Fit Maharashtra Profile picture
🔸Health and Fitness🔸 🚩जय हिंद जय महाराष्ट्र. 📌https://t.co/m1DYf2k6co

Jan 28, 2023, 15 tweets

🔶चपाती की भाकरी? नक्की काय खावे🔶
🔸Jowar Roti Or Wheat Roti🔸

-बरेच जण म्हणतात चपाती ने वजन वाढतं.
-वजन कमी करायची असेल तर भाकरी खावा.
-मधुमेह असणाऱ्यांनी चपाती ऐवजी भाकरी निवडावी.

-यामध्ये खरंच काही तथ्य आहे का?
सगळं काही जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/13

▪️गेले बरेच दिवसांपूर्वी Whatsapp वर "जेवणात का खावी ज्वारीची भाकरी""ज्वारीच्या भाकरीचे महत्व" असे Messages पाहिले.
▪️या मेसेज मध्ये "गव्हामुळे अनेक आजार होतात, वजन वाढतं, Acidity वाढते आणि बरेच काही सांगितलं होतं".
▪️असे मेसेज समाजात प्रबोधनाऐवजी गैरसमज च जास्त पसवरतात.
2/13

🔶चपाती भाकरी मधील Macronutrient🔶 Per 100Gm Of Grain.

▪️Carbohydrate▪️
गहू - 72 Gm.
ज्वारी - 72 Gm.

▪️Protein▪️
गहू - 13 Gm.
ज्वारी - 11 Gm.

▪️Total Calories▪️
गहू - 340 Calories.
ज्वारी - 329 Calories.

वरील Comparison वरून समजलं असेल की दोघांमध्ये फार मोठा फरक नाहीये.
3/13

▪️दोघांमध्ये प्रत्येकी 100 ग्राम मागे सारखेच Carbohydrates आहेत,
▪️प्रोटीन ही जवळपास सारखेच आहेत,
▪️Total Calories ही जवळपास सारख्याच आहेत किंवा खूप Calories मध्ये फरक आहे असंही काही नाही.
▪️यावरून एक धान्य श्रेष्ठ आणि दुसरे कनिष्ठ हा निष्कर्ष काढणे पूर्णतः चुकीचे आहे.
4/13

🔶Glycemic Index (GI)🔶
▪️एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर Energy मध्ये किती लवकर Convert होतो त्याला Glycemic Index म्हणतात.
▪️0 ते 100 मध्ये यांना मोजले जाते.
▪️जितका जास्त GI तितके लवकर Blood Sugar (Glucose) वाढते.

🔸चपाती भाकरी चा GI🔸
- गहू - 54.
- ज्वारी- 62.
5/13

▪️इथेही आपल्याला लक्षात येईल की चपाती भाकरी च्या GI मध्ये फार मोठा फरक नाहीये.
▪️त्यामुळे चपाती खाल्ल्याने Blood Sugar भाकरी च्या तुलनेत लक्षणीय वाढते , मधुमेह असणाऱ्यांनी चपाती खाऊ नये, हे म्हणणे योग्य ठरणार नाही.
6/13

🔶गव्हातील Gluten मुळे वजन वाढते का?🔶
▪️गव्हामध्ये Gluten नावाचं प्रोटीन असते, त्यामुळे कणकेला लवचिकता येते. म्हणून बेकारी Products बनवण्यासाठी गव्हाचा उपयोग जास्त होतो.
▪️शास्त्रीय संशोधन मध्ये सिद्ध झाले आहे की गव्हातील Gluten वजन वाढीसाठी कोणत्याही प्रकारे कारणीभूत नाही.
7/13

▪️अलिकडे काही डॉक्टर्स ही रुग्णाला वजन कमी करण्यासाठी चपाती बंद करा असा सल्ला देतात जे पूर्णतः चुकीचे आहे.
▪️अशा चुकीच्या Recommandation चा फायदा Food Products बनवणाऱ्या कंपन्या घेतात.
▪️आणि याच गैरसमज मुळे Gluten Free Biscuits/Noodles विकले जात आहेत.
8/13

🔶गव्हाची चपाती कोणासाठी व्यर्ज आहे🔶

▪️चपाती किंवा गव्हाचे पदार्थ खाण्याच्या संदर्भात फक्त एकंच समस्या येते ती म्हणजे Celiac Disease.
▪️Celiac Disease - गव्हातील Gluten मुळे काही लोकांना अतिसार, थकवा, पोट फुगणे, रक्ताची कमतरता, हाडे ठिसूळ होणे अशी लक्षण दिसतात. अशाच…
9/13

लोकांसाठी गहू खाणे धोकादायक ठरू शकते.
▪️Celiac Disease ने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या भारतात 1 टक्के पेक्षा कमी.
▪️भारतात/जगात 1 टक्के ही लोक Celiac Disease ने ग्रस्त नाहीत, पण Gluten Free Food मार्केट मध्ये असे विकले जात आहेत की सगळ्या जनतेला Celiac झाला झाला आहे😁
10/13

▪️जर आपण लहानपणापासून गहू/चपाती खात असाल आणि Celiac ने होणारे Problem आपल्याला कधीही झाले नसतील तर आपण Celiac बद्दल काळजी करू नये.
▪️Food Marketing कंपन्यांना नेहमी कोणता तरी Health Trend कायम चालू ठेवायचा असतो त्यांचे Product विकण्यासाठी, या अशा फालतू Trends मध्ये येऊ नका
11/13

▪️गेल्यावर्षी Miss Universe झालेल्या भारताच्या हरणाज संधू त्यांच्या Weight Gain मुळे चर्चेत होत्या.
▪️त्याही Celiac Disease ने ग्रस्त झाल्या आहेत असे निदर्शनास आले होते.
▪️Celiac ही एक Specific Condition आहे, हरणाज ने वजन कमी करण्यासाठी गहू सोडला म्हणून सगळ्यांनी सोडू नये.
12/13

🔶निष्कर्ष🔶
▪️कोणी म्हणत म्हणून चपाती खाण बंद करू नका किंवा भाकरी खाण चालू करू नका.
▪️आपल्याला खायला जे आवडत ते खावा,जे Easily उपलब्द आहे त्याची निवड करा.
▪️शेवटी ही तुमची Individual Choice आहे की आपण काय खायचं.
▪️चपाती असो व भाकरी दोघेही Nutrition च्या बाबतीत सारखेच आहेत.
13/13

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling