवस मंदिरात केलेला बलात्कार असो..त्या लहान लेकराने ओरडु नये म्हणुन तिला मादक द्रव्य पाजण्यात आले..शेवटी बलात्कार करून झाल्यावर
तिला जंगलात नेऊन तोंडावर मोठा दगड टाकुन ठार मारण्यात आलं🙏🤕
बलात्कार करताना धर्म जात पाहिले जात नाही..माणसातली नासकी प्रवृत्ती सर्व घडवायला कारणीभुत आहे.सरकारने आणि समाजाने षंढपणा सोडावा.आणि असल्या विकृत मानसिकतेला जिथल्या तिथ ठेचण्याला प्राधान्य द्यावे🙏🙏😤😤
@MarathiDeadpool
#म #मराठी #रिम #हाथरस #हाथरस_की_बेटी #हाथरस_बलात्कारियों_को_फांसी_दो #हाथरसकांड #HathrasHorrorShocksIndia #HathrasCase #HathrasPolice #HathrasHorror #UttarPradesh #Delhi @CovidWarriorM5 @ImLB17 @win98761 @prathameshs1189 @anil010374
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.