मनोहर गोपाळकृष्ण प्रभुपर्रीकर.
स्वतःला "निष्ठावान संघ स्वयंसेवक" म्हणवून घेण्यातच त्यांना गौरव वाटायचा.
आजच्या काळातील राजकारणी असून सुद्धा आणि तीन-चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा हा माणूस स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी साधा एक मतदारसंघ बांधू शकला नाही.
(१/१४)
आज भारतातील युवराज, जाणते राजे, निम्म्याअधिक गोवऱ्या मसणात गेलेले नेते, बोलता येत नाहीये की नीट चालता येत नाहीये पण मुलांसाठी, नातवांसाठी, पुतण्यासाठी, पुतण्याच्या मुलांसाठी -
(२/१४)
आजकालचा शेम्बडा अपक्ष नगरसेवक सुद्धा स्कॉर्पिओपेक्षा खालच्या दर्जाच्या गाडीवर बुड टेकवणं हा आपल्या घराण्याचा अपमान समजतो तिथे भाई मासे घ्यायला -
(३/१४)
आता गोव्या सारख्या ठिकाणी Foreign Delegates ना Alcohol serve करताना येणारा खर्च -
(५/१४)
इथे भ्रष्टाचाराच्या आरोपात कोर्टाने पोलीस कोठडी दिली म्हणून लगेच "कसंतरी होतंय" म्हणून लीलावती, जसलोक मध्ये ठिय्या मांडणारे #भुजबळ आणि -
(६/१४)
तुमच्या मुलांनी-नातवंडांनी आणि त्यांच्या पुढील आठ-दहा पिढ्यांनी आता काय आमच्या सारख्या सामान्य -
(८/१४)
तुमच्या या अशा निष्ठेने वागण्याबद्दल तुमचा जाहीर निषेध का करू नये ?
खरंतर एवढा #प्रामाणिकपणा पहायची आम्हाला सवय नव्हती. कारण सक्रिय राजकारणात राहून सुद्धा 'लालबहादूर शास्त्री' होता येत हे फक्त पुस्तकातच वाचलं होतं.
(९/१४)
पण तुमची #निष्ठा एवढी तगडी होती की साधा हाफ शर्ट नि चप्पल घालून तुम्ही मॉडर्न गोवा ते सर्जिकल स्ट्राईक सारं काही घडवून आणलं.
(१०/१४)
तुमच्यासारखे काही कर्तव्यनिष्ठ देशवासी आपल्या देशात आहेत आणि त्यांच्याच जीवावर हा देश चालतो आहे हे अंमळ उशीराच कळलं.
कदाचित तुमच्या सारखी माणसं देवाला त्याच्या दरबारात 'जग चालवण्यासाठी' हवी असावीत म्हणूनच -
(११/१४)
एक आदर्श म्हणून नेहमीच तुमची कमी जाणवेल आणि म्हणूनच तुमच्या सारखा 'मूल्यांवरती जगण्याचा' प्रयत्नही नक्कीच करत राहू.
साधेपणाने राहून प्रामाणिकपणे आयुष्यात देशासाठी खूप काही करता येतं हे शिकवल्याबद्दल आम्ही आपले -
१२/१४
की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने,
लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें,
जें दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे,
बुद्ध्याचि वाण धरिंले करिं हे सतीचे !
#वंदेमातरम् 🇮🇳
(१४)