🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Oct 2, 2020, 17 tweets

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या व्यक्तीला मारणारा आज देशातल्या एका विशिष्ट वर्गासाठी नायक,देशभक्त ठरलाय.आजच्या थ्रेडमध्ये
१)#नथुराम_गोडसे
२)#गांधीजी व हत्या
३) वल्लभभाई पटेल व त्यांचा RSS विरोध
४)फाशीवेळीस गोडसेची परिस्थिती
#रिम #MahatmaGandhi

नथुराम विनायकराव गोडसे चा जन्म 19मे,1910 ला झाला.त्यांच्या जन्मावेळीस भारतात क्रांतिकारी चळवळी चालु झाल्या होत्या.थोड्या कालावधीने गांधीजीं चे भारतात आगमन झाले आणि त्यांनी 1920 ला 'असहकार आंदोलन' पुकारले.नथुरामचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्टल ऑफिसमध्ये कामाला होते.

त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी.नथुराम चे 'नथुराम' नाव पडण्यामागे एक गोष्ट आहे.त्यांचे खरे नाव 'रामचंद्र' होते.पण नथुराम जन्माला यायच्यापुर्वी ३ मुले जन्माला आली आणि अल्पावधीतच मरण पावली.घरच्यांना वाटले की आपल्याला कोणतातरी शाप असावा त्यामुळे मुले दगावत आहेत..म्हणुन त्यांनी 'रामचंद्र'

ला मुलींसारखे वाढवले.त्याचे कान टोचले,त्याला नाकात नथ घातली व यामुळे रामचंद्रचा नथु-राम झाला.नथुरामचे 5वी पर्यंतचे शिक्षण बारामतीत झाले.तिथुन पुढे त्याला पुण्याला पाठवण्यात आले.महत्त्वाच म्हणजे लहानपणापासुन नथुराम हे गांधींचे चाहता होते.

पण मोठे झाल्यावर जशी त्यांनी RSS व हिंदू महासभामध्ये प्रवेश केला तशी त्यांना गांधीजींची विचारधारा पटेनाशी झाली.गांधीबद्दल "हा माणुस आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देईल पासुन" त्यांना मारल्यावर कोर्टातील "त्या माणसामुळे देशाची फाळणी झाली" या जबाबापर्यंतचा प्रवास म्हणजे नथुराम गोडसे🙏

गोडसेंना गांधीजी समजलेच नाहीत.महंमद जीना यांची स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी पेटली होती.काॅंग्रेस तर फाळणीला विरोध करून अक्षरशः थकुन गेल होतं.गांधीजी वेगळ्या पाकिस्तान विरोधात उपोषणाला बसले होते..परंतु देशभरात दंगली उसळल्या होत्या,कत्तली घडत होत्या त्यामुळे नाईलाजास्तव

पेटलेले वातावरण शांत करण्यासाठी फाळणी झाली.(समाजात फाळणी आणि त्याच्या मागे अनेक मतं आहेत,आपण कमेंटमध्ये मांडु शकता).1940 ला गोडसेंनी 'हिंदु राष्ट्र दल' स्थापन केला व 1946 ला अधिकृतपणे RSS ला सोडचिठ्ठी दिली.
‌शेवटी 'Indian Independence Plan' आल्यावर त्यात देशाच्या फाळणीचा उल्लेख

पाहुन गोडसेंनी गांधीजींना फाळणीसाठी दोषी ठरवायला सुरूवात केली.गांधीजीमुळं हिंदूंवर अन्याय झालाय,एव्हढी लोक मेली इ..पण गांधीजी तर काय करणार??ते तर देशभरात प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना समजावत होते की हिंसा करू नका..उदा.जेव्हा देशभरात स्वतंत्रदिनाचा उत्सव साजरा होत होता

त्यावेळेस गांधीजी कोलकाता(नाओखली)मध्ये उसळलेल्या दंगली थांबवत होते.गांधीजी अनवाणी चालतात ही माहिती असल्यामुळे दंगलखोरांनी रस्त्यावर काटे टाकले होते.गांधीजी म्हणाले,"मी हा स्वतंत्रउत्सव साजरा करू शकत नाही कारण मला उद्या भारत पाकिस्तान मध्ये होणार्या तणावाचे बीज आजच दिसत आहेत"🙏

तुम्हाला माहित नसेल पण गोडसेंनी गांधीजींना 1934 व 1942 ला मारायचा प्रयत्न केला होता पण दोन्हीवेळा असफल झाला.गांधीजी कोणतीही सुरक्षाव्यवस्था घेऊन फिरत नव्हते.(जस आजकाल कोणीही उठुन 'Y+' घेतय तशी🙏).30 जानेवारी,1948 चा दिवस होता.गांधीजी नेहमीप्रमाणे बिर्ला हाऊसला प्रार्थना करायला

पोचले..तेव्हा तिथे नथुराम गोडसेनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या...
गांधीजीच्या सोबत असणारे म्हणतात,"त्या दिवशी बापुंनी 3-4 वेळा मरणाचा उल्लेख केला.." संध्याकाळी 4 वाजता(घटनेच्या 1 तास आधी) वल्लभभाई पटेल बापुंना भेटले होते तेव्हा त्यांनी बापुंना विचारल बापु प्रार्थनेनंतर मिटींग आहे

तेव्हा बापु म्हणाले जिवंत राहिलो तर नक्की येईन🙏🙏..
गांधीजी म्हातारे झाल्यामुळे त्यांच्यासोबत 'मन्नु' आणि 'आभा' दोघी राहायच्या.त्या दोघींचा आधार घेऊन ते चालायचे.गोळ्या झाडताना नथुरामने बापुंना पहिला नमस्कार केला व परत गोळ्या झाडल्या..तेव्हा बापुंचे शेवटचे वाक्य"हे राम!" होते....

पोलिसांनी नथुरामला अटक केली व त्याच दिवशी तुघलक रोड पोलिस ठाण्यात FIR दाखल झाली.गोडसेला शिमला कोर्टने दोषी ठरवलं.गोडसेच्या वकीलाने Re-apeal केली, तेव्हा गोडसे म्हणाले,"माझ्याकडुन मोठा गुन्हा झालाय..मला माफ करावे,मला संधी मिळाली तर मी नव्याने साधं जिवन जगेन".पण तस झाल नाही आणि

15 नोव्हेंबर,1949 ला अंबाला जेलमध्ये गोडसेंना फाशी दिली.गांधीजींवर नेहरू व वल्लभभाई पटेल यांचा खुप जीव होता. वल्लभभाई पटेल यांनी तर रागाला जाऊन RSS संघटनेवरच बंदी घातली.पोलिसांना पाठवुन सगळ्यांना अटक करण्यात आली पण त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले नाहीत म्हणुन सोडुन देण्यात आले.

1950 ला पटेल वारले त्यामागे 'गांधींच्या हत्येची' खंत होती असे म्हणले जाते..जी.डी.खोसला जे गोडसेचे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी त्यांच्या पुस्तकात(1965 ला प्रकाशित) फाशी देताना घोडसेची परिस्थिती सांगितली,"तो अखंड भारत ओरडत होता पण भितीने थरथरत होता..चेहर्यावर भिती स्पष्ट दिसत होती"

माझ वैयक्तिक मत आहे,
ज्या माणसाकडुन संपूर्ण आयुष्यात क्वचितच कुणाच नुकसान झाल असेल आणि ज्याने संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पित केलं त्याला मारणार्याचा जयजयकार करणे किती योग्य आहे??
शेवटी फाळणी हा निर्णय त्या वेळीसच्या परिस्थितीच्या मागणीनुसार घेतलेला निर्णय होता.🙏🤕
#म #मराठी #रिम

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling