, 31 tweets, 5 min read Read on Twitter
बंगाली पत्रकार अर्क राजपंडित यांची ही फेसबुक पोस्ट आहे. मला अगदी उत्कटतेने वाटतं की ही पोस्ट भारतातील जितक्या भाषांमध्ये अनुवादित होईल आणि जितकी जास्त शेअर होईल, तितकी ती असंख्य लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हे होणं अत्यंत आवश्यक आहे. #Kashmir 1/n
मला पूर्ण कल्पना आहे की जम्मू काश्मीरच्या परिस्थतीची तुलना महाराष्ट्रासारख्या पूर्ण राज्याशी करणं संयुक्तिक नाही. परंतु हे केवळ काल्पनिक कथानक असल्याचे भान वाचकाने ठेवावे. आपण हे विसरून चालणार नाही की काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग असून तिथेही लोकशाही लागू आहे. 2/n
धनत्रयोदशी च्या काही दिवस आधीची रात्र. सर्वत्र अंधार आहे. रात्रीच्या मिणमिणत्या प्रकाशात अगदी अंधुक असं दिसतंय. रस्त्यावर गाड्या ही तशा तुरळकच आहेत. गिरगांवातील गायवाडीत स्मशान शांतता पसरली आहे. 3/n
व्हाट्सएप बंद पडलंय. फेसबुक उघडत नाही आहे. तुम्ही आळसावलेल्या अवस्थेत उठून कोणा मित्राला आणि कुठल्या नातेवाईकाला फोन करता. पण सर्व फोन लाईन्स तर बंद आहेत.4/n
तुम्ही तडक टीव्ही लावता. एबीपी माझा वर अंधारच अंधार. तसंच TV9 मराठी बंद पडली आहे. अगदी रिपब्लिक टीव्ही सुद्धा चालत नाही आहे.

दिवाळीच्या उत्सवी वातावरणात हे असं अचानक ह्या शहराला काय झालंय? संपूर्ण शहर एकदम शांत, जणू मृत असल्यासारखं का भासतंय? 5/n
थोड्यावेळात पहाट होते. रेडिओ वरचा रोजचा प्रभातगीताचा कार्यक्रम ऐकू येत नाही. आली दिवाळी, दिव्यादिव्यांची ज्योत सांगते...अशा सुमधुर गाण्यांनी घर कसं सुंदर वाटू लागायचं, आज हे काहीच ऐकू येत नाही. इतकंच काय, साधं वर्तमानपत्र आज दाराशी पडलेलं दिसत नाही.
6/n
तुम्ही थोडे आश्चर्यचकित होता, काहीसे घाबरता. तुम्ही घरातून बाहेर पडून पणशीकरच्या नाक्यावर जाता तर एक लष्करी रणगाडा तुम्हाला तैनात दिसतो.

आता तुम्ही चांगलेच हबकता. पिवळट हिरव्या रंगाच्या युनिफॉर्म मधली राकट माणसं आक्रमक आवेशात तुमच्या दिशेने येऊ लागलेली असतात. 7/n
तुम्ही धावत माघारी फिरता आणि घरी येऊन लपता.

तुमच्या घरासमोरील किराणा मालाचं दुकान बंद दिसतं. कोपऱ्यावरचा बटाटेवडेवाला, चहावाला, मॅजेस्टिक सिनेमाच्या जवळील फेरीवाले सर्व गायब. 8/n
फटाके विकायला बांधलेल्या दुकानांच्या रांगांमध्ये सामसूम , त्यात लागणाऱ्या रेकॉर्डस् बंद. सर्व काही शांत, मृत.

एक लष्करी गाडी तुमच्या परिसरात गस्त घालू लागते. तुम्हाला एकच एक घोषणा ऐकू येऊ लागते, " पूर्ण परिसरात संचारबंदी लागू आहे .तुमच्या संपूर्ण राज्यात सुद्धा "9/n
मुख्यमंत्र्यांचा हेल्पलाईन नंबर तुम्ही जाहिरात बोर्डावरून उतरवलेला असतो. तुम्ही लागलीच तो नंबर फिरवता. पण तुमची लँडलाइन बंद पडलेली असते. आणि मुख्यमंत्री तर तसेही राज्यात नाहीच आहेत. ते तर दिल्लीला पसार झालेले असतात. 10/n
तुम्ही धीर करून खाडिलकर रोडला जाऊन बघता तर समजतं की सर्व विरोधी नेते अटकेत आहेत.

तुमचे अनेक विरोधी नेते, अगदी मवाळ नेत्यांपासून ते आक्रमक नेत्यांपर्यंत, सर्वच्या सर्व नेत्यांना अटक झालेली आहे.11/n
तिथून तुम्ही मंत्रालयाच्या दिशेने जाऊ लागता. आणिक काही नेते अटकेत पडल्याची धक्कादायक बातमी तुम्हाला मिळत राहते. तुमच्या भागाचा नगरसेवक गायब झालेला असतो.
तुमच्या नगरपालिकेचा अध्यक्ष, ज्याला तुम्ही अतिशय धडाडीचं नेतृत्व म्हणून ओळखता, तो ही तुम्हाला कुठेच दिसत नाही.
12/n
तुमची लहानगी एव्हाना आकांडतांडव करायला लागलेली असते. तिला सगळीकडे फिरून,फटाके, रांगोळीचं सामान, छोटुसा कंदील, असं सर्व खरेदी करायचं असतं. तुम्ही तिला आदल्या दिवशी तसं प्रॉमिस केलेलं असतं. तुम्ही त्या चिमुरडीला कसं समजावणार की, ती सुद्धा बंदीवानात अडकल्ये. 13/n
आता थोडं थांबा, दीर्घ श्वास घ्या, कारण अजून एक आघात सहन करायची तयारी तुमच्या घायाळ मनाला करायची आहे .आत्ताच तुम्हाला जाणीव होते की तुमची बायको कदाचित माहेरून, पुण्याहून परतीच्या प्रवासात अडकली असण्याची चांगलीच शक्यता आहे.14/n
तुमचे सासरे, तुमची मेहुणी तिच्या बरोबर असणार होते, पण तुम्हाला काहीच बातमी लागत नाही, त्यांची खुशाली कळू शकत नाही.

ह्या मृत शहरात, ह्या मृत राज्यात तुम्ही एकाकी आहात, बंदिवान, अगदी एकटे! 15/n
श्रीनगर तुमच्या एकाकीपणावर छद्मी हसतंय. पहलगाम आणि कुलगाम तुमच्या आगंतुकतेवर शिट्ट्या वाजवतंय. नगाव आणि बरपेटा तुमच्या असहाय्यतेवर,हतबलतेवर टाळ्या वाजवतंय.16/n
होय, ही अशी अवस्था आहे गेली साठ दिवस काश्मीर ची. साहजिकच आहे, तुम्हाला राग नाही आला. तुम्ही कानाडोळा केलात. तुम्ही पर्वाही केली नाहीत. ज्या काश्मिरी इसमाकडून दर हिवाळ्यात तुम्ही आक्रोड घेता, त्याचा आक्रोश तुम्ही का ऐकाल? 17/n
आसाम मधल्या एकोणीस लाख जनतेला राज्यविहिन घोषित केलं गेलंय. 85 टक्के लोक वेडेपिसे झालेत. त्यांची बीभत्स चित्रं तुमचं हृदय पिळवटून नाही टाकत?18/n
तो जलपायगुडीचा माणूस तुमच्या त्रासलेल्या चेहऱ्याकडे बघून आता हसतोय. दक्षिण दिनाजपुर मधली ती मुलगी तुमच्या चिमुकलीच्या दुःखाकडे आता थट्टेने बघत्ये.

कारण तेव्हा तुम्ही गप्प राहिलात. तोंडातून एक ब्र देखील काढला नाहीत. जणू काही बिनसलंच नाही अशा आविर्भावात जगलात.19/n
आज तुम्ही घाबरला आहात? आज तुमच्या हृदयाचा ठोका चुकतोय? आज तुम्ही विचार करताय, हे असं माझ्या बाबतीत का झालं?
आता हबकू नका. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ही आज हाच विचार छळतोय.20/n
जे काश्मीर मध्ये झालं, जे आसाम मध्ये होतंय, ते उद्या आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतं.. का, आत्ता दचकलात ना?
आता भ्यायची ही वेळ नाही. हतबल व्हायचीसुद्धा ही वेळ नाही. ही वेळ आहे आता लढा द्यायची.21/n
ह्या दिवाळीत तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुम्ही दिवाळी पहाट कार्यक्रमाला गेलात तर तिथे कुलगाम च्या परिस्तिथी बद्दल वाचा फोडा. दिवाळीत आप्तेष्टांबरोबर फराळाची देवाणघेवाण करताना त्या दाल लेक मधील शिकारा चालवणाऱ्या स्त्री बद्दल बोला, जी आता वाट पाहत्ये आतुरतेने... कामाची. 22/n
जरी खड्या आवाजात बोलायचे धैर्य तुम्ही दाखवू शकला नाहीत, तरी तुमच्या सग्या-सोबत्यांच्या कानांत, गोहाटीतल्या बरपेटा मधील लोकांची विराण कहाणी, नक्कीच कुजबुजू शकता. 23/n
दिवाळी म्हणजे एक उत्सव, एक उत्साह. असंख्य आकाशकंदिलांनी प्रकाशमान झालेला परिसर, फराळाचे गोड धोड पदार्थ एकमेकांना प्रेमाने खाऊ घालणं, मनमोहक रांगोळ्यांनी आवार सुशोभित करणं,23/n
भाऊबहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असणारी भाऊबीज, नवराबायकोचं अतूट बंधन सांगणारा पाडवा, नवनवीन दिवाळी अंक वर्तमानपत्राच्या स्टॉल वरून विकत घेणं, फटाक्यांची चंगळ...24/n
दिवाळी म्हणजे गणेश आणि अस्लम ह्या मित्रांनी एकत्र फराळावर ताव मारायचा, आरती आणि फरीदा ह्या सख्यांनी जोडीनं फटाके उडवायचा अभूतपूर्व सण..हे सर्व आनंद राजकारणी लोक कुठे समजू शकणार. नेते मंडळी फक्त राजकारण करण्यात मग्न... त्यांना एकात्मतेची भावना कुठे उमजू शकणार? 25/n
गल्लीतील गणपती आणायला जात धर्म विसरून एकत्र उत्साहाने नाचणारे आम्ही. विसर्जनाच्या दिवशी 'पुढच्या वर्षी लवकर या',अशी गणपती बाप्पाला साश्रु नयनांनी शपथ घालणारे आम्ही. अडीअडचणीला एकमेकांना फोन करून हक्काने बोलावणारे आम्ही...26/n
आज काश्मीरच्या जनतेच्या हाल-अपेष्टांवर इतके कठोर हृदयाचे, इतके अनभिज्ञ कसे झालो? त्यांच्या दुःखाचं, वेदनेचं आम्हाला सोयरसुतक ही असू नये?27/n
असे निष्ठुर होऊ नका, असा पळपुटेपणा करू नका..तुमच्या चिमुकलीसाठी एक तरी रोप लावा.. जेव्हा फुलं बहरतील तेव्हा एक फूल आपल्या परीला द्या आणि तिला सांगा, 'ह्या फुलाची जशी काळजी घेतेस तशी तुझ्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा काळजी घे, त्यांचं संरक्षण कर' 28/n
संवेदनशीलतेने विचार केलात, तर सत्यासाठी लढा देताना तुम्ही डगमगणार नाही
#Kashmir
#काश्मीर

शुभ दिवाळी 29/n
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to Kirti Deolekar
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!